nationlist congress party Archives - Dainik Yashwant, Latur https://dailyyashwant.com/tag/nationlist-congress-party/ Online Portal Mon, 12 Feb 2024 08:46:26 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.4 नसीम खान, चंद्रकांत हंडोरे, अशोक चव्हाणांसोबत 6-7 आजी-माजी आमदार काँग्रेस सोडणार? https://dailyyashwant.com/naseem-khan-chandrakant-handore-ashok-chavan-along-with-6-7-grandmothers-and-former-mlas-will-leave-congress/3964/ https://dailyyashwant.com/naseem-khan-chandrakant-handore-ashok-chavan-along-with-6-7-grandmothers-and-former-mlas-will-leave-congress/3964/#respond Mon, 12 Feb 2024 08:06:47 +0000 https://dailyyashwant.com/?p=3964 मुंबई : काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण  यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्याची पत्र एबीपी माझाच्या हाती लागली आहे. अशोक चव्हाण हे काँग्रेस  सोडून भाजपमध्ये  प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. अशोक चव्हाण हे नांदेडचे  आमदार आहेत. अशोक चव्हाण यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली. मात्र ही भेट नार्वेकरांच्या वाढदिवसानिमित्त असल्याचं सांगण्यात येत […]

The post नसीम खान, चंद्रकांत हंडोरे, अशोक चव्हाणांसोबत 6-7 आजी-माजी आमदार काँग्रेस सोडणार? appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
मुंबई : काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण  यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्याची पत्र एबीपी माझाच्या हाती लागली आहे. अशोक चव्हाण हे काँग्रेस  सोडून भाजपमध्ये  प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. अशोक चव्हाण हे नांदेडचे  आमदार आहेत. अशोक चव्हाण यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली. मात्र ही भेट नार्वेकरांच्या वाढदिवसानिमित्त असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, अशोक चव्हाण यांच्यासोबत आणखी काही मोठे नेते आणि आजी- माजी आमदार राजीनामा देणार असल्याची माहिती आहे. यामध्ये माजी मंत्री नसीम खान  आणि चंद्रकांत हंडोरे  यांच्या नावाची चर्चा आहे.

येत्या 14 तारखेला काँग्रेसच्या काही नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. यामध्ये नांदेड, धाराशिव आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही नेत्यांचा समावेश आहे. याशिवाय मराठवाड्यातील असे नेते जे राष्ट्रीय राजकारणात आहेत, ते सुद्धा काँग्रेस सोडून भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे.

अशोक चव्हाणांसोबत कोण कोण काँग्रेस सोडणार? 

अशोक चव्हाण यांच्यासोबत काँग्रेसचे आणखी बडे नेते राजीनामा देण्याची चर्चा आहे. यामध्ये माजी मंत्री नसीम खान आणि चंद्रकांत हंडोरे यांची नावं आहेत.

अशोक चव्हाण यांच्या जवळचे मानले जाणारे नागपूरचे दोन काँग्रेस आमदार आहेत. यामध्ये  राजू पारवे आणि विकास ठाकरे यांचा समावेश आहे. मात्र मला अशा घडामोडीची कुठलीही माहिती नाही मी मतदारसंघात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेत दौरा करत आहे, अशी प्रतिक्रिया राजू पारवे यांनी दिली.

विकास ठाकरे म्हणाले,  अशोक चव्हाणांनी राजीनामा दिल्याची माहिती  मी पण टीव्हीवरूनच ऐकले आहे. राजीनामा दिल्याची माझ्याकडे कुठलीही माहिती नाही मी काँग्रेस पक्षामध्येच आहे, असं विकास ठाकरे म्हणाले.

अशोक चव्हाण यांचे समर्थक आमदार

  1. नसीम खान, माजी आमदार, चांदिवली
  2. चंद्रकांत हंडोरे, माजी आमदार, चेंबूर
  3. राजू पारवे, आमदार, उमरेड
  4. विकास ठाकरे, आमदार, पश्चिम नागपूर
  5. मोहन हंबर्डे,नांदेड दक्षिण
  6. जितेश अंतापूरकर, देगलूर (नांदेड)
  7. सुभाष धोटे, राजुरा, चंद्रपूर
  8. अमित झनक, रिसोड, वाशिम

अशोक चव्हाण यांना राज्यसभेवर पाठवणार? 

अशोक चव्हाण यांना राज्यसभा मिळण्याची शक्यता आहे. राज्यात मंत्रिपद देण्यासाठी भाजप नेत्यांकडून विरोध आहे. त्यामुळे त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली जाण्याची दाट शक्यता आहे.

अशोक चव्हाण यांनी राहुल नार्वेकर यांची भेट 

दरम्यान, अशोक चव्हाण यांनी आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली. या भेटीतच त्यांच्या भाजप प्रवेशाची आणि काँग्रेसच्या आमदारकीच्या राजीनाम्याची चर्चा झाल्याची माहिती आहे.

 प्रताप पाटील चिखलीकर काय म्हणाले? 

अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करतील अशी बातमी आहे. ते विधानभवनात राजीनामा देण्यासाठी गेल्याची माहिती आहे, पण अधिकृत माहिती नाही. ज्या पक्षाने त्यांना मुख्यमंत्रीपदापर्यंत नेलं, तिथे अस्वस्थ राहण्याचं कारण नाही. ते भाजपमध्ये येत असतील तर त्यांचं मी स्वागत करतो, असं भाजपचे नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर म्हणाले. भाजपला कोणाचीही गरज नाही, पण ज्यांना गरज आहे, ते भाजपमध्ये येतात असंही चिखलीकरांनी सांगितलं.

The post नसीम खान, चंद्रकांत हंडोरे, अशोक चव्हाणांसोबत 6-7 आजी-माजी आमदार काँग्रेस सोडणार? appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
https://dailyyashwant.com/naseem-khan-chandrakant-handore-ashok-chavan-along-with-6-7-grandmothers-and-former-mlas-will-leave-congress/3964/feed/ 0
नाव मिळालं, चिन्ह बाकी; ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार’ कोणत्या निवडणूक चिन्हासाठी आग्रही? https://dailyyashwant.com/nationalist-congress-party-sharad-chandra-pawar-is-the-new-party/3860/ Thu, 08 Feb 2024 02:56:48 +0000 https://dailyyashwant.com/?p=3860 नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतरच्या घडामोडींमध्ये अजित पवार गटाला पक्षाचे नाव व निवडणूक चिन्ह बहाल करणाऱ्या केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्षाचे संस्थापक नेते शरद पवार यांच्या गटाला बुधवारी नवे नाव दिले. यानुसार हा गट आता ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार’ या नावाने ओळखला जाईल. मात्र, या पक्षाच्या निवडणूक चिन्हाबाबत अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला […]

The post नाव मिळालं, चिन्ह बाकी; ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार’ कोणत्या निवडणूक चिन्हासाठी आग्रही? appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतरच्या घडामोडींमध्ये अजित पवार गटाला पक्षाचे नाव व निवडणूक चिन्ह बहाल करणाऱ्या केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्षाचे संस्थापक नेते शरद पवार यांच्या गटाला बुधवारी नवे नाव दिले. यानुसार हा गट आता ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार’ या नावाने ओळखला जाईल. मात्र, या पक्षाच्या निवडणूक चिन्हाबाबत अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही.

निवडणूक आयोगाने अजित पवार गट हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा निर्णय मंगळवारी दिला. आयोगाने एका आदेशात अजित पवार गटाला घड्याळ हे राष्ट्रवादीचे मूळ निवडणूक चिन्हही दिले. सहा महिने चाललेल्या दहा सुनावण्यांनंतर पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह अजित पवार गटाला देण्यात आले.

आयोगाने १४१ पानी आदेशात म्हटले होते की, अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गट हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (एनसीपी) आहे आणि त्यांनाच पक्षाचे नाव आणि ‘घड्याळ’ चिन्ह वापरण्याचा अधिकार आहे. या निर्णयानंतर आयोगाने शरद पवार गटाला बुधवारी दुपारी ४ वाजेपर्यंत तीन नावे पाठवण्याची मुदत दिली होती. नावे न दिल्यास आगामी राज्यसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढवावी लागेल, असेही आयोगाने म्हटले होते.

वटवृक्ष, उगवता सूर्य की कप-बशी?

आयोगाच्या निर्देशानुसार शरद पवार गटाने बुधवारी आपल्या पक्षासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (एस), राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार ही तीन नावे निवडणूक आयोगाकडे पाठवली होती. यातील तिसऱ्या नावाला आयोगाने मान्यता दिली. निवडणूक चिन्हांबाबतही शरद पवार गटाने निवडणूक आयोगाकडे तीन चिन्हांचा प्रस्ताव दिला आहे. यामध्ये वटवृक्ष, उगवता सूर्य आणि कप-बशी यांचा समावेश आहे. यातील वटवृक्ष या चिन्हासाठी शरद पवार गट आग्रही आहे.

The post नाव मिळालं, चिन्ह बाकी; ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार’ कोणत्या निवडणूक चिन्हासाठी आग्रही? appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>