ram mandir Archives - Dainik Yashwant, Latur https://dailyyashwant.com/tag/ram-mandir/ Online Portal Mon, 22 Jan 2024 05:54:54 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.4 लातूर शहरामध्ये मिरवणुकीचा उत्साह; चिमुकल्यांसह अबालवृद्ध नागरिकांचा मिरवणुकीत सहभाग https://dailyyashwant.com/processional-enthusiasm-in-latur-city-children-and-elderly-citizens-participate-in-the-procession/3708/ https://dailyyashwant.com/processional-enthusiasm-in-latur-city-children-and-elderly-citizens-participate-in-the-procession/3708/#respond Mon, 22 Jan 2024 05:54:54 +0000 https://dailyyashwant.com/?p=3708 लातूर: अयोध्येत आज होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त लातूरमध्ये रविवारी मोठ्या जल्लोषात मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील आबालवृद्ध नागरिकांनी या मिरवणुकीत मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त रामभक्तांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. विविध संस्था, संघटना, मंडळांचे कार्यकर्ते या कार्यक्रमांचे मोठ्या उत्साहाने आयोजन करीत आहेत. व्यापारी वर्गाचा उत्साहही वाखणण्याजोगा आहे. गांधी चौक, हनुमान चौक, सराफ लाइन, […]

The post लातूर शहरामध्ये मिरवणुकीचा उत्साह; चिमुकल्यांसह अबालवृद्ध नागरिकांचा मिरवणुकीत सहभाग appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
लातूर: अयोध्येत आज होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त लातूरमध्ये रविवारी मोठ्या जल्लोषात मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील आबालवृद्ध नागरिकांनी या मिरवणुकीत मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त रामभक्तांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. विविध संस्था, संघटना, मंडळांचे कार्यकर्ते या कार्यक्रमांचे मोठ्या उत्साहाने आयोजन करीत आहेत. व्यापारी वर्गाचा उत्साहही वाखणण्याजोगा आहे. गांधी चौक, हनुमान चौक, सराफ लाइन, गंजगोलाई, विवेकानंद चौक, ठाकरे चौक, छत्रपती शिवाजी चौकातील व्यापाऱ्यांनी समोरच्या दर्शनी भागातील रस्त्यावर ही विद्युत रोषणाई केली आहे.

शहराच्या विविध भागांत रविवारीच रामरथाच्या मिरवणुकीचे आयोजन केले आहे. महिला, तरुणांचा उत्साह दिसून येत आहे. लातुरातील पुरातन श्रीराम मंदिरात विविध कार्यक्रम होत आहेत. माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी सूरतशहावली दर्गाला चादर अर्पण करून त्यांच्या परिसरात सुरुवात केली आहे.

लातुरातील जुना औसा रोड भागातील प्रभाग क्रमांक १७ मधील नागरिकांनी एकत्र येत मिरवणूक काढली आहे. या यात्रेत मंदिर विश्‍वस्त इंद्रजित ठाकूर, उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, नगरसेवक शोभा पाटील, व्यंकटेश कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती आहे. या यात्रेत भजनीमंडळ, भगवे वस्त्र परिधान केलेल्या महिला, तरुणांचा मोठा सहभाग आहे. परिसरातील सिद्धिविनायक मंदिर, साईबाबा मंदिर, ओंकार हनुमान मंदिर परिसरात मिरवणूक काढण्यात येणार असून, अयोध्या कॉलनीतील श्रीराम मंदिरात त्याचा समारोप होणार आहे.

श्री केशव मित्र मंडळच्या वतीने मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. केशवनगरमधील वीर हनुमान मंदिर येथून निघालेली ही मिरवणूक केशवनगर, अंबा हनुमान, कॉकसिट कॉलेज, शारदा कॉलनी, बँक कॉलनी, केशवनगर, इंडियानगर या भागातून काढण्यात आली. मिरवणुकीत मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते. नागरिकांनी जागोजागी यात्रेचे फटाके वाजवून स्वागत केले. सडा, रांगोळ्या, भगव्या पताका, श्रीराम मूर्तीचे भव्य फलक यांनी रस्ते सजले होते. मिरवणुकीत रामरथावर श्रीराम, लक्ष्मण, सीता व हनुमान रूपात मुले विराजमान झाली होती. भव्य श्रीराम प्रतिमा वेगळ्या रथावर लावण्यात आली होती. मिरवणुकीत उंट, घोडे सजलेल्या स्वारासहित सहभागी झाले. मिरवणूक यशस्वी करण्यासाठी केशव मित्र मंडळाचे अध्यक्ष सर्वोत्तम कुलकर्णी, माजी महापौर दीपक सूळ, माजी नगरसेविका सपना किसवे, कीर्ती धूत, विलास आराध्ये, मुरलीधर दीक्षित, किशोर कुलकर्णी, कांचन भावठाणकर, संजय निरगुडे, पोटे, अजय सूळ, अजय रेणापूरे आदींनी परिश्रम घेतले.

The post लातूर शहरामध्ये मिरवणुकीचा उत्साह; चिमुकल्यांसह अबालवृद्ध नागरिकांचा मिरवणुकीत सहभाग appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
https://dailyyashwant.com/processional-enthusiasm-in-latur-city-children-and-elderly-citizens-participate-in-the-procession/3708/feed/ 0
शाळा-कॉलेज बंद, रुग्णालयांमध्ये हाफ डे अन् मांस विक्री दुकानांना टाळे https://dailyyashwant.com/schools-and-colleges-closed-hospitals-half-day-and-meat-shops-closed/3679/ https://dailyyashwant.com/schools-and-colleges-closed-hospitals-half-day-and-meat-shops-closed/3679/#respond Sun, 21 Jan 2024 07:24:01 +0000 https://dailyyashwant.com/?p=3679 अयोध्या: २२ जानेवारीला अयोध्येतील श्री राम मंदिरात अभिषेक सोहळा होणार आहे. याबाबत कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्याचबरोबर मांस आणि दारूची दुकानंही बंद राहतील. सरकारी आदेशानुसार सोमवारी म्हणजेच २२ जानेवारीला कसिनो उघडणार नाहीत. सरकारी कर्मचाऱ्यांच्या भावना लक्षात घेता सर्व केंद्रीय कार्यालयांना सोमवारी दुपारी अडीच वाजेपर्यंत सुट्टी जाहीर केली आहे. याशिवाय अनेक राज्यांनी अर्ध्या दिवसाची सुट्टीही […]

The post शाळा-कॉलेज बंद, रुग्णालयांमध्ये हाफ डे अन् मांस विक्री दुकानांना टाळे appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
अयोध्या: २२ जानेवारीला अयोध्येतील श्री राम मंदिरात अभिषेक सोहळा होणार आहे. याबाबत कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्याचबरोबर मांस आणि दारूची दुकानंही बंद राहतील. सरकारी आदेशानुसार सोमवारी म्हणजेच २२ जानेवारीला कसिनो उघडणार नाहीत. सरकारी कर्मचाऱ्यांच्या भावना लक्षात घेता सर्व केंद्रीय कार्यालयांना सोमवारी दुपारी अडीच वाजेपर्यंत सुट्टी जाहीर केली आहे. याशिवाय अनेक राज्यांनी अर्ध्या दिवसाची सुट्टीही जाहीर केली आहे.

दुसरीकडे, दिल्लीच्या एम्सने आदेश जारी केला आहे की, २२ जानेवारी रोजी दुपारी अडीच वाजेपर्यंत ओपीडी सुविधा उपलब्ध होणार नाही. या कालावधीत तुम्ही चाचणी आणि इतर सुविधांपासून वंचित राहाल. मात्र, सर्व प्रकारच्या आपत्कालीन सेवा सुरू राहतील. सर्व नियोजित शस्त्रक्रिया (ज्या नंतर केल्या जाऊ शकतात) पुन्हा शेड्यूल केल्या जातील, परंतु जर एखाद्या व्यक्तीला अपघात झाला आणि आपत्कालीन परिस्थितीत रुग्णालयात नेले गेले तर त्याच्यावर उपचार केले जातील. सामान्य ओपीडी संध्याकाळी सुरू होईल, असंही एम्सने सांगितलं.

त्याचवेळी डॉ. राम मनोहर लोहिया यांच्यासह इतर रुग्णालयांमध्ये दुपारी २.३० नंतर ओपीडी सुविधा सुरू होईल. या काळात आपत्कालीन सेवा पूर्वीप्रमाणे सुरू राहतील. डॉ. राम मनोहर लोहिया हॉस्पिटलने आदेश जारी करून सांगितले की, ओपीडी सुविधेसाठी दुपारी अडीचनंतर, ओपीडी नोंदणी सुविधा दुपारी दीड वाजल्यापासून सुरू होईल. याशिवाय, सफदरजंग आणि लेडी हार्डिंज केंद्रीय सरकारी रुग्णालयांमध्येही अर्धा दिवस सुट्टी असेल.

मध्यप्रदेशात मांस विक्रीची दुकानं बंद

प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर, २२ जानेवारी रोजी मध्य प्रदेशातील शहरी भागात सर्व कत्तलखाने आणि मांस विक्रीची दुकानं बंद राहतील. या संदर्भात नगरविकास आणि गृहनिर्माण विभागाने महापालिका आयुक्त, मुख्य पालिका अधिकारी, महानगरपालिका आणि नगरपरिषदांना सूचना दिल्या आहेत. मध्य प्रदेशातील सर्व सरकारी कार्यालयांना अर्धा दिवस सुट्टी असेल. सर्व शासकीय कार्यालये दुपारी अडीच वाजेपर्यंत बंद राहणार आहेत.

गोव्यात सर्व कसिनो बंद

राम मंदिर उद्घाटनाच्या शुभ मुहूर्तावर, गोव्यातील सर्व कसिनोने स्वेच्छेने २२ जानेवारी रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत कसिनो बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

यूपी डीजीपीने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली

उत्तर प्रदेश डीजीपी विजय कुमार यांनी २२ जानेवारी संदर्भात आवश्यक मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. ते म्हणाले की अयोध्येत मोठ्या संख्येने यात्रेकरू आधीच उपस्थित आहेत, जे धार्मिक स्थळं, धर्मशाळा आणि आश्रमांमध्ये मुक्काम करत आहेत. त्या धर्मशाळा आणि आश्रमाच्या व्यवस्थापकांना विनंती आहे की, सर्व भाविकांनी एकत्र दर्शनासाठी जाऊ नये. २२ जानेवारीनंतर दर्शनाची व्यवस्था केली जाईल. सर्व चेकपोस्टवर सखोल तपासणी मोहीम राबवावी.
भारत-नेपाळ सीमा, आंतरराज्य सीमा, अयोध्या आणि त्याच्या लगतच्या जिल्ह्यांच्या सीमांवर सखोल तपासणी केली जावी. जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याशी संबंधित वाहनांची सेवा खंडित होऊ नये, असे त्यांनी सांगितले. अयोध्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांशी चांगला व्यवहार ठेवा. सरयू नदीत सुरक्षेसाठी तैनात असलेले जलपोलीस कार्यरत ठेवावेत. सीमेवर वाहनांची तपासणी करताना निष्काळजीपणा होता कामा नये. संशयास्पद वाहन किंवा व्यक्तीची कसून चौकशी करून चौकशी करावी. सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यांवर तात्काळ आणि कडक कारवाई करण्यात यावी, असे आदेश देण्यात आले आहेत.

या राज्यांमध्ये शाळा-कॉलेजला सुट्टी

उत्तर प्रदेशात सर्व शाळा-कॉलेजला सुट्टी असेल, तसेच मांस विक्री करणारी दुकानंही बंद राहतील. गोव्यात सर्व शाळा बंद असतील. कार्यालयांनाही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर हरियाणात २२ जानेवारीला शाळांना सुट्टी असेल. ओदिशातही सरकारने हाफ डेची घोषणा केली आहे. गुजरातमध्येही २२ जानेवारीला अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

The post शाळा-कॉलेज बंद, रुग्णालयांमध्ये हाफ डे अन् मांस विक्री दुकानांना टाळे appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
https://dailyyashwant.com/schools-and-colleges-closed-hospitals-half-day-and-meat-shops-closed/3679/feed/ 0