141 निलंबित खासदारांसाठी लोकसभा सचिवालयाचे नविन फर्मान

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 7 Views 1 Min Read
1 Min Read

नवी दिल्ली : संसदेच्या या हिवाळी अधिवेशन काळात आतापर्यंत १४१ खासदारांना निलंबित करण्यात आले आहे.  या १४१ निलंबित खासदारांसाठी लोकसभा सचिवालयाकडून नवीन नोटीस जारी करण्यात आली आहे.  यात त्यांना काही सूचना देण्यात आल्या आहेत. निलंबित खासदारांना लॉबीत प्रवेश दिला जाणार नाही. निलंबित खासदारांनी दिलेल्या नोटीस, ठरावाच्या सूचना ग्राह्य धरण्यात येणार नाहीत. निलंबित खासदार ज्या समितीचे सदस्य असतील. त्या समितीच्या बैठकांना हजर राहण्याचा त्यांना अधिकार नाही. तसंच दैनिक भत्त्यांना निलंबित खासदार पात्र नाहीत, या बाबींचा समावेश या परिपत्रकात आहे.

- Advertisement -

संसदेच्या इतिहासात कधीही घडली नव्हती अशी घटना सध्या घडत आहे. एका मागोमाग एक विरोधी पक्षातील खासदारांना निलंबित करण्यात येत आहे. कालपर्यंत एकूण १४१ खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. लोकसभेच्या ९५ खासदारांना  तर राज्यसभेच्या ४६ खासदारांना  निलंबित करण्यात आले  आहे. यात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, शिरूरचे राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांचा समावेश आहे. खासदारांच्या निलंबनाचे देशभर पडसाद उमटत आहेत.

- Advertisement -

- Advertisement -

Share This Article