पॅट कमिन्स आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 17 Views 2 Min Read
2 Min Read

दुबई : आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक बोली यावेळी IPL 2024 Auction मध्ये लागल्याचे पाहायला मिळाले. कारण यापूर्वी इंग्लंडचा सॅम करन हा आयपीएलमधील सर्वात महागडा खेळाडू होता. गेल्या आयपीएलच्या लिलावात पंजाब किंग्स या संघाने करनला १८.५० कोटी रुपये देत आपल्या संघात सहभागी केले होती. पण या आयपीएलमध्ये मात्र सर्वाधिक पैसे मोजले ते सनरायझर्स हैदराबादच्या संघाने. हैदराबदच्या संघाने यावेळी तब्बल १० पट जास्त किंमत मोजली आणि मॅचविनर खेळाडूला आपल्या संघात स्थान दिले.

- Advertisement -

ऑस्ट्रेलियाने यावर्षी वनडे वर्ल्ड कप जिंकला. यावेळी ऑस्ट्रेलियाच्या विजयात सर्वात मोलाचा वाटा उचलला होता तो कर्णधार पॅट कमिन्सने. त्यामुळे कमिन्सचे नाव जेव्हा लिलावात घेतले तेव्हा त्याच्यावर मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांनी बोली लावायला सुरुवात केली. चेन्नई आणि मुंबई यांच्यात यावेळी चांगलीच चुरस रंगली होती. पण काही वेळात मुंबईच्या संघाने माघार घेतली आणि त्यामुळे चेन्नईचा संघ आता कमिन्सला आपल्या संघात स्थान देणार, असे वाटत होते. पण त्यावेळी हैदराबादच्या काव्या मारनने यावेळी लिलावात एंट्री घेतली. त्यानंतर चेन्नई आणि हैदराबाद यांच्यामध्ये बोली सुरु झाली. काही वेळात चेन्नईच्या संघानेही माघार घेतली. त्यामुळे आता कमिन्स हैदराबादच्या संघात जाईल, असे वाटत होते. पण त्यावेळी लिलावात एंट्री झाली ती आरसीबीच्या संघाची. त्यानंतर आरसीबी आणि हैदराबाद यांच्यामध्ये चांगलीच शर्यत रंगल्याचे पाहायला मिळाले. कारण हैदराबाद आणि आरसीबी या दोन्ही संघांनी कमिन्ससाठी मोठ्या बोली लावायला सुरुवात केली. त्यावेळी कोणताही संघ मागे हटण्याच्या तयारीत नव्हता. त्यामुळे तब्बल १० पट रक्कम कमिन्सला मिळाली. हैदराबादने अखेर २० कोटी ५० लाख रुपयांची बोली कमिन्सवर लावली. त्यानंतर आरसीबीने माघार घेतली आणि आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू हैदराबादच्या संघाने घेतला.

- Advertisement -

वर्ल्डकप गाजवणाऱ्या रचिन रवींद्रला किंमतच नाही

खरा धक्का तेव्हा बसला ज्यावेळी वर्ल्डकप गाजवणाऱ्या रचिन रवींद्रला  खूपच कमी बोली लावण्यात आली. न्यूझीलंडचा ऑलराऊंडर रचिन रवींद्रवर सर्वाधिक बोली लागेल, असा अंदाज लावला जात होता.  न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू रचिन रवींद्रवर खूप कमी बोली लावली, तर त्याच्या नावासाठी मोठी बोली अपेक्षित होती. रचिन रवींद्रला चेन्नई सुपर किंग्सनं अवघ्या 1 कोटी 80 लाख रुपयांना विकत घेतलं आहे. या खेळाडूच्या नावावरही मोठी बोली लागेल, अशी अपेक्षा होती. मात्र, रचिन रवींद्रवर सर्वात कमी बोली लागली.

- Advertisement -

Share This Article