बस आणि डंपरचा भीषण अपघात, 12 जणांचा होरपळून मृत्यू

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 10 Views 1 Min Read
1 Min Read

मध्य प्रदेशमधील गुना जिल्ह्यात बुधवारी रात्री भीषण अपघाताची घटना घडली. बस आणि डंपरमध्ये भीषण अपघात  झालाय. अपघातानंतर बस पटली झाली अन् आग लागली. यामध्ये 12 जणांचा मृत्यू झाला. तर 14 प्रवाशी जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच उपस्थितांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली. जखमी प्रवाशांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेय. सध्या सर्व जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे समजतेय.

- Advertisement -

स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बस आणि डंपरचा अपघात बुधवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास घडली. गुना – आरोन महामार्गावर हा भीषण अपघात झाला. डंपर महामार्गावर उलट्या दिशेने येत होता.. त्यावेळी डंपने प्रवाशी बसला जोरदार धक्का दिला. डंपरची धडक बसल्यामुळे बस पलटी झाली. त्यानंतर बसला भीषण आग लागली. या आगीमध्ये 14 जणांचा होरपळून मृत्यू झालाय.

- Advertisement -

गुना येथे झालेल्या भीषण अपघातावर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी दु:ख व्यक्त केलेय. त्याशिवाय आर्थिक मदतीची घोषणाही केली. मुख्यमंत्री मोहन यादव यांनी  एक्स (ट्विटर) वर म्हटलेय, गुनावरुन आरोनला जाणाऱ्या बसमध्ये भीषण आग लागल्यामुळे प्रवाशांचा मृत्यू झाल्याचं समजलं, हे वृत्त वाचून दु:ख झालेय. या हृदय विदारक अपघातामध्ये मृत्यू झालेल्या नागरिकांच्या कुटुंबियांच्या दुखा:त सहभागी आहे.

- Advertisement -

Share This Article