mumbai Archives - Dainik Yashwant, Latur https://dailyyashwant.com/tag/mumbai/ Online Portal Sat, 20 Jan 2024 08:04:41 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.4 नांदेड, लातूर, बीड, हिंगोलीसह परभणीतील हजारो मराठा आंदोलक मुंबईकडे रवाना https://dailyyashwant.com/thousands-of-maratha-protesters-from-nanded-latur-beed-hingoli-and-parbhani-left-for-mumbai/3666/ https://dailyyashwant.com/thousands-of-maratha-protesters-from-nanded-latur-beed-hingoli-and-parbhani-left-for-mumbai/3666/#respond Sat, 20 Jan 2024 07:42:57 +0000 https://dailyyashwant.com/?p=3666 मराठा आरक्षणाच्या  आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी मराठवाड्यातील नांदेड, लातूर, बीड, हिंगोलीसह, परभणीतील हजारो मराठा आंदोलक मुंबईकडे रवाना झाले आहेत. सोबतच वाहनांमध्ये राहण्याची आणि अन्नधान्य, पाण्याची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. त्यामुळे एकट्या मराठवाड्यातील लाखो मराठे मुंबईत दाखल होणार आहेत. लातूर जिल्ह्यातील 30 हजार आंदोलक मुंबईकडे… मराठा आरक्षणाचा लढा आता मुंबईतून लढवणार अशी हाक देणाऱ्या मनोज जरांगे […]

The post नांदेड, लातूर, बीड, हिंगोलीसह परभणीतील हजारो मराठा आंदोलक मुंबईकडे रवाना appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
मराठा आरक्षणाच्या  आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी मराठवाड्यातील नांदेड, लातूर, बीड, हिंगोलीसह, परभणीतील हजारो मराठा आंदोलक मुंबईकडे रवाना झाले आहेत. सोबतच वाहनांमध्ये राहण्याची आणि अन्नधान्य, पाण्याची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. त्यामुळे एकट्या मराठवाड्यातील लाखो मराठे मुंबईत दाखल होणार आहेत.

लातूर जिल्ह्यातील 30 हजार आंदोलक मुंबईकडे…

मराठा आरक्षणाचा लढा आता मुंबईतून लढवणार अशी हाक देणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली एकवठलेला मराठा समाज आंतरवली सराटी येथून मुंबईकडे निघाले आहे. लातूर जिल्ह्यातून 30 हजारापेक्षा जास्त मराठा बांधव मुंबई येथे होणाऱ्या आंदोलनात सहभागी होणार आहे. हे आंदोलक तीन टप्प्यात मुंबईकडे रवाना होताना दिसत आहेत. ज्यात पहिल्या टप्प्यात मनोज जरांगे पाटील यांच्याबरोबर आंतरवली सराटीतून, दुसऱ्या टप्प्यात लातूरवरून थेट पुण्याला जाणारी एक टीम असेल, तर काहीजण थेट मुंबईला दाखल होत होणार आहे. अशा तीन टप्प्यात हजारो वाहनं आपल्यासोबत घेत लातूर जिल्ह्यातील तीस हजारपेक्षा अधिक मराठा आंदोलक मुंबईत दाखल होणार आहेत.

हिंगोलीत मराठा आंदोलक मुंबईकडे रवाना..

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे आज आंतरवाली सराटीहून मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. मनोज जरांगे यांच्या याच आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी हिंगोलीच्या कुरुंदा गावांमधून 400 ते 500 मराठा समाज बांधव रवाना झाले आहेत. हे मराठा बांधव पुढे मनोज जरांगे यांच्यासोबत मुंबईत पोहोचणार आहेत. दरम्यान, आंदोलन काळामध्ये लागणारे अन्नधान्य यासह इतर साहित्य घेऊन हे मराठा समाजबांधव आज निघाले आहेत. गावकऱ्यांच्या वतीने वाजत गाजत या सर्व मराठा समाज बांधवांना आंदोलनासाठी पाठवण्यात करण्यात आले आहे.

परभणीतील मराठा समाजबांधव मुंबईकडे रवाना 

मराठा आरक्षणासाठी मुंबईकडे निघण्याचे आवाहन करत, स्वतः मनोज जरांगे मुंबईकडे रवाना झाले आहेत. दरम्यान, परभणी जिल्ह्यातील गावागावातून मराठा बांधव हे मुंबईकडे रवाना झालेले आहेत. परभणीच्या लिमला येथील अनेक मराठा बांधव हे सर्व साहित्य घेऊन अंतरवालीमार्गे मुंबईकडे रवाना झालेले आहेत. मुंबईमध्ये किती दिवस आंदोलन चालेल हे माहीत नसल्यामुळे खाण्यापिण्याचा सर्व साहित्य, मनोज जरांगे यांच्या प्रतिमेचे टी-शर्ट घालून, भगवा रुमाल घेऊन जोरदार घोषणाबाजी करत हे तरुण आंतरवालीमार्गे मुंबईकडे रवाना झालेत. तर, आरक्षण घेऊनच परत येणार असल्याचा निर्धार या तरुणांनी केलाय.

नांदेडमधून हजारो मराठे मुंबईकडे रवाना…

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेल्या आंदोलनाला साद घालीत नांदेड जिल्ह्यातून हजारो मराठा आंदोलक आपल्या वाहनातून आंतरवाली सराटीमार्गे मुंबईला निघाले आहे. जरांगे पाटील यांच्यासोबत पायी रॅलीमध्ये सहभागी होऊन हे आंदोलक मुंबईपर्यंत प्रवास करणार आहेत. तसेच, 26 तारखेपासून सुरु होणाऱ्या आझाद मैदानावरील उपोषणात देखील तरुण सामील होणार आहेत.

बीड जिल्ह्यातील मराठा आंदोलक मुंबईच्या दिशेने रवाना…

मराठा आरक्षणाची निर्णायक लढाई लढण्यासाठी बीडमधील मराठा समाज बांधव मुंबईकडे निघाले आहेत. शहरातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास अभिवादन करून आंतरवाली सराटीकडे मराठा समाजबांधव रवाना झाले आहेत. यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.  जरांगे पाटील यांच्या लढ्यात आम्ही साथ देणार असूनम, मुंबईहून आरक्षण घेऊन येणार असल्याच्या भावना आंदोलकांनी व्यक्त केली. सरकार आरक्षण प्रश्नावर वेळ काढूपणा करत असून, आता कोट्यावधी मराठे मुंबईत गेल्यावर जो प्रश्न निर्माण होईल त्यालाही सरकार जबाबदार असेल. त्यामुळे, सरकारने आरक्षण प्रश्नावर तात्काळ निर्णय घ्यावा, अशी आमची अजूनही मागणी असल्याचे आंदोलक म्हणाले.

धारशिवमधील आंदोलक किराणासोबत घेऊन मुंबईकडे

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी धाराशिव तालुक्यातील सांजा येथील शेकडो तरुण मुंबईकडे रवाना झाले आहेत. या तरुणांनी आरक्षण न दिल्यास मंत्रालयात घुसून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. एक मराठा लाख मराठा, हम सब जरांगे अशा घोषणा देत भाकरी, रेशन, किराणा असे एक महिन्याचे साहित्य घेत मुंबईकडे रवाना झाले आहे.

The post नांदेड, लातूर, बीड, हिंगोलीसह परभणीतील हजारो मराठा आंदोलक मुंबईकडे रवाना appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
https://dailyyashwant.com/thousands-of-maratha-protesters-from-nanded-latur-beed-hingoli-and-parbhani-left-for-mumbai/3666/feed/ 0
मनोज जरांगे अंतरवाली-मुंबई पायी कूच करणार https://dailyyashwant.com/manoj-jarange-will-march-on-foot-from-antarwali-mumbai/3392/ https://dailyyashwant.com/manoj-jarange-will-march-on-foot-from-antarwali-mumbai/3392/#respond Tue, 26 Dec 2023 02:58:55 +0000 https://dailyyashwant.com/?p=3392 छत्रपती संभाजीनगर: ‘मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने वेळोवेळी हुलकावणी दिल्यामुळे मुंबईत २० जानेवारीपासून आंदोलन करणार आहे. आता मुंबईकडे कूच केल्याशिवाय पर्याय नाही. राज्यातील गावोगावचे साखळी उपोषण स्थगित करून लोकांनी अंतरवाली ते मुंबई या पायी प्रवासाची तयारी करावी’, असे आवाहन मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केले. मुंबईला जाण्याचा मार्ग आणि आंदोलनाच्या तयारीबाबत लवकरच माहिती जाहीर […]

The post मनोज जरांगे अंतरवाली-मुंबई पायी कूच करणार appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
छत्रपती संभाजीनगर: ‘मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने वेळोवेळी हुलकावणी दिल्यामुळे मुंबईत २० जानेवारीपासून आंदोलन करणार आहे. आता मुंबईकडे कूच केल्याशिवाय पर्याय नाही. राज्यातील गावोगावचे साखळी उपोषण स्थगित करून लोकांनी अंतरवाली ते मुंबई या पायी प्रवासाची तयारी करावी’, असे आवाहन मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केले. मुंबईला जाण्याचा मार्ग आणि आंदोलनाच्या तयारीबाबत लवकरच माहिती जाहीर केली जाणार आहे, असेही जरांगे म्हणाले.

प्रकृती अस्वास्थ्यामुळे मनोज जरांगे पाटील तीन दिवस छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. मुंबईतील नियोजित आंदोलनाच्या पूर्वतयारीची माहिती जरांगे यांनी सोमवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. ‘राज्यात आरक्षणासाठी साखळी उपोषण सुरू आहेत. २० जानेवारीला मुंबईत जाण्याची तयारी करायची असल्यामुळे लोक विचारणा करीत आहेत. अंतरवाली येथील साखळी उपोषण कायमस्वरुपी सुरू राहणार आहे. तर राज्यातील साखळी उपोषण स्थगित करावे, असे ‌आवाहन जरांगे यांनी केले. लोकांचा आग्रह असल्यामुळे गाठीभेटी घेण्यासाठी राज्यात सहावा दौरा सुरू करण्याचे नियोजन आहे. अंतरवाली ते मुंबई मार्ग निश्चित केला जात आहे. रस्ता आणि प्रवासाचे टप्पे स्वयंसेवकांना सांगितले जाणार आहेत. मुंबईचे आंदोलन मोठे असल्यामुळे कुणीही घरी राहू नये. मुलांना आरक्षण मिळवून देण्यासाठी सर्व कामे उरकून मुंबईकडे निघायचे आहे. या प्रकारचे सर्वात मोठे शांततापूर्ण आंदोलन देशात आतापर्यंत कधी झाले नसेल, असे जरांगे म्हणाले.

  • मुंबईत आमरण उपोषण अनेक दिवस सुरू राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोबत घ्यायच्या वस्तू आणि इतर माहिती दिली जाणार आहे.
  • सोबत आणलेले ट्रॅक्टर किंवा ट्रक या वाहनांना छत लावायचे आहे. आपल्याच वाहनात मुक्काम करुन आंदोलन यशस्वी करायचे आहे.
  • हे आंदोलन शेवटचे राहणार असून येताना आरक्षण घेऊनच यायचे आहे, अशी माहिती जरांगे यांनी दिली. परीक्षा आणि नोकर भरती जवळ आली आहे.
  • एकदा संधी हुकून गेल्यानंतर आंदोलन करून उपयोग नसतो. त्यामुळे सर्वांनी आंदोलनासाठी मुंबईत यायचे आहे.

The post मनोज जरांगे अंतरवाली-मुंबई पायी कूच करणार appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
https://dailyyashwant.com/manoj-jarange-will-march-on-foot-from-antarwali-mumbai/3392/feed/ 0
पैसे न दिल्यामुळे पत्नीची हत्या; पतीस अटक https://dailyyashwant.com/wife-killed-for-non-payment-husband-arrested/3038/ https://dailyyashwant.com/wife-killed-for-non-payment-husband-arrested/3038/#respond Sat, 09 Dec 2023 03:25:20 +0000 https://dailyyashwant.com/?p=3038 मुंबई : मुंबईतील मालाड परिसरातील गोरेगाव ते मालाड रेल्वे स्थानकादरम्यान एका बेकायदा झोपडीत पती आणि पत्नी राहत होते. गुरूवारी संध्याकाळी महिलेच्या पतीने दारू पिण्यासाठी तिच्याकडे पैशांची मागणी केली होती. मात्र पत्नीने पैसे न दिल्यामुळे त्याने पत्नीला बेदम मारहाण केली. या घटनेची माहिती मिळताच बोरिवली जीआरपीने खुनाअंतर्गत गुन्हा दाखल करून अवघ्या 4 तासात आरोपी मोईनुद्दीन अन्सारी […]

The post पैसे न दिल्यामुळे पत्नीची हत्या; पतीस अटक appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
मुंबई : मुंबईतील मालाड परिसरातील गोरेगाव ते मालाड रेल्वे स्थानकादरम्यान एका बेकायदा झोपडीत पती आणि पत्नी राहत होते. गुरूवारी संध्याकाळी महिलेच्या पतीने दारू पिण्यासाठी तिच्याकडे पैशांची मागणी केली होती. मात्र पत्नीने पैसे न दिल्यामुळे त्याने पत्नीला बेदम मारहाण केली.

या घटनेची माहिती मिळताच बोरिवली जीआरपीने खुनाअंतर्गत गुन्हा दाखल करून अवघ्या 4 तासात आरोपी मोईनुद्दीन अन्सारी याला मालवण परिसरातून अटक केली. पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी मुंबईतून पळून जाण्याचा कट आखत होता, मात्र तो पळून जाण्यापूर्वीच पोलिसांनी त्याला अटक केल्याचे पोलिसांनी सांगितलं, परवीन अन्सारी असे मृत महिलेचे नाव आहे. दरम्यान, महिला काबाड कष्ट करून पैसे कमवत असायची आणि तिचा पती महिलेकडून पैसे घेऊन दारू प्यायचा, जेव्हा महिला पैसे देत नाही तेव्हा तो तिला मारहाण करायचा. अनेकवेळा त्याने तिला मारहाण केल्याचं पोलिसांनी सांगितलं.

The post पैसे न दिल्यामुळे पत्नीची हत्या; पतीस अटक appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
https://dailyyashwant.com/wife-killed-for-non-payment-husband-arrested/3038/feed/ 0