ncp Archives - Dainik Yashwant, Latur https://dailyyashwant.com/tag/ncp/ Online Portal Fri, 08 Dec 2023 06:28:33 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.4 देवेंद्र फडणवीसांच्या लेटरबॉम्बमुळे अजित पवार गट नाराज https://dailyyashwant.com/ajit-pawar-faction-upset-over-devendra-fadnavis-letter-bomb/3030/ https://dailyyashwant.com/ajit-pawar-faction-upset-over-devendra-fadnavis-letter-bomb/3030/#respond Fri, 08 Dec 2023 06:21:42 +0000 https://dailyyashwant.com/?p=3030 नागपूर: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांची विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशानातील एंट्री चांगलीच गाजली आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी ते थेट सत्तापक्षाच्या बाकांवर विराजमान झालेत. त्यावर विरोधकांनी केलेल्या टीकेनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महायुतीत तुर्तास घेऊ नये, असे पत्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लिहीले. या संपूर्ण घटनाक्रमावर मलिक यांनी मौन बाळगले असले तरी युतीतील नेते सध्या बॅकफूटवर आल्याचे […]

The post देवेंद्र फडणवीसांच्या लेटरबॉम्बमुळे अजित पवार गट नाराज appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
नागपूर: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांची विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशानातील एंट्री चांगलीच गाजली आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी ते थेट सत्तापक्षाच्या बाकांवर विराजमान झालेत. त्यावर विरोधकांनी केलेल्या टीकेनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महायुतीत तुर्तास घेऊ नये, असे पत्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लिहीले. या संपूर्ण घटनाक्रमावर मलिक यांनी मौन बाळगले असले तरी युतीतील नेते सध्या बॅकफूटवर आल्याचे चित्र आहे.

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मलिक यांची अधिवेशनातील एंट्रीने राष्ट्रवादीच्या अजित पवार गटामध्ये चैतन्य संचारले होते. विधानसभेत ते सत्तापक्षाच्या बाकांवर बसलेत. त्यामुळे अजितदादांनी ही लढाई जिंकल्याचा विजयीभाव त्यांच्या गटात दिसून आला. नवाब मलिक तेव्हादेखील मौन होते. पहिल्या दिवशी त्यांनी कुठल्याही गटात नाही तर राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असल्याचे सांगितले. पण, सत्तापक्षाच्या बाकावर बसून त्यांनी स्वत:च्या कृतीतून त्यांची बाजू स्पष्ट केल्याचे चित्र होते. त्यावर विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत ‘देशद्रोहाचे आरोप असलेल्यांच्या मांडीला मांडी लावून बसणार का,’ असा सवाल केला होता. या संपूर्ण घटनाक्रमानंतर सायंकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्राने राजकीय भूंकप झाला. त्या पत्राचे पडसाद राष्ट्रवादीच्या अजित पवार गटावर पडल्याचे शुक्रवारी दिसून आले. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील म्हणाले,‘उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पत्र जाहीर झाले नसते तर बरे झाले असते. मित्रपक्ष म्हणून यासंदर्भात चर्चा करायला पाहिजे होती. आमचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी याबाबत भूमिका स्पष्ट केल्यामुळे युतीत मिठाचा खडा पडला, असे म्हणण्याचे काहीही कारण नाही.’

आमदार नवाब मलिक यांना कुठे बसू द्यावे, हा विधानसभा अध्यक्षांचा अधिकार आहे. त्यावर मी बोलणे योग्य नाही. काल नवाब मलिक वैद्यकीय जामीनावर सुटल्यानंतर पहिल्यांदाच यंदाच्या हिवाळी अधिवेशनात आलेत. त्यानंतर ते सहकाऱ्यांशी भेटलेत. मात्र, ते कुठल्या गटात आहेत, याबाबत त्यांनी भूमिका स्पष्ट केल्यानंतर मी यावर भाष्य करेल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणालेत.

फडणवीसांच्या लेटरबॉम्बवर बोचरी टीका करताना काँग्रसेचे नेते बाळासाहेब थोरात म्हणाले,‘भाजप सत्तेसाठी कुठल्याही थराला जाण्यास तयार आहे; हे या पत्रावरून स्पष्ट होते.’ त्यांनी खासगीत पत्र लिहीणे शक्य होते, ते जाहीर करण्याची गरज नव्हती, असेदेखील ते म्हणाले.

The post देवेंद्र फडणवीसांच्या लेटरबॉम्बमुळे अजित पवार गट नाराज appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
https://dailyyashwant.com/ajit-pawar-faction-upset-over-devendra-fadnavis-letter-bomb/3030/feed/ 0
नवाब मलिक कोणत्या गटात मला माहिती नाही; अजित पवारांचं स्पष्टीकरण https://dailyyashwant.com/nawab-malik-in-which-group-i-do-not-know-explanation-of-ajit-pawar/3027/ https://dailyyashwant.com/nawab-malik-in-which-group-i-do-not-know-explanation-of-ajit-pawar/3027/#respond Fri, 08 Dec 2023 06:15:48 +0000 https://dailyyashwant.com/?p=3027 नागपूर: राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमच्या गटाने महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला, त्याबाबत नवाब मलिक यांना कोणतीही माहिती नव्हती. हिवाळी अधिवेशनाच्यानिमित्ताने ते पहिल्यांदाच सभागृहात आले होते. मात्र, ते कोणत्या गटासोबत आहेत, याबाबत त्यांनी भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केल्यानंतर मी या सगळ्यावर प्रतिक्रिया देईन, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी […]

The post नवाब मलिक कोणत्या गटात मला माहिती नाही; अजित पवारांचं स्पष्टीकरण appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
नागपूर: राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमच्या गटाने महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला, त्याबाबत नवाब मलिक यांना कोणतीही माहिती नव्हती. हिवाळी अधिवेशनाच्यानिमित्ताने ते पहिल्यांदाच सभागृहात आले होते. मात्र, ते कोणत्या गटासोबत आहेत, याबाबत त्यांनी भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केल्यानंतर मी या सगळ्यावर प्रतिक्रिया देईन, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना गुरुवारी रोखठोक भाषेत पत्र धाडून नवाब मलिक यांच्या सत्ताधारी गटातील समावेशाला विरोध दर्शविला होता. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांची आजची प्रतिक्रिया सूचक आणि अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. अजितदादांच्या एकूण बोलण्याचा रोख पाहता आगामी काळात अजित पवार गटाकडून नवाब मलिक यांना अंतर दिले जाण्याची शक्यता आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्यासंदर्भात लिहेलेल पत्र मला मिळाले, ते मी वाचलं. नवाब मलिक हे काल पहिल्यांदाच सभागृहात आले होते. ते सभागृहात कुठे बसले, याबाबत मीडियाने माहिती दिली. पण आम्ही महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला त्यानंतर नवाब मलिक हे पहिल्यांदाच सभागृहात आले होते. त्यांची भूमिका काय आहे, हे ऐकल्यानंतरच मी त्यांच्याबद्दल माझं मत देईन. नबाव मलिक यांना न्यायालयाने वैद्यकीय कारणामुळे बाहेर येण्याची संधी दिली आहे. त्यांच्यावरील केस अजून सुरु आहे. सभागृहात कोणी कुठे बसायचे, हा माझा अधिकार नाही. तो निर्णय विधानसभा अध्यक्ष घेतात. नवाब मलिक कोणासोबत आहेत, हे अद्याप त्यांनी स्पष्ट केलेले नाही. त्यांची भूमिका स्पष्ट झाल्यानंतरच मी बोलेन. देवेंद्र फडणवीस यांच्या पत्राबाबत काय करायचं ते मी करेन. त्याबाबत मीडियाला सांगण्याचं काही कारण नाही, असे अजित पवार यांनी म्हटले. यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी अजित पवार यांच्यावर एकापाठोपाठ एक प्रश्नांची सरबत्ती केली. त्यामुळे अजित पवार चांगलेच वैतागल्याचे दिसत होते.

जमीन गैरव्यवहारप्रकरणात ईडी कोठडीत तुरुंगवास भोगलेल्या आणि भाजपकडून देशद्रोहाचे आरोप झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची चांगलीच कोंडी झाली आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी गुरुवारी नवाब मलिक हे सभागृहात बसले होते. यावेळी ते सत्ताधाऱ्यांच्या रांगेत शेवटच्या बाकावर बसले होते. इतके दिवस भाजपने देशद्रोहाचे आरोप केलेले नवाब मलिक सत्ताधाऱ्यांच्या रांगेत बसल्याने अनेकांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले होते. या सगळ्या घटनाक्रमानंतर देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी संध्याकाळी अजित पवार यांना एक पत्र लिहले. योगायोगाने हे पत्र प्रसारमाध्यमांच्या हाती लागले. त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांना सोबत घेण्यास स्पष्ट विरोध केला होता. यानंतर अजित पवार काय भूमिका घेतात, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या होत्या.

The post नवाब मलिक कोणत्या गटात मला माहिती नाही; अजित पवारांचं स्पष्टीकरण appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
https://dailyyashwant.com/nawab-malik-in-which-group-i-do-not-know-explanation-of-ajit-pawar/3027/feed/ 0