praniti shinde Archives - Dainik Yashwant, Latur https://dailyyashwant.com/tag/praniti-shinde/ Online Portal Mon, 12 Feb 2024 14:05:51 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.4 अशोक चव्हाणांसोबत भाजपने माईंड गेम खेळला -प्रणिती शिंदे https://dailyyashwant.com/bjp-played-mind-game-with-ashok-chavan-praniti-shinde/3997/ https://dailyyashwant.com/bjp-played-mind-game-with-ashok-chavan-praniti-shinde/3997/#respond Mon, 12 Feb 2024 14:05:51 +0000 https://dailyyashwant.com/?p=3997 सोलापूर: काँग्रेसचे अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्यात राजकीय भूकंप आला आहे. काँग्रेसच्या राज्य कार्याध्यक्ष आणि काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी प्रतिक्रिया देताना भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. राजकीय नेत्यांना फोडणे, ईडी सारख्या चौकशा लावणे, हताश होऊन अशोक चव्हाण काँग्रेस सोडून गेले. भाजपची ही युक्तीच आहे, असेही प्रणिती शिंदेंनी सांगितलं. मी तर स्पष्टपणे सांगितले आहे. माझ्याबाबत […]

The post अशोक चव्हाणांसोबत भाजपने माईंड गेम खेळला -प्रणिती शिंदे appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
सोलापूर: काँग्रेसचे अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्यात राजकीय भूकंप आला आहे. काँग्रेसच्या राज्य कार्याध्यक्ष आणि काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी प्रतिक्रिया देताना भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. राजकीय नेत्यांना फोडणे, ईडी सारख्या चौकशा लावणे, हताश होऊन अशोक चव्हाण काँग्रेस सोडून गेले. भाजपची ही युक्तीच आहे, असेही प्रणिती शिंदेंनी सांगितलं.

मी तर स्पष्टपणे सांगितले आहे. माझ्याबाबत फक्त अफवा आहेत. आम्ही काँग्रेस सोडून जाणार नाही. आमच्याकडे ईडीची चौकशी होण्यासारखं काहीही नाही, असे प्रणिती शिंदें स्पष्ट सांगितले. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे आमदार अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्याने राज्यातील काँग्रेसमध्ये मोठा भूकंप आला आहे. अशोक चव्हाणांसोबत भाजपने माईंड गेम खेळला. ईडीच्या चौकशा आणि दबाव यामुळे अशोक चव्हाणांनी हा निर्णय घेतला. हे केवळ आणि केवळ ईडीच्या प्रेशरमुळे आहे. जे अशोक चव्हाण साहेबांसोबत झालं. वारंवार प्रेशर, ब्लॅकमेल, एकप्रकारचं ब्लॅकमेल पण त्यांना करण्यात आलेलं म्हणून कदाचित त्यांनी तो निर्णय हा निर्णय घेतला असेल. ही काँग्रेससाठी अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे, असं त्या म्हणाल्या.

प्रणिती शिंदे म्हणाल्या की, ब्लॅकमेल करून अटक असेल, ईडी असेल त्या पद्धतीचा ब्लॅकमेल करून प्रत्येक पक्षाच्या नेत्यांना त्यांच्यामध्ये घेण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपने त्यांच्याबरोबर माईंड गेम खेळले गेले. अतिशय हताश होऊन त्यांनी हा निर्णय घेतला आहे. मी भाजपमध्ये जाणार ह्या सगळ्या अफवा आहेत. साहेबांनी आणि मी याअगोदर स्पष्टीकरण दिलेला आहे. त्याबद्दल मला काही बोलायचं नाही. पण जे शक्य नाही. अर्थात चव्हाण साहेबांनी जो काही निर्णय भीतीपोटी असेल तो घेतला तो काँग्रेससाठी अतिशय दुर्दैवी आहे. ह्या पद्धतीचे राजकारण आपल्या देशात किंवा महाराष्ट्रात पहिल्यांदाच होत आहे. माझ्याबद्दल अफवा पसरवत आहेत. ईडी चौकशी करण्यासारख आमच्याकडे नाहीच आहेत संस्था वैगरे. पण भारताची नागरिक म्हणून ज्याच्यासाठी माझी जे तत्व आहेत, ज्याच्यासाठी मी राजकारणात आली.

बीजेपी आम्हाला आणि अनस्टेबल दाखवायचा प्रयत्न करत आहे. तसं काही नाही काँग्रेस पक्ष भक्कम आहे. कितीही आम्हाला अनस्टेबल करायचा प्रयत्न केला तर ते यशस्वी होणार नाहीत. काँग्रेस हा एक विचार आहे आणि महाविकास आघाडी भक्कम आहे. महाराष्ट्राला एक विचार देणारा महाविकास आघाडी एक राजकीय पक्ष आहे. महाविकास आघाडीच्या बाजूने कौल वाढत चालला आहे. हे त्यांना माहित आहे. म्हणून ते महानगरपालिका निवडणुका घेत नाहीत. लोकसभा किंवा विधानसभेमध्ये महाविकास आघाडीचा कल हे भाजपपेक्षा जास्त असेल, असं प्रणिती शिंदे म्हणाल्या आहेत.

The post अशोक चव्हाणांसोबत भाजपने माईंड गेम खेळला -प्रणिती शिंदे appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
https://dailyyashwant.com/bjp-played-mind-game-with-ashok-chavan-praniti-shinde/3997/feed/ 0