४०६८ मालमत्ताधारकांना मिळाली ७ लाख रुपयांची सूट

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 36 Views 1 Min Read
1 Min Read

लातूर शहर महानगरपालिकेने मालमत्ताकराच्या वसुलीसाठी जुलै आणि ऑगस्ट महिन्यात वेगवेगळ्या पद्धतीने सवलत जाहीर केली होती.शहरातील ४०६८ मालमत्ताधारकांनी या सवलतीचा लाभ घेतल्याने मालमत्ताधारकांना एकूण ७ लाख २ हजार ९०२ रुपयांची सुट मिळाली. शहरातील इतर मालमत्ताधारकांनीही या कर सवलत योजनेचा लाभ घ्यावा,असे आवाहन मनपाच्या वतीने करण्यात आले आहे.

- Advertisement -

शहरातील मालमत्ता धारकांकडे थकलेला कर वसूल करण्यासाठी मनपाने चालू आर्थिक वर्षातील फक्त मालमत्ताकरामध्ये सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. ३१ जुलै अखेरपर्यंत मालमत्ताकराचा भरणा करणा-या मालमत्ताधारकांना ५ टक्के तर ३१ऑगस्टपर्यंत कर भरणा-यांना ४ टक्के सूट देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. ३१ जुलै अखेरपर्यंत शहरातील एकूण २९९४ मालमत्ताधारकांनी याचा लाभ घेतला.

- Advertisement -

मनपाने ऑगस्ट महिना अखेरपर्यंत मालमत्ता कर भरणा-यांना ४ टक्के सवलत देण्याचे जाहीर केले आहे. त्यानुसार दि. १ ते २१ ऑगस्ट या कालावधीत १०७४ मालमत्ताधारकांनी योजनेचा लाभ घेत कर भरणा केला. या मालमत्ता धारकांकडून ९३ लाख ६१ हजार ५१ रुपये कर येणे बाकी होते. ४ टक्के सवलतीचा लाभ घेत या मालमत्ता धारकांनी एकूण ९२ लाख ३८ हजार ४८९ रुपयांच्या कराचा भरणा मनपाकडे केला. त्यामुळे या मालमत्ताधारकांचे १ लाख २२ हजार ५६२ रुपये वाचले. शहरातील इतर मालमत्ताधारकांनीही या सवलत योजनेचा लाभ घ्यावा.ऑगस्ट अखेरपर्यंत ४ टक्के सवलत योजना सुरु राहणार आहे. या कालावधीत आपल्याकडील कराचा भरणा करावा, असे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

- Advertisement -

Share This Article