हिंगोलीतील जवानाने पश्चिम बंगालमध्ये संपवलं जीवन

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 12 Views 2 Min Read
2 Min Read

हिंगोली: हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे येथील भारतीय सैन्य दलात असलेले सैनिक पुंडलिक शिंदे यांना आज ७ जानेवारी रोजी शोकाकुल वातावरणात अखेरचा निरोप देण्यात आला. सेवानिवृत्ती घेऊन लवकरच गावी येणार आहे, असे सांगत पंधरा ते वीस दिवसांपूर्वीच मित्राचा निरोप घेऊन ते कर्तव्यावर गेले होते.

- Advertisement -

पुंडलिक पंडितराव शिंदे यांनी पश्चिम बंगाल येथील सिलिगुडी येथे आपल्या राहत्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची धक्कादायक घटना घडली होती. पांगरा शिंदे येथील असलेले पुंडलिक शिंदे हे सीमा सुरक्षा दलात सन २००१ मध्ये भरती झाले होते. सध्या सिलिगुडी येथे कर्तव्यावर असताना मागील पंधरा ते वीस दिवसांपूर्वी रजा घेऊन आपल्या गावी आले होते. गावाकडील मित्रांना सेवानिवृत्ती घेऊन आता लवकरच आपल्या गावाकडे येणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. मात्र कर्तव्यावर हजर झाल्यानंतर पुंडलिक यांनी ६ जानेवारीच्या दिवशी सिलिगुडी येथे त्यांच्या राहत्या खोलीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.

- Advertisement -

बटालियनच्या वतीने याची माहिती वसमत मधील कुरुंदा पोलीस स्टेशनला कळविण्यात आली होती. गावामध्ये माहिती कळतच संपूर्ण परिसरामध्ये शोककळा पसरली असून मयत जवान शिंदे यांचे पश्चात आईवडील, पत्नी दोन मुले असा परिवार आहे. पुंडलिक यांच्या जाण्याने हा परिवार आता उघड्यावर आला आहे. पश्चिम बंगालमधून त्यांचे पार्थिव शासकीय इतमामात गावाकडे आणले होते. त्यांचे जन्मगावी पांगरा शिंदे येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. यावेळी सैनिक पुंडलिक शिंदे यांना साश्रू नयनांनी श्रद्धांजली देण्यात आली.

- Advertisement -

Share This Article