लोकसभा निवडणूक भारतीय जनता पार्टी विरुद्ध भारतीय जनता अशी आहे

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 14 Views 7 Min Read
7 Min Read
Lok Sabha election is Bharatiya Janata Party vs Bharatiya Janata
अहमदपूर  : काँग्रेस पक्षाने गॅरंटी कार्ड जनतेला तेलंगणा, कर्नाटक निवडणुकीत दिले, तिथे काँग्रेसचे सरकार सत्तेत आल्यावर पहिल्या कॅबिनेटमध्ये काँग्रेसने हे सर्व लागू केले. यासाठी भाजपने दहा वर्षांपूर्वी जे संकल्पपत्र जारी केले त्याचे काय झाले ते त्यांनी अगोदर सांगावे, असे आवाहन करुन भाजपने महाराष्ट्रात फोडाफोडीचे राजकारण केले, महायुतीने राज्यात आरक्षणाचे राजकारण केले, असे राजकारण यापूर्वी कधीही महाराष्ट्रात घडले नाही. यामुळे ही निवडणूक भारतीय जनता पार्टी विरुद्ध भारतीय जनता अशी आहे. राज्यात राजकारणाचा बाजार मांडलेल्या भाजपला मतदारांनी धडा शिकवावा, असे आवाहन माजी मंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केले.
रविवार दि. २१ एप्रिल रोजी माजी मंत्री विनायकराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सायंकाळी अहमदपूर तालुक्यातील हडोळती येथे लातूर लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा झाली योवळी ते बोलत होते. यावेळी लातूर लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. शिवाजी काळगे, अहमदपूर विधानसभा मतदार संघाचे निरीक्षक माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लातूर जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय शेटे, अहमदपूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. गणेश कदम, एन. आर. पाटील, चंद्रकांत मद्दे, संजय पवार, श्रीकांत बनसोडे, सिराज जहागीरदार. ज्योतीताई पवार, विलास पवार, नीलकंठ मिरकले, साजिद सय्यद, सोमेश्वर कदम, सांब महाजन, सलमान पटेल, कलीमुद्दिन अहमद, निलेश देशमुख, रामभाऊ बेलाळे, आरडी शेळके, विकास महाजन आदींसह, काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे महाविकास आघाडीचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले की, ही लढाई महाविकास आघाडी विरुद्ध महायुती आहे. ज्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणीस यांच्या सभा होतील, तेथे महाविकास आघाडी जिंकेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी नांदेडला आले होते, पण सामान्य माणसाच्या जीवना बद्दल त्यांनी शब्द काढला नाही. शेतीमालाच्या हमीभावाबद्दल, शेतकरी कर्जमाफी, महागाई यासाठी काहीचे बोलले नाहीत. महायुतीने राज्यात आरक्षणाचे राजकारण केले, असे राजकारण यापूर्वी कधीही महाराष्ट्रात घडले नाही.
भाजपने दहा वर्षांपूर्वी जे संकल्पपत्र जारी केले त्याचे काय झाले ते त्यांनी सांगावे. काँग्रेसचे गॅरंटी कार्ड तेलंगणा, कर्नाटक निवडणुकीत जनतेला तिथे काँग्रेसने दिले. सत्तेत आल्यावर पहिल्या कॅबिनेटमध्ये काँग्रेसने हे सर्व लागू केले. त्याप्रमाणे देशात इंडिया आघाडीचे सरकार आल्यानंतर काँग्रेस गॅरंटी कार्ड लागू करेल. सोयाबीन कापसाला भाव नाही, काँग्रेस गॅरंटी कार्डकडे पाहून मतदारांनी काँग्रेसला मतदान करावे. भाजपने महाराष्ट्रात फोडाफोडीचे राजकारण केले, माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडली, शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला. महायुतीने राज्यात आरक्षणाचे राजकारण केले, असे राजकारण यापूर्वी कधीही महाराष्ट्रात घडले नाही. जात निहाय जनगणना करणे, हे इंडिया आघाडीचे सरकार सत्तेत आल्यावर करेल. जातनिहाय जनगणना बिहारमध्ये झाली, महाराष्ट्रात ही झाली पाहिजे, ही निवडणूक भारतीय जनता पार्टी विरुद्ध भारतीय जनता अशी आहे. राज्यात राजकारणाचा बाजार भाजपने मांडला आहे. यामुळे मतदारांनी महायुतीला निवडणुकीत धडा शिकवावा. या गद्दारांना महाराष्ट्रातील लोकन्यायालयात जनताच सांगेल खरा पक्ष कोणता. पहिल्यांदा मतदान करण्याचा अधिकार मिळालेले असंख्य तरुण डॉ. शिवाजी काळगे यांच्या पाठीशी आहेत. अहमदपूर परिसरातील उसाची गॅरंटी मांजरा परिवार घेईल, नांदेड लातूर रोड रेल्वेचा विकासही आम्ही करणार आहोत, असे सांगून त्यांनी येत्या ७ मेला लातूर लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांच्या नावासमोरील हात चिन्हाचे बटन दाबून त्यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन त्यांनी केले.
लोकांच्या प्रश्नाला भाजपने बगल 
दिली : माजी मंत्री विनायकराव  पाटील
माजी मंत्री विनायकराव पाटील म्हणाले की, जनतेने ही निवडणूक स्वत:च्या खांद्यावर हातावर घेतली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांचा प्रतिनिधी म्हणून प्रत्येक गावात जाऊन प्रचार करावा, लोकांच्या प्रश्नाला भाजपने बगल दिली. गेल्या दहा वर्षात शेतकरी खूप अडचणीत आला आहे. या लातूर जिल्ह्याचे नेतृत्व माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी केले तोच वारसा माजी मंत्री आमदार अमित देशमुख चालवत आहेत. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी ही स्वत:च उमेदवार आहे असे समजून कामाला लागावे, असे असे सांगून त्यांनी येत्या ७ मे रोजी लातूर लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांच्या नावासमोरील हात चिन्हाचे बटन दाबून त्यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन त्यांनी केले.
भाजपच्या जाहिरातीला, थापाला बळी पडू नये: डॉ. शिवाजी काळगे
लातूर लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. शिवाजी काळगे म्हणाले की, महाविकास आघाडीने लोकसभेची उमेदवारी जाहीर करुन आज एक महिना झाला आहे. सर्वसामान्य जनतेने विचारपूर्वक आता मतदान करावे, भाजपच्या जाहिरातीला थापाला बळी पडू नये, भाजप सरकारने सर्वसामान्यांसाठी शेतक-यांसाठी कुठलेच काम केले नाही. शेतीमालाला हमीभाव, कर्ज माफी सारखे विषय सोडवले नाहीत. माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने पाच लाख रुपये पर्यंतचे बिनव्याजी कर्ज शेतक-यांना देते.
मांजरा परिवाराने पंधराशे कोटी रुपये शेतक-यांना वितलित केले आहेत. काँग्रेस पक्षाने महिला, युवक, श्रमिक शेतक-यांसाठी न्याय गॅरंटी दिली आहे. प्रत्येक क्षेत्रात महागाई वाढली आहे. लातूरमध्ये आज रेल्वेची जाळ, पोस्टाच जाळ वाढवायची आहे, महिलांचे प्रश्न सोडवायचे आहेत, त्यामुळे त्यांनी येत्या ७ मे रोजी लातूर लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांच्या नावासमोरील हात चिन्हाचे बटन दाबून मला विक्रमी मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन त्यांनी केले.
डॉ. शिवाजी काळगे यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करावे
शिवसेना जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी म्हणाले की, भाजपने नुसत्या भुलथापा मारल्या, शेतक-याला देशोधडीला लावले, त्यांनी महागाई वाढवली, भाजप निवडून आल्यानंतर देशात पुन्हा निवडणुका होणार नाहीत, त्यामुळे त्यांनी येत्या ७ मे रोजी लातूर लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांच्या नावासमोरील हात चिन्हाचे बटन दाबून त्यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमात अहमदपूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. गणेश कदम, ज्योतीताई पवार, सिराज जहागीरदार यांनी मनोगत व्यक्त केले तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार जाधव ज्ञानेश्वर जाधव यांनी केले.

- Advertisement -

Share This Article