५०० च्या बनावट नोटा; टोळीचा पुणे पोलिसाकडून पर्दाफाश

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 21 Views 2 Min Read
2 Min Read
Highlights
  • चीनवरुन पेपरची खरेदी 

पिंपरी चिंचवड, पुणे : पिंपरी चिंचवड पोलिसांनी पाचशे  रुपयांच्या बनावट नोटांची छपाई  करणारी आणि त्या नोटा बाजारात विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केलाय. धक्कादायक म्हणजे या टोळीकडून प्रिंटिंग मशीन ही ताब्यात घेण्यात आलंय. याच मशीनवर छपाई सुरू असताना देहूरोड पोलिसांनी सहा आरोपींना रंगेहाथ अटक केली आहे. त्यांच्याकडून 440 विक्रीसाठी तयार असणाऱ्या हुबेहूब, 4784 प्रिंट झालेल्या आणि एक हजार करन्सी पेपर ही जप्त केलेत.

- Advertisement -

आपल्या हातात असलेल्या 500 च्या नोटा खऱ्याच असतील यावर आता अनेकांचा विश्वास बसणं कठिण होणार आहे. कारण या भामट्यांनी हुबेहूब हिरव्या रंगाची तार असलेल्या नोटा तयार केल्या होत्या. पुण्यातील आप्पा बळवंत चौकात अनेक ठिकाणी प्रिंटिंगची कामं केली जातात. याच परिसरातून या भामट्यांनी छपाईची मशीन विकत घेतली होती आणि या मशीनच्या माध्यमातून ते नोटांची छपाई करत असल्याचं पोलीस तपासात पुढे आलं आहे.

- Advertisement -

पुण्यात पर्दाफाश केलेल्या या टोळीने थेट चीनवरुन ऑनलाईन पद्धतीने या बनावट नोटा तयार करण्यासाठी लागणारा कागद खरेदी करण्यात आला होता.  अलीबाबा या वेबसाईटच्या आधारे हा कागद खरेदी केला होता. देहू रोड पोलिसांना बनावट नोटा  विक्री कऱण्यासाठी एक व्यक्ती मुकाई चौकात येत असल्याची माहिती मिळाली होती. ही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचना आणि थेट त्याला बेड्या ठोकल्या. त्यानंतर तपास केला असता दिघी परिसरात या बनावट नोटांची छपाई सुरु असल्याचं त्यांना कळलं. त्यानंतर पोलिसांनी दिघी परिसरात छापा टाकला आणि रंगेहात सहा जणांना पकडलं आणि त्यांना अटक केली. त्यावेळी 440 हूबेहूब 500 च्या नोटा सापडल्या. त्यासोबतच 4484 कटिंग करण्यासाठी तयार असलेल्या नोटा त्यादेखील पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

- Advertisement -

हा सगळा प्रकार पाहून देहू पोलिसांना मोठा धक्का बसला. त्यांनी सगळा मुद्देमाल जप्त केला आणि सहा जणांना अटक केली. या सहा जणांना पोलीस कोठडी मिळाली आहे. मात्र या नोटा कधीपासून छपाई केल्या जात होत्या आणि कुठे पुरवल्या जात होत्या?, याचा शोध पोलीस घेत आहे.

Share This Article