Manoj Jaragne patil Archives - Dainik Yashwant, Latur https://dailyyashwant.com/tag/manoj-jaragne-patil/ Online Portal Tue, 26 Dec 2023 02:58:55 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.4 मनोज जरांगे अंतरवाली-मुंबई पायी कूच करणार https://dailyyashwant.com/manoj-jarange-will-march-on-foot-from-antarwali-mumbai/3392/ https://dailyyashwant.com/manoj-jarange-will-march-on-foot-from-antarwali-mumbai/3392/#respond Tue, 26 Dec 2023 02:58:55 +0000 https://dailyyashwant.com/?p=3392 छत्रपती संभाजीनगर: ‘मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने वेळोवेळी हुलकावणी दिल्यामुळे मुंबईत २० जानेवारीपासून आंदोलन करणार आहे. आता मुंबईकडे कूच केल्याशिवाय पर्याय नाही. राज्यातील गावोगावचे साखळी उपोषण स्थगित करून लोकांनी अंतरवाली ते मुंबई या पायी प्रवासाची तयारी करावी’, असे आवाहन मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केले. मुंबईला जाण्याचा मार्ग आणि आंदोलनाच्या तयारीबाबत लवकरच माहिती जाहीर […]

The post मनोज जरांगे अंतरवाली-मुंबई पायी कूच करणार appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
छत्रपती संभाजीनगर: ‘मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने वेळोवेळी हुलकावणी दिल्यामुळे मुंबईत २० जानेवारीपासून आंदोलन करणार आहे. आता मुंबईकडे कूच केल्याशिवाय पर्याय नाही. राज्यातील गावोगावचे साखळी उपोषण स्थगित करून लोकांनी अंतरवाली ते मुंबई या पायी प्रवासाची तयारी करावी’, असे आवाहन मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केले. मुंबईला जाण्याचा मार्ग आणि आंदोलनाच्या तयारीबाबत लवकरच माहिती जाहीर केली जाणार आहे, असेही जरांगे म्हणाले.

प्रकृती अस्वास्थ्यामुळे मनोज जरांगे पाटील तीन दिवस छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. मुंबईतील नियोजित आंदोलनाच्या पूर्वतयारीची माहिती जरांगे यांनी सोमवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. ‘राज्यात आरक्षणासाठी साखळी उपोषण सुरू आहेत. २० जानेवारीला मुंबईत जाण्याची तयारी करायची असल्यामुळे लोक विचारणा करीत आहेत. अंतरवाली येथील साखळी उपोषण कायमस्वरुपी सुरू राहणार आहे. तर राज्यातील साखळी उपोषण स्थगित करावे, असे ‌आवाहन जरांगे यांनी केले. लोकांचा आग्रह असल्यामुळे गाठीभेटी घेण्यासाठी राज्यात सहावा दौरा सुरू करण्याचे नियोजन आहे. अंतरवाली ते मुंबई मार्ग निश्चित केला जात आहे. रस्ता आणि प्रवासाचे टप्पे स्वयंसेवकांना सांगितले जाणार आहेत. मुंबईचे आंदोलन मोठे असल्यामुळे कुणीही घरी राहू नये. मुलांना आरक्षण मिळवून देण्यासाठी सर्व कामे उरकून मुंबईकडे निघायचे आहे. या प्रकारचे सर्वात मोठे शांततापूर्ण आंदोलन देशात आतापर्यंत कधी झाले नसेल, असे जरांगे म्हणाले.

  • मुंबईत आमरण उपोषण अनेक दिवस सुरू राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोबत घ्यायच्या वस्तू आणि इतर माहिती दिली जाणार आहे.
  • सोबत आणलेले ट्रॅक्टर किंवा ट्रक या वाहनांना छत लावायचे आहे. आपल्याच वाहनात मुक्काम करुन आंदोलन यशस्वी करायचे आहे.
  • हे आंदोलन शेवटचे राहणार असून येताना आरक्षण घेऊनच यायचे आहे, अशी माहिती जरांगे यांनी दिली. परीक्षा आणि नोकर भरती जवळ आली आहे.
  • एकदा संधी हुकून गेल्यानंतर आंदोलन करून उपयोग नसतो. त्यामुळे सर्वांनी आंदोलनासाठी मुंबईत यायचे आहे.

The post मनोज जरांगे अंतरवाली-मुंबई पायी कूच करणार appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
https://dailyyashwant.com/manoj-jarange-will-march-on-foot-from-antarwali-mumbai/3392/feed/ 0
‘मराठे एवढे खालच्या पातळीचे नाहीत’ – मनोज जरांगे पाटील https://dailyyashwant.com/marathas-are-not-that-low-level-manoj-jarange-patil/2589/ https://dailyyashwant.com/marathas-are-not-that-low-level-manoj-jarange-patil/2589/#respond Tue, 31 Oct 2023 06:46:39 +0000 https://dailyyashwant.com/?p=2589 जालना :    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे   यांनी आज सकाळी मनोज जरांगे यांच्याशी फोनवरून संवाद साधला.  त्यावेळी जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. अर्धा तास झालेल्या चर्चात कुणबी प्रमाणपत्र, विशेष अधिवेशन अशा विविध मुद्द्यांवर चर्चा झाली.  मराठे एवढे खालच्या पातळीचे नाहीत  नोंदीनुसार अहवाल स्वीकारणार नाही. आपण अर्धवट आरक्षण घेणार नाही, असे मनोज जरांगेनी मुख्यमंत्र्यांना सांगितले आहे. जालन्यातील […]

The post ‘मराठे एवढे खालच्या पातळीचे नाहीत’ – मनोज जरांगे पाटील appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
जालना :    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे   यांनी आज सकाळी मनोज जरांगे यांच्याशी फोनवरून संवाद साधला.  त्यावेळी जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. अर्धा तास झालेल्या चर्चात कुणबी प्रमाणपत्र, विशेष अधिवेशन अशा विविध मुद्द्यांवर चर्चा झाली.  मराठे एवढे खालच्या पातळीचे नाहीत  नोंदीनुसार अहवाल स्वीकारणार नाही. आपण अर्धवट आरक्षण घेणार नाही, असे मनोज जरांगेनी मुख्यमंत्र्यांना सांगितले आहे. जालन्यातील आंदोलनस्थळावर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आरक्षणाबाबत चर्चा झाली. मनोज जरांगे म्हणाले,  आपण त्यांना स्पष्टपणे सांगितले, नोंदीनुसार अहवाल स्वीकारणार नाही.आपण अर्धवट आरक्षण घेणार नाही, हे त्यांना स्पष्ट सांगितले. आम्ही अभ्यासकांची बैठक बोलावली आहे. मराठा आणि कुणबी एकच असल्याचा 2004 चा GR दुरुस्त करा. शेतीच्या आधारावरच आरक्षण दिलेले आहे. कितीही बहाणे सांगितले तरी आम्ही ऐकणार नाहीत. समितीकडे भरपूर पुरावे आहेत. सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे. 60 -65 टक्के मराठा समाज अगोदरच obc मध्ये आहे,  आम्ही थोडे राहिलेलो आहोत. विशेष अधिवेशन घ्या. ज्याचा कुणबी प्रमाणपत्राला विरोध आहे त्यांनी घेऊ नका. शेतीची लाज वाटण्याएवढे मराठे खालच्या पातळीवर नाहीत. मराठवड्यात कागदपत्रे जमा करा आणि सर्व महराष्ट्राला आरक्षण द्या. विशेष अधिवेशन घ्या,समितीचा प्रथम अहवाल स्वीकारून तिला राज्याचा दर्जा द्या.

मराठा समाजाला जरांगेंचे आवाहन 

कालपासून मी पाणी पितोय, मी पाणी पिल्यानंतर समाज शांत होणार असेल तर मी पाणी पिणार. मी पुन्हा सांगतो उद्रेक करू नका, आत्महत्या करू नका. खांद्याला खांदा लावून लढा. पाण्यामुळे तब्येत चांगली झालीय, उठून बसलोय. सगळीकडे शांततेत उपोषण सुरू आहे.आमरण उपोषण जसे सहन होईल तसे करा, मात्र साखळी उपोषण सुरू ठेवा, असे आवाहन त्यांनी समाजाला केले आहे.

आमदार, खासदारांनी मुंबईतच राहा, राजीनामे थांबवा 

राज्यात सुरू असलेल्या राजीनामा सत्रार मनोज जरांगेंनी भाष्य केले आहे. जरांगे म्हणाले,  सर्वांनी मुंबईत जाऊन आवाज उठवा असे म्हटले होते.  बहुतेक आमदार मुंबईकडे गेलेत,  राजीनामा देण्याचं कळत नाही. सर्व आमदार खासदार मुंबईतच राहा. राजीनामा दिल्याने काय फायदा होतो कळत नाही पण सर्वांनी मुंबई सोडायची नाही.

राज्यात मराठा आंदोलनाला काही ठिकाणी हिंसक वळण लागले आहे. त्याविषयी देखील मनोज जरांगेनी वक्तव्य केले आहे. मराठा समाजाने संयम राखावा, थोडं टप्प्या टप्प्यात होऊ द्या, बंदचा विचार तूर्तास करू नये, असे देखील जरांगे यावेळी म्हणाले.

बस बंद करायला कोणी सांगितले 

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना येथे सुरू असलेल्या आंदोलनाची झळ राज्यभर जाणवू लागली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे.अनेक ठिकाणी बसच्या जाळपोळ झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने बस  बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. याविषयी बोलताना जरांगे म्हणाले,  बस बंद करायला कोणी सांगितले. ST महामंडळवाले  खूप घाबरतात. एसटीवाले खूप कलाकार आहेत. डोके आमचे फुटले आणि बस बंद होते

The post ‘मराठे एवढे खालच्या पातळीचे नाहीत’ – मनोज जरांगे पाटील appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
https://dailyyashwant.com/marathas-are-not-that-low-level-manoj-jarange-patil/2589/feed/ 0