top batsman Archives - Dainik Yashwant, Latur https://dailyyashwant.com/tag/top-batsman/ Online Portal Wed, 08 Nov 2023 09:40:12 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.4 शुभमन गिल जगातील नंबर 1 फलंदाज, ICC क्रमवारीत बाबर आझमला टाकलं मागे https://dailyyashwant.com/shubman-gill-is-worlds-number-1-batsman-surpassing-babar-azam-in-icc-rankings/2654/ https://dailyyashwant.com/shubman-gill-is-worlds-number-1-batsman-surpassing-babar-azam-in-icc-rankings/2654/#respond Wed, 08 Nov 2023 09:39:54 +0000 https://dailyyashwant.com/?p=2654 भारताचा युवा फलंदाज शुभमन गिल (Shubman Gill) याला जगातील सर्वोत्तम एकदिवसीय फलंदाज म्हणून घोषित करण्यात आले आहे. आयसीसीनं (ICC) जारी केलेल्या एकदिवसीय क्रमवारीनुसार, शुभमन गिल आता वनडे फॉरमॅटमध्ये जागतिक क्रमवारीत नंबर 1 फलंदाज आहे. यापूर्वी वनडे फॉरमॅटमध्ये नंबर 1 चा मुकुट पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) याच्या डोक्यावर होता. मात्र, आता शुभमन गिलनं बाबर आझमला मागे टाकत आयसीसी […]

The post शुभमन गिल जगातील नंबर 1 फलंदाज, ICC क्रमवारीत बाबर आझमला टाकलं मागे appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
भारताचा युवा फलंदाज शुभमन गिल (Shubman Gill) याला जगातील सर्वोत्तम एकदिवसीय फलंदाज म्हणून घोषित करण्यात आले आहे. आयसीसीनं (ICC) जारी केलेल्या एकदिवसीय क्रमवारीनुसार, शुभमन गिल आता वनडे फॉरमॅटमध्ये जागतिक क्रमवारीत नंबर 1 फलंदाज आहे. यापूर्वी वनडे फॉरमॅटमध्ये नंबर 1 चा मुकुट पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) याच्या डोक्यावर होता. मात्र, आता शुभमन गिलनं बाबर आझमला मागे टाकत आयसीसी क्रमवारीत नंबर 1 स्थान पटकावलं आहे.

शुभमन गिल गेल्या एका वर्षापासून फॉर्ममध्ये आहे. एकदिवसीय, कसोटी आणि टी-20 अशा तिनही फॉरमॅटमध्ये त्यानं चमकदार कामगिरी केली आहे. एकदिवसीय फॉर्मेटमध्ये शुभमन गिलनं इतकी चांगली कामगिरी केली की, भारतीय संघ व्यवस्थापनाला शिखर धवनसारख्या तेजस्वी खेळाडूकडेही दुर्लक्ष करावं लागलं. गिलनं सातत्यानं केलेल्या धमाकेदार कामगिरीमुळे अल्पावधीतच टीम इंडियाचा सलामीवीर म्हणून कर्मधार रोहितसह धुरा आपल्या खांद्यावर घेतली.

बाबर आझमला टाकलं मागे, शुभमन गिल अव्वल 

टीम इंडियाचा युवा सलामीवीर शुभमन गिलनं पाकिस्तानच्या बाबर आझमला मागे टाकत ICC एकदिवसीय फलंदाजी क्रमवारीत पहिलं स्थान पटकावलं आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माच्या ओपनिंग पार्टनरनं पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला मागे टाकलं आहे. विश्वचषक सुरू होण्यापूर्वी बाबर आझम पहिल्या क्रमांकावर होता. स्टार फलंदाज शुभमन गिलला डेंग्यूची लागण झाल्यामुळे वर्ल्डकपसाठी उशिरा प्लेईंग इलेव्हनमध्ये त्याचा उशिरा समावेश करण्यात आला. एकीकडे शुभमन गिलनं जबरदस्त परफॉर्मन्स दिला, तर दुसरीकडे बाबर आझमला एका एका धावेसाठी मोठी कसरत करावी लागत होती.

भारताच्या तीन फलंदाजांचा टॉप-10 मध्ये समावेश 

विश्वचषकात धावा करणारा भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि माजी कर्णधार विराट कोहली यांचाही शुभमन गिलसह टॉप-10 क्रमवारीत समावेश करण्यात आला आहे. या यादीत विराट कोहली चौथ्या क्रमांकावर आहे, तर रोहित शर्मा सहाव्या क्रमांकावर आहे. हे दोघेही ज्या फॉर्मात फलंदाजी करत आहेत, ते पाहता भविष्यात क्रमवारीत सुधारणा होण्याची अपेक्षा आहे.

फलंदाज  संघ टीम रेटिंग पॉईंट्स
शुभमन गिल टीम इंडिया 830
बाबर आजम पाकिस्तान 824
क्विंटन डि कॉक दक्षिण आफ्रिका 771
विराट कोहली टीम इंडिया 770
डेविड वॉर्नर ऑस्ट्रेलिया 743
रोहित शर्मा टीम इंडिया 739
रासी वान डर डुसां दक्षिण आफ्रिका 730
हॅरी ट्रॅक्टर आयर्लंड 729
हेन्री क्लासेन दक्षिण आफ्रिका 725
डेविड मलान इंग्लंड 704

आता एकदिवसीय क्रमवारीत शुभमल गिलचे 830 गुण झाले आहेत. त्याचवेळी दुसऱ्या स्थानावर असलेल्या बाबर आझमचे 824 गुण आहेत. या यादीत तिसऱ्या स्थानावर दक्षिण आफ्रिकेचा यष्टिरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉक आहे, ज्याचे 771 गुण आहेत. या तिघांशिवाय विराट कोहलीनेही या विश्वचषकात 500 हून अधिक धावा करून ICC एकदिवसीय क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. रोहित शर्मा आणि डेव्हिड वॉर्नरला मागे टाकत विराट कोहली आता चौथ्या स्थानावर आला आहे.

आयसीसी वनडे क्रमवारीत विराटचे 770 गुण आहेत. याचा अर्थ विराट डी कॉकपेक्षाही मागे नाही आणि काही चांगल्या खेळीनंतर विराट आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत 3 नंबरवरही येऊ शकतो. विराटनंतर ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नर पाचव्या क्रमांकावर आहे, ज्याचे 743 गुण आहेत. त्याच वेळी, वॉर्नरनंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा 739 गुणांसह 6 व्या क्रमांकावर आहे.

The post शुभमन गिल जगातील नंबर 1 फलंदाज, ICC क्रमवारीत बाबर आझमला टाकलं मागे appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
https://dailyyashwant.com/shubman-gill-is-worlds-number-1-batsman-surpassing-babar-azam-in-icc-rankings/2654/feed/ 0