अजित पवार गटाच्या बड्या नेत्याचा दावा; ते 3 आमदार कोण? राजेश टोपे यांच्या नावाची चर्चा

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 54 Views 2 Min Read
2 Min Read

अजित पवार यांच्या बंडाळीनंतर राष्ट्रवाद काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आणखी एक मोठा झटका बसणार असल्याचा दावा राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते तथा राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी केला आहे. शरद पवार गटातील आणखी 3 आमदार आमच्याकडे येणार आहेत. त्यांचा लवकरच प्रवेश होईल, असे ते म्हणालेत. त्यांच्या या ट्विटमुळे पवारांना हादरा देण्याच्या तयारीत असणारे 3 आमदार कोण? अशी चर्चा सुरू झाली आहे.

- Advertisement -

समर्थक आमदारांचा आकडा 48 वर पोहोचणार

- Advertisement -

माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे लवकरच अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर धर्मरावबाबा आत्राम यांनी हा दावा केला आहे. ते म्हणाले की, शरद पवार गटाचे आणखी 3 आमदार आमच्या गटात येतील. तूर्त आम्हाला 45 आमदारांचा पाठिंबा आहे. त्यात लवकरच 3 आमदारांची भर पडून आकडा 48 वर पोहोचेल.

- Advertisement -

आमच्या पक्षात येणाऱ्या नेत्यांची मी नावे सांगणार नाहीत. पण ते येणार हे नक्की आहे. ते विकासासाठी आमच्याकडे येत आहेत. त्यांना विकास कामांसाठी निधीही मिळत आहे, असे धर्मरावबाबा आत्राम म्हणाले.

पक्षबांधणीसाठी दौऱ्यांत वाढ

अजित पवार गटाने आगामी निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. यासाठी त्यांनी पक्षबांधणीचे काम हाती घेतले आहे. त्यांनी आपल्या मंत्र्यांनाही मैदानात उतरवले आहे. त्यानुसार आत्राम विदर्भाच्या दौऱ्यावर आलेत. ते पक्षबांधणी, सदस्य नोंदणी, नव्या जिल्हाध्यक्षांच्या नियुक्तीसंबंधी यवतमाळ, गडचिरोली व चंद्रपूरच्या दौऱ्यावर आलेत. यावेळी त्यांनी आपण गडचिरोली मतदार संघातून लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याचीही घोषणा केली.

राजेश टोपेंची राजकीय आत्महत्या ठरेल

शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी राजेश टोपे अजित पवार गटात जाणार असल्याच्या चर्चेवर भाष्य केले. ते म्हणाले की, राजेश टोपे अजित पवार गटाकडे जाणार ही फक्त चर्चा आहे. 2 महिन्यांच्या विलंबाने ते भूमिका का घेत आहेत? त्यांनी तशी भूमिका घेतली तर ती त्यांची राजकीय आत्महत्या ठरेल.

Share This Article