sharad pawar Archives - Dainik Yashwant, Latur https://dailyyashwant.com/tag/sharad-pawar/ Online Portal Sat, 24 Feb 2024 05:26:47 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.4 रायगडावर ‘तुतारी’चे नाद घुमले, शरद पवार गटाच्या चिन्हाचं अनावरण https://dailyyashwant.com/the-sound-of-tutari-sounded-at-raigad-the-unveiling-of-the-symbol-of-sharad-pawar-group/4117/ https://dailyyashwant.com/the-sound-of-tutari-sounded-at-raigad-the-unveiling-of-the-symbol-of-sharad-pawar-group/4117/#respond Sat, 24 Feb 2024 05:26:47 +0000 https://dailyyashwant.com/?p=4117 राष्ट्रवादी काँग्रेस  शरद पवार  पक्षाच्या तुतारी चिन्हाचं अनावरण करण्यात आलं आहे.  तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह तळागाळात पोहोचवण्यासाठी रायगड किल्ल्यावर भव्य कार्यक्रम झाला.   छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीनं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं तुतारी चिन्हाचं स्वागत केलं.  या कार्यक्रमाला शरद पवार स्वतः उपस्थित होते. जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड,  अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळे यांनी तुतारी […]

The post रायगडावर ‘तुतारी’चे नाद घुमले, शरद पवार गटाच्या चिन्हाचं अनावरण appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
राष्ट्रवादी काँग्रेस  शरद पवार  पक्षाच्या तुतारी चिन्हाचं अनावरण करण्यात आलं आहे.  तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह तळागाळात पोहोचवण्यासाठी रायगड किल्ल्यावर भव्य कार्यक्रम झाला.   छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीनं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं तुतारी चिन्हाचं स्वागत केलं.  या कार्यक्रमाला शरद पवार स्वतः उपस्थित होते. जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड,  अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळे यांनी तुतारी वाजवून आगामी निवडणुकींचं रणशिंग फुंकलं. चिन्ह अनावराच्या निमित्ताने शरद पवार तब्बल 40 वर्षानंतर रायगडवार गेले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला तुतारी वाजवणारा माणूस’ चिन्ह बहाल करण्यात आले आहे.  आज रायगडावर भव्य कार्यक्रम पार पडला. ‘तुतारी’ चिन्हांचं लॉन्चिंग  या वेळी करण्यात आले.  केंद्रीय निवडणूक आयोगाने शरद पवार गटाच्या ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार’ पक्षाला ‘तुतारी वाजवणारा माणूस’ हे पक्षचिन्ह बहाल केले आहे. न्यायालयाच्या पुढील आदेशापर्यंत शरद पवार गटाकडे हे चिन्ह असणार आहे.

The post रायगडावर ‘तुतारी’चे नाद घुमले, शरद पवार गटाच्या चिन्हाचं अनावरण appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
https://dailyyashwant.com/the-sound-of-tutari-sounded-at-raigad-the-unveiling-of-the-symbol-of-sharad-pawar-group/4117/feed/ 0
नाव मिळालं, चिन्ह बाकी; ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार’ कोणत्या निवडणूक चिन्हासाठी आग्रही? https://dailyyashwant.com/nationalist-congress-party-sharad-chandra-pawar-is-the-new-party/3860/ Thu, 08 Feb 2024 02:56:48 +0000 https://dailyyashwant.com/?p=3860 नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतरच्या घडामोडींमध्ये अजित पवार गटाला पक्षाचे नाव व निवडणूक चिन्ह बहाल करणाऱ्या केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्षाचे संस्थापक नेते शरद पवार यांच्या गटाला बुधवारी नवे नाव दिले. यानुसार हा गट आता ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार’ या नावाने ओळखला जाईल. मात्र, या पक्षाच्या निवडणूक चिन्हाबाबत अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला […]

The post नाव मिळालं, चिन्ह बाकी; ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार’ कोणत्या निवडणूक चिन्हासाठी आग्रही? appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतरच्या घडामोडींमध्ये अजित पवार गटाला पक्षाचे नाव व निवडणूक चिन्ह बहाल करणाऱ्या केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्षाचे संस्थापक नेते शरद पवार यांच्या गटाला बुधवारी नवे नाव दिले. यानुसार हा गट आता ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार’ या नावाने ओळखला जाईल. मात्र, या पक्षाच्या निवडणूक चिन्हाबाबत अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही.

निवडणूक आयोगाने अजित पवार गट हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा निर्णय मंगळवारी दिला. आयोगाने एका आदेशात अजित पवार गटाला घड्याळ हे राष्ट्रवादीचे मूळ निवडणूक चिन्हही दिले. सहा महिने चाललेल्या दहा सुनावण्यांनंतर पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह अजित पवार गटाला देण्यात आले.

आयोगाने १४१ पानी आदेशात म्हटले होते की, अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गट हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (एनसीपी) आहे आणि त्यांनाच पक्षाचे नाव आणि ‘घड्याळ’ चिन्ह वापरण्याचा अधिकार आहे. या निर्णयानंतर आयोगाने शरद पवार गटाला बुधवारी दुपारी ४ वाजेपर्यंत तीन नावे पाठवण्याची मुदत दिली होती. नावे न दिल्यास आगामी राज्यसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढवावी लागेल, असेही आयोगाने म्हटले होते.

वटवृक्ष, उगवता सूर्य की कप-बशी?

आयोगाच्या निर्देशानुसार शरद पवार गटाने बुधवारी आपल्या पक्षासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (एस), राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार ही तीन नावे निवडणूक आयोगाकडे पाठवली होती. यातील तिसऱ्या नावाला आयोगाने मान्यता दिली. निवडणूक चिन्हांबाबतही शरद पवार गटाने निवडणूक आयोगाकडे तीन चिन्हांचा प्रस्ताव दिला आहे. यामध्ये वटवृक्ष, उगवता सूर्य आणि कप-बशी यांचा समावेश आहे. यातील वटवृक्ष या चिन्हासाठी शरद पवार गट आग्रही आहे.

The post नाव मिळालं, चिन्ह बाकी; ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार’ कोणत्या निवडणूक चिन्हासाठी आग्रही? appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
केंद्र सरकारकडून हत्यार म्हणून ईडीचा वापर, शरद पवारांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल https://dailyyashwant.com/using-ed-as-a-weapon-by-the-central-government-sharad-pawar-attacks-pm-modi/3660/ https://dailyyashwant.com/using-ed-as-a-weapon-by-the-central-government-sharad-pawar-attacks-pm-modi/3660/#respond Sat, 20 Jan 2024 06:48:18 +0000 https://dailyyashwant.com/?p=3660 सोलापूर: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार शनिवारी सोलापूर दौऱ्यावर आले आहेत. आज दिवसभर सोलापुरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.शनिवारी सकाळी बालाजी सरोवर या पंचतारांकित हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेत पवारांनी पंतप्रधान मोदींवर निशाना साधला. मोदी शुक्रवारी रे नगरच्या उद्घाटनासाठी सोलापूरला येऊन गेले पण रे नगरच्या गृहप्रकल्पाचा सर्व श्रेय माजी आमदार नरसय्या आडम यांना जाते अशी कोपरखळी […]

The post केंद्र सरकारकडून हत्यार म्हणून ईडीचा वापर, शरद पवारांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
सोलापूर: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार शनिवारी सोलापूर दौऱ्यावर आले आहेत. आज दिवसभर सोलापुरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.शनिवारी सकाळी बालाजी सरोवर या पंचतारांकित हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेत पवारांनी पंतप्रधान मोदींवर निशाना साधला. मोदी शुक्रवारी रे नगरच्या उद्घाटनासाठी सोलापूरला येऊन गेले पण रे नगरच्या गृहप्रकल्पाचा सर्व श्रेय माजी आमदार नरसय्या आडम यांना जाते अशी कोपरखळी पवारांनी मारली.

मोदींनी भर सभेत भावूक होऊन भाषण केले मात्र मोदींनी किंवा भाजपने याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये अशी टीका शरद पवार यांनी केली आहे. मोदी सोलापुरात येऊन रे नगर गृहप्रकल्पाचा उदघाटन करून गेले,व्यासपीठावर थांबून मोदींना अश्रू अनावर झाले. लहानपणीच्या आठवणींना उजाळा दिला हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. सोलापुरात अनेक लोक आजही बेरोजगार आहेत.महागाई जबरदस्त वाढली आहे या विषयांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी काहीही बोलले नाहीत अशी टीका शरद पवार यांनी केली आहे.

ईडीचा वापर सरकार हत्यार म्हणून करत आहे

केंद्रीय संस्था ईडीचा वापर सरकार हत्यार म्हणून करत आहे. एकच सरकार सत्तेत असल्याने ईडीचा वापर करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात आहे.रोहित पवारांना ईडीची नोटीस आल्यावर शरद पवारांनी ईडीची भीती विरोधकांना दाखवली जातं आहे अशी टीका केली. अनिल देशमुख यांना सहा महिने तुरुंगात पाठवले,सामनाचे संपादक संजय राऊत यांनाही तुरुंगात टाकले, हे सरकार ईडीचा वापर सरकार हत्यार म्हणून करत आहे अशी टीका शरद पवारांनी केली आहे.

अजित पवारांच्या भाषणाकडे जास्त लक्ष देऊ नका

उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुणे येथील सहकारी बँकेच्या कार्यक्रमात शरद पवारांच नाव न घेता टीका केली होती.वयस्कर लोक तरुणांना संधी देत नाहीत ,असे अजित पवार यांनी भाषणातून खंत व्यक्त केली होती.सोलापूर शहरात असताना शरद पवारांनी अजित पवारांच्या भाषणाला प्रतिउत्तर दिले आहे.अजित पवार हे तरुणच होते,त्यांना संधी कुणी दिली.त्यांच्या भाषणाकडे जास्त लक्ष द्यायची गरज नाही असे शरद पवारांनी सांगितलं.

The post केंद्र सरकारकडून हत्यार म्हणून ईडीचा वापर, शरद पवारांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
https://dailyyashwant.com/using-ed-as-a-weapon-by-the-central-government-sharad-pawar-attacks-pm-modi/3660/feed/ 0