१६४३ बालक व ३३० गरोदर मातांचे लसीकरण पूर्ण

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 62 Views 2 Min Read
2 Min Read

लातूर :  लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने दि. ७ ते १२ ऑगस्ट या कालावधीत ‘मिशन इंद्रधनुष्य ५.०’ या विशेष लसीकरण मोहिमेची पहिली फेरी राबविण्यात आली. त्यात शहरातील १६४३ बालक व ३३० गरोदर मातांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले. उपरोक्त कालावधित शहरातील ८ प्राथमिक नागरी आरोगय केंद्र यांच्यामार्फत विवीध १०५ ठिकाणी विशेष लसीकरण सत्रांचे नियोजन करण्यात आले. या कालावधीत ० ते १ वर्षे वयोगटातील ८०८ बालकांचे, १ ते २ वर्षे वयोगटातील ३८९ बालकांचे, २ ते ५ वर्षे वयोगटातील ४४६ बालकांचे याप्रमाणे एकुण १६४३ बालकांचे लसीकरण करण्यात आले आहे.

- Advertisement -

तसेच ३३० गरोदर मातांचे देखील लसीकरण करण्यात आले. प्रलंबित लसीकरण पूर्ण करुन घेण्यासाठी ए.एन.एम. व आशा स्वंयसेविका यांनी घरोघरी जावून लसीकरण प्रलंबीत असलेल्या लाभार्थ्याची यादी तयार केली होती. तसेच यावेळी मनपामार्फत उर्दू भाषेतील बॅनरदेखील लावण्यात आले होते. घरोघरी जावून लसीकरणाबाबत असलेले गैरसमज दूर करण्याचे प्रयत्न करण्यात आले. बाहेरगावी असल्याने किंवा आजारी असल्याने काही बालकांचे लसीकरण पूर्ण होवू शकले नाही. दि. ११ ते १६ सप्टेंबर या कालावधीत मिशन इंद्रधनुष्यची दुसरी मोहीम राबविण्यात येणार आहे.

- Advertisement -

तरी ज्या बालकांचे अर्धवट लसीकरण झालेले आहे व लसीकरण प्रलंबित आहे. त्यांचे व तसेच नियमित वेळापत्रकानूसार ज्यांचे लसीकरण आहे. अश्या बालकांचे लसीकरण पालकांनी मनपाच्या नजीकच्या नियमित लसीकरण केंद्रावर जावून पूर्ण करुन घ्यावे असे आवाहन लातूर शहर महानगरपालिका,लातूर च्या वतीने करण्यात येत आहे. तसेच दि. ७ ऑगस्ट पासून लसीकरण केलेल्या बालकांची नोंद यू-वीन या केंद्र शासनाच्या नवीन ऑनलाईन पोर्टलवर सादर करण्यात येत आहे. यामुळे पालकांना आपल्या बाळाच्या लसीकरणाचे ई-सर्टिफिकेट देखील मोबाईल वर पाहता येणार आहे. तसेच पुढील लसीकरणाची तारीख कधी आहे याचा मेसेज देखील पालकांच्या मोबाईल वर येणार आहे. यामूळे बालकांचे वेळेवर लसीकरण पूर्ण करुन घेण्यास पालकांना मदत होणार आहे.

- Advertisement -

Share This Article