खिचडी घोटाळ्याचे धागेदोर संजय राऊत यांच्या कुटुंबीयांपर्यंत?

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 7 Views 3 Min Read
3 Min Read

राज्यात कोविड काळात गाजलेल्या खिचडी घोटाळ्याचे  धागेदोरे आता थेट ठाकरे गटाचे  खासदार संजय राऊत यांच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचल्याचं बोललं जात आहे. खिचडी घोटाळ्यातील भ्रष्टाचाराचे पैसे मुख्य आरोपी राजीव साळुंखे  यांच्या खात्यातून संजय राऊतांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर  यांच्या खात्यात जमा झाले. त्यानंतर हे पैसे संजय राऊतांचे भाऊ संदीप राऊत  आणि कन्या विधीता राऊत  यांच्या खात्यात पैसे जमा झाल्याचं पोलीस तपासात समोर आल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा खासदार संजय राऊत यांच्यासह राऊत कुटुंबीयांच्याही अडचणी वाढणार असल्याचं बोललं जात आहे.

- Advertisement -

कोविड काळात खिचडीचं कंत्राट मिळालेल्या सह्याद्री रिफरेशमेन्ट कंपनीचे राजीव सांळुखे यांच्या खात्यातून लाखोंचा निधी सुजीत पाटकर यांच्या खात्यात जमा झाल्याचे पुरावे आता समोर आले आहेत. सुजीत पाटकरांच्या खात्यातून हाच निधी संजय राऊतांचे भाऊ संदीप राऊत आणि कन्या विधीता राऊतांच्या खात्यात जमा झाल्याची माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

नेमका हा खिचडी घोटाळ्यातील पैसा कसा फिरवला गेला? 

  • सुजीत पाटकर यांच्या खात्यातून संदीप राऊत यांच्या खात्यावर 7.75 लाख रुपये तर विधिता राऊत यांच्या खात्यावर 14.75 लाख जमा झाल्याचे पोलीस तपासात उघड
  • कोविड काळात खिचडी बनवण्याचे कंत्राट चुकीच्या पद्धतीने देऊन, मोठा भ्रष्ट्राचार केल्याचे पोलिस तपासात उघड
  • खिचडी बनवण्याचे कंत्राट मिळवण्यासाठी बोगस कंपनीची कागदपत्रे देऊन कंत्राट मिळवल्याचा पोलिसांच आरोप
  • खिचडी बनवण्याचे कंत्राट संजय राऊत यांचे निकटवर्तिय बाळा कदम यांच्या मे वैष्णवी किचन (सह्याद्री रिफरेशमेन्ट) या नावाने देण्यात आले
  • मूळात या कंपनीचा पत्ता चुकीचा देण्यात आला असून या कंपनीकडे अन्न व प्रशासनाचा परवाना नसतानाही वाटाघाटी करून ते कंत्राट दिल्याचे पोलीस तपासात उघड झालंय.
  • इतक्यावरच न थांबता मुंबई महापालिकेने प्रति 300 ग्रॅम खिचडीचे 33 रुपये मंजूर केले असताना, प्रत्यक्षात मात्र 100 ग्रॅम खिचडीचे वाटप करत 5 कोटी 93 लाख 97 हजार 235 रुपये स्विकारून प्रत्यक्षात खिचडी बनवण्यासाठी 3.20 कोटी देत, उर्वरित 2 कोटी 3 लाखाच्या निधीचा गैर वापर केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
  • खिचडी वाटपाची वर्क ऑर्डर मिळवून देण्यास मदत केल्याचे आणि खिचडी कन्सलटन्सी सर्विसेस पुरवल्या म्हणून मे एमएसपी असोसिएटचे सुजीत पाटकर यांना गैर लाभातून  पैसे मिळाल्याची सूत्रांची माहिती
  • सुजीत पाटकर यांच्या खात्यातून गैरलाभातून मिळालेले 45 लाख रुपये तसेच सुजीत पाटकर यांच्या सांगण्यानुसार विधिता राऊत यांच्या खात्यात 14.75 लाख, तर संदीप राऊत याच्या खात्यात 7.75 लाख रुपये वळते केल्याचेही पुरावे पोलिसांना सापडले असून या आर्थिक घोटाळ्याचा अधिक तपास पोलिस करत आहेत.

खिचडी घोटाळा नेमका आहे तरी काय? 

मुंबई महानगरपालिकेचा कोरोना काळातील बॉडी बॅग घोटाळा चर्चेत असतानाच आता आणखी एका घोटाळ्या प्रकरणी कारवाई सुरू झाली आहे. मुंबई महानगरपालिकेचा 100 कोटींचा कोविड घोटाळा आता समोर आला आहे. गरिब मायग्रेन कामगारांसाठी, ज्यांचे स्वत:चे मुंबईत घर नाही त्यांना लॉकडाऊन काळात जेवणाची व्यवस्था करण्याचा निर्णय तत्कालीन सरकारनं घेतला होता. भारत सरकारचंही त्याला समर्थन होतं. या मायग्रेन कामगारांना खिचडी देण्याचं कॉन्ट्रॅक्ट 52 कंपन्यांना मुंबई महानगरपालिकेनं दिलं होतं. सुरुवातीच्या 4 महिन्यात 4 कोटी खिचडी पॅकेट वाटण्यात आले, असं मुंबई महानगरपालिकेचे म्हणणं आहे. पण यामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्याचीच चौकशी सुरू आहे.

- Advertisement -

Share This Article