Manoj Jarange Archives - Dainik Yashwant, Latur https://dailyyashwant.com/tag/manoj-jarange/ Online Portal Sat, 10 Feb 2024 07:45:50 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.4 छगन भुजबळांना मारण्यासाठी ५० लाखांची सुपारी, धमकीच्या पत्रावर जरांगे म्हणाले, ‘त्यांना आता पोलिसांचे कपडे घाला!’ https://dailyyashwant.com/50-lakh-betel-nut-to-kill-chhagan-bhujbal-jarange-said-on-the-threatening-letter-put-them-in-police-clothes-now/3944/ https://dailyyashwant.com/50-lakh-betel-nut-to-kill-chhagan-bhujbal-jarange-said-on-the-threatening-letter-put-them-in-police-clothes-now/3944/#respond Sat, 10 Feb 2024 07:45:50 +0000 https://dailyyashwant.com/?p=3944 जालना: मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोध करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना ठार मारण्यासाठी ५० लाखांची सुपारी देण्यात आल्याचा उल्लेख असणारे पत्र समोर आले आहे. याविषयी मनोज जरांगे-पाटील यांना विचारणा केली असता, हा सगळा बनाव भुजबळ यांनीच रचला असेल, असे त्यांनी म्हटले. छगन भुजबळ यांना कोण कशाला मारेल, असा सवालही त्यांनी विचारला. […]

The post छगन भुजबळांना मारण्यासाठी ५० लाखांची सुपारी, धमकीच्या पत्रावर जरांगे म्हणाले, ‘त्यांना आता पोलिसांचे कपडे घाला!’ appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
जालना: मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोध करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना ठार मारण्यासाठी ५० लाखांची सुपारी देण्यात आल्याचा उल्लेख असणारे पत्र समोर आले आहे. याविषयी मनोज जरांगे-पाटील यांना विचारणा केली असता, हा सगळा बनाव भुजबळ यांनीच रचला असेल, असे त्यांनी म्हटले. छगन भुजबळ यांना कोण कशाला मारेल, असा सवालही त्यांनी विचारला. ते शनिवारी जालन्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळांना आलेल्या धमकीची खिल्ली उडवली. छगन भुजबळांच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्रातील सर्व पोलीस द्या. आम्हालाही अनेकदा धमक्या आल्या पण आम्ही आजपर्यंत पोलिसांना सांगितले नाही. छगन भुजबळ यांना कोण कशाला मारेल? हवं असेल तर सुरक्षेसाठी त्यांना पोलिसांचे कपडे घाला. पण भुजबळ म्हातारे आहेत, त्यांना कोणी मारणार नाही. पुरोगामी महाराष्ट्रावर म्हाताऱ्या व्यक्तींचा आदर करण्याचे संस्कार आहेत. त्यांना मारण्याची गरज नाही, ते असेच जातील. भुजबळांनी बीडमधील आपल्या नातेवाईकाचं हॉटेल मराठा आंदोलकांनी जाळल्याचा बनाव रचला तसाच आता पत्राचा बनाव रचला असेल. आपल्याच एखाद्या कार्यकर्त्याला धमकीचे पत्र द्यायला सांगितले असेल. छगन भुजबळांना रात्री जी स्वप्नं पडतात, तेच ते सकाळी उठून बोलतात, अशी टीका जरांगे पाटील यांनी केली.

पहाटे राष्ट्रपती राजवट उठवता येते मग मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे का घेता येत नाही? जरांगेंचा सवाल

मराठा आरक्षणाचा अध्यादेश राज्य सरकारने तातडीने मंजूर करुन त्याची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी शनिवारपासून जालन्यात पुन्हा एकदा आमरण उपोषणाला सुरुवात केली. यावेळी त्यांनी राज्य सरकारने मराठा आरक्षणाच्या अध्यादेश मंजूर करण्यासाठी दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी केली. दोन दिवसांत अधिवेशन बोलावून आमच्या व्याख्येप्रमाणे सगेसोयऱ्यांच्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी. त्यासाठी मी आजपासून उपोषण सुरु करत आहे. या उपोषणादरम्यान मी पाणी पिणार नाही, तसेच उपचारही घेणार नाही, असे जरांगे पाटील यांनी सांगितले. मराठा आंदोलकांवरील गुन्हे अद्याप सरकारने मागे घेतलेले नाहीत. यापूर्वी सरकारने यापेक्षा भयानक गुन्हे मागे घेतले आहेत. मग मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे का घेतले जात नाहीत? राष्ट्रपती राजवट भल्या पहाटे उठवता येते मग गुन्हे मागे का घेता येत नाहीत? मराठा आरक्षणासाठी पुन्हा माझा जीव पणाला लावण्याची तयारी आहे, असेही जरांगे पाटलांनी यावेळी सांगितले.

The post छगन भुजबळांना मारण्यासाठी ५० लाखांची सुपारी, धमकीच्या पत्रावर जरांगे म्हणाले, ‘त्यांना आता पोलिसांचे कपडे घाला!’ appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
https://dailyyashwant.com/50-lakh-betel-nut-to-kill-chhagan-bhujbal-jarange-said-on-the-threatening-letter-put-them-in-police-clothes-now/3944/feed/ 0
मनोज जरांगेंचं काळजात धडकी भरवणारे भगवं वादळ लोणावळ्यात https://dailyyashwant.com/manoj-jarages-morcha-reaches-lonavala/3757/ https://dailyyashwant.com/manoj-jarages-morcha-reaches-lonavala/3757/#respond Thu, 25 Jan 2024 02:05:40 +0000 https://dailyyashwant.com/?p=3757 मुंबई: मराठा आरक्षणासाठी   मराठा आंदोलक मनोज जरांगे मुंबईच्या दिशेने निघाले  आहेत. लवकरच मराठ्यांचं वादळ मुंबईत धडकणार आहे. जरांगेंच्या  आंदोलनात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक जोडले जात आहेत. त्यामुळे सरकारची डोकेदुखी वाढलीये. त्यामुळे मराठ्यांचं वादळ थोपवण्यासाठी सरकारचेही प्रयत्न सुरु आहेत. मराठा बांधवाची गर्दी पाहता आज पावणे सात वाजता मराठा मोर्चा  लोणावळ्यात पोहचणार आहे. आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक […]

The post मनोज जरांगेंचं काळजात धडकी भरवणारे भगवं वादळ लोणावळ्यात appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
मुंबई: मराठा आरक्षणासाठी   मराठा आंदोलक मनोज जरांगे मुंबईच्या दिशेने निघाले  आहेत. लवकरच मराठ्यांचं वादळ मुंबईत धडकणार आहे. जरांगेंच्या  आंदोलनात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक जोडले जात आहेत. त्यामुळे सरकारची डोकेदुखी वाढलीये. त्यामुळे मराठ्यांचं वादळ थोपवण्यासाठी सरकारचेही प्रयत्न सुरु आहेत. मराठा बांधवाची गर्दी पाहता आज पावणे सात वाजता मराठा मोर्चा  लोणावळ्यात पोहचणार आहे. आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक असल्याने जरांगेंनी आंदोलन थांबवावं असं आवाहन मुख्यमंत्री शिंदेंनी  केलंय.

मराठा बांधव माझ्यासाठी गेले अनेक तास रस्त्यावर थांबले आहेत यांना भेटल्याशिवाय मी जाऊ शकत नाही. हे लोकच माझी ताकत आहे. आतापर्यंत माझ्यासोबत या मोर्चामध्ये जवळपास 70 ते 80 लाख लोक आहेत. मोजता येणार नाहीत अशा पद्धतीने मराठा बांधव या मोर्चात सहभागी होत आहेत.26 तारखेला आम्ही मुंबईला पोहोचणार आहे. आता जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही. न्यायालयात जाण्याचा अधिकार आम्हालाही आहे.  आमचे वकील आमची बाजू मांडतील. कोणत्याही नियमांचे उल्लंघन केलेला नाही. आम्हाला न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे, असे मनोज जरांगे एबीपी माझाशी बोलताना म्हणाले.  मनोज जरांगेंच्या मोर्चाविरोधात सदावर्तेंनी केलेल्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पार पडली .हायकोर्टाने जरांगेंना नोटीसही बजावली आहे.

मुंबईत धडकणार, वादळ घोंगावणार 

मुंबईत पोहोचेपर्यंत तीन कोटी लोक सहभागी होण्याचा दावा करण्यात येत आहे. ट्रॅक्टर, इतर वाहनं आल्यास अडचणीची धास्ती आहे.26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क आहे. मुंबईत लोकल, वाहतुकीवर परिणामांची शक्यता आहे. कायदा-सुव्यवस्था, सामाजिक शांतता भंगण्याची भीती आहे. महत्त्वाचं म्हणजे, हेच मुद्दे उपस्थित करत गुणरत्न सदावर्तेंनी कोर्टाचं दार ठोठावलं.. यावेळी कोर्टाने कायदा आणि सुव्यस्था राखणं ही राज्य  सरकारची जबाबदारी आहे, अशी टिप्पणी करत  जरांगेंना नोटीस बजावली आहे.

मुंबापुरीची धावपळ जरांगेंच्या आंदोलनामुळे थबकणार 

एकीकडे सरकारकडून जरांगेंशी चर्चा सुरू असताना दुसरीकडे सरकारचे महाधिवक्ता बीरेंद्र सराफ यांनी मात्र जरांगेवर कारवाई करण्याचे संकेत दिलेत. जरांगेंच्या वाटेवर सरकार वाटाघाटी करतंय आणि सोबतच कोर्टात जरांगेंवर कारवाईचे संकेतही देतंय. त्यामुळे, ज्या वेगाने मनोज जरांगे लाखो लोकांना घेऊन मुंबईकडे झेपावतायत, तितक्याच वेगाने सरकारचीही धावपळ सुरू झालीय.म्हणूनच, घड्याळाच्या काट्यांना आणि कॅलेंडरच्या आकड्यांना टांगलेल्या मुंबापुरीची धावपळ जरांगेंच्या आंदोलनामुळे थबकते की त्याआधीच सरकार तोडग्याची वेळ साधतंय, हेच पाहणं महत्त्वाचं आहे.

The post मनोज जरांगेंचं काळजात धडकी भरवणारे भगवं वादळ लोणावळ्यात appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
https://dailyyashwant.com/manoj-jarages-morcha-reaches-lonavala/3757/feed/ 0
दादागिरीची भाषा करू नका, 26 जानेवारीच्या आधी तोडगा काढा -जरांगे https://dailyyashwant.com/dont-use-bully-language-solve-before-january-26-jarange/3673/ https://dailyyashwant.com/dont-use-bully-language-solve-before-january-26-jarange/3673/#respond Sun, 21 Jan 2024 05:35:18 +0000 https://dailyyashwant.com/?p=3673 जालना (मातोरी) : मराठा आरक्षणाच्या  मागणीसाठी मनोज जरांगे  शनिवारी मुंबईच्या  दिशेने निघाले असून, त्यांच्या पायी दिंडीचा आजचा दुसरा दिवस आहे. दरम्यान, आज निघणाऱ्या पायी दिंडीपूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत पुन्हा एकदा सरकारला इशारा दिला आहे. 26 जानेवारीच्या आधी तोडगा काढा, मुंबईत येऊ नका असे म्हणत दादागिरीची भाषा करू नयेत. त्यांना मराठ्यांची ताकद पहायची असेल, असे […]

The post दादागिरीची भाषा करू नका, 26 जानेवारीच्या आधी तोडगा काढा -जरांगे appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
जालना (मातोरी) : मराठा आरक्षणाच्या  मागणीसाठी मनोज जरांगे  शनिवारी मुंबईच्या  दिशेने निघाले असून, त्यांच्या पायी दिंडीचा आजचा दुसरा दिवस आहे. दरम्यान, आज निघणाऱ्या पायी दिंडीपूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत पुन्हा एकदा सरकारला इशारा दिला आहे. 26 जानेवारीच्या आधी तोडगा काढा, मुंबईत येऊ नका असे म्हणत दादागिरीची भाषा करू नयेत. त्यांना मराठ्यांची ताकद पहायची असेल, असे म्हणत जरांगे यांनी आज पुन्हा सरकारवर हल्लाबोल केला आहे.

यावेळी बोलतांना जरांगे म्हणाले की,”संविधान हातात घेऊ नयेत, यावर तोडगा कसा काढता येईल, सत्ता येत असते जात असते. मराठा समाज मोठ्या संख्येने मुंबईत दाखल होणार आहे. आम्ही आमच्या मागणीवक्र ठाम आहे. आमच्या नोंदी सापडल्या आहेत. त्यांना मराठ्यांची ताकद पहायची असेल. मराठा समाजाचा हा शेवटचा लढा आहेत. दोन दिवस वाट पाहणार अन्यथा त्यांनी आमच्या गावात येऊ नयेत. मुंबईला येऊ नका असे कसे म्हणतात, दादागिरीची भाषा करू नयेत.  26 जानेवारीच्या आधी तोडगा काढा,” असा इषारा जरांगे यांनी दिला आहे.

मुंबईच्या प्रत्येक गल्लीत मराठे असतील

पुढे बोलतांना जरांगे म्हणाले की,”संविधानाने सांगितलं आहे ज्यांच्या शासकीय नोंदी सापडले आहे, त्यांना आरक्षणासह न्याय दिला पाहिजे. हे सरकारचं क्रमप्राप्त असते. फक्त बोलून समाजात रोष निर्माण होईल, यात त्यांचं काय मोठेपण आहे. यावर तोडगा कसा काढता येईल, सत्ता येत असते जात असते. परंतु, जनतेच्या मनात एखादा माणूस बसला, तर तो कायमचा मनातून उतरत असतो. त्यामुळे यात तोडगा कसा काढता येईल यावर प्रयत्न करायला पाहिजे. त्यांना आणखी देखील सांगत आहे, आम्ही रस्त्याने जरी कमी असलो, तरीही 26 जानेवारीला मराठे मुंबईतून मागे येणार नाही. प्रत्येक गल्लीत मराठे असतील, परत कुणाला पाठवणार, असे जरांगे म्हणाले.

आता दोन दिवस वाट पाहू…

मुंबईला जाईपर्यंत तुम्ही निर्णय घ्या, आम्ही आमच्या मागणीवर ठाम आहोत. मात्र, मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही, त्यांच्या मुलांना मोठं होऊ द्यायचं नाही यावर सरकार देखील ठाम असल्याचं वाटत आहे. कारण कुणबी नोंदी सापडलेल्या असताना देखील आरक्षण दिले जात नसेल, तर मराठ्यांची ताकद काय आहे हे यांना बघायचं असेल. नोंदी नसत्या तर मराठ्यांना 200 वर्षे आरक्षण दिलं नसतं हे आता स्पष्ट झाले आहे. फक्त आंदोलन आणि आंदोलनच करायचे हे मराठ्यांच्या वाट्याला आले असते. परंतु, आता नोंदी सापडल्याने त्यांना देखील काही करता येत नाही. आम्ही यांना सात महिन्याचा वेळ दिला यापेक्षा आणखी किती वेळ दिला पाहिजे. मराठा समाजाची यात काय चूक आहे. त्यामुळे आता दोन दिवस वाट पाहू, त्यानंतर त्यांनी देखील आमच्या गावात येऊ नयेत, असे जरांगे म्हणाले.

दादागिरीची भाषा करू नयेत.

आम्हाला मुंबईत येऊ नका असे म्हणतात, आम्ही जर म्हटलं त्यांना की तुम्ही मुंबईत येऊ नका तर जमेल का?, मुंबईत येऊ नका असे म्हणणे ही कोणती भाषा आहे. दादागिरीची भाषा करू नयेत. आम्ही तुमच्यावर गुलाल टाकायला येतोय, तुम्ही नशीबवान आहात. काम झाल्यावर लोक विसरून जातात, मात्र तुम्ही भाग्यवान आहात की करोडो मराठे तुमच्यावर गुलाल टाकायला येत आहेत,असे जरांगे म्हणाले.

The post दादागिरीची भाषा करू नका, 26 जानेवारीच्या आधी तोडगा काढा -जरांगे appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
https://dailyyashwant.com/dont-use-bully-language-solve-before-january-26-jarange/3673/feed/ 0
नांदेड, लातूर, बीड, हिंगोलीसह परभणीतील हजारो मराठा आंदोलक मुंबईकडे रवाना https://dailyyashwant.com/thousands-of-maratha-protesters-from-nanded-latur-beed-hingoli-and-parbhani-left-for-mumbai/3666/ https://dailyyashwant.com/thousands-of-maratha-protesters-from-nanded-latur-beed-hingoli-and-parbhani-left-for-mumbai/3666/#respond Sat, 20 Jan 2024 07:42:57 +0000 https://dailyyashwant.com/?p=3666 मराठा आरक्षणाच्या  आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी मराठवाड्यातील नांदेड, लातूर, बीड, हिंगोलीसह, परभणीतील हजारो मराठा आंदोलक मुंबईकडे रवाना झाले आहेत. सोबतच वाहनांमध्ये राहण्याची आणि अन्नधान्य, पाण्याची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. त्यामुळे एकट्या मराठवाड्यातील लाखो मराठे मुंबईत दाखल होणार आहेत. लातूर जिल्ह्यातील 30 हजार आंदोलक मुंबईकडे… मराठा आरक्षणाचा लढा आता मुंबईतून लढवणार अशी हाक देणाऱ्या मनोज जरांगे […]

The post नांदेड, लातूर, बीड, हिंगोलीसह परभणीतील हजारो मराठा आंदोलक मुंबईकडे रवाना appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
मराठा आरक्षणाच्या  आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी मराठवाड्यातील नांदेड, लातूर, बीड, हिंगोलीसह, परभणीतील हजारो मराठा आंदोलक मुंबईकडे रवाना झाले आहेत. सोबतच वाहनांमध्ये राहण्याची आणि अन्नधान्य, पाण्याची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. त्यामुळे एकट्या मराठवाड्यातील लाखो मराठे मुंबईत दाखल होणार आहेत.

लातूर जिल्ह्यातील 30 हजार आंदोलक मुंबईकडे…

मराठा आरक्षणाचा लढा आता मुंबईतून लढवणार अशी हाक देणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली एकवठलेला मराठा समाज आंतरवली सराटी येथून मुंबईकडे निघाले आहे. लातूर जिल्ह्यातून 30 हजारापेक्षा जास्त मराठा बांधव मुंबई येथे होणाऱ्या आंदोलनात सहभागी होणार आहे. हे आंदोलक तीन टप्प्यात मुंबईकडे रवाना होताना दिसत आहेत. ज्यात पहिल्या टप्प्यात मनोज जरांगे पाटील यांच्याबरोबर आंतरवली सराटीतून, दुसऱ्या टप्प्यात लातूरवरून थेट पुण्याला जाणारी एक टीम असेल, तर काहीजण थेट मुंबईला दाखल होत होणार आहे. अशा तीन टप्प्यात हजारो वाहनं आपल्यासोबत घेत लातूर जिल्ह्यातील तीस हजारपेक्षा अधिक मराठा आंदोलक मुंबईत दाखल होणार आहेत.

हिंगोलीत मराठा आंदोलक मुंबईकडे रवाना..

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे आज आंतरवाली सराटीहून मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. मनोज जरांगे यांच्या याच आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी हिंगोलीच्या कुरुंदा गावांमधून 400 ते 500 मराठा समाज बांधव रवाना झाले आहेत. हे मराठा बांधव पुढे मनोज जरांगे यांच्यासोबत मुंबईत पोहोचणार आहेत. दरम्यान, आंदोलन काळामध्ये लागणारे अन्नधान्य यासह इतर साहित्य घेऊन हे मराठा समाजबांधव आज निघाले आहेत. गावकऱ्यांच्या वतीने वाजत गाजत या सर्व मराठा समाज बांधवांना आंदोलनासाठी पाठवण्यात करण्यात आले आहे.

परभणीतील मराठा समाजबांधव मुंबईकडे रवाना 

मराठा आरक्षणासाठी मुंबईकडे निघण्याचे आवाहन करत, स्वतः मनोज जरांगे मुंबईकडे रवाना झाले आहेत. दरम्यान, परभणी जिल्ह्यातील गावागावातून मराठा बांधव हे मुंबईकडे रवाना झालेले आहेत. परभणीच्या लिमला येथील अनेक मराठा बांधव हे सर्व साहित्य घेऊन अंतरवालीमार्गे मुंबईकडे रवाना झालेले आहेत. मुंबईमध्ये किती दिवस आंदोलन चालेल हे माहीत नसल्यामुळे खाण्यापिण्याचा सर्व साहित्य, मनोज जरांगे यांच्या प्रतिमेचे टी-शर्ट घालून, भगवा रुमाल घेऊन जोरदार घोषणाबाजी करत हे तरुण आंतरवालीमार्गे मुंबईकडे रवाना झालेत. तर, आरक्षण घेऊनच परत येणार असल्याचा निर्धार या तरुणांनी केलाय.

नांदेडमधून हजारो मराठे मुंबईकडे रवाना…

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेल्या आंदोलनाला साद घालीत नांदेड जिल्ह्यातून हजारो मराठा आंदोलक आपल्या वाहनातून आंतरवाली सराटीमार्गे मुंबईला निघाले आहे. जरांगे पाटील यांच्यासोबत पायी रॅलीमध्ये सहभागी होऊन हे आंदोलक मुंबईपर्यंत प्रवास करणार आहेत. तसेच, 26 तारखेपासून सुरु होणाऱ्या आझाद मैदानावरील उपोषणात देखील तरुण सामील होणार आहेत.

बीड जिल्ह्यातील मराठा आंदोलक मुंबईच्या दिशेने रवाना…

मराठा आरक्षणाची निर्णायक लढाई लढण्यासाठी बीडमधील मराठा समाज बांधव मुंबईकडे निघाले आहेत. शहरातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास अभिवादन करून आंतरवाली सराटीकडे मराठा समाजबांधव रवाना झाले आहेत. यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.  जरांगे पाटील यांच्या लढ्यात आम्ही साथ देणार असूनम, मुंबईहून आरक्षण घेऊन येणार असल्याच्या भावना आंदोलकांनी व्यक्त केली. सरकार आरक्षण प्रश्नावर वेळ काढूपणा करत असून, आता कोट्यावधी मराठे मुंबईत गेल्यावर जो प्रश्न निर्माण होईल त्यालाही सरकार जबाबदार असेल. त्यामुळे, सरकारने आरक्षण प्रश्नावर तात्काळ निर्णय घ्यावा, अशी आमची अजूनही मागणी असल्याचे आंदोलक म्हणाले.

धारशिवमधील आंदोलक किराणासोबत घेऊन मुंबईकडे

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी धाराशिव तालुक्यातील सांजा येथील शेकडो तरुण मुंबईकडे रवाना झाले आहेत. या तरुणांनी आरक्षण न दिल्यास मंत्रालयात घुसून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. एक मराठा लाख मराठा, हम सब जरांगे अशा घोषणा देत भाकरी, रेशन, किराणा असे एक महिन्याचे साहित्य घेत मुंबईकडे रवाना झाले आहे.

The post नांदेड, लातूर, बीड, हिंगोलीसह परभणीतील हजारो मराठा आंदोलक मुंबईकडे रवाना appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
https://dailyyashwant.com/thousands-of-maratha-protesters-from-nanded-latur-beed-hingoli-and-parbhani-left-for-mumbai/3666/feed/ 0
एक आठवड्याच्या आत मराठा समाज मागास असल्याचे सिद्ध करू आणि पुढील निर्णय घेऊ; मंत्री हसन मुश्रीफांचा दावा https://dailyyashwant.com/within-a-week-we-will-prove-that-the-maratha-community-is-backward-and-take-further-decisions-minister-hasan-mushrifs-claim/3663/ https://dailyyashwant.com/within-a-week-we-will-prove-that-the-maratha-community-is-backward-and-take-further-decisions-minister-hasan-mushrifs-claim/3663/#respond Sat, 20 Jan 2024 07:01:10 +0000 https://dailyyashwant.com/?p=3663 कोल्हापूर : मराठा आरक्षणासाठी एल्गार पुकारलेल्या मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून (20 जानेवारी) मुंबईच्या दिशेनं कूच केली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी 26 जानेवारीपासून मुंबईमध्ये आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा दिला आहे. यानंतर आता शासकीय पातळीवर सुद्धा धावाधाव सुरू झाली आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी  कोल्हापूरमध्ये बोलताना मोठा दावा केला […]

The post एक आठवड्याच्या आत मराठा समाज मागास असल्याचे सिद्ध करू आणि पुढील निर्णय घेऊ; मंत्री हसन मुश्रीफांचा दावा appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
कोल्हापूर : मराठा आरक्षणासाठी एल्गार पुकारलेल्या मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून (20 जानेवारी) मुंबईच्या दिशेनं कूच केली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी 26 जानेवारीपासून मुंबईमध्ये आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा दिला आहे. यानंतर आता शासकीय पातळीवर सुद्धा धावाधाव सुरू झाली आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी  कोल्हापूरमध्ये बोलताना मोठा दावा केला आहे.

मराठा समाज मागासलेपण सिद्ध करू आणि पुढील निर्णय घेऊ

एक आठवड्याच्या आत मराठा समाज मागासलेपण सिद्ध करू आणि पुढील निर्णय घेऊ असा दावा हसन मुश्रीफ यांनी केला. कोल्हापूरमध्ये बोलतानाते म्हणाले की सरकारच्या निर्णयाने मराठा समाजाच्या समाधान केले जाईल. मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईकडे चालत जाऊ नये, त्यांच्या तब्येतीची काळजी म्हणून त्यांनी चालत जाऊ नये. मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचे ते म्हणाले.

काही तथ्य नसल्यास रोहित पवार चौकशीला सामोरे जातील

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांनी सरकारकडून आपल्यावर ट्रॅप केला जात असल्याचा आरोप केला होता. या पार्श्वभूमीवर बोलताना मुश्रीफ यांनी कोणी ट्रॅप केला हे सांगावे, असे सांगितले. दुसरीकडे, राष्ट्रवादीच्या सुरू असलेल्या सुनावणी संदर्भात बोलताना जयंत पाटील यांच्याकडून सुनावणीबाबत कोणती खबरदारी घेतली, मला माहित नाही असे सांगितले. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आलं असून 24 जानेवारीला त्यांची चौकशी केली जाणार आहे. याबाबत विचारण्यात आले असता मुश्रीफ यांनी काही तथ्य नसल्यास रोहित पवार चौकशीला सामोरे जातील, असे सांगितले.

मुश्रीफ करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरामध्ये स्वच्छता करणार

दुसरीकडे, मुश्रीफ करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरामध्ये स्वच्छता करणार आहेत. याबाबत बोलताना म्हणाले की, राम मंदिर कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकप्रतिनिधींना मंदिर स्वच्छतेचं आव्हान केलं आहे. याच पार्श्वभूमीवर मुश्रीफ स्वच्छता करणार आहेत. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावर, मनाप आयुक्त के. मंजुलक्ष्मी मंदिर परिसरात उपस्थित राहणार आहेत. ते म्हणाले की, अनेक वर्षांपासून देशवासियांची इच्छा होती की राम मंदिर व्हावे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात मंदिर तयार झाले मी राम, राम माझा ही भावना सगळ्यांची आहे. कागलमध्ये एक लाख लोकांना प्रसाद दिला जात असल्याचे ते म्हणाले.

The post एक आठवड्याच्या आत मराठा समाज मागास असल्याचे सिद्ध करू आणि पुढील निर्णय घेऊ; मंत्री हसन मुश्रीफांचा दावा appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
https://dailyyashwant.com/within-a-week-we-will-prove-that-the-maratha-community-is-backward-and-take-further-decisions-minister-hasan-mushrifs-claim/3663/feed/ 0
मनोज जरांगे मुंबईच्या दिशेने रवाना; दिवसभरात दुसऱ्यांदा डोळ्यात पाणी https://dailyyashwant.com/manoj-jarange-leaves-for-mumbai-watery-eyes-for-the-second-time-in-a-day/3648/ https://dailyyashwant.com/manoj-jarange-leaves-for-mumbai-watery-eyes-for-the-second-time-in-a-day/3648/#respond Sat, 20 Jan 2024 06:28:33 +0000 https://dailyyashwant.com/?p=3648 जालना : मराठा आरक्षणाचे आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारी सकाळी ११ वाजता मुंबईकडे कूच केली. यावेळी अंतरावाली सराटी येथून मराठा समाज त्यांच्यासोबत निघाला आहे. मनोज जरांगे अंतरावाली सराटीतून निघाल्यावर पुन्हा भावूक झाले. शनिवारी सकाळापासून दुसऱ्यांदा त्यांच्या डोळ्यात आश्रू आले. यावेळी बोलताना त्यांनी आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही. २६ जानेवारीला मुंबईतील गल्ली गल्लीत मराठा दिसणार आहे. आता मला गोळ्या […]

The post मनोज जरांगे मुंबईच्या दिशेने रवाना; दिवसभरात दुसऱ्यांदा डोळ्यात पाणी appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
जालना : मराठा आरक्षणाचे आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारी सकाळी ११ वाजता मुंबईकडे कूच केली. यावेळी अंतरावाली सराटी येथून मराठा समाज त्यांच्यासोबत निघाला आहे. मनोज जरांगे अंतरावाली सराटीतून निघाल्यावर पुन्हा भावूक झाले. शनिवारी सकाळापासून दुसऱ्यांदा त्यांच्या डोळ्यात आश्रू आले. यावेळी बोलताना त्यांनी आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही. २६ जानेवारीला मुंबईतील गल्ली गल्लीत मराठा दिसणार आहे. आता मला गोळ्या घातल्या तरी मी मागे हटणार नाही. मी मरण्यास भीत नाही. समाजासाठी मी लढत राहणार आहे. मराठ्यांनी आरक्षण घेण्यासाठी माझ्यामागे पुन्हा एकदा ताकदीने उभे राहा, असे आवाहन मनोज जरांगे पाटील केले.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे आंतरवाली सराटीमधून मुंबईकडे रवाना झाले आहे. त्यामुळे राज्यभरात देखील मराठा आरक्षणासाठी वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन होण्याची शक्यता लक्षात घेता, पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहे. याबाबत पोलीस महासंचालक कार्यालयाकडून पत्र काढण्यात आले आहे. ज्यात 20 जानेवारी ते 28 जानेवारीपर्यंत सर्व पोलीस अधिकारी, अमलदार यांच्या साप्ताहिक सुट्टीसह सर्व प्रकारच्या सुट्ट्या (वैद्यकीय रजा वगळून)  रद्द करण्यास घटक प्रमुखांना मान्यता देण्यात आली आहे.

पोलीस महासंचालक कार्यालयाकडून काढण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की, “मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने जालना ते मुंबई असा संभाव्य पदयात्रा करणार आहेत. त्यामुळे त्यांच्या समर्थनार्थ राज्यात ठिकठिकाणी मोर्चे, आंदोलने करण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्या अनुषंगाने राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणेकरिता तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये या करिता सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून आवश्यक बंदोबस्तासाठी 20 जानेवारी ते 28 जानेवारी या कालावधीत खालील नमुद घटकांमधील सर्व अधिकारी व अंमलदार (कार्यकारी व अकार्यकारी पदावरील) यांच्या साप्ताहिक सुट्टीसह सर्व प्रकारच्या रजा (वैद्यकीय रजा वगळून) बंद करण्यास घटक प्रमुख यांना मान्यता देण्यात येत आहे. तसेच घटकातील साप्ताहीक सुट्टी बंद करताना उपरोक्त संदर्भातील शासन निर्णयाचे तंतोतंत पालन करावे. तरी, घटक प्रमुख यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणेकरिता सर्वोतोपरी दक्षता घ्यावी,असे म्हटले आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील पोलिसांच्या तीन दिवसांसाठी सुट्या रद्द…

पोलीस महासंचालकांच्या पत्रानंतर अहमदनगर पोलीस दलातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय सुट्ट्या वगळता इतर सर्व सुट्ट्या रद्द करण्यात आल्याचा आदेश काढण्यात आला आहे. अहमदनगर पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून काढण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की, ‘अहमदनगर जिल्हयात 21 जानेवारी ते 22 जानेवारी या काळात मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटी ते मौजे कोळगाव (ता. गेवराई), मीड सांगवी, पाथडी, तीसगाव, करंजी घाट, बाराबाभळी, भिगार, जी पी ओ नौक, केडगाव, सुगा, वाडेगव्हाण, गव्हाणवाडी असा अहमदनगर जिल्ह्यातून प्रवास करुन पुणे मार्गे मुंबईतील आझाद मैदान असा मराठा आरक्षण अनुषंगाने पायी दिंडी करणार आहेत. त्याकरीता जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडु नये या करीता कायदा व सुव्यवस्था व सुरक्षिततेच्या दृष्टीने बंदोबस्तासाठी जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकारी,अंमलदार यांच्या साप्ताहिक सुट्टी, सर्व प्रकारच्या रजा (वैद्यकीय रजा वगळून) 20 ते 22 जानेवारी असे एकुण 3 दिवस बंद करण्यात आले आहे. तर, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व पोलीस स्टेशन व सर्व शाखा प्रभारी अधिकारी, पोलीस महासंचालक यांच्या पत्राचे अनुषंगाने योग्य ती कार्यवाही करावी.

The post मनोज जरांगे मुंबईच्या दिशेने रवाना; दिवसभरात दुसऱ्यांदा डोळ्यात पाणी appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
https://dailyyashwant.com/manoj-jarange-leaves-for-mumbai-watery-eyes-for-the-second-time-in-a-day/3648/feed/ 0
मुंबईला निघण्यापूर्वी जरांगेंनी शेवटचा डाव टाकला, सरकारची अडचण वाढणार https://dailyyashwant.com/before-leaving-for-mumbai-jarang-threw-the-last-innings-the-governments-problem-will-increase/3646/ https://dailyyashwant.com/before-leaving-for-mumbai-jarang-threw-the-last-innings-the-governments-problem-will-increase/3646/#respond Sat, 20 Jan 2024 05:39:17 +0000 https://dailyyashwant.com/?p=3646 मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी काही वेळात मनोज जरांगे  आंतरवाली सराटीमधून मुंबईकडे  निघणार आहे. मात्र, त्यापूर्वी पत्रकार परिषद घेऊन मनोज जरांगे यांनी सरकारवर शेवटचा डाव टाकला आहे. मनोज जरांगे यांच्या या एका वक्तव्याने सरकारची अडचण वाढणार आहे. कारण मुंबईकडे निघण्यापूर्वी मनोज जरांगे मराठा समाजाशी संवाद साधणार आहे. यावेळी मुंबईकडे निघतांनाच आंतरवाली सराटीमधूनच आमरण उपोषण सुरू करण्याचा निर्णय […]

The post मुंबईला निघण्यापूर्वी जरांगेंनी शेवटचा डाव टाकला, सरकारची अडचण वाढणार appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी काही वेळात मनोज जरांगे  आंतरवाली सराटीमधून मुंबईकडे  निघणार आहे. मात्र, त्यापूर्वी पत्रकार परिषद घेऊन मनोज जरांगे यांनी सरकारवर शेवटचा डाव टाकला आहे. मनोज जरांगे यांच्या या एका वक्तव्याने सरकारची अडचण वाढणार आहे. कारण मुंबईकडे निघण्यापूर्वी मनोज जरांगे मराठा समाजाशी संवाद साधणार आहे. यावेळी मुंबईकडे निघतांनाच आंतरवाली सराटीमधूनच आमरण उपोषण सुरू करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो असं मनोज जरांगे म्हणाले आहे. त्यामुळे सरकारची मोठी अडचण वाढू शकते.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी सरकारला दिलेली मुदत संपली असून, आजपासून मनोज जरांगेसह लाखो मराठे मुंबईकडे कूच करणार आहे. विशेष म्हणजे मुंबईकडे जाताना अंतरवाली सराटीमधूनच आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याचं जरांगे म्हणाले आहे. जर, उपाशीपोटी आंदोलकांनी मुंबईपर्यंत प्रवास करणं शक्य नाही, आणि तसं झाल्यास काही दुर्दैवी घटना घडू नये अशी अपेक्षा आहे. मात्र जरांगे यांचे या घोषणेमुळे सरकारची अडचण वाढणार आहे.

रात्रभर झोप लागली नाही: जरांगे 

दरम्यान यावेळी बोलतांना मनोज जरांगे म्हणाले की,“ राज्यात 54 लाख नोंदी सापडल्या आहेत. करोडोच्या संख्येने लोक एकत्र येत आहेत, 250-300 आत्महत्या झाल्या आहेत. ततरीही सरकार निर्णय घेत नाही. एवढं निर्दयी सरकार असू शकत, ज्या मराठ्यांनी त्यांना गादीवर बसवलं, त्यांना हक्काचं आरक्षण देऊ शकत नाही. त्यामुळे आता यांचा राजकीय सुपडासाफ केल्याशिवाय राहायचं नाही. एवढा निर्दयीपणा आमदार, खासदारामध्ये असू शकतो. मी समाजात असेल नसेल, मराठ्यांनी एकजूट तुटू देऊ नका असे म्हणत जरांगे भावूक झाले. पैठणला एका तरुणाने आत्महत्या केली, आई-वडीलांना तो एकुलताएक मुलगा होता. त्याचे वडील येऊन म्हणाले जाऊ द्या माझा मुलगा समाजासाठी गेला तरीही चालेल. यामुळे मी रात्रभर झोपू शकलो नाही, त्यामुळे रात्रीच ठरवलं तिथे जाऊन मरण्यापेक्षा येथूनच आमरण उपोषण सुरु करायचं. आता आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही, असे जरांगे म्हणाले.

सरकारच्या दारात मरण आले तरीही चालेल…

मनोज जरांगे यांच्या मुंबई आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर स्राकारडून त्यांचे आंदोलन थांबवण्यासाठी अनेक प्रयत्न झाले. अनेकदा सरकारच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली. बच्चू कडू यांच्या मार्फत देखील सरकारने जरांगे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, मनोज जरांगे आपल्या भूमिकावर ठाम असल्याचे पाहायला मिळत आहे. सरकारच्या दारात मरण आले तरीही चालेल पण आपण मुंबईला जाणारचं आणि मराठा आरक्षण मिळवणारच असे जरांगे म्हणाले आहेत.

The post मुंबईला निघण्यापूर्वी जरांगेंनी शेवटचा डाव टाकला, सरकारची अडचण वाढणार appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
https://dailyyashwant.com/before-leaving-for-mumbai-jarang-threw-the-last-innings-the-governments-problem-will-increase/3646/feed/ 0
मला म्हातारा म्हणतोय,पण डोक्याचे जेवढे केस पिकलेत तेवढी आंदोलनं केलीत https://dailyyashwant.com/they-call-me-old-but-i-have-protested-as-much-as-the-hair-on-my-head/2747/ https://dailyyashwant.com/they-call-me-old-but-i-have-protested-as-much-as-the-hair-on-my-head/2747/#respond Sun, 26 Nov 2023 09:50:03 +0000 https://dailyyashwant.com/?p=2747 हिंगोली : संपूर्ण राज्याचं लक्ष लागून असलेल्या हिंगोलीतील ओबीसी सभेला सुरुवात झाली असून, मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच मनोज जरांगे यांचा समाचार घेतला आहे. “आता नवीन बोलायला लागला. भुजबळ म्हातारा झाला म्हणतो. सर्वच म्हातारे होणार आहे. तुझ्या आई वडील देखील म्हातारे असतील. पण डोक्याचे जेवढे केस पिकले आहे, तेवढे आंदोलन केले आहे. दोन्ही बाजूने […]

The post मला म्हातारा म्हणतोय,पण डोक्याचे जेवढे केस पिकलेत तेवढी आंदोलनं केलीत appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
हिंगोली : संपूर्ण राज्याचं लक्ष लागून असलेल्या हिंगोलीतील ओबीसी सभेला सुरुवात झाली असून, मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच मनोज जरांगे यांचा समाचार घेतला आहे. “आता नवीन बोलायला लागला. भुजबळ म्हातारा झाला म्हणतो. सर्वच म्हातारे होणार आहे. तुझ्या आई वडील देखील म्हातारे असतील. पण डोक्याचे जेवढे केस पिकले आहे, तेवढे आंदोलन केले आहे. दोन्ही बाजूने अडचणीत आणले जात आहे. एकीकडे कुणबी आरक्षण द्या हे सुरू आहे. दुसरीकडे बाळासाहेब सराटे कोर्टात गेले आणि ओबीसींचं आरक्षण काढून घ्या म्हणत आहे,असे भुजबळ म्हणाले.

तर, मी काही बोललो की महाराष्ट्रातील अनेक नेत्यांना वाटतं दोन समाजात तेढ निर्माण करतो. त्याच्या 15 सभा सभा झाल्यावर, आमची एकच सभा होत आहे. भुजबळ यांचा खुटा उपटून म्हणतो, मी काय केले खुटा उपटायला. आम्हाला रोज शिव्या दिल्या जात आहे. आम्ही कधी एक टायर जाळला का? त्यांनीचं पेटवले, असेही भुजबळ म्हणाले.

भुजबळ यांच्याकडून जरांगे यांच्यावर टीका

मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी आरक्षण देण्याच्या मागणीला ओबीसी नेत्यांकडून प्रचंड विरोध होत असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, आपला विरोध दाखवण्यासाठी ओबीसी नेत्यांकडून राज्यभरात सभा घेण्यात येणार आहे. यासाठी पहिला सभा जालना जिल्ह्यातील अंबडमध्ये झाली, तर दुसरी सभा आज हिंगोलीत होत आहे. या सभेला छगन भुजबळ यांच्यासह राज्यभरातील ओबीसी नेते देखील उपस्थित असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच, अपेक्षेप्रमाणे भुजबळ यांच्याकडून जरांगे यांच्यावर टीका देखील करण्यात आली असल्याचे पाहायला मिळत आहे.

आदरांजली अर्पण

“काल 25 नोव्हेंबरला माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे स्मृतिदिन झाला. याच दिवशी कसाबने मुंबईवर हल्ला केला. यात अनेकांनी आपला जीव गमावला. तसेच आज संविधान दिवस असून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला तुम्हाला लिहण्याचं, बोलण्याचा अधिकार दिला. त्यामुळे या सर्वांना आपण आदरांजली अर्पण करत असल्याचे म्हणत,” भुजबळ यांनी आदरांजली वाहिली.

ओबीसींना विरोध करणाऱ्यांचे हातपाय तोडू : बबनराव तायवाडे

मागील तीन महिन्यापासून राज्यात दोन समाजात संघर्ष सुरू आहे. ओबीसींच्या अधिकाराच्या संरक्षणासाठी आम्ही संघर्ष करतोय. मंडळ आयोगाच्या अहवालात मराठा समाजाला फॅारवर्ड कास्ट म्हटलंय. एकाही आयोगाच्या अहवालात मराठा मागास असल्याचे सांगितले नाही.  ओबीसींनी आमचं 70 वर्षापासून चोरलं असल्याचं म्हटलं जातं. पण कुठे चोरलं. आतापर्यंत सात अहवाल झाले पण एकाही अहवालात मराठा समाज ओबीसी असल्याचे सांगितले गेले नाही. हे आमची लायकी काढत आहे, आमची लायकी काढणारे हे कोण आहे. आमची लायकी नाही तर, मग आमच्या पंक्तीत कशाला येऊ लागले आहे. यापुढे जर असा आमचा अपमान केल्यास महाराष्ट्रात फिरू देणार नाही. यापुढे ओबीसींच्या विरोधात कोणी बोलल्यास त्यांचे हातपाय कापून ठेवू. तसेच मनोज जरांगे यांचं जाहीर धिक्कार करतो. 32 लाख नोंदी सापडल्या असं जरांगे म्हणाले. किती मुर्ख आम्हाला बनवत आहे. एकाच व्यक्तीची अनेक ठिकाणी नोंदी आहेत, असे बबनराव तायवाडे म्हणाले.

मराठ्याचा एकही आमदार निवडून येणार नाही: लक्ष्मणराव गायकवाड 

मंडल आयोगाचे घर जाळत होते, ते आज ओबीसीमध्ये का येत आहे. भुजबळ यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न करू नका. पुढच्या वर्षी मराठ्याचा एकही आमदार निवडून येणार नाही. इडा पिडा टळू दे ओबीसीचा राज्य येऊ दे, एक मराठा लाख मराठा एक मराठा गरीब मराठा करु,…मी गरीब मराठा याना सांगू इच्छितो 100 जीसीबीने फुल वाहण्यापेक्षा जरांगे यांना पैसे द्या आणि ज्यामुळे त्याचा संसार सुखी होईल, असे लक्ष्मणराव गायकवाड म्हणाले.

अन्यथा आम्ही हातात दंडुके घेऊ: टी पी मुंडे 

आमचे घर पेटवून देण्यासाठी कोणी येत असेल तर ओबीसी समाज गप्प बसणार नाही. जाणीवपूर्वक आम्हाला खवळू नका. ऊस तोड कामगारांच्या हातात ऊस तोडताना काय असते हे जाणून घ्यावे, आपल्याला कोणी धक्का द्यायला आला तर त्याला उंच पाडा, तुम्ही दंडलशाही करण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही हातात दंडुके घेऊ, चिलत्या जरांग्या कुवत काय तुझी, तमाशे नाचवत फिरले आणि जमिनी विकल्या. पोलीस बहिणीला तुम्ही दगडाने मारतात, असे टी पी मुंडे म्हणाले.

आम्ही कमांडर आहोत: महादेव जानकर

छगन भुजबळ, गोपीनाथ मुंडे यांनी पक्ष काढला असता तर महादेव जानकर इथे मुख्यमंत्री म्हणून आला असता. छोट्या लोकांना तिकीट मागायला कशायला जायचं? आम्ही कमांडर आहोत. ओबीसीने ठरवलं तर खासदार किंवा आमदार होईल. जिल्हा परिषद, पंचायत समिती लढायच्या नाही. उत्तर प्रदेशात मुलायम सिंग यांनी पार्टी काढली म्हणून त्यांचा मुलगा मुख्यमंत्री झाला. पण, महाराष्ट्र कोण चालवतंय? कुणाच्या मागे तिकीट मागतो,  भुजबळ साहेब कमांडर बना, डिमांडर नको. ज्यांना यायचं ते येईल. भुजबळ साहेब पुढच्या वेळेस दलीत आणि मुस्लीम यांना सोबत घेतलं पाहिजे.  भुजबळ साहेब तुमच्यासोबत युती करायला तयार आहोत. त्यांच्यासोबत युती करणार नाही. पैशाला कमी नाही. 100 वंजाऱ्याला सांगेल, 1 कोटी रुपये द्या, जमा होतील. भुजबळ साहेब आणि गोपीनाथ मुंडे एकत्र आले असते तर आमच्यावर ही वेळ आली नसती, असे महादेव जानकर म्हणाले.

The post मला म्हातारा म्हणतोय,पण डोक्याचे जेवढे केस पिकलेत तेवढी आंदोलनं केलीत appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
https://dailyyashwant.com/they-call-me-old-but-i-have-protested-as-much-as-the-hair-on-my-head/2747/feed/ 0
एकाही अहवालात मराठा समाजाला मागास म्हटले नाही https://dailyyashwant.com/not-a-single-report-called-the-maratha-community-backwards/2744/ https://dailyyashwant.com/not-a-single-report-called-the-maratha-community-backwards/2744/#respond Sun, 26 Nov 2023 09:44:39 +0000 https://dailyyashwant.com/?p=2744 हिंगोली, दि. 26 नोव्हेंबर 2023 | आमची लायकी काढली जात आहे. आमची लायकी काढण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला. आमची लायकी नाही असे म्हणतात तर आमच्या पंगती का येत आहे? असा प्रश्न राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे नेते बबनराव तायवाडे यांनी मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना केला. हिंगोलीतील ओबीसी एल्गार परिषदेतून त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार हल्ला केला. […]

The post एकाही अहवालात मराठा समाजाला मागास म्हटले नाही appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
हिंगोली, दि. 26 नोव्हेंबर 2023 | आमची लायकी काढली जात आहे. आमची लायकी काढण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला. आमची लायकी नाही असे म्हणतात तर आमच्या पंगती का येत आहे? असा प्रश्न राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे नेते बबनराव तायवाडे यांनी मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना केला. हिंगोलीतील ओबीसी एल्गार परिषदेतून त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार हल्ला केला. तसेच आमची लायकी काढण्याचा यापुढे प्रयत्न केल्यास तुमचे महाराष्ट्रात फिरणे बंद करु, असा इशारा दिला.  1967 पासून आजपर्यंत कुठेच मराठा समाजास मागास म्हटले गेले नाही. सर्वच अहवालात मराठा समाजाला प्रगत समाज म्हटले होते. तेच छगन भुजबळ आता सांगत आहेत. त्यामुळे तुम्ही आमच्यावर खोटे आरोप लावत आहात, असा हल्ला राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे नेते बबनराव तायवाडे यांनी मनोज जरांगे पाटील यांनी केला.

सर्वच अहवालांनी मराठा समाजास प्रगत दाखवले

मंडल आयोगाने मराठा समाजास सुपरकास्ट म्हटले आहे.  मराठा समाजासंदर्भात १९९४ पासून आतापर्यंत सात आयोग नेमले गेले आहे. परंतु एकाही आयोगाने मराठा समाजास मागास म्हटले नाही. त्यानंतर हे आमच्यावर कसे आरोप लावू शकतात? असा प्रश्न बबनराव तायवाडे यांनी उपस्थित केला.

मनोज जरांगे यांचा धिक्कार करतो

आमचे नेते तुमच्याविषयी एखादा शब्द बोलत असतील तर त्यांना शिवीगाळ केली जाते. आमची लायकी काढली जाते. तुम्हाला हा अधिकार कोणी दिला. यामुळे आम्ही मनोज जरांगे यांचा धिक्कार करतो. त्यांचा निषेध करतो. यापुढे ओबीसीच्या विरोधात जर कोणी बोलण्याची हिंमत करु नका, असा इशारा त्यांनी दिला.

The post एकाही अहवालात मराठा समाजाला मागास म्हटले नाही appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
https://dailyyashwant.com/not-a-single-report-called-the-maratha-community-backwards/2744/feed/ 0