मुंबईला निघण्यापूर्वी मनोज जरांगे यांचा संदेश, म्हणाले, मराठ्यांनो…

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 36 Views 2 Min Read
2 Min Read

जालना : मराठा आंदोलनासाठी मनोज जरांगे पाटील उद्या २० जानेवारी रोजी मुंबईत निघाणार आहे. मुंबई दौऱ्यापूर्वी त्यांनी मराठा समाजाला महत्वाचा संदेश दिला. मराठा समाजाने आता घरी बसू नये. हे शेवटचे आंदोलन आहे. मराठा समाजाने ताकदीने मुंबईकडे निघा. मराठे भीत नाहीत आणि आम्ही गुन्हे दाखल होण्यास भीत नाहीत. आम्ही मुंबईला जाणार आहोत. मी आणि माझा समाज 26 जानेवारीला मुंबईत आमरण उपोषण करणार आहे. 26 तारखेला गल्ली गल्लीत मराठा समाज दिसणार आहेत. मी मरायला भीत नाही. मी मुंबईवरुन आता आरक्षण घेऊन येणार आहे. आपण शांततेत चाललो आहोत, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.

- Advertisement -

दुरुस्तीच्या नावाखाली वेळ मारण्याचा प्रकार

शासनाकडून सुधारणा आणि दुरुस्तीच्या नावाखाली वेळ मारून नेला जात आहे. अध्यादेश महत्त्वाचा आहे. पण ज्यांच्या नोंदी मिळाल्या आहेत त्यांना दाखले दिले पाहिजे. आता 54 लाख लोकांना नोंदी मिळाल्या आहे. समितीने किती काम केले हे बघणे महत्वाचे आहे. ड्राफ्ट सुधारणा फक्त बहाणे आहेत. मी मराठ्यांची फसवणूक होऊ देणार नाही. आता 54 लाख लोकांना प्रमाणपत्र भेटले पाहिजे

- Advertisement -

सग्या सोयऱ्यांना आरक्षण द्या

सर्वेक्षण व्हायला पाहिजे आम्ही ते नाकारले नाही पण ते टिकले पाहिजे. सुप्रीम कोर्टाकडून मिळणाऱ्या आरक्षणामुळे नुकसान होणार आहे. आता एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष देणे खूप गरजेचे आहे. बचू कडू हे प्रामाणिक आहेत. त्यांनी दिलेले आश्वासन ते पाळतात. यापूर्वी जे उपोषण सोडायला आले होते त्यांना मराठ्यांची गरज नाही का..? मग 54 लाख नोंदीच्या आधारे त्यांच्या सग्या सोयऱ्यांना ओबीसी प्रमाणपत्र का देत नाही? असा प्रश्न मनोज जरांगे पाटील यांनी विचारला.

- Advertisement -

Share This Article