Narendra Modi Archives - Dainik Yashwant, Latur https://dailyyashwant.com/tag/narendra-modi/ Online Portal Mon, 12 Feb 2024 13:45:43 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.4 अशोक चव्हाणांबद्दल २०१४ मध्ये मोदी काय म्हणाले होते? https://dailyyashwant.com/what-did-modi-say-about-ashok-chavan-in-2014/3991/ https://dailyyashwant.com/what-did-modi-say-about-ashok-chavan-in-2014/3991/#respond Mon, 12 Feb 2024 13:40:28 +0000 https://dailyyashwant.com/?p=3991 देशातील विरोधकांमागे ईडी आणि सीबीआयचा ससेमीरा सुरू असतानाच देशातील विरोधी पक्षातील नेते सुद्धा एका मागोमाग एक या पद्धतीने भाजपमध्ये सामील होत आहेत. काहींची संस्थात्मक राजकारणासाठी राजकीय अगतिकता, तर काहींची राजकीय सोय यामागे पाहिली जात आहे. मात्र, यामुळे विचारधारा मात्र बासनात गुंडाळून ठेवावी लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यासह देशामध्ये ईडी आणि सीबीआयचे धाडसत्र सुरूच आहे. […]

The post अशोक चव्हाणांबद्दल २०१४ मध्ये मोदी काय म्हणाले होते? appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
देशातील विरोधकांमागे ईडी आणि सीबीआयचा ससेमीरा सुरू असतानाच देशातील विरोधी पक्षातील नेते सुद्धा एका मागोमाग एक या पद्धतीने भाजपमध्ये सामील होत आहेत. काहींची संस्थात्मक राजकारणासाठी राजकीय अगतिकता, तर काहींची राजकीय सोय यामागे पाहिली जात आहे. मात्र, यामुळे विचारधारा मात्र बासनात गुंडाळून ठेवावी लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यासह देशामध्ये ईडी आणि सीबीआयचे धाडसत्र सुरूच आहे.

मोदी सरकारच्या श्वेतपत्रिकेत आदर्श घोटाळा

केंद्रातील सत्ताधारी मोदी सरकारकडून सातत्याने विरोधकांवर भ्रष्टाचाराचा आणि घराणेशाहीचा आरोप केला जातो. मात्र, त्याच आरोपातील नेते मागच्या दाराने भाजपमध्ये सामील होतात, हे गेल्या काही दिवसांपासून ठळकपणे दिसून येत आहे. काँग्रेस प्रणित युपीएच्या कार्यकाळातील कामकाजावर मोदी सरकारकडून श्वेतपत्रिका सादर करण्यात आली. या श्वेत पत्रिकेमध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक गाजलेल्या आदर्श घोटाळ्याचा सुद्धा समावेश होता. मात्र, आता त्याच आदर्श घोटाळ्यातील मुख्य आरोपी म्हणून पाहिले गेले तेच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण राजीनामा देताच भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे.

मोदींकडून अशोक चव्हाणांवर टीका

मात्र, तेच अशोक चव्हाण यांचं नाव आदर्श घोटाळ्यात आले त्यावेळी त्यांच्यावर आरोपांची राळ उडवून देण्यात पंतप्रधान मोदींपासून ते राज्यातील भाजप नेतृत्वाने कोणतीही कसर बाकी ठेवली नव्हती. इतकंच नव्हे तर आता 2014 मध्ये पीएम मोदी यांनी केलेले ट्विट सुद्धा आता सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.

9 एप्रिल 2014 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशोक चव्हाण यांच्या अनुषंगाने ट्विट करत जोरदार टीका केली होती. अशोक चव्हाण सारख्या घर चोरणाऱ्यांना आपण चौकीदार करणार का? अशी विचारणा त्यांनी सार्वजनिकरित्या केली होती. आता हे ट्विट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झालं आहे. आता अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर आता ते भाजपवासी होऊन त्यांना केंद्रामध्ये मोठं मंत्रिपद दिलं जाईल, अशी चर्चा रंगली आहे. त्यामुळे आता एका बाजूने आरोप करायचे आणि दुसऱ्या बाजूने मागचं दार उघड ठेवून त्यांनाच भाजपमध्ये सामील करून घ्यायचं असा आरोप विरोधकांकडून होत आहे. याची चर्चा आता सोशल मीडियामध्ये रंगली आहे.

 

 

The post अशोक चव्हाणांबद्दल २०१४ मध्ये मोदी काय म्हणाले होते? appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
https://dailyyashwant.com/what-did-modi-say-about-ashok-chavan-in-2014/3991/feed/ 0
केंद्र सरकारकडून हत्यार म्हणून ईडीचा वापर, शरद पवारांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल https://dailyyashwant.com/using-ed-as-a-weapon-by-the-central-government-sharad-pawar-attacks-pm-modi/3660/ https://dailyyashwant.com/using-ed-as-a-weapon-by-the-central-government-sharad-pawar-attacks-pm-modi/3660/#respond Sat, 20 Jan 2024 06:48:18 +0000 https://dailyyashwant.com/?p=3660 सोलापूर: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार शनिवारी सोलापूर दौऱ्यावर आले आहेत. आज दिवसभर सोलापुरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.शनिवारी सकाळी बालाजी सरोवर या पंचतारांकित हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेत पवारांनी पंतप्रधान मोदींवर निशाना साधला. मोदी शुक्रवारी रे नगरच्या उद्घाटनासाठी सोलापूरला येऊन गेले पण रे नगरच्या गृहप्रकल्पाचा सर्व श्रेय माजी आमदार नरसय्या आडम यांना जाते अशी कोपरखळी […]

The post केंद्र सरकारकडून हत्यार म्हणून ईडीचा वापर, शरद पवारांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
सोलापूर: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार शनिवारी सोलापूर दौऱ्यावर आले आहेत. आज दिवसभर सोलापुरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.शनिवारी सकाळी बालाजी सरोवर या पंचतारांकित हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेत पवारांनी पंतप्रधान मोदींवर निशाना साधला. मोदी शुक्रवारी रे नगरच्या उद्घाटनासाठी सोलापूरला येऊन गेले पण रे नगरच्या गृहप्रकल्पाचा सर्व श्रेय माजी आमदार नरसय्या आडम यांना जाते अशी कोपरखळी पवारांनी मारली.

मोदींनी भर सभेत भावूक होऊन भाषण केले मात्र मोदींनी किंवा भाजपने याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये अशी टीका शरद पवार यांनी केली आहे. मोदी सोलापुरात येऊन रे नगर गृहप्रकल्पाचा उदघाटन करून गेले,व्यासपीठावर थांबून मोदींना अश्रू अनावर झाले. लहानपणीच्या आठवणींना उजाळा दिला हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. सोलापुरात अनेक लोक आजही बेरोजगार आहेत.महागाई जबरदस्त वाढली आहे या विषयांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी काहीही बोलले नाहीत अशी टीका शरद पवार यांनी केली आहे.

ईडीचा वापर सरकार हत्यार म्हणून करत आहे

केंद्रीय संस्था ईडीचा वापर सरकार हत्यार म्हणून करत आहे. एकच सरकार सत्तेत असल्याने ईडीचा वापर करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात आहे.रोहित पवारांना ईडीची नोटीस आल्यावर शरद पवारांनी ईडीची भीती विरोधकांना दाखवली जातं आहे अशी टीका केली. अनिल देशमुख यांना सहा महिने तुरुंगात पाठवले,सामनाचे संपादक संजय राऊत यांनाही तुरुंगात टाकले, हे सरकार ईडीचा वापर सरकार हत्यार म्हणून करत आहे अशी टीका शरद पवारांनी केली आहे.

अजित पवारांच्या भाषणाकडे जास्त लक्ष देऊ नका

उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुणे येथील सहकारी बँकेच्या कार्यक्रमात शरद पवारांच नाव न घेता टीका केली होती.वयस्कर लोक तरुणांना संधी देत नाहीत ,असे अजित पवार यांनी भाषणातून खंत व्यक्त केली होती.सोलापूर शहरात असताना शरद पवारांनी अजित पवारांच्या भाषणाला प्रतिउत्तर दिले आहे.अजित पवार हे तरुणच होते,त्यांना संधी कुणी दिली.त्यांच्या भाषणाकडे जास्त लक्ष द्यायची गरज नाही असे शरद पवारांनी सांगितलं.

The post केंद्र सरकारकडून हत्यार म्हणून ईडीचा वापर, शरद पवारांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
https://dailyyashwant.com/using-ed-as-a-weapon-by-the-central-government-sharad-pawar-attacks-pm-modi/3660/feed/ 0
गृहिणींसाठी आनंदाची बातमी! घरगुती गॅस सिलिंडर होणार स्वस्त https://dailyyashwant.com/good-news-for-housewives-domestic-gas-cylinders-will-be-cheaper/2667/ https://dailyyashwant.com/good-news-for-housewives-domestic-gas-cylinders-will-be-cheaper/2667/#respond Thu, 09 Nov 2023 04:13:54 +0000 https://dailyyashwant.com/?p=2667 नवी दिल्ली : पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. वाढलेली महागाई लक्षात घेता येत्या काही दिवसांत घरगुती एलपीजी सिलिंडरवर आणखी सूट (सबसिडी) मिळण्याची शक्यता आहे. केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना दिलासा देण्याची तयारी करत आहेत. एवढेच नाहीतर सामान्य ग्राहकांसाठीही सिलेंडरच्या किंमतीत कपात होऊ शकतात. […]

The post गृहिणींसाठी आनंदाची बातमी! घरगुती गॅस सिलिंडर होणार स्वस्त appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
नवी दिल्ली : पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. वाढलेली महागाई लक्षात घेता येत्या काही दिवसांत घरगुती एलपीजी सिलिंडरवर आणखी सूट (सबसिडी) मिळण्याची शक्यता आहे. केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना दिलासा देण्याची तयारी करत आहेत. एवढेच नाहीतर सामान्य ग्राहकांसाठीही सिलेंडरच्या किंमतीत कपात होऊ शकतात.

सध्या या लाभार्थ्यांना एका वर्षात १२ सिलिंडरवर ३०० रुपये सबसिडी दिली जात आहे. तर उज्ज्वला योजनेंतर्गत अतिरिक्त सवलतीबाबत येत्या काही महिन्यांत निर्णय घेतला जाऊ शकतो. पुढील वर्षी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी मोदी सरकारचा हा मास्टर स्ट्रोक ठरेल असा राजकीय तज्ज्ञांचा अंदाज आहे.

एलपीजी सिलिंडरची मागणी वाढली

केंद्र सरकारने एलपीजी सिलिंडरवरील अनुदानाच्या रकमेत वाढ करण्याच्या निर्णयानंतर देशात एलपीजी सिलिंडरच्या मागणीत विक्रमी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. २९ ऑगस्ट रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने सर्वसामान्य आणि उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी LPG सिलिंडरचे दर दोनशे रुपयांनी स्वस्त केले. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात दररोज रिफिल होणाऱ्या एलपीजी सिलिंडरची सरासरी संख्या ११ लाखांच्या पार गेली.

तसेच पुढील महिन्यात, ऑक्टोबर २०२३ मध्ये पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना एलपीजी दरात आणखी १०० रुपयांनी सवलत देण्यात आल्यानंतर एलपीजी गॅसची मागणी वाढल्यानंतर दररोज १०.३ सिलिंडर रिफिल झाले आणि एलपीजी सिलेंडर रिफिलच्या संख्येत आणखी वाढ होऊ शकते, असे मानले जात आहे.

अशाप्रकारे पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारने एलपीजी सिलिंडरच्या किमती कमी केल्या. आता उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना एलपीजी सिलिंडर ५०० रुपयांनी स्वस्त म्हणजे ६०० रुपयांना मिळत आहे. तर सामान्यांना एलपीजी सिलिंडर रिफिल करण्यासाठी ९०० रुपये मोजावे लागत आहेत. केंद्र सरकारने २०१६ मध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरू केल्यापासून अलीकडेच २०२४-२६ या वर्षासाठी ७.५ कोटी रुपये आणि उज्ज्वला योजनेंतर्गत मोफत स्वयंपाकाच्या गॅस कनेक्शनसाठी अतिरिक्त १,६५० कोटी रुपये जारी केले आहेत.

सर्वसामान्यांना महागाईतून दिलासा मिळणार

अहवालानुसार केंद्र सरकार सामान्यांना महागाईपासून दिलासा देण्याचा प्रयत्न करत असल्याचे वृत्तात म्हटले असून लाइव्हमिंटच्या वृत्तानुसार या वृत्ताबाबत पेट्रोलियम मंत्रालय आणि वित्त मंत्रालयाकडून ईमेलद्वारे माहिती मागवण्यात आली असता, त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. भू-राजकीय तणावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पेट्रोलियम पदार्थांच्या किमती भडकल्या असताना सरकारकडून दिलासा देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

The post गृहिणींसाठी आनंदाची बातमी! घरगुती गॅस सिलिंडर होणार स्वस्त appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
https://dailyyashwant.com/good-news-for-housewives-domestic-gas-cylinders-will-be-cheaper/2667/feed/ 0