हमासकडून 40 निरपराध बालकांची हत्या

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 28 Views 2 Min Read
2 Min Read
Highlights
  • इस्रायलने हमासच्या 450 तळांवर हल्ला
  • गाझा सीमेजवळ 100 इस्रायलींचे मृतदेह
  • हमासकडून 40 बालकांची हत्या

हमास आणि इस्रायल यांच्यातील युद्धाचा आगडोंब पाहायला मिळत आहे. हमासच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देत इस्रायलने गाझापट्टीवर बॉम्ब हल्ले सुरु केले. यामुळे 700 हून अधिक पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला आहे. याचा बदला घेण्यासाठी हमासने इस्रायलमध्ये घुसखोरी करत नागरिकांवर हल्ला केला आहे. हमासच्या दहशतवाद्यांनी अत्यंत क्रूरपणे 40 नवजात बालके आणि लहान मुलांची हत्या केली. इस्रायली वृत्तसंस्था i24News च्या रिपोर्टनुसार, शनिवारी 7 ऑक्टोबरला सकाळी 70 हमास सैनिकांनी हल्ला केला. या हल्ल्यात 40 मुले मारली गेली आणि यापैकी काही मुलांचा शिरच्छेद करण्यात आला.

- Advertisement -

हमासकडून 40 बालकांची हत्या

हमासने क्रूरतेचा कळस गाठला आहे. इस्रायलच्या हमासवरील रॉकेट हल्ल्याचा परिणाम कफर आझा शहरामध्ये दिसून आला आहे. कफर आझामध्ये इस्रायली अधिकारी आणि पत्रकार पोहोचले असता, समोरील दृश्यं पाहून त्यांना धक्का बसला. हमासच्या दहशतवाद्यांनी सुमारे 40 बालकं आणि लहान मुलांची निर्घृणपणे हत्या केली होती. हमासने अत्यंत निदर्यीपणे काहींचे शिरच्छेद केले होते. गाझा पट्टीपासून फक्त 3 किमी अंतरावर असलेल्या कफर आझामधील परिस्थितीची माहिती इस्रायल लष्कराने दिली आहे.

- Advertisement -

इस्रायलने हमासच्या 450 तळांवर हल्ला

इस्रायली लष्कराने ट्विटर पोस्टमध्ये लिहिलं आहे की, इस्रायली हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी अल-फुरकान परिसरात हमासच्या 200 हून अधिक ठिकाणांवर हल्ला केला. येथे हमास दहशतवाद्यांचा हॉटस्पॉट होते, जिथून हमासकडून इस्रायल हल्ल्यांचे कट आखण्यात येत होते. गेल्या 24 तासांत इस्रायलचा हमासवरील या भागातील हा तिसरा काउंटरस्ट्राईक आहे. यामध्ये इस्रायलने तीन स्ट्राईकमध्ये हमासच्या 450 तळांवर हल्ला करण्यात आला.

- Advertisement -

‘इस्रायल पॅलेस्टिनी वैद्यकीय कर्मचाऱ्यांना लक्ष्य करतंय’

इस्रायल आणि पॅलेस्टिनी यांच्यातील युद्ध तीव्र झालं असून दोन्ही बाजंनी जोरदार हल्ले सुरु आहेत. इस्रायलच्या संरक्षण मंत्र्यांने म्हटलं आहे की, गाझामध्ये हल्ले सुरु आहेत. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, इस्रायलचे संरक्षण मंत्री योव गॅलंट यांनी हमासविरोधातील युद्ध अधिक तीव्र करण्याचं आश्वासन दिलं आहे. इस्रायल पॅलेस्टिनी वैद्यकीय कर्मचाऱ्यांना जाणूनबुजून लक्ष्य करत असल्याचा आरोप केला, गाझामधील आरोग्य मंत्रालयाने केला आहे.

इस्रायली लष्कराला गाझा सीमेवर 100 इस्रायलींचे मृतदेह सापडले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, गाझा सीमेजवळ एका ठिकाणी 100 मृतदेह आढळून आले आहेत. हमासच्या हल्ल्यावेळी या इस्रायलींची हत्या करण्यात आली. इस्रायलच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, या ठिकाणी खूप मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते, त्यावेळी हमासच्या अतिरेक्यांनी हल्ला केला. या गोळीबारात 100 जणांचा मृत्यू झाला आहे.

Share This Article