maharashtra Archives - Dainik Yashwant, Latur https://dailyyashwant.com/tag/maharashtra/ Online Portal Sat, 10 Feb 2024 07:45:50 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.4 छगन भुजबळांना मारण्यासाठी ५० लाखांची सुपारी, धमकीच्या पत्रावर जरांगे म्हणाले, ‘त्यांना आता पोलिसांचे कपडे घाला!’ https://dailyyashwant.com/50-lakh-betel-nut-to-kill-chhagan-bhujbal-jarange-said-on-the-threatening-letter-put-them-in-police-clothes-now/3944/ https://dailyyashwant.com/50-lakh-betel-nut-to-kill-chhagan-bhujbal-jarange-said-on-the-threatening-letter-put-them-in-police-clothes-now/3944/#respond Sat, 10 Feb 2024 07:45:50 +0000 https://dailyyashwant.com/?p=3944 जालना: मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोध करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना ठार मारण्यासाठी ५० लाखांची सुपारी देण्यात आल्याचा उल्लेख असणारे पत्र समोर आले आहे. याविषयी मनोज जरांगे-पाटील यांना विचारणा केली असता, हा सगळा बनाव भुजबळ यांनीच रचला असेल, असे त्यांनी म्हटले. छगन भुजबळ यांना कोण कशाला मारेल, असा सवालही त्यांनी विचारला. […]

The post छगन भुजबळांना मारण्यासाठी ५० लाखांची सुपारी, धमकीच्या पत्रावर जरांगे म्हणाले, ‘त्यांना आता पोलिसांचे कपडे घाला!’ appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
जालना: मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोध करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना ठार मारण्यासाठी ५० लाखांची सुपारी देण्यात आल्याचा उल्लेख असणारे पत्र समोर आले आहे. याविषयी मनोज जरांगे-पाटील यांना विचारणा केली असता, हा सगळा बनाव भुजबळ यांनीच रचला असेल, असे त्यांनी म्हटले. छगन भुजबळ यांना कोण कशाला मारेल, असा सवालही त्यांनी विचारला. ते शनिवारी जालन्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळांना आलेल्या धमकीची खिल्ली उडवली. छगन भुजबळांच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्रातील सर्व पोलीस द्या. आम्हालाही अनेकदा धमक्या आल्या पण आम्ही आजपर्यंत पोलिसांना सांगितले नाही. छगन भुजबळ यांना कोण कशाला मारेल? हवं असेल तर सुरक्षेसाठी त्यांना पोलिसांचे कपडे घाला. पण भुजबळ म्हातारे आहेत, त्यांना कोणी मारणार नाही. पुरोगामी महाराष्ट्रावर म्हाताऱ्या व्यक्तींचा आदर करण्याचे संस्कार आहेत. त्यांना मारण्याची गरज नाही, ते असेच जातील. भुजबळांनी बीडमधील आपल्या नातेवाईकाचं हॉटेल मराठा आंदोलकांनी जाळल्याचा बनाव रचला तसाच आता पत्राचा बनाव रचला असेल. आपल्याच एखाद्या कार्यकर्त्याला धमकीचे पत्र द्यायला सांगितले असेल. छगन भुजबळांना रात्री जी स्वप्नं पडतात, तेच ते सकाळी उठून बोलतात, अशी टीका जरांगे पाटील यांनी केली.

पहाटे राष्ट्रपती राजवट उठवता येते मग मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे का घेता येत नाही? जरांगेंचा सवाल

मराठा आरक्षणाचा अध्यादेश राज्य सरकारने तातडीने मंजूर करुन त्याची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी शनिवारपासून जालन्यात पुन्हा एकदा आमरण उपोषणाला सुरुवात केली. यावेळी त्यांनी राज्य सरकारने मराठा आरक्षणाच्या अध्यादेश मंजूर करण्यासाठी दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी केली. दोन दिवसांत अधिवेशन बोलावून आमच्या व्याख्येप्रमाणे सगेसोयऱ्यांच्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी. त्यासाठी मी आजपासून उपोषण सुरु करत आहे. या उपोषणादरम्यान मी पाणी पिणार नाही, तसेच उपचारही घेणार नाही, असे जरांगे पाटील यांनी सांगितले. मराठा आंदोलकांवरील गुन्हे अद्याप सरकारने मागे घेतलेले नाहीत. यापूर्वी सरकारने यापेक्षा भयानक गुन्हे मागे घेतले आहेत. मग मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे का घेतले जात नाहीत? राष्ट्रपती राजवट भल्या पहाटे उठवता येते मग गुन्हे मागे का घेता येत नाहीत? मराठा आरक्षणासाठी पुन्हा माझा जीव पणाला लावण्याची तयारी आहे, असेही जरांगे पाटलांनी यावेळी सांगितले.

The post छगन भुजबळांना मारण्यासाठी ५० लाखांची सुपारी, धमकीच्या पत्रावर जरांगे म्हणाले, ‘त्यांना आता पोलिसांचे कपडे घाला!’ appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
https://dailyyashwant.com/50-lakh-betel-nut-to-kill-chhagan-bhujbal-jarange-said-on-the-threatening-letter-put-them-in-police-clothes-now/3944/feed/ 0
कर्नाटकात मंकी फिव्हरचा कहर; दोघांचा मृत्यू; महाराष्ट्राला किती धोका? लक्षणं काय? https://dailyyashwant.com/monkey-fever-ravages-karnataka-death-of-two-how-much-danger-to-maharashtra-what-are-the-symptoms/3831/ https://dailyyashwant.com/monkey-fever-ravages-karnataka-death-of-two-how-much-danger-to-maharashtra-what-are-the-symptoms/3831/#respond Tue, 06 Feb 2024 07:04:00 +0000 https://dailyyashwant.com/?p=3831 महाराष्ट्राचा शेजारी असलेल्या कर्नाटकमधील उत्तर कन्नड जिल्ह्यात मंकी फिव्हरचा कहर पाहायला मिळत आहे. महाराष्ट्राला लागून असलेल्या उत्तर कन्नड जिल्ह्यात मंकी फिव्हरमुळे दोघांचा मृत्यू झाला आहे. या फिव्हरची लागण ४९ जणांना झाली आहे. उत्तर कन्नड जिल्हा बेळगावच्या शेजारी आहे. बेळगावची सीमा महाराष्ट्राला लागून आहे. मंकी फिव्हरचा वाढता कहर पाहता आरोग्य विभागाचे अधिकारी कामाला लागले आहेत. मंकी […]

The post कर्नाटकात मंकी फिव्हरचा कहर; दोघांचा मृत्यू; महाराष्ट्राला किती धोका? लक्षणं काय? appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
महाराष्ट्राचा शेजारी असलेल्या कर्नाटकमधील उत्तर कन्नड जिल्ह्यात मंकी फिव्हरचा कहर पाहायला मिळत आहे. महाराष्ट्राला लागून असलेल्या उत्तर कन्नड जिल्ह्यात मंकी फिव्हरमुळे दोघांचा मृत्यू झाला आहे. या फिव्हरची लागण ४९ जणांना झाली आहे. उत्तर कन्नड जिल्हा बेळगावच्या शेजारी आहे. बेळगावची सीमा महाराष्ट्राला लागून आहे.

मंकी फिव्हरचा वाढता कहर पाहता आरोग्य विभागाचे अधिकारी कामाला लागले आहेत. मंकी फिव्हरपासून बचाव करण्यासाठी तयारी सुरू आहे. मंकी फिव्हर म्हणजेच क्यासानूर फॉरेस्ट डिजीज (केएफडी) प्राण्यांपासून माणसांपर्यंत पोहोचतो. माकड्यांच्या माध्यमातून माणसांच्या संपर्कात येणाऱ्या ढेकणांमधून मंकी फिव्हरचा फैलाव होतो. १९५७ मध्ये पहिल्यांदा हा आजार ओळखण्यात यश आलं. अनेक माकडांमुळे याचा मृत्यू झाल्यानं त्याला मंकी फिव्हर म्हटलं गेलं.

महाराष्ट्राला किती धोका?

कर्नाटकातील पश्चिम घाट परिसरात सुरुवातीला मंकी फिव्हरचे रुग्ण आढळून आले. गेल्या दशकभरात या आजाराचे रुग्ण वाढले. पश्चिम घाट पसरलेल्या शेजारच्या राज्यांमध्येही मंकी फिव्हरचे रुग्ण आढळले. त्यात केरळ, महाराष्ट्राचा समावेश असल्याचं नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयाचे संक्रामक आजार विभागाच्या सल्लागार असलेले डॉ. लक्ष्मण जेस्सानी यांनी सांगितलं.

कर्नाटकच्या उत्तर कन्नड जिल्ह्यात मंकी फिव्हरचे ३१ रुग्ण सापडले आहेत. त्यांच्यावर घरांमध्ये आणि रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. या आजाराचा फैलाव रोखण्यासाठी मंकी फिव्हर पसरलेल्या भागांमध्ये आवश्यक पावलं उचलण्याची गरज असल्याचं जेस्सानी म्हणाले.

मंकी फिव्हरची लक्षणं काय?

  1. जास्त ताप येणं
  2. डोळ्यांमध्ये सूज आणि वेदना
  3. जास्त थंडी वाजणं
  4. मांसपेशींमध्ये अधिक वेदना
  5. शरीरात वेदना होणं
  6. खोकला, सर्दी
  7. डोकेदुखी
  8. उलट्या
  9. रक्तस्राव
  10. प्लेटलेट्स कमी होणं

बचाव कसा करायचा?

वरील लक्षणं जाणवल्यास तातडीनं डॉक्टरांकडे जा. मंकी फिव्हरपासून बचाव करण्याचा एकमेव उपाय लसीकरण हाच आहे. त्यामुळे लसीकरण करुन घ्या. मंकी फिव्हरचा फैलाव झालेल्या भागातील लोकांनी वेळोवेळी तपासणी करुन घ्यावी. मंकी फिव्हरपासून बचाव करणाऱ्या लसीचे दोन डोस एका महिन्यात दिले जातात.

आसपासच्या भागात स्वच्छता ठेवा. ढेकणांपासून बचाव करण्यासाठी अंग पूर्ण झाकतील असे कपडे घाला. घरातून बाहेर पडताना काळजी घ्या. संपूर्ण अंग झाकू शकणारे कपडे घालून बाहेर पडा.

The post कर्नाटकात मंकी फिव्हरचा कहर; दोघांचा मृत्यू; महाराष्ट्राला किती धोका? लक्षणं काय? appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
https://dailyyashwant.com/monkey-fever-ravages-karnataka-death-of-two-how-much-danger-to-maharashtra-what-are-the-symptoms/3831/feed/ 0
लग्न समारंभ आटोपून परत जाताना एकाच गावातील 6 लोकांवर काळाची झडप https://dailyyashwant.com/while-going-back-after-the-wedding-ceremony-6-people-from-the-same-village-are-attacked-by-time/3167/ https://dailyyashwant.com/while-going-back-after-the-wedding-ceremony-6-people-from-the-same-village-are-attacked-by-time/3167/#respond Sat, 16 Dec 2023 05:06:30 +0000 https://dailyyashwant.com/?p=3167 नागपूर : नागपूरच्या काटोल तालुक्यात शुक्रवारी मध्यरात्री भीषण अपघात झाला. ताराबोडी परिसरात भरधाव वेगाने जाणाऱ्या एका ट्रकने कारला जोरदार धडक दिली. या धडकेत लग्न समारंभ आटोपून गावी परत जाणाऱ्या एकाच गावातील 6 लोकांचा मृत्यू झाला. अपघातात निधन झालेले सर्व जण नागपूरच्या काटोल तालुक्यातील मेंढेपठार बाजार गावातील रहिवासी होते. मृतकामध्ये दोन सख्या चुलत भावाचा समावेश. हा अपघातात कारचा […]

The post लग्न समारंभ आटोपून परत जाताना एकाच गावातील 6 लोकांवर काळाची झडप appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
नागपूर : नागपूरच्या काटोल तालुक्यात शुक्रवारी मध्यरात्री भीषण अपघात झाला. ताराबोडी परिसरात भरधाव वेगाने जाणाऱ्या एका ट्रकने कारला जोरदार धडक दिली. या धडकेत लग्न समारंभ आटोपून गावी परत जाणाऱ्या एकाच गावातील 6 लोकांचा मृत्यू झाला. अपघातात निधन झालेले सर्व जण नागपूरच्या काटोल तालुक्यातील मेंढेपठार बाजार गावातील रहिवासी होते. मृतकामध्ये दोन सख्या चुलत भावाचा समावेश. हा अपघातात कारचा अक्षरश: चुराडा झाला आहे.

नागपूरच्या काटोल तालुक्यातील मेंढेपठार बाजार गावातील चंद्रशेखर चिखले यांच्या मुलीचे नागपुरात लग्न होते. या लग्नासाठी वऱ्हाड नागपूरला गेले होते. शुक्रवारी ते वऱ्हाड परत गावी येण्यासाठी निघाले. मध्यरात्री सोनखांब ते ताराबोडी वेगाने जाणाऱ्या ट्रकने त्यांच्या कारला धडक दिली. या भीषण अपघातात कारचा चुराडा झाला. ट्रकच्या उजव्या बाजूचे नुकसान झाले. कारमध्ये बसलेल्या सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. यामधील एका जणाची प्रकृती गंभीर आहे. जखमीला नागपुरातील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले आहे.

या अपघातात अजय दशरथ चिखले (वय 45), विठ्ठल दिगंबर थोटे (वय 45), सुधाकर रामचंद्र मानकर (वय 42), रमेश ओंकार हेलोंडे (वय 48), मयूर मोरेश्वर इंगळे (वय 26), वैभव साहेबराव चिखले (वय 32) यांचा मृत्यू झाला आहे. यामधील अजय चिखले आणि वैभव चिखले हे सख्ये चुलत भाऊ आहे. लग्न आटोपून आनंदात असणारे चिखले कुटुंबियांवर या घटनेनंतर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

The post लग्न समारंभ आटोपून परत जाताना एकाच गावातील 6 लोकांवर काळाची झडप appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
https://dailyyashwant.com/while-going-back-after-the-wedding-ceremony-6-people-from-the-same-village-are-attacked-by-time/3167/feed/ 0