मोठी बातमी! संपावर गेलेल्या संभाजीनगरच्या 440 आशा सेविका निलंबित; मनपा आयुक्त जी श्रीकांत यांचे आदेश

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 21 Views 2 Min Read
2 Min Read

छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या  440 आशा स्वयंसेवीका निलंबित करण्यात आले आहेत. मनपा आयुक्त जी श्रीकांत यांनी याबाबत आदेश काढले आहेत. संभाजीनगर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या आशा स्वयंसेविकांनी संप पुकारला होता. दरम्यान, आरोग्य विभागाला वेठीस धरू नाही आणि 24 तासात कामावर हजर होण्याची नोटीस अशा सेविकांना देण्यात आले होते. मात्र, या नोटीसकडे दुलर्क्ष केल्याने आणि कामावर हजर न झाल्याने मनपा आयुक्तांनी तब्बल 440 आशा सेविकांच्या निलंबनाचे आदेश काढले आहेत. त्यामुळे महानगरपालिकेत खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

मानधन वाढीसह आपल्या प्रलंबित विविध मागण्यांसाठी आशा स्वयंसेवी संघटनेने राज्यव्यापी संप पुकारला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अशा सेविका देखील या संपात सहभागी झाले आहेत. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर महापालिकेत कार्यरत असलेल्या 511 आशा स्वयंसेविकाही सुद्धा या संपात सहभागी आहेत. मात्र, याच संपाचे परिणाम आरोग्य विभागावर होतांना पाहायला मिळत आहे. त्यामुळे, अशा सेविकांनी तात्काळ कामावर हजर राहण्याबाबत दोन वेळेस आरोग्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना नोटिसा बजावल्या होत्या. मात्र, आपल्या मागण्यांवर ठाम असलेल्या अशा सेविकांनी या नोटीसची कोणतेही दखल घेतली नाही. नोटीस बजावल्यावर 511 आशा सेविकांपैकी केवळ 71 जणी कामावर हजर झाल्या होत्या.

- Advertisement -

अशा सेविका आपल्या मागण्यावर ठाम…

मानधन वाढीसह आपल्या प्रलंबित विविध मागण्यांसाठी आशा स्वयंसेवी संघटनेने राज्यव्यापी संप पुकारला आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिकेत कार्यरत असलेल्या 511 आशा स्वयंसेविका सुद्धा या संपत सहभागी झाल्या होत्या. यातील71 जणी कामावर हजर झाल्या आहेत. मात्र, कामावर हजर न झालेल्या महापालिकेच्या 440 आशा स्वयंसेवीका निलंबित करण्यात आले आहेत. मात्र, या कारवाईनंतर देखील अशा सेविका आपल्या मागण्यावर ठाम असल्याची माहिती मिळत आहे.

- Advertisement -

राज्यभरात अशा सेविका संपावर…

आपल्या प्रलंबित मागण्यासाठी राज्यभरात अशा सेविका संपावर गेल्या असून, ठिकठिकाणी त्यांच्याकडून आंदोलन देखील करण्यात येत आहे. दरम्यान, शुक्रवारी ठाण्यातील कोर्ट नका परिसरात राज्यभरातील अनेक अशा सेविका येऊन धडकल्याचे पाहायला मिळाले. यावेळी अशा सेविकांनी आक्रमक पवित्रा घेत जोरदार घोषणाबाजी देखील केली. यावेळी महिला पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी आंदोलक अशा सेविका यांनी मंत्रालयापर्यंत पदयात्रा काढण्याचा निर्णय घेतला होता. मात्र. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आश्वासनानंतर पदयात्रा काढण्याचा निर्णय मागे घेण्यात आला. मात्र, राज्यभरातील आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा यावेळी अशा सेविका यांच्याकडून देण्यात आला आहे.

Share This Article