devendra fadanvis Archives - Dainik Yashwant, Latur https://dailyyashwant.com/tag/devendra-fadanvis/ Online Portal Mon, 12 Feb 2024 14:35:58 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.4 सप्टेंबरमध्ये ठरलं, फेब्रुवारीत घडलं, आणखी होणार भूकंप, कुणी केला खळबळजनक दावा? https://dailyyashwant.com/it-was-decided-in-september-it-happened-in-february/4000/ https://dailyyashwant.com/it-was-decided-in-september-it-happened-in-february/4000/#respond Mon, 12 Feb 2024 14:35:58 +0000 https://dailyyashwant.com/?p=4000 हिंगोली  : शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन पक्षानंतर आता देशातील सर्वात जुना पक्ष कॉंग्रेस हा फुटीरतेच्या उंबरठ्यावर आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी अचानक पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. आपल्या आमदारकीचाही राजीनामा त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे दिला. गेले काही महिने अशोक चव्हाण पक्षात नाराज असल्याच्या चर्चा होत्या. त्यांच्यासह आणखी काही आमदार भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा होती. […]

The post सप्टेंबरमध्ये ठरलं, फेब्रुवारीत घडलं, आणखी होणार भूकंप, कुणी केला खळबळजनक दावा? appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
हिंगोली  : शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन पक्षानंतर आता देशातील सर्वात जुना पक्ष कॉंग्रेस हा फुटीरतेच्या उंबरठ्यावर आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी अचानक पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. आपल्या आमदारकीचाही राजीनामा त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे दिला. गेले काही महिने अशोक चव्हाण पक्षात नाराज असल्याच्या चर्चा होत्या. त्यांच्यासह आणखी काही आमदार भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा होती. अखेर, अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यामुळे त्या चर्चांवर शिक्कामोर्तब झाले आहे.

अशोक चव्हाण हे कॉंग्रेसमध्ये नाराज होते. पक्षात योग्य स्थान मिळत नसल्याची त्यांची खदखद होती. यातच भाजपने विरोधाकांमागे ईडी चौकशी लावल्याने अनेक विरोधक भाजपमध्ये गेले. एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आणि अजित पवार यांच्यासह 35 आमदार गेले. त्यामुळे पुढील गडांतर कॉंग्रेसवर येणार हे जवळपास निश्चित होते. यात अशोक चव्हाण यांचे नाव आघाडीवर होते.

अशोक चव्हाण यांच्या भाऊराव चव्हाण साखर कारखान्याने बुलढाणा अर्बन बँकेकडून 200 कोटींचे कर्ज घेतले होते. याच प्रकरणी कारखान्याचे कुटुंबियांची ED चौकशी होणार अशी कुजबुज होती. त्यामुळे अशोक चव्हाण यांची धास्ती वाढली होती. नागपूरचे कॉंग्रेसचे माजी आमदार आणि भाजपात प्रवेश केलेले आशिष देशमुख यांच्या घरी गणपतीनिमित्त अशोक चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली होती. सुमारे वीस मिनिटे त्यांच्यात चर्चा झाली. मात्र, या भेटीनंतर ही अचानक झालेली भेट होती अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिली होती.

माजी आमदार आशिष देशमुख यांनी दिल्लीतील हाय कमांडवर टीका केली. पक्षांचे नेते राहुल गांधी यांच्यावरही टीका केली होती. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनाही त्यांनी सोडले नाही. अशावेळी कॉंग्रेसचे कट्टर कार्यकर्ते, ज्येष्ठ नेते, आमदार अशोक चव्हाण यांनी आशिष देशमुख यांच्या घरी सप्टेंबर महिन्यात गणपतीला गेले त्याचवेळी त्यांच्याभोवती संशयाची सुई निर्माण झाली होती, अशी माहिती कॉंग्रेसच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली.

अशोक चव्हाण यांच्यासोबत किमान 11 आमदार भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर कॉंग्रेस नेते सर्व आमदारांच्या संपर्कात आहेत. 14 फेब्रुवारीला कॉंग्रेसच्या सर्व आमदारांची बैठक बोलावण्यात आली आहे. मात्र, ही बैठक होण्यापूर्वीच शिंदे गटाच्या आमदाराने आणखी एक बॉम्ब फोडला आहे. पुढील आठ दिवसामध्ये एवढा मोठा स्फोट होईल की काँग्रेस संपुष्टात येईल. काँग्रेस राहणारच नाही, असा दावा हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांनी केलाय.

The post सप्टेंबरमध्ये ठरलं, फेब्रुवारीत घडलं, आणखी होणार भूकंप, कुणी केला खळबळजनक दावा? appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
https://dailyyashwant.com/it-was-decided-in-september-it-happened-in-february/4000/feed/ 0
आगे आगे देखिए, होता है क्या, देवेंद्र फडणवीसांचं सूचक वक्तव्य https://dailyyashwant.com/suggestive-statement-by-devendra-fadnavis/3960/ https://dailyyashwant.com/suggestive-statement-by-devendra-fadnavis/3960/#respond Mon, 12 Feb 2024 07:43:31 +0000 https://dailyyashwant.com/?p=3960 अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं वक्तव्य केले आहे. काँग्रेसमधील अनेक नेते आमच्या संपर्कात आहेत, असं सूचक वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. देवेंद्र फडणवीस काँग्रेसमधील अनेक दिग्गज नेते संपर्कात असल्याचं समोर आले आहे. अशोक चव्हाण भाजपमध्ये येत आहेत, हे तुमच्याकडूनच ऐकतोय. पण काँग्रेसचे अनेक नेते संपर्कात […]

The post आगे आगे देखिए, होता है क्या, देवेंद्र फडणवीसांचं सूचक वक्तव्य appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं वक्तव्य केले आहे. काँग्रेसमधील अनेक नेते आमच्या संपर्कात आहेत, असं सूचक वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. देवेंद्र फडणवीस काँग्रेसमधील अनेक दिग्गज नेते संपर्कात असल्याचं समोर आले आहे.

अशोक चव्हाण भाजपमध्ये येत आहेत, हे तुमच्याकडूनच ऐकतोय. पण काँग्रेसचे अनेक नेते संपर्कात आहेत. गेली काही वर्ष काँग्रेस जी वाटचाल करतोय, त्यामुळे अनेकांची घुसमट होतेय, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
भाजपसोबत अनेक पक्षातील बडे नेते येण्यासाठी इच्छुक आहेत. विशेषत: काँग्रेसमधील अनेक नेते आमच्या संपर्कात आहेत. काँग्रेसमधील गटबाजी आणि अंतर्गत राजकारणाला नेते कंटाळले आहेत. काँग्रेसमधील मुस्कटदाबी आणि मोदींच्या नेतृत्त्वातील भारताची प्रगती पाहता, अनेक नेत्यांना वाटतं की मुख्य प्रवाहात यायला हवं. त्यामुळे आमच्या कोण कोण संपर्कात आहेत, भाजपमध्ये कोण कोण येणार याबाबत मी इतकंच सांगेन, आगे आगे देखीए, होता है क्या!

महाविकास आघाडीतील सगळ्याच पक्षातील नेते आमच्या संपर्कात आहेत. काही लोकांना यायचं आहे, ते येत आहेत. मोदींजीसोबत, भाजपसोबत यायला हवं, ही त्यांची भावना झालेली आहे. काँग्रेसचे अनेक नेते संपर्कात आहेत. गेली काही वर्ष काँग्रेस जी वाटचाल करतोय, त्यामुळे अनेकांची घुसमट होतेय. ‘आगे आगे देखिए होता है क्या’ असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

पंकजा नेत्या राष्ट्रीय नेत्या आहेत, त्यांचं अंडरस्टँडिंग पक्कं आहे. त्यांच्या भाषणातील एक-दोन वाक्ये काढून मीडिया दाखवतो. पक्षामध्ये त्यांचा सन्मान होता, आहे आणि पुढेही राहील, असं फडणवीसांनी सांगितलं. बिहारमध्ये नेमकं काय चाललंय याची मला माहिती नाही. मी आधी भाजपचा प्रभारी होतो, आता नाही. अलिकडच्या काळात उद्धवजी जे बोलतायत, ते फार गांभीर्याने घेऊ शकत नाही. कालच मी त्यांना शुभेच्छा दिल्यात, गेट वेल सून.

The post आगे आगे देखिए, होता है क्या, देवेंद्र फडणवीसांचं सूचक वक्तव्य appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
https://dailyyashwant.com/suggestive-statement-by-devendra-fadnavis/3960/feed/ 0
मनोज जरांगे अंतरवाली-मुंबई पायी कूच करणार https://dailyyashwant.com/manoj-jarange-will-march-on-foot-from-antarwali-mumbai/3392/ https://dailyyashwant.com/manoj-jarange-will-march-on-foot-from-antarwali-mumbai/3392/#respond Tue, 26 Dec 2023 02:58:55 +0000 https://dailyyashwant.com/?p=3392 छत्रपती संभाजीनगर: ‘मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने वेळोवेळी हुलकावणी दिल्यामुळे मुंबईत २० जानेवारीपासून आंदोलन करणार आहे. आता मुंबईकडे कूच केल्याशिवाय पर्याय नाही. राज्यातील गावोगावचे साखळी उपोषण स्थगित करून लोकांनी अंतरवाली ते मुंबई या पायी प्रवासाची तयारी करावी’, असे आवाहन मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केले. मुंबईला जाण्याचा मार्ग आणि आंदोलनाच्या तयारीबाबत लवकरच माहिती जाहीर […]

The post मनोज जरांगे अंतरवाली-मुंबई पायी कूच करणार appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
छत्रपती संभाजीनगर: ‘मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने वेळोवेळी हुलकावणी दिल्यामुळे मुंबईत २० जानेवारीपासून आंदोलन करणार आहे. आता मुंबईकडे कूच केल्याशिवाय पर्याय नाही. राज्यातील गावोगावचे साखळी उपोषण स्थगित करून लोकांनी अंतरवाली ते मुंबई या पायी प्रवासाची तयारी करावी’, असे आवाहन मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केले. मुंबईला जाण्याचा मार्ग आणि आंदोलनाच्या तयारीबाबत लवकरच माहिती जाहीर केली जाणार आहे, असेही जरांगे म्हणाले.

प्रकृती अस्वास्थ्यामुळे मनोज जरांगे पाटील तीन दिवस छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. मुंबईतील नियोजित आंदोलनाच्या पूर्वतयारीची माहिती जरांगे यांनी सोमवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. ‘राज्यात आरक्षणासाठी साखळी उपोषण सुरू आहेत. २० जानेवारीला मुंबईत जाण्याची तयारी करायची असल्यामुळे लोक विचारणा करीत आहेत. अंतरवाली येथील साखळी उपोषण कायमस्वरुपी सुरू राहणार आहे. तर राज्यातील साखळी उपोषण स्थगित करावे, असे ‌आवाहन जरांगे यांनी केले. लोकांचा आग्रह असल्यामुळे गाठीभेटी घेण्यासाठी राज्यात सहावा दौरा सुरू करण्याचे नियोजन आहे. अंतरवाली ते मुंबई मार्ग निश्चित केला जात आहे. रस्ता आणि प्रवासाचे टप्पे स्वयंसेवकांना सांगितले जाणार आहेत. मुंबईचे आंदोलन मोठे असल्यामुळे कुणीही घरी राहू नये. मुलांना आरक्षण मिळवून देण्यासाठी सर्व कामे उरकून मुंबईकडे निघायचे आहे. या प्रकारचे सर्वात मोठे शांततापूर्ण आंदोलन देशात आतापर्यंत कधी झाले नसेल, असे जरांगे म्हणाले.

  • मुंबईत आमरण उपोषण अनेक दिवस सुरू राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोबत घ्यायच्या वस्तू आणि इतर माहिती दिली जाणार आहे.
  • सोबत आणलेले ट्रॅक्टर किंवा ट्रक या वाहनांना छत लावायचे आहे. आपल्याच वाहनात मुक्काम करुन आंदोलन यशस्वी करायचे आहे.
  • हे आंदोलन शेवटचे राहणार असून येताना आरक्षण घेऊनच यायचे आहे, अशी माहिती जरांगे यांनी दिली. परीक्षा आणि नोकर भरती जवळ आली आहे.
  • एकदा संधी हुकून गेल्यानंतर आंदोलन करून उपयोग नसतो. त्यामुळे सर्वांनी आंदोलनासाठी मुंबईत यायचे आहे.

The post मनोज जरांगे अंतरवाली-मुंबई पायी कूच करणार appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
https://dailyyashwant.com/manoj-jarange-will-march-on-foot-from-antarwali-mumbai/3392/feed/ 0
देवेंद्र फडणवीसांच्या लेटरबॉम्बमुळे अजित पवार गट नाराज https://dailyyashwant.com/ajit-pawar-faction-upset-over-devendra-fadnavis-letter-bomb/3030/ https://dailyyashwant.com/ajit-pawar-faction-upset-over-devendra-fadnavis-letter-bomb/3030/#respond Fri, 08 Dec 2023 06:21:42 +0000 https://dailyyashwant.com/?p=3030 नागपूर: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांची विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशानातील एंट्री चांगलीच गाजली आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी ते थेट सत्तापक्षाच्या बाकांवर विराजमान झालेत. त्यावर विरोधकांनी केलेल्या टीकेनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महायुतीत तुर्तास घेऊ नये, असे पत्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लिहीले. या संपूर्ण घटनाक्रमावर मलिक यांनी मौन बाळगले असले तरी युतीतील नेते सध्या बॅकफूटवर आल्याचे […]

The post देवेंद्र फडणवीसांच्या लेटरबॉम्बमुळे अजित पवार गट नाराज appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
नागपूर: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांची विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशानातील एंट्री चांगलीच गाजली आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी ते थेट सत्तापक्षाच्या बाकांवर विराजमान झालेत. त्यावर विरोधकांनी केलेल्या टीकेनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महायुतीत तुर्तास घेऊ नये, असे पत्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लिहीले. या संपूर्ण घटनाक्रमावर मलिक यांनी मौन बाळगले असले तरी युतीतील नेते सध्या बॅकफूटवर आल्याचे चित्र आहे.

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मलिक यांची अधिवेशनातील एंट्रीने राष्ट्रवादीच्या अजित पवार गटामध्ये चैतन्य संचारले होते. विधानसभेत ते सत्तापक्षाच्या बाकांवर बसलेत. त्यामुळे अजितदादांनी ही लढाई जिंकल्याचा विजयीभाव त्यांच्या गटात दिसून आला. नवाब मलिक तेव्हादेखील मौन होते. पहिल्या दिवशी त्यांनी कुठल्याही गटात नाही तर राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असल्याचे सांगितले. पण, सत्तापक्षाच्या बाकावर बसून त्यांनी स्वत:च्या कृतीतून त्यांची बाजू स्पष्ट केल्याचे चित्र होते. त्यावर विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत ‘देशद्रोहाचे आरोप असलेल्यांच्या मांडीला मांडी लावून बसणार का,’ असा सवाल केला होता. या संपूर्ण घटनाक्रमानंतर सायंकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्राने राजकीय भूंकप झाला. त्या पत्राचे पडसाद राष्ट्रवादीच्या अजित पवार गटावर पडल्याचे शुक्रवारी दिसून आले. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील म्हणाले,‘उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पत्र जाहीर झाले नसते तर बरे झाले असते. मित्रपक्ष म्हणून यासंदर्भात चर्चा करायला पाहिजे होती. आमचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी याबाबत भूमिका स्पष्ट केल्यामुळे युतीत मिठाचा खडा पडला, असे म्हणण्याचे काहीही कारण नाही.’

आमदार नवाब मलिक यांना कुठे बसू द्यावे, हा विधानसभा अध्यक्षांचा अधिकार आहे. त्यावर मी बोलणे योग्य नाही. काल नवाब मलिक वैद्यकीय जामीनावर सुटल्यानंतर पहिल्यांदाच यंदाच्या हिवाळी अधिवेशनात आलेत. त्यानंतर ते सहकाऱ्यांशी भेटलेत. मात्र, ते कुठल्या गटात आहेत, याबाबत त्यांनी भूमिका स्पष्ट केल्यानंतर मी यावर भाष्य करेल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणालेत.

फडणवीसांच्या लेटरबॉम्बवर बोचरी टीका करताना काँग्रसेचे नेते बाळासाहेब थोरात म्हणाले,‘भाजप सत्तेसाठी कुठल्याही थराला जाण्यास तयार आहे; हे या पत्रावरून स्पष्ट होते.’ त्यांनी खासगीत पत्र लिहीणे शक्य होते, ते जाहीर करण्याची गरज नव्हती, असेदेखील ते म्हणाले.

The post देवेंद्र फडणवीसांच्या लेटरबॉम्बमुळे अजित पवार गट नाराज appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
https://dailyyashwant.com/ajit-pawar-faction-upset-over-devendra-fadnavis-letter-bomb/3030/feed/ 0
नवाब मलिक कोणत्या गटात मला माहिती नाही; अजित पवारांचं स्पष्टीकरण https://dailyyashwant.com/nawab-malik-in-which-group-i-do-not-know-explanation-of-ajit-pawar/3027/ https://dailyyashwant.com/nawab-malik-in-which-group-i-do-not-know-explanation-of-ajit-pawar/3027/#respond Fri, 08 Dec 2023 06:15:48 +0000 https://dailyyashwant.com/?p=3027 नागपूर: राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमच्या गटाने महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला, त्याबाबत नवाब मलिक यांना कोणतीही माहिती नव्हती. हिवाळी अधिवेशनाच्यानिमित्ताने ते पहिल्यांदाच सभागृहात आले होते. मात्र, ते कोणत्या गटासोबत आहेत, याबाबत त्यांनी भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केल्यानंतर मी या सगळ्यावर प्रतिक्रिया देईन, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी […]

The post नवाब मलिक कोणत्या गटात मला माहिती नाही; अजित पवारांचं स्पष्टीकरण appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
नागपूर: राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमच्या गटाने महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला, त्याबाबत नवाब मलिक यांना कोणतीही माहिती नव्हती. हिवाळी अधिवेशनाच्यानिमित्ताने ते पहिल्यांदाच सभागृहात आले होते. मात्र, ते कोणत्या गटासोबत आहेत, याबाबत त्यांनी भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केल्यानंतर मी या सगळ्यावर प्रतिक्रिया देईन, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना गुरुवारी रोखठोक भाषेत पत्र धाडून नवाब मलिक यांच्या सत्ताधारी गटातील समावेशाला विरोध दर्शविला होता. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांची आजची प्रतिक्रिया सूचक आणि अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. अजितदादांच्या एकूण बोलण्याचा रोख पाहता आगामी काळात अजित पवार गटाकडून नवाब मलिक यांना अंतर दिले जाण्याची शक्यता आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्यासंदर्भात लिहेलेल पत्र मला मिळाले, ते मी वाचलं. नवाब मलिक हे काल पहिल्यांदाच सभागृहात आले होते. ते सभागृहात कुठे बसले, याबाबत मीडियाने माहिती दिली. पण आम्ही महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला त्यानंतर नवाब मलिक हे पहिल्यांदाच सभागृहात आले होते. त्यांची भूमिका काय आहे, हे ऐकल्यानंतरच मी त्यांच्याबद्दल माझं मत देईन. नबाव मलिक यांना न्यायालयाने वैद्यकीय कारणामुळे बाहेर येण्याची संधी दिली आहे. त्यांच्यावरील केस अजून सुरु आहे. सभागृहात कोणी कुठे बसायचे, हा माझा अधिकार नाही. तो निर्णय विधानसभा अध्यक्ष घेतात. नवाब मलिक कोणासोबत आहेत, हे अद्याप त्यांनी स्पष्ट केलेले नाही. त्यांची भूमिका स्पष्ट झाल्यानंतरच मी बोलेन. देवेंद्र फडणवीस यांच्या पत्राबाबत काय करायचं ते मी करेन. त्याबाबत मीडियाला सांगण्याचं काही कारण नाही, असे अजित पवार यांनी म्हटले. यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी अजित पवार यांच्यावर एकापाठोपाठ एक प्रश्नांची सरबत्ती केली. त्यामुळे अजित पवार चांगलेच वैतागल्याचे दिसत होते.

जमीन गैरव्यवहारप्रकरणात ईडी कोठडीत तुरुंगवास भोगलेल्या आणि भाजपकडून देशद्रोहाचे आरोप झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची चांगलीच कोंडी झाली आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी गुरुवारी नवाब मलिक हे सभागृहात बसले होते. यावेळी ते सत्ताधाऱ्यांच्या रांगेत शेवटच्या बाकावर बसले होते. इतके दिवस भाजपने देशद्रोहाचे आरोप केलेले नवाब मलिक सत्ताधाऱ्यांच्या रांगेत बसल्याने अनेकांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले होते. या सगळ्या घटनाक्रमानंतर देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी संध्याकाळी अजित पवार यांना एक पत्र लिहले. योगायोगाने हे पत्र प्रसारमाध्यमांच्या हाती लागले. त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांना सोबत घेण्यास स्पष्ट विरोध केला होता. यानंतर अजित पवार काय भूमिका घेतात, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या होत्या.

The post नवाब मलिक कोणत्या गटात मला माहिती नाही; अजित पवारांचं स्पष्टीकरण appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
https://dailyyashwant.com/nawab-malik-in-which-group-i-do-not-know-explanation-of-ajit-pawar/3027/feed/ 0
महाराष्ट्रातील अस्थिरतेला गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार https://dailyyashwant.com/home-minister-devendra-fadnavis-responsible-for-instability-in-maharashtra/2741/ https://dailyyashwant.com/home-minister-devendra-fadnavis-responsible-for-instability-in-maharashtra/2741/#respond Sun, 26 Nov 2023 09:36:40 +0000 https://dailyyashwant.com/?p=2741 मुंबई : महाराष्ट्र अस्थिर झाला असून गुप्तचर विभागाचं अपयश असून त्याला गृहमंत्री देवेंद्र फडणवीस  जबाबदार असल्याची सडकून टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. 26/11 हल्ल्यातील शहीदांना वाहिल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी राजकीय स्थितीवर भाष्य केले. मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम या आरक्षणवर कोणतंही विधेयक अधिवेशनात आलं तर आम्ही पूर्ण ताकदीने सहकार्य करू, असेही त्यांनी सांगितले.सुप्रिया सुळे म्हणाल्या की, 26/11 […]

The post महाराष्ट्रातील अस्थिरतेला गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
मुंबई : महाराष्ट्र अस्थिर झाला असून गुप्तचर विभागाचं अपयश असून त्याला गृहमंत्री देवेंद्र फडणवीस  जबाबदार असल्याची सडकून टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. 26/11 हल्ल्यातील शहीदांना वाहिल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी राजकीय स्थितीवर भाष्य केले. मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम या आरक्षणवर कोणतंही विधेयक अधिवेशनात आलं तर आम्ही पूर्ण ताकदीने सहकार्य करू, असेही त्यांनी सांगितले.सुप्रिया सुळे म्हणाल्या की, 26/11 भारतातील नवे तर जग काळा दिवस म्हणून बघतं. या योद्धांनी आपल्या कुटुंबाची काळजी न करता देशासाठी योगदान दिलं. 26/11 जग कधीच विसरणार नाही.

माझे आणि देवेंद्र फडणवीस यांचे अनेकांसोबत फोटो

अंतरवाली सराटीमधील दगडफेकीतील संशयित आरोपी ऋषीकेश बेदरेला अटक करण्यात आल्यानंतर आमदार नितेश राणे यांनी फोटो ट्विट करत शरद पवार गटावर टीका केली आहे. याबाबत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, नितेश राणेंनी केलेला आरोप मी पाहिलेला नाही, त्यामुळे मी यावर बोलणार नाही. माझे आणि देवेंद्र फडणवीस यांचे अनेकांसोबत फोटो आहे, याचा अर्थ आम्ही सगळ्यांना ओळखतोच असं नाही, असेही त्यांनी सांगितले. त्या पुढे म्हणाल्या की, एखादा आमदार आणि खासदारावर हल्ला होत असेल तर त्याचं अपयश गृह विभागाचं आहे.

नैतिक जबाबदारी त्यांनी घेतली पाहिजे

मी फडणवीस यांचा राजीनामा मागते ते वैयक्तिक कारणासाठी नाही, भाजपच्या खासदारावर दगडफेक झाली यात अपयश फडणवीस यांचं नाही, पण नैतिक जबाबदारी त्यांनी घेतली पाहिजे, ते सरकारचं अपयश आहे.

माझ्यासमोर बेरोजगारी आणि इतर समस्या

सुप्रिया सुळे यांनी सांगितले की, माझ्यासमोर बेरोजगारी आणि इतर समस्या भीषण असून मी त्यासाठी लढत आहे. महाराष्ट्रातील सामाजिक वातावरण खराब होत असेल तर त्यासाठी सरकार जबाबदार आहे. सगळ्यांत मोठं आव्हान भीषण दुष्काळ आहे. ट्रिपल इंजिन खोके सरकार यावरून इतरांच लक्ष दूर करत आहे.

भाजप आता जूमला पार्टी

दुष्काळ,महागाई,बेरोजगारी या भीषण समस्या आहेत. दूध महाग झालं आहे, कांदा प्रश्न बिकट झाला आहे, शेतकऱ्यांना टॅक्स भरावा लागत आहे. दिल्ली सरकार आता भ्रष्ट जुमला भाजप सरकार आहे. वाजपेयी, सुषमा स्वराज यांची ओरिजिनल सुसंस्कृत भाजप आता जूमला पार्टी झाला असल्याची कडवट टीका त्यांनी केली. या देशात बाळासाहेब ठाकरे एकच होऊन गेले, त्यांच्या नावाच्या उपाध्या कोणी घेऊ शकत नाही, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पोस्टरवरून लगावला. प्रकाश आंबडकर या देशाचे एक मोठे नेते, ते इंडिया आघाडीत आल्यास त्यांचं स्वागत असेल, असेही सुप्रिया सुळे यांनी नमूद केले.

The post महाराष्ट्रातील अस्थिरतेला गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
https://dailyyashwant.com/home-minister-devendra-fadnavis-responsible-for-instability-in-maharashtra/2741/feed/ 0