sanjay raut Archives - Dainik Yashwant, Latur https://dailyyashwant.com/tag/sanjay-raut/ Online Portal Mon, 12 Feb 2024 16:22:21 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.4 भ्रष्टाचाराचा एकच नारा तुरुंगापेक्षा भाजप बरा, हा नारा अशोक चव्हाणांनी दिला; संजय राऊतांचा बोचरा वार https://dailyyashwant.com/ashok-chavan-gave-this-slogan-that-bjp-is-better-than-jail-for-the-single-slogan-of-corruption/4003/ https://dailyyashwant.com/ashok-chavan-gave-this-slogan-that-bjp-is-better-than-jail-for-the-single-slogan-of-corruption/4003/#respond Mon, 12 Feb 2024 16:22:21 +0000 https://dailyyashwant.com/?p=4003 आता नवा नारा आला आहे,  भ्रष्टाचाराचा एकच नारा तुरुंगापेक्षा भाजप बरा.  हा नारा अशोक चव्हाण यांनी दिला, अशी सडकडून टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली. शिवसेना ठाकरे गटाची जनसंवाद यात्रा छत्रपती संभाजीनगरमध्ये पोहोचली. यावेळी बोलताना संजय राऊत यांनी अशोक चव्हाणांचा चांगलाच समाचार घेतला. त्यांनी अब्दुल सत्तार यांचाही खोचक शब्दात समाचार घेतला. राऊत पुढे  म्हणाले […]

The post भ्रष्टाचाराचा एकच नारा तुरुंगापेक्षा भाजप बरा, हा नारा अशोक चव्हाणांनी दिला; संजय राऊतांचा बोचरा वार appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
आता नवा नारा आला आहे,  भ्रष्टाचाराचा एकच नारा तुरुंगापेक्षा भाजप बरा.  हा नारा अशोक चव्हाण यांनी दिला, अशी सडकडून टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली. शिवसेना ठाकरे गटाची जनसंवाद यात्रा छत्रपती संभाजीनगरमध्ये पोहोचली. यावेळी बोलताना संजय राऊत यांनी अशोक चव्हाणांचा चांगलाच समाचार घेतला. त्यांनी अब्दुल सत्तार यांचाही खोचक शब्दात समाचार घेतला.

राऊत पुढे  म्हणाले की, भारतीय जनता पार्टीला विस्मरणाचा रोग झाला आधी काय बोललो होतो ते त्यांना आठवत नाही. दोन-तीन वर्षांपूर्वी मोदींनी नांदेडमध्ये जाऊन अशोक चव्हाणांविरोधात भाषण केलं होतं. अशोक चव्हाण किती भ्रष्टाचारी आहे ते सांगितलं होतं. संजय राऊत यांनी त्याच भाषणाची क्लीप व्यासपीठावर ऐकवली. देवेंद्र फडणवीस यांनी देखील जे बोलले होते त्याची क्लिपही ऐकवली.

अब्दुल सत्तार नावाचा चोर जेलमध्ये असेल

संजय राऊत यांनी अब्दुल सत्तार यांच्यावरही तोफ डागली. अब्दुल सत्तार नावाचा चोर पुढील चार महिन्यात जेलमध्ये असेल. आपलं सरकार येईल आणि किमान 12 महिने जेलमध्ये असेल, असा इशारा राऊत यांनी दिला.

तत्पूर्वी, बोलताना माजी मंत्री चंद्रकांत खैरे यांनी सुद्धा चंद्रकांत खैरे यांच्यावर तोफ डागली. खैरे यांनी सत्तार यांच्या विरोधात ईडीकडे 17 हजार पानांचा पुरावा दिला होता तो गठ्ठा दाखवला. ईडीवर यावर कोणती कारवाई करणार आहे का? असा सवाल त्यांनी केला. भुमरे मला म्हणतात की मी काम केलं नाही. मी मंदिर उभा केलं, पण दारूची दुकाने उघडली नाही, अशी टीका करताना खैरे यांनी भूमऱ्या असा उल्लेख केला. पोलिस पालकमंत्री यांचं ऐकत असेल, तर आम्हाला कोर्टात जावं लागेल असा इशाराही त्यांनी दिला.

The post भ्रष्टाचाराचा एकच नारा तुरुंगापेक्षा भाजप बरा, हा नारा अशोक चव्हाणांनी दिला; संजय राऊतांचा बोचरा वार appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
https://dailyyashwant.com/ashok-chavan-gave-this-slogan-that-bjp-is-better-than-jail-for-the-single-slogan-of-corruption/4003/feed/ 0
अशोक चव्हाण आता काँग्रेस पक्षावर दावा ठोकणार? संजय राऊतांचं ट्विट https://dailyyashwant.com/ashok-chavan-will-now-sue-the-congress-party-sanjay-rauts-tweet/3976/ https://dailyyashwant.com/ashok-chavan-will-now-sue-the-congress-party-sanjay-rauts-tweet/3976/#respond Mon, 12 Feb 2024 09:37:06 +0000 https://dailyyashwant.com/?p=3976 मुंबई: काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सोमवारी काँग्रेसच्या पक्षसदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला. त्यांच्या या निर्णयाने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी ट्विट करुन भाष्य केले. आता अशोक चव्हाणही  काँग्रेस आमदारांचा गट फोडून संपूर्ण पक्ष आणि हात या चिन्हावर दावा करणार […]

The post अशोक चव्हाण आता काँग्रेस पक्षावर दावा ठोकणार? संजय राऊतांचं ट्विट appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
मुंबई: काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सोमवारी काँग्रेसच्या पक्षसदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला. त्यांच्या या निर्णयाने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी ट्विट करुन भाष्य केले. आता अशोक चव्हाणही  काँग्रेस आमदारांचा गट फोडून संपूर्ण पक्ष आणि हात या चिन्हावर दावा करणार का, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला. अशोक चव्हाण भाजपवासी झाले, विश्वास बसत नाही. कालपर्यंत ते सोबत होते. चर्चा करीत होते, आज गेले. एकनाथ मिंधे व अजित पवार यांच्याप्रमाणे चव्हाणसुध्दा आता काँग्रेसवर दावा सांगून हात चिन्ह मिळवणार काय?   आणि निवडणूक आयोग त्यांना ते देणार काय? आपल्या देशात काहीही घडू शकते!, असे संजय राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

The post अशोक चव्हाण आता काँग्रेस पक्षावर दावा ठोकणार? संजय राऊतांचं ट्विट appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
https://dailyyashwant.com/ashok-chavan-will-now-sue-the-congress-party-sanjay-rauts-tweet/3976/feed/ 0