धाराशिवमध्ये पहिला जेएन १ रुग्ण; तुळजापूर तालुक्यातील मेसाई जवळगा येथील एका १४ वर्षीय बालक

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 24 Views 2 Min Read
2 Min Read

धाराशिव: जिल्ह्यात जे एन- १ या नवीन प्रजातीच्या व्हेरियंटने प्रवेश केला असून त्याने एका १४ वर्षीय रुग्णाला ग्रासले आहे. तो रुग्ण तुळजापूर तालुक्यातील मेसाई जवळगा येथील असून नागरिकांनी दक्षता घेणे आवश्यक आहे. कारण दि. २० मार्च २०२० साली उमरगा तालुक्यातील बलसूर येथे पुण्याहून आलेले रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले होते.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, नवीन प्रजातीच्या व्हेरियंटने जिल्ह्यामध्ये प्रवेश केला असून तुळजापूर तालुक्यातील मेसाई जवळगा येथील एका १४ वर्षीय बालकाला त्याची लागण झाल्याचा प्राथमिक अंदाज आरोग्य विभागाने वर्तविला आहे. त्याची रॅपिड नमुना पॉझिटिव्ह आला आहे. तर आरटीपीसीआरसाठी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसरातील कोविड १९ विषाणू तपासणी प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. त्याचा अहवाल उद्या दि. २९ डिसेंबर रोजी आल्यानंतर तो पॉझिटिव्ह आहे किंवा नाही याचे निदान होणार होईल. तसेच जिल्ह्यातील इतर १४ जणांचे रॅपिड (रॅट) तपासणी म्हणजेच कोरोना तपासणी केली असून ते सर्व नमुने नेगेटीव्ह आले आहेत.

- Advertisement -

त्या पॉझिटिव्ह रुग्णास तुळजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असून घरातील इतर नातेवाईकांना कोणत्याही प्रकारची लक्षणे नाहीत. मात्र नागरिकांनी याबाबत दक्षता घ्यावी, असे आवाहन माहिती निवासी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. इस्माईल मुल्ला यांनी केले आहे. विषाणूंची बाधा झालेल्या रुग्णाला दोन-तीन दिवस ताप येतो. त्यानंतर खोकला सुरू होतो. मात्र हा आजार जास्त बळवणारा आणि घातक नसल्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. तसेच अशी लक्षणे दिसताच नजीकच्या रुग्णालयात जाऊन वेळीच उपचार घ्यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी केले आहे.

- Advertisement -

Share This Article