गॅस सिलिंडरवर ६ लाखांपर्यंत विमा कव्हर, दुर्घटनेनंतर मिळेल नुकसान भरपाई

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 15 Views 2 Min Read
2 Min Read

नवी दिल्ली : एलपीजी सिलिंडरचा वापर करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. गेल्या काही महिन्यांपासून एलपीजी गॅसच्या किमतींनी सर्वसामान्यांना हैराण करून सोडले आहे. एकीकडे व्यावसायिक सिलिंडरच्या किमती गगनाला भिडल्या आहेत तर घरगुती दर स्थिर ठेवण्यात आले आहेत. दरम्यान, एलपीजी सिलिंडर दुर्घटनाग्रस्त झाल्यास होणाऱ्या नुकसानीची तेल विपणन कंपन्या (OMCs) भरपाई देतात. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी यासंदर्भात लोकसभेत हिवाळी अधिवेशनात सविस्तर माहिती दिली.

- Advertisement -

तेल विपणन कंपन्यांसोबत रजिस्टर्ड सर्वच एलपीजी उपभोक्त्यांना विमा कव्हर दिलेले असून एलपीजी सिलिंडरच्या आगीमुळे मृत्यू झाल्यास प्रति व्यक्ती सहा लाख रुपयांचे व्यैयक्तीक अपघात कव्हर दिले जाते तर प्रति व्यक्ति कमाल दोन लाख रुपयांसह प्रति घटनेसाठी ३० लाख रुपयांपर्यंत वैद्यकीय खर्च तेल विपणन कंपन्या उचलते. त्याचप्रमाणे मालमत्तेचे नुकसान झाल्यास प्रति घटना कमाल दोन लाख रुपयांपर्यंतचे कव्हर मिळते.

- Advertisement -

LPG विम्यासाठी काय करावे?
ग्राहकाच्या परिसरात कुठल्याही प्रकारची दुर्घटना झाल्यास सर्वप्रथम संबंधित तेल विपणन कंपनीच्या वितरकाला कळवा. यानंतर वितरकाकडून तेल विपणन कंपनीच्या कार्यालयाला माहिती दिली जाईल ज्यावर तेल विपणन कंपनीचे कार्यालय विमा कंपनीला माहिती देते, मग नंतर संबंधित विमा कंपनी विमा पॉलिसींच्या तरतुदींनुसार दाव्याच्या निपटाऱ्यासाठी निर्णय घेते.

- Advertisement -

एलपीजी सिलिंडरची किंमत काय?
तेल विपणन कंपन्या दार महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी सिलेंडरच्या किमती सुधारित करते. यावर्षी सप्टेंबरमध्ये सरकारने घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत २०० रुपयांची कपात करण्याची घोषणा केली होती. याशिवाय सरकारने उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना एलपीजी सिलिंडरवर दिल्या जाणाऱ्या २०० रुपयांच्या अनुदानातही वाढ केली त्यानंतर योजनेतील सबसिडी प्रति एलपीजी सिलिंडर ३०० रुपये झाली.

अशाप्रकारे राजधानी दिल्लीत प्रति एलपीजी सिलिंडरची किंमत ९०३ रुपये असून उज्जवला योजनेच्या लाभार्थ्यांना प्रति सिलिंडर ६०३ रुपये खर्च होत आहे.

TAGGED: ,
Share This Article