शाहरुखची पत्नी गौरी खानला ईडीची नोटीस; 30 कोटींचा गंडा घातल्याचा आरोप

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 20 Views 2 Min Read
2 Min Read

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची पत्नी गौरी खान ब्रँड अॅम्बेसेडर असलेल्या तुलसियानी ग्रुपवर गुंतवणुकदार आणि बँकांना सुमारे 30 कोटींचा गंडा घातल्याचा आरोप तिच्यावर लावण्यात आला आहे. गौरी खानला  ईडीने  नोटीस पाठवली आहे.

- Advertisement -

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची पत्नी गौरी खानला ईडी (अंमलबजावणी संचालनालय) ने नोटीस पाठवली आहे. गौरी खान ही लखनौस्थित रिअल इस्टेट कंपनी तुलसियानी ग्रुपची ब्रँड अॅम्बेसेडर आहे.  कंपनीवर गुंतवणूकदार आणि बँकांचे अंदाजे 30 कोटी रुपयांचा गंडा घातल्याचा आरोप आहे.  गौरी खानही या कंपनीच्या चाकोरीत येत आहे.

- Advertisement -

नेमकं प्रकरण काय? 

- Advertisement -

लखनऊमध्ये सुशांत गोल्फ सिटीमध्ये तुलसियानी ग्रुपचा एक प्रोजेक्ट आहे. मुंबईचे रहिवासी किरीट जसवंत शहा यांनी या प्रकल्पात 2015 मध्ये 85 लाख रुपयांना फ्लॅट खरेदी केला होता, मात्र कंपनीने त्यांना ना ताबा दिला आहे ना ही रक्कम परत केली आहे. त्यामुळे जसवंत शहा यांनी तुलसियानी समूहाचे संचालक अनिल कुमार तुलसियानी, महेश तुलसियानी आणि गौरी खान यांच्यावर नुकताच गुन्हा दाखल केला आहे.

गौरी खानवर आरोप करत किरीट जसवंत शाह म्हणाले की,”गौरी खाननेच तुलसियानी ग्रुप प्रोजेक्टचा प्रचार केला होता. गौरी खानवर विश्वास ठेवत मी ही प्रॉपर्टी विकत घेतली होती. पण मेहनतीच्या पैशांनी विकत घेतलेला फ्लॅट अद्याप मला मिळालेला नाही. या प्रकरणी गौरी खानची चौकशी होणार आहे”.

30 कोटींचा गंडा घातल्याचा आरोप

ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रियल इस्टेट कंपनी तुलसियानी ग्रुप प्रकरणामुळे गौरी खान चर्चेत आहे. या तुलसियानी ग्रुपची गौरी खान ब्रांड एंबेसडर आहे. 30 कोटींचा गंडा घातल्याचा आरोप गौरीवर करण्यात आला आहे. गौरी खान मुख्य आरोपी नसली तरी ती या प्रकरणाचा भाग आहे. गौरीने अद्याप या प्रकरणावर काहीही भाष्य केलेलं नाही.

गौरी खान 2015 साली ‘तुलसियानी कन्स्ट्रक्शन अॅन्ड डेव्हलपर्स लिमिटेड’ या कंपनीची ब्रँड अॅम्बेसेडर होती. त्यावेळी त्यांच्या या प्रोजेक्टचं ती खूप प्रमोशन करत होती. लखनौच्या सुशांत गोल्फ सिटी सेक्टर – 1 पॉकेट डीमध्ये फ्लॅट बांधले जात असल्याची माहिती गौरीने जाहिरातीच्या माध्यमातून दिली होती. या जाहिरातीमुळे ते प्रभावित झाले आणि लगेचच 85 लाखांचा हा फ्लॅट विकत घेतला. त्यावेळी 2016 मध्ये पझेशन मिळेल असे सांगण्यात आले होते. पण पूर्ण पैसे घेतल्यानंतरही त्यांना अद्याप फ्लॅटची चावी मिळालेली नाही.

Share This Article