सोसायटीत खेळणाऱ्या चिमुकल्याला वृद्धाकडून मारहाण

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 2 Views 1 Min Read
1 Min Read

बोरिवलीमध्ये एका सोसायटीच्या आवारात खेळणाऱ्या आठ वर्षांच्या मुलाला एका ज्येष्ठ नागरिकाने मारहाण केली. त्याने दिलेला दम आणि केलेल्या मारहाणीचा या मुलाने प्रचंड धसका घेतला. यामुळे त्याला ‘अॅगोराफोबिया’ हा आजार जडल्याचे डॉक्टरांच्या तपासणीतून स्पष्ट झाले आहे. या प्रकारानंतर मुलाच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून बोरिवली पोलिस ठाण्यात या वृद्धाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

बोरिवली पश्चिमेकडील गार्डन ग्रूव्ह कॉम्प्लेक्स आवारात ९ नोव्हेंबरला काही लहान मुले नेहमीप्रमाणे खेळत होती. त्यांच्या खेळण्याचा त्रास होत असल्याने, याच कॉम्प्लेक्समध्ये वास्तव्यास असलेल्या ६० वर्षीय वृद्धाने या मुलांना दम दिला. खेळू नये यासाठी त्यांनी यातील एका आठ वर्षांच्या मुलाच्या कानशिलात लगावली आणि हाताला धरून त्याला लिफ्टमध्ये ओढत नेले. वृद्धाला घाबरून या मुलाने चड्डीमध्ये लघुशंकाही केली. हा प्रकार लक्षात येताच, त्याच्या पालकांनी वृद्धाचे घर गाठून याबाबत विचारणा केली. त्यांच्या घरच्यांनी माफी मागितली, मात्र वृद्धाच्या वागणुकीत काहीच बदल झाला नसल्याचे लक्षात आले.

- Advertisement -

मारहाणीच्या या घटनेनंतर आठ वर्षांचा मुलगा मानसिक तणावात गेला. वृद्ध वारंवार धमकावत असल्याने, त्याच्या मनात त्यांच्याबद्दल भीती निर्माण झाली होती. झोपेमध्येही तो याबाबत बडबडत असायचा. गर्दीमध्ये, सार्वजनिक ठिकाणी, तसेच खेळायला जाण्यासही घाबरू लागला. त्यामुळे पालकांनी त्याला डॉक्टरकडे नेले. डॉक्टरांनी त्याला ‘अॅगोराफोबिया’ हा आजार जडला असून, त्यामुळे तो घाबरत असल्याचे सांगितले. यामुळे संतापलेल्या पालकांनी या वृद्धाविरुद्ध बोरिवली पोलिस ठाण्यात तक्रार केली.

- Advertisement -

Share This Article