मुंबईला निघण्यापूर्वी जरांगेंनी शेवटचा डाव टाकला, सरकारची अडचण वाढणार

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 95 Views 2 Min Read
2 Min Read

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी काही वेळात मनोज जरांगे  आंतरवाली सराटीमधून मुंबईकडे  निघणार आहे. मात्र, त्यापूर्वी पत्रकार परिषद घेऊन मनोज जरांगे यांनी सरकारवर शेवटचा डाव टाकला आहे. मनोज जरांगे यांच्या या एका वक्तव्याने सरकारची अडचण वाढणार आहे. कारण मुंबईकडे निघण्यापूर्वी मनोज जरांगे मराठा समाजाशी संवाद साधणार आहे. यावेळी मुंबईकडे निघतांनाच आंतरवाली सराटीमधूनच आमरण उपोषण सुरू करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो असं मनोज जरांगे म्हणाले आहे. त्यामुळे सरकारची मोठी अडचण वाढू शकते.

- Advertisement -

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी सरकारला दिलेली मुदत संपली असून, आजपासून मनोज जरांगेसह लाखो मराठे मुंबईकडे कूच करणार आहे. विशेष म्हणजे मुंबईकडे जाताना अंतरवाली सराटीमधूनच आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याचं जरांगे म्हणाले आहे. जर, उपाशीपोटी आंदोलकांनी मुंबईपर्यंत प्रवास करणं शक्य नाही, आणि तसं झाल्यास काही दुर्दैवी घटना घडू नये अशी अपेक्षा आहे. मात्र जरांगे यांचे या घोषणेमुळे सरकारची अडचण वाढणार आहे.

- Advertisement -

रात्रभर झोप लागली नाही: जरांगे 

दरम्यान यावेळी बोलतांना मनोज जरांगे म्हणाले की,“ राज्यात 54 लाख नोंदी सापडल्या आहेत. करोडोच्या संख्येने लोक एकत्र येत आहेत, 250-300 आत्महत्या झाल्या आहेत. ततरीही सरकार निर्णय घेत नाही. एवढं निर्दयी सरकार असू शकत, ज्या मराठ्यांनी त्यांना गादीवर बसवलं, त्यांना हक्काचं आरक्षण देऊ शकत नाही. त्यामुळे आता यांचा राजकीय सुपडासाफ केल्याशिवाय राहायचं नाही. एवढा निर्दयीपणा आमदार, खासदारामध्ये असू शकतो. मी समाजात असेल नसेल, मराठ्यांनी एकजूट तुटू देऊ नका असे म्हणत जरांगे भावूक झाले. पैठणला एका तरुणाने आत्महत्या केली, आई-वडीलांना तो एकुलताएक मुलगा होता. त्याचे वडील येऊन म्हणाले जाऊ द्या माझा मुलगा समाजासाठी गेला तरीही चालेल. यामुळे मी रात्रभर झोपू शकलो नाही, त्यामुळे रात्रीच ठरवलं तिथे जाऊन मरण्यापेक्षा येथूनच आमरण उपोषण सुरु करायचं. आता आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही, असे जरांगे म्हणाले.

- Advertisement -

सरकारच्या दारात मरण आले तरीही चालेल…

मनोज जरांगे यांच्या मुंबई आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर स्राकारडून त्यांचे आंदोलन थांबवण्यासाठी अनेक प्रयत्न झाले. अनेकदा सरकारच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली. बच्चू कडू यांच्या मार्फत देखील सरकारने जरांगे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, मनोज जरांगे आपल्या भूमिकावर ठाम असल्याचे पाहायला मिळत आहे. सरकारच्या दारात मरण आले तरीही चालेल पण आपण मुंबईला जाणारचं आणि मराठा आरक्षण मिळवणारच असे जरांगे म्हणाले आहेत.

Share This Article