दरीत कोसळली कार, स्टार गोलंदाज मोहम्मद शमी धावला मदतीसाठी

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 15 Views 2 Min Read
2 Min Read

भारताचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमी याने नुकताच झालेल्या वर्ल्डकपमध्ये जबरदस्त कामगिरी केली. आपल्या गोलंदाजीने चांगला, चांगल्या दिग्गज फलंदाजांना त्याने चकवले. परंतु व्यक्तीगत जीवनात शमी एक चांगला व्यक्ती आहे. तो इमोशनल आणि विनम्र आहे. शमीमधील हे गुण पुन्हा एकदा दिसून आले आहे. वर्ल्डकपचा थकवा घालवण्यासाठी शमी हिमाचल प्रदेशातील नैनीतालमध्ये दाखल झाला. त्या ठिकाणी एक कारचा अपघात झाला. मग मोहम्मद शमी स्वत: त्या व्यक्तीच्या मदतीसाठी धावला. यासंदर्भातील एक व्हिडिओ मोहम्मद शमी याने आपल्या इंस्ट्रग्रॉम अकाऊंटवर शेअर केला आहे.

- Advertisement -

नैनीतालमधील रस्त्यावर एका अपघातग्रस्त कारमध्ये अडकलेल्या व्यक्तीची मदत करताना शमी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे. यासंदर्भात इंस्ट्रग्रॉम अकाउंटवर शेअर केलेल्या व्हिडिओत शमी म्हणतो की, हा व्यक्ती खूप भाग्यशाली आहे. ईश्वराने त्याला दुसरे जीवन दिले आहे. या व्यक्तीची कार रस्त्यावरुन दरीत पडली. त्या व्यक्तीची गाडी माझ्या थोड्या पुढे होती. आम्ही त्यांना सुरक्षित बाहेर काढले.

- Advertisement -

https://www.instagram.com/reel/C0E3eCFCB3U/?utm_source=ig_embed&ig_rid=3a72f7aa-f45a-440e-a9a8-038ddb46e806

- Advertisement -

हातात पट्टी बांधताना दिसतो शमी

व्हिडिओमध्ये जखमी झालेल्या त्या व्यक्तीच्या हातात पट्टी बांधताना मोहम्मद शमी दिसत आहे. शमी याने पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केले असून लाल रंगाची टोपी घातली आहे. या ठिकाणी इतर अनेक जण उभे असल्याचे दिसतात. सर्वांनी मिळून ही कार बाहेर काढली. शमी याच्या या व्हिडिओवर हजारो जणांनी कॉमेंट केल्या आहेत. लाखो लोकांनी हा व्हिडिओ पहिला आहे.

हार्दिक पांड्या जखमी झाल्यानंतर मोहम्मद शमी याला वर्ल्डकपमध्ये खेळण्याची संधी मिळाली. सात सामन्यातील तीन सामन्यांमध्ये त्याने तीन वेळा पाचपेक्षा जास्त बळी घेतले. उपांत्यफेरीत न्यूझीलंडविरुद्ध त्याने सात बळी घेतले. वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक बळी घेणारा तो गोलंदाज ठरला.

Share This Article