uddhav thackeray Archives - Dainik Yashwant, Latur https://dailyyashwant.com/tag/uddhav-thackeray/ Online Portal Mon, 12 Feb 2024 09:29:38 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.4 आदर्श घोटाळा लपवण्यासाठी अशोक चव्हाण भाजपमध्ये; उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया https://dailyyashwant.com/ashok-chavan-in-bjp-to-hide-adarsh-scam-uddhav-thackerays-first-reaction/3973/ https://dailyyashwant.com/ashok-chavan-in-bjp-to-hide-adarsh-scam-uddhav-thackerays-first-reaction/3973/#respond Mon, 12 Feb 2024 09:24:57 +0000 https://dailyyashwant.com/?p=3973 छत्रपती संभाजीनगर :  अशोक चव्हाण यांचा आदर्श घोटाळा लपविण्यासाठी ते भाजपमध्ये गेले की काय असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी चव्हाण यांच्यावर निशाणा साधला आहे.  भाजप भाडोत्री लोकं घेत असून सतरंज्या उचलणाऱ्याच्या बोकांडी बसवत आहेत. आत्मविश्वास नसल्याने भाजप फोडाफाडी करत आहेत. आणखीन काही वर्षानंतर भाजपचां अध्यक्ष सुद्धा काँग्रेसमधून आलेला असेल. एकाने शिवसेना भाजपच्या ताब्यात दिली. मी आव्हान […]

The post आदर्श घोटाळा लपवण्यासाठी अशोक चव्हाण भाजपमध्ये; उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
छत्रपती संभाजीनगर :  अशोक चव्हाण यांचा आदर्श घोटाळा लपविण्यासाठी ते भाजपमध्ये गेले की काय असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी चव्हाण यांच्यावर निशाणा साधला आहे.  भाजप भाडोत्री लोकं घेत असून सतरंज्या उचलणाऱ्याच्या बोकांडी बसवत आहेत. आत्मविश्वास नसल्याने भाजप फोडाफाडी करत आहेत. आणखीन काही वर्षानंतर भाजपचां अध्यक्ष सुद्धा काँग्रेसमधून आलेला असेल. एकाने शिवसेना भाजपच्या ताब्यात दिली. मी आव्हान केले असून, पोलिसांना बाजूला ठेवा लोकांना गोळा करू आणि विचारू शिवसेना कुणाची आहे. मला अशोक चव्हाण यांचे आश्चर्य वाटत आहे. आजपर्यंत सगळ्या जागा वाटपात वाटून घेण्यासाठी प्रयत्न करत होते आणि आता गेले, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी अशोक चव्हाण यांच्यासह भाजपवर हल्लाबोल केला आहे.

सगळे भाडोत्री आणले जात आहे…

दरम्यान पुढे बोलतांना उद्धव ठाकरे म्हणाले की, “ तुम्ही भ्रष्टचार करा आणि आम्ही तुम्हाला आमदार खासदार करणार. तुमच्या योजना भारत सरकारच्या आहेत की मोदी सरकारच्या? सगळे भाडोत्री आणले जात आहे. मी मुख्यमंत्री म्हणून शेतकऱ्यांना फसवण्याचा प्रयत्न करून कर्जमुक्ती जाहीर करू शकलो असतो. पण मी तसे केले नाही. 80 कोटी लोकांना फुकट धान्य देत असाल, तर मग गरिबी कुणाची हटवली. देशातील सगळ्या शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

नाना पटोलेंची प्रतिक्रिया..

“काँग्रेस पक्षाने अनेक नेत्यांना खूप काही काही दिले आहे. आज काँग्रेस पक्ष संविधान आणि लोकशाही वाचविण्याची लढाई लढत असताना सर्वकाही मिळालेले नेते काँग्रेस पक्षाला आणि विचारधारेला सोडून जात आहेत हे दुर्देवी आहे. कोण, कशासाठी, कुठे जात आहे? हे जनता उघड्या डोळ्याने पहात आहे. आम्ही सर्व काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते काँग्रेसचा विचार आणि लोकशाही वाचविण्यासाठी धर्मांध, हुकुमशाही वृत्तीच्या भारतीय जनता पक्षाविरोधात पूर्ण ताकदीनिशी लढून त्यांना पराभूत करू.

The post आदर्श घोटाळा लपवण्यासाठी अशोक चव्हाण भाजपमध्ये; उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
https://dailyyashwant.com/ashok-chavan-in-bjp-to-hide-adarsh-scam-uddhav-thackerays-first-reaction/3973/feed/ 0
“भूपेश बघेल भाजपात गेले, तर ‘महादेव’ बेटिंग अ‍ॅपचे…”, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल https://dailyyashwant.com/bhupesh-baghel-joined-bjp-while-mahadev-belongs-to-betting-app-uddhav-thackerays-attack/2623/ https://dailyyashwant.com/bhupesh-baghel-joined-bjp-while-mahadev-belongs-to-betting-app-uddhav-thackerays-attack/2623/#respond Tue, 07 Nov 2023 02:48:22 +0000 https://dailyyashwant.com/?p=2623 ‘महादेव’ या ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपवरून छत्तीसगडमधील राजकारण तापलं आहे. ‘महादेव’ बेटिंग अ‍ॅपच्या प्रवर्तकांनी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना आतापर्यंत ५०८ कोटी रुपये दिल्याचा दावा सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी ( ३ नोव्हेंबर ) केला. तसेच हे प्रकरण चौकशीच्या कक्षेत येत असल्याचे सांगितले. यावरून बघेल यांना भाजपाकडून लक्ष्य करण्यात येत आहे. आता शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख […]

The post “भूपेश बघेल भाजपात गेले, तर ‘महादेव’ बेटिंग अ‍ॅपचे…”, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
‘महादेव’ या ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपवरून छत्तीसगडमधील राजकारण तापलं आहे. ‘महादेव’ बेटिंग अ‍ॅपच्या प्रवर्तकांनी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना आतापर्यंत ५०८ कोटी रुपये दिल्याचा दावा सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी ( ३ नोव्हेंबर ) केला. तसेच हे प्रकरण चौकशीच्या कक्षेत येत असल्याचे सांगितले. यावरून बघेल यांना भाजपाकडून लक्ष्य करण्यात येत आहे. आता शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावर भाष्य करत भाजपावर हल्लाबोल केला आहे.

“‘महादेव’ बेटिंग अ‍ॅप प्रकरणावरून भूपेश बघेल भाजपात जाणार नाहीत. पण, बघेल भाजपात गेले, तर ‘महादेव’ बेटिंग अ‍ॅपचे ‘हर हर महादेव’ अ‍ॅप होईल. एवढं निर्लज्जपणाने चाललं असताना आपण गप्प कसं काय बसू शकतो?” असा संतप्त सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला.

The post “भूपेश बघेल भाजपात गेले, तर ‘महादेव’ बेटिंग अ‍ॅपचे…”, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
https://dailyyashwant.com/bhupesh-baghel-joined-bjp-while-mahadev-belongs-to-betting-app-uddhav-thackerays-attack/2623/feed/ 0