कांद्याच्या निर्यातीवरील बंदी उठवली

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 28 Views 1 Min Read
1 Min Read

मोदी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. यापूर्वी लावण्यात आलेला कांद्यावरील निर्यात बंदी उठविण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली मंत्र्यांच्या समितीने कांद्याच्या निर्यातीला हिरवा झेंडा दाखवला. देशातील कांद्याच्या किंमतींना लगाम घालण्यासाठी सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी आणली होती. 31 मार्च 2024 पर्यंत ही निर्यात बंदी लागू करण्यात आली होती. पण ही मुदत संपण्यापूर्वीच केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात बंदीचा निर्णय हटवला आहे. त्याचा देशातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल.

- Advertisement -

गुजरात आणि महाराष्ट्रात सध्या कांदाचा मबुलक साठा आहे. त्यामुळे केंद्र सरकारने निर्यातीची परवानगीला मंजुरी दिली. केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांना देशातील कांद्याचे उत्पादन आणि साठ्याविषयी माहिती दिली. दोघांमधील चर्चेनंतर बंदी हटविण्याचा निर्णय घेण्यात आला. केंद्र सरकारने 3 लाख मॅट्रिक टन कांदा निर्यातीला मंजूरी दिली आहे. तर बांगलादेशातून 50,000 टन कांद्याच्या निर्यातीला मंजुरी देण्यात आली. या निर्णयाचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.

- Advertisement -

 

- Advertisement -

Share This Article