26/11 मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड साजिद मीरवर पाकिस्तानात विषप्रयोग

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 2 Views 2 Min Read
2 Min Read

मुंबई: 26/11 मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड साजिद मीरवर  पाकिस्तानात विषप्रयोग करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. साजिद मीर सध्या व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानने भारताकडे होणारे प्रत्यार्पण थांबवण्यासाठी विषप्रयोगाचं नाटक रचल्याचा भारतीय यंत्रणांना संशय आहे.

- Advertisement -

मुंबईतील दहशतवादी हल्ल्याच्या दरम्यान साजिद मीर हा दहशतवाद्यांशी संपर्कात होता. तो अजमल कसाब आणि इतर पाकिस्तानी दहशतवाद्यांना पाकिस्तानातून आदेश देत होता. साजिद मीर हा लष्कर-ए-तय्यबा चा फॉरेन रिक्रूटर होता तसेच अमेरिकन दहशतवादी डेव्हिड हेडलीचादेखील मुख्य हॅंडलर होता.

- Advertisement -

साजिद मीरवर अमेरिकच्या एफबीआयने 5 कोटी डॉलरचं बक्षीस जाहीर केलं आहे. टेरर फायनान्सिंग प्रकरणी मीरला 8 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

- Advertisement -

पाकिस्तानमध्ये 15 वर्षांची शिक्षा 

पाकिस्तानमधील एका तुरुंगात अज्ञात व्यक्तीने साजिद मीरवर विष प्रयोग केल्याचा दावा केला जात आहे. मात्र भारताच्या या मोस्ट वाँटेड दहशतवादाशी संबंधित या बातमीत किती तथ्य आहे याची पुष्टी अद्याप झालेली नाही. परदेशी भूमीवर भारताच्या शत्रूंचा एकापाठोपाठ खात्मा होत असताना ही बाब समोर आली आहे. अमेरिकेत खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूच्या हत्येचा प्रयत्न आणि कॅनडात दहशतवादी हरदीपसिंग निज्जरचा मृत्यू ही त्याची ताजी उदाहरणे आहेत.

साजिद मीरला विषबाधा झाल्यानंतर सीएमएच इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस बहावलपूरमध्ये आणण्यात आल्याचा दावा एका अहवालात करण्यात आला आहे. साजिद मीरला काही महिन्यांपूर्वीच लाहोर सेंट्रल जेलमधून दुसरीकडे हलवण्यात आलं होतं. गेल्या वर्षी पाकिस्तानच्या न्यायालयाने त्याला दहशतवादाला आर्थिक मदत केल्याप्रकरणी 15 वर्षांची शिक्षा सुनावली होती.

Share This Article