सरसकट मराठा प्रमाणपत्राला छगन भुजबळांचा थेट विरोध

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 22 Views 2 Min Read
2 Min Read
Highlights
  • मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या
  • मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही
  • आरक्षण हा गरिबी हटावचा कार्यक्रम नाही

जालना :  मनोज जरांगेच्या (Manoj Jarange) मागणीमुळे ओबीसी (OBC)  समाजात एकच खळबळ उडाली. ओबीसी नेत्यांनी मराठा समाजाला ओबीसीत घेण्यात विरोध केला आहे. मंत्री छगन भुजबळांनी (Chhagan bhujbal) यांनी सरसकट पहिल्यांदाच मराठा प्रमाणपत्राच्या विरोधत आक्रमक पवित्रा घेतला आहे. बाकीचे समाज आरक्षणासाठी एक झाले तसे ओबीसी समाजाने एकत्र यावे असं आवाहन भुजबळांनी केले आहे. तसेच आपल्यावर अन्याय होत असेल तर आपल्याला दहशत माजावीच लागेल, असे देखील भुजबळ म्हणाले.  अंतरवली सराटी येथे भुजबळ बोलत होते.

- Advertisement -

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर रान उठवलं आहे. ओबीसींमध्ये मराठ्यांचा समावेश करावा आणि मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावी अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.  छगन भुजबळ म्हणाले,  मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या. आरक्षण हा गरिबी हटावचा कार्यक्रम नाही. 70 वर्षाच्या लढ्यानंतर आम्हाला आरक्षण मिळाले आहे. अजूनही  आमचा समाज मागास आहे.   ज्यांची नोंद आढळली असेल त्यांना सर्टिफिकेट देण्यास हरकत नाही.

- Advertisement -

आपल्या लेकरा बाळांचे भवितव्य धोक्यात येईल

मनोज जरांगेच्या मागणीमुळे ओबीसी समाजात एकच खळबळ उडाली. ओबीसी नेत्यांनी मराठा समाजाला ओबीसीत घेण्यात विरोध केला आहे. मराठा समाज आरक्षणात आला तर आरक्षणाचा टक्का कमी होईल अशी भीती ओबीसी नेत्यांमध्ये निर्माण झाली होती.  त्यामुळे ओबीसींना एकत्र येऊन आवाज उठवण्याचे आवाहन भुजबळांनी केले आहे.  छगन भुजबळ म्हणाले, आपल्यावर अन्याय होत असेल आणि दुःख झालं असेल तर आपल्याला कोणीही डॉक्टर  औषध देणार नाही. त्यामुळे आपल्याला दहशत माजवावी लागेल.  समोरच्या दरवाज्यातून एन्ट्री मिळत नाही म्हणून तुम्ही मागच्या दरवाजाने येण्याचा हा प्रकार आहे. सर्व ओबीसींनी एकत्रित येऊन उपोषण मोर्चे काढून एक आवाजात उभे राहावे लागेल नाहीतर आपल्या लेकरा बाळांचे भवितव्य धोक्यात येईल

- Advertisement -

Share This Article