यंदाचा विश्वचषक भारतात होणार आहे, त्यासाठी इंग्लंडच्या संघाने जोरदार तयारी सुरु केली आहे. अष्टपैलू बेन स्टोक्स याने निवृत्ती मागे घेण्याचा निर्णय घेतलाय.
- Advertisement -
2019 चा एकदिवसीय विश्वचषकावर इंग्लंडने नाव कोरले होते. इंग्लंडला विश्वचषक जिंकून देण्यात बेन स्टोक्सचा मोलाचा वाटा होता. स्टोक्सने 66.43 च्या सरासरीने 465 धावा केल्या. याशिवाय गोलंदाजीतही सात विकेट्स घेतल्या.
- Advertisement -
अष्टपैलू बेन स्टोक्स याने इंग्लंडसाठी 105 वनडे सामने खेळले आहेत. यामधील 90 डावात स्टोक्स याने 2924 धावा केल्या आहेत. 102 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. तीन शतके आणि 21 अर्धशतके स्टोक्सने झळकावली आहेत.
- Advertisement -
वनडेमध्ये गोलंदाजीत स्टोक्स याने 88 डावात 74 विकेट घेतल्या आहेत. 61 धावांच्या मोबदल्यात 5 विकेट, ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे