सलग पाचवी टी 20 मालिका जिंकण्याचा पराक्रम

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 14 Views 3 Min Read
3 Min Read

टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर चौथ्या टी 20 सामन्यात दणदणीत विजय मिळवला. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियन संघाचा 20 धावांनी पराभव केला आहे. भारताने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 175 धावांचे दिलेले आव्हान त्यांना पेलता आले नाही. भारताच्या गोलंदाजांसमोर 7 बळी गमावून ऑस्ट्रेलिया केवळ 154 धावाच करु शकला. यामुळे टीम इंडियाने या विजयासह मालिकाही जिंकली आहे. परंतु हा सामना जिंकणे भारतासाठी विश्वविक्रम ठरला. आता भारतीय संघ सर्वाधिक टी 20 सामने जिंकणारा संघ झाला आहे. यापूर्वी हा विक्रम पाकिस्तानचा नावावर होता.

- Advertisement -

भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियाचा पराभव करत सलग पाचवी टी 20 मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. भारताच्या ऋतुराज गायकवाड याने टी 20 सामन्यात चार हजार धावांचा टप्पा पूर्ण केला. कमी डावांत हा टप्पा गाठणारा तो न्यूझीलंडच्या डीवोन कॉन्वेसह चौथा वेगवान फलंदाज ठरला आहे. सलग तीन डावांत 200 पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय टी 20 धावा करणारा गायकवाड हा रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि विराट कोहली याच्यानंतर चौथा भारतीय फलंदाज ठरला आहे.

- Advertisement -

भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव करताच इतिहास रचला. टीम इंडियाने हा 136वा टी-20 विजय मिळवला. यापूर्वी सर्वाधिक टी-20 मध्ये विजय मिळवणारा संघ पाकिस्तानचा होता. पाकिस्तानने 135 सामन्यात विजय मिळवला आहे. टी-20 मध्ये टाय होणाऱ्या सामन्यांचा निकाल सुपर ओव्हरमध्ये काढला जातो. भारताचे ते विजय धरल्यास 139 सामने भारत जिंकला आहे. पाकिस्तान संघ 136 टी-20 सामने जिंकला आहे. भारतीय संघ आपल्या घरच्या मैदानात 14 टी-20 मालिकेत विजयी ठरला आहे. ऑस्ट्रेलियाचा विचार केल्यास टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव 2019 मध्ये झाला होता. त्यावेळी ऑस्ट्रेलियेने 2-0 अशी मालिका जिंकली होती.\

- Advertisement -

रवि बिष्णोई काय म्हणाला?

“मला टीम इंडियासाठी चांगली गोलंदाजी करण्याची संधी मिळाली. आज मी चांगली गोलंदाजी केली आणि टीम इंडियाला विजय मिळवून देण्यात हातभार लावला. मी आज माझ्या गोलंदाजीने खूश आहे. मी अशीच कामगिरी भविष्यात करत राहीन. आमच्या संघात बरेच तरूण खेळाडू आहेत. प्रत्येक जण चांगली कामगिरी करत आहे. गोलंदाजी प्रशिक्षक साईराज बहुतुले यांचे आभार. त्यांनीही मला मोलाची साथ दिली.”, असं रवि विष्णोई याने सांगितलं.

रवि बिष्णोई याने 4 षटकात फक्त 17 धावा दिल्या आणि 1 गडी बाद केला. तसेच अक्षर पटेलने 4 षटकात 16 धावा देत तीन गडी बाद केले. दुसरीकडे भारताची स्थिती नाजूक असताना फलंदाजीच रिंकू सिंह आणि जितेश शर्मा यांनी जबरदस्त खेळी केली. रिंकू सिंहचं अर्धशतक अवघ्या 4 धावांनी हुकलं. तर जितेश शर्माने 19 चेंडूत 3 षटकार आणि 1 चौकाराच्या मदतीने 35 धावा केल्या.

Share This Article