भांडण सोडवायला गेलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 22 Views 1 Min Read
1 Min Read

उदगीर शहरातील बनशेळकी रोड परिसरात राहणाऱ्या लखन व्यंकट सूर्यवंशी याने आपल्या शेजारी राहणाऱ्या महिलेस शिवीगाळ करून लाकडाने मारहाण करण्याच्या उद्देशाने लाकूड हातात घेतले, तेव्हा तेथे उपस्थित असलेल्या 15 वर्षीय मुलीने आपल्या आईला मार लागू नये म्हणून आरोपीच्या हातातील लाकूड धरले.

- Advertisement -

तेव्हा आरोपीने वाईट हेतूने त्या अल्पवयीन मुलीच्या पोटात लाथ मारली आणि फिर्यादी खाली वाकली असता,  स्त्री मनाला लज्जास्पद वाटेल असे वर्तन केले. व अश्लील भाषेत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. अशा आशयाची फिर्याद शिक्षण घेणारी अल्पवयीन पीडित मुलीने उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे दिली आहे.

- Advertisement -

त्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 80 /24 कलम 354, 354(अ), 323, 504, 506 भारतीय दंड विधान संहितेसह कलम 11, 12 बाल लैंगिक अन्याय अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 2012 अन्वये आरोपी लखन व्यंकट सूर्यवंशी याच्याविरुद्ध रीतसर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास ज्येष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक देवकते हे करत आहेत.

- Advertisement -

Share This Article