आशियाई पॅरा खेळ स्पर्धेत भारतीय खेळाडूंची 111 पदकांची कमाई

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 22 Views 1 Min Read
1 Min Read

चीनमध्ये सुरु असलेल्या आशियाई पॅरा खेळ 2023 स्पर्धेत भारताची शानदार कामगिरी सुरु आहे. आज एशियन पॅर गेम्स स्पर्धेचा चौथा आणि शेवटचा दिवस भारतासाठी अविस्मरणीय ठरला आहे. भारतीय खेळाडूंनी या स्पर्धेत शंभर नंबरी कामगिरी केली आहे. आशियाई पॅरा गेम्स 2023 मध्ये भारतीय खेळाडूंनी आतापर्यंत 111 पदकांची कमाई केली आहे. यामध्ये 29 सुवर्णपदकं, 31 रौप्यपदकं आणि 51 कांस्यपदकांचा समावेश आहे.

- Advertisement -

पंतप्रधान मोदींकडून खेळाडूंचं अभिनंदन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आशियाई पॅरा गेम्स 2023 मधील भारतीय खेळाडूंच्या दमदार कामगिरीचं कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहे. पंतप्रधान मोदी यांनी एक्स मीडियावर पोस्ट करत म्हटलं आहे की, ‘एशियन पॅरा गेम्समध्ये भारतीय खेळाडूंनी 100 हून अधिक पदकं जिंकण्याचा विक्र केला आहे, ही खूप मोठी आनंदाची बाब आहे. हे यश आपल्या खेळाडूंची प्रतिभा, कठोर परिश्रम आणि दृढनिश्चय याचाच परिणाम आहे. हा उल्लेखनीय मैलाचा दगड भारतीयांच्या अंतःकरणात अपार अभिमानाने भरलेला आहे. मी याबद्दल खेळाडूंचे मनापासून कौतुक आणि कृतज्ञता व्यक्त करतो.’

- Advertisement -

- Advertisement -

Share This Article