भारतीय वायुसेनेच्या शिकाऊ विमानाचा तेलंगणामध्ये अपघात; दोन वैमानिकांचा जागीच मृत्यू

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 1 View 2 Min Read
2 Min Read

भारतीय वायुसेनेच्या शिकाऊ विमान  तेलंगणामध्ये  अपघातग्रस्त झालं आहे. या अपघातात दोन वैमानिकांचा मृत्यू झाला आहे. तेलंगणामध्ये भारतीय हवाई दलाचे  ट्रेनर विमान  कोसळल्याची बातमी समोर आली आहे. तेलंगणातील मेडक जिल्ह्यात ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघाताच्या वेळी विमानात एक ट्रेनर पायलट आणि एक ट्रेनी पायलट होते. या अपघातात दोन्ही वैमानिकांचा मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

वायुसेनेचं शिकाऊ विमान अपघातग्रस्त

हैदराबादमध्ये सोमवारी, 4 डिसेंबरला वायसेनेच्या विमानाचा अपघात झाल्याची दुःखद घटना घडली आहे. भारतीय वायुसेनेचे ट्रेनर विमानाचा आज सकाळी अपघात झाला. या अपघाता दोन वैमानिकांचा मृत्यू झाला आहे. खुद्द हवाई दलाने ही माहिती दिली आहे. भारतीय हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, सकाळी 8.55 वाजता तेलंगणातील दिंडीगुल येथील वायुसेना अकादमीमध्ये पिलाटस प्रशिक्षण विमानाला अपघात झाला. या विमान अपघातात हवाई दलाच्या दोन वैमानिकांचा मृत्यू झाला.

- Advertisement -

 

- Advertisement -

दोन वैमानिकांचा जागीच मृत्यू

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार की, विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दोन वैमानिकांपैकी एक प्रशिक्षक होता, तर दुसरा हवाई दलाचा कॅडेट होता. Pilatus PC7 Mk 2 हे विमान सोमवारी सकाळी वायुसेना अकादमीतून नियमित प्रशिक्षणासाठी निघाले होतं, पण वाटेत या विमानाचा अपघात झाला. अधिकाऱ्यांनी पुढे सांगितलं की, विमानातील दोन्ही पायलटचा जागीच मृत्यू झाला आहे.

संरक्षणमंत्र्यांनी व्यक्त केला शोक

तेलंगणामध्ये झालेल्या विमान अपघातावर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शोक व्यक्त केला आहे. राजनाथ सिंह यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करत लिहिलं आहे की, ‘हैदराबादजवळ झालेल्या अपघाताची बातमी समजल्यावर दुःख झालं. दोन वैमानिकांना आपला जीव गमवावा लागला, हे अत्यंत दुःखद आहे. या दु:खाच्या प्रसंगी शोकाकुल कुटुंबियांसोबत माझी संवेदना आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, या अपघात प्रकरणात अपघाताचं कारण स्पष्ट करण्यासाठी कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश देण्यात आले आहेत.

घटनेचा तपास सुरु

तेलंगणा टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, अपघातानंतर काही मिनिटांतच विमान जळून खाक झालं. ज्या ठिकाणी विमान कोसळलं, त्या ठिकाणी खूप मोठे दगडही होते. पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून पुढील तपास सुरु आहे. वायूदलाकडून या अपघाताची चौकशी करण्यात येत आहे. अपघातानंतरचा एक व्हिडीओही समोर आला आहे, ज्यामध्ये विमान जळताना दिसत आहे. पिलाटस हे एक लहान विमान आहे, जे हवाई दल आपल्या वैमानिकांना प्रशिक्षण देण्यासाठी वापरलं जातं.

Share This Article