crime news Archives - Dainik Yashwant, Latur https://dailyyashwant.com/tag/crime-news/ Online Portal Thu, 08 Feb 2024 02:57:59 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.4 तुळजाभवानी मंदिर संस्थानचा लेखाधिकारी निघाला लाचखोर https://dailyyashwant.com/accountant-of-tuljabhavani-temple-sansthan-turned-out-to-be-a-briber/3858/ https://dailyyashwant.com/accountant-of-tuljabhavani-temple-sansthan-turned-out-to-be-a-briber/3858/#respond Thu, 08 Feb 2024 02:49:35 +0000 https://dailyyashwant.com/?p=3858 धाराशिव : छत्रपती संभाजीनगरच्या लाचलुचपत विभागाने (ACB) धाराशिव  जिल्ह्यात मोठी कारवाई केली असून, तुळजाभवानी मंदिर  संस्थानचे वित्त व लेखाधिकारी सिद्धेश्वर शिंदे याला सुमारे 6 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ ताब्यात घेतले आहे. मंदिर संस्थानच्या प्रशासकीय कार्यालयातील स्वतःच्या केबिनमध्ये बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास त्यांना लाच घेतांना पकडण्यात आले आहेत.  3  कोटी 88 लाखांच्या कामापैकी थकलेले 1 […]

The post तुळजाभवानी मंदिर संस्थानचा लेखाधिकारी निघाला लाचखोर appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
धाराशिव : छत्रपती संभाजीनगरच्या लाचलुचपत विभागाने (ACB) धाराशिव  जिल्ह्यात मोठी कारवाई केली असून, तुळजाभवानी मंदिर  संस्थानचे वित्त व लेखाधिकारी सिद्धेश्वर शिंदे याला सुमारे 6 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ ताब्यात घेतले आहे. मंदिर संस्थानच्या प्रशासकीय कार्यालयातील स्वतःच्या केबिनमध्ये बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास त्यांना लाच घेतांना पकडण्यात आले आहेत.  3  कोटी 88 लाखांच्या कामापैकी थकलेले 1 कोटी 88 लाखांचे बिल मंजुरीसाठी शिंदे याने 10 लाख रुपये मागितले होते. तडजोडीअंती 6 लाख रुपये घेतांना त्याला ताब्यात घेण्यात आले.

छत्रपती संभाजीनगरच्या लाचलुचपत विभागाने दिलेल्या माहितीनुसार, “यातील तक्रारदार हे शासकीय कॅान्ट्रॅक्टर असुन तक्रारदार यांना श्री. तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापुर संचलीत श्री तुळजाभवानी सैनिक विदयालयाचे प्रशासकीय इमारतीचे पहिल्या मजल्याचे तसेच प्रवेशद्वार व संरक्षक भिंतीचे बांधकामाचे 03 करोड 88 लाखाचे कान्ट्रॅक्ट मिळाले होते. सदर बांधकामाचे 90% काम पुर्ण झाले आहे. या बांधकामाचे आत्तापर्यंत 02 करोड पेक्षा जास्त बिल तपासणी करुन मंजुरीसाठी पाठवून मिळवून दिले म्हणुन तसेच उर्वरीत बिल तपासणी करुन मंजुरीसाठी पाठविणेकरीता तसेच अतिरिक्त सुरक्षा रक्कम म्हणुन भरलेली 34,60,579 रुपये ही परत मिळवून देण्यासाठी शिंदे याने पंचासमक्ष 10 लाख रुपयाची मागणी करुन, तडजोडीअंती 6 लाख रुपये स्विकारण्याचे मान्य केले. त्यानुसार बुधवारी रोजी पंचासमक्ष 6 लाख रुपये लाच रक्कम स्विकारताना लाचलुचपत विभागाने शिंदेला ताब्यात घेतले.  या प्रकरणी पोलीस स्टेशन तुळजापुर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंदिर संस्थानच्या इतिहासात पहिलीच कारवाई 

धाराशिव जिल्ह्यातील तुळजाभवानी मंदिर संस्थान राज्यातील एक मोठं मंदिर संस्थान पैकी एक आहे. रोज हजारो भाविक मंदिरात येत असतात. राज्याचं नाही तर देशभरातील भाविक तुळजाभवानी मंदिराच्या दर्शनासाठी येतात. त्यामुळे मंदिर संस्थानात मोठ्या प्रमाणात देणग्या देखील येतात. मात्र, याच तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वित्त व लेखाधिकारी सिद्धेश्वर शिंदे हा लाचखोर निघाल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे मंदिर संस्थानच्या इतिहासात पहिलीच लाचलुचपतची कारवाई असल्याचे देखील बोलले जात आहे.

सिद्धेश्वर शिंदेचे आणखी वाटेकरी कोण? 

श्री तुळजाभवानी सैनिक विदयालयाचे प्रशासकीय इमारतीचे पहिल्या मजल्याचे तसेच प्रवेशद्वार व संरक्षक भिंतीचे बांधकामाचे बिल मंजूर करण्यासाठी सिद्धेश्वर शिंदे याने थेट 10 लाखाची मागणी केली. तडजोडीअंती 6 लाख रुपये स्विकारण्याचे मान्य केले. पण शिंदे याने एकट्याने एवढी मोठी रक्कम लाच म्हणून मागणे आणि ती स्वीकारण्याची हिंमत करणे याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे शिंदे याच्यासह आणखी काही वाटेकरी असण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे. त्यामुळे एसीबीच्या चौकशीत या वाटेकरींचे नावं समोर येणार का? हे पाहणं देखील महत्वाचे ठरणार आहे.

The post तुळजाभवानी मंदिर संस्थानचा लेखाधिकारी निघाला लाचखोर appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
https://dailyyashwant.com/accountant-of-tuljabhavani-temple-sansthan-turned-out-to-be-a-briber/3858/feed/ 0
पुण्यातील हिरे व्यापाऱ्याला गुवाहाटीत संपवलं, बंगाली जोडप्याला अटक https://dailyyashwant.com/pune-diamond-merchant-killed-in-guwahati-bengali-couple-arrested/3844/ https://dailyyashwant.com/pune-diamond-merchant-killed-in-guwahati-bengali-couple-arrested/3844/#respond Wed, 07 Feb 2024 05:23:28 +0000 https://dailyyashwant.com/?p=3844 पुण्यातील हिरे व्यापाराचा गुवाहाटीत 5 स्टार हॉटेलमध्ये खून झाल्याचं समोर आलेय. ही हत्या लव्ह ट्रँगलमधून  झाल्याचं प्राथमिक तपासात उघड झाले आहे. संदीप कांबळे पुण्यातील श्रास्तीनगर येथील रहिवाशी आहेत. याप्रकरणी बंगाली जोडप्यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांनी खूनाची कबूली  दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून संदीप कांबळे हा एक्स गर्लफ्रेंडला ब्लॅकमेल करत असल्याचेही तपासातून उघड झालेय. गुवाहाटी […]

The post पुण्यातील हिरे व्यापाऱ्याला गुवाहाटीत संपवलं, बंगाली जोडप्याला अटक appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
पुण्यातील हिरे व्यापाराचा गुवाहाटीत 5 स्टार हॉटेलमध्ये खून झाल्याचं समोर आलेय. ही हत्या लव्ह ट्रँगलमधून  झाल्याचं प्राथमिक तपासात उघड झाले आहे. संदीप कांबळे पुण्यातील श्रास्तीनगर येथील रहिवाशी आहेत. याप्रकरणी बंगाली जोडप्यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांनी खूनाची कबूली  दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून संदीप कांबळे हा एक्स गर्लफ्रेंडला ब्लॅकमेल करत असल्याचेही तपासातून उघड झालेय. गुवाहाटी पोलिसांनी 24 तासांच्या आत आरोपींना बेड्या ठोकल्यात.

गुन्ह्याची कबुली – 

गुवाहाटीचे पोलीस आयुक्त दिंगत बोरा यांनी याप्रकरणी पत्रकार परिषद घेत माहिती दिली. त्यांनी सांगितलं की, संदीप कांबळे यांच्या हत्येच्या आरोपाखाली बंगाली जोडप्याला अटक केली आहे. विकास कुमार शॉ आणि अंजली शॉ अशी अरोपींची नावे आहेत. या आरोपींनी आपणच खून केल्याची कबूली दिली आहे. गुवाहाटी येथील  रॅडिसन ब्लू या पाईव्ह स्टार हॉटेलमध्ये हिरे व्यापारी संदीप कांबळे यांचा संशयतरित्या खून झाला.

भेट कशी झाली ?

संदीप कांबळे व्यावसायाच्या निमित्ताने विविध ठिकाणी फिरतात. गतवर्षी सप्टेंबर महिन्यात कामाख्या मंदिरात संदीप कांबळे गेले होते. गुवाहाटी येथून परतत असताना कोलकाता विमानतळावर त्यांची अंजली शॉ हिच्याबरोबर भेट झाली. त्यावेळी दोघांमध्ये फोन क्रमांकाची देवाणघेवाण झाली. त्यानंतर ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं. दोघांमध्ये भेटीगाठी वाढल्या. दोघांमध्ये पुणे, कोलकाता येथे वारंवार भेटी झाल्या. संदीप कांबळे विवाहित असतानाही अंजलीला लग्नाचा प्रस्ताव दिला. संदीप कांबळेचा हा प्रस्ताव अंजलीने नाकारला. त्यानंतर बोलणं, भेटणंही टाळले. संदीप कांबळेला ही गोष्ट रुचली नाही. त्याने अंजलीला बदनाम करण्यास सुरुवात केले.

संदीपनं बदनामीचं षडयंत्र रचलं –

अंजलीने लग्नासाठी नकार दिल्याचं संदीप कांबळेला रुचलं नाही. त्यानं अंजलीला बदनाम करण्यासाठी षडयंत्र रचलं. संदीप कांबळे यानं अंजलीच्या कुटुंबियांना आणि प्रियकर (विकास शॉ) यांना फोन करुन बदनामी केली. अंजलीसोबतचे प्रायव्हेट फोटो प्रियकलारा पाठवले. त्यामुळे अंजली आणि विकास यांच्या नात्याला तडा गेला.. पण काही कालावधीनंतर दोघांमध्ये समेट झाली. त्यानंतर दोघांनी संदीपच्या मोबाईलमधून पुरावे मिटवण्यासाठी षडयंत्र रचलं.

अंजलीनं प्रियकराच्या मदतीने डाव टाकला – 

अंजलीने प्रियकराच्या मदतीने संदीपचा मोबाईल हिसकावून घेऊन अनैतिक संबंधाचे सर्व पुरावे मिटवण्याची योजना आखली. अंजलीने संदीपला कोलकात्याला भेटायला बोलवलं. पण तिचा समोरुन फोन आल्यानं संदीपला संशय आला. संदीपनं तिला गुवाहाटी येथे भेटायाला बोलवलं. अंजलीने प्रियकर विकास याच्यासोबत सोमवारी गुवाहाटी गाठली. संदीपने नवव्या मजल्यावर रुम बूक केली होती. विकासने तिथेच दहाव्या मजल्यावर रुम घेतली. अंजलीने विकासला नवव्या मजल्यावर बोलवलं.. त्यानंतर संदीप आणि विकास यांच्यामध्ये बाचाबाची झाली. विकासनं मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला. दोघांमध्ये हाणामारी झाली. त्यामध्ये संदीपचा मृत्यू झाला. या घटनेनंतर विकास आणि अंजलीने तेथून पळ काढला. पण पोलिसांनी तात्काळ सुत्रे हलवले. सीसीटीव्हीच्या आधारावर पोलिसांनी विमानतळावर अंजली आणि विकासला ताब्यात घेतलं.

The post पुण्यातील हिरे व्यापाऱ्याला गुवाहाटीत संपवलं, बंगाली जोडप्याला अटक appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
https://dailyyashwant.com/pune-diamond-merchant-killed-in-guwahati-bengali-couple-arrested/3844/feed/ 0
सूडाच्या भावनेतून भावकीतील महिलेने चिमुकल्या बहीण-भावाला संपवलं https://dailyyashwant.com/out-of-a-sense-of-revenge-the-emotional-woman-killed-the-little-brother-and-siste/3698/ https://dailyyashwant.com/out-of-a-sense-of-revenge-the-emotional-woman-killed-the-little-brother-and-siste/3698/#respond Mon, 22 Jan 2024 05:16:03 +0000 https://dailyyashwant.com/?p=3698 बीड :  बीडमध्ये सूडाच्या भावनेतून भावकीतील महिलेने चक्क चिमुकल्या बहीण व भावास उंदीर मारण्याचे विषारी औषध पाजून कायमचं संपवलं आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली असून, पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. 29 डिसेंबर 2023 रोजी घडलेल्या या घटनेचा तब्बल 20 दिवसानंतर खुलासा झाला आहे. तनुजा (वय 2 वर्ष) व किशोर अमोल भावले (वय 13 महिने) […]

The post सूडाच्या भावनेतून भावकीतील महिलेने चिमुकल्या बहीण-भावाला संपवलं appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
बीड :  बीडमध्ये सूडाच्या भावनेतून भावकीतील महिलेने चक्क चिमुकल्या बहीण व भावास उंदीर मारण्याचे विषारी औषध पाजून कायमचं संपवलं आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली असून, पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. 29 डिसेंबर 2023 रोजी घडलेल्या या घटनेचा तब्बल 20 दिवसानंतर खुलासा झाला आहे. तनुजा (वय 2 वर्ष) व किशोर अमोल भावले (वय 13 महिने) अशी मयत चिमुकल्यांची नावे आहेत. स्वाती उमाजी भावले असे आरोपी महिलेचे नाव आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेवराई तालुक्यातील पांढरवाडी येथील तनुजा आणि किशोर या बहीण-भावाला 29 डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास अचानक उलट्या होऊ लागल्या होत्या. त्यामुळे नातेवाईकांनी दोघांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले. 13 महिन्याच्या किशोर याला बीडच्या एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, तर तनुजाला छत्रपती संभाजीनगरच्या एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोघांवर उपचार सुरु असतानाच उपचारादरम्यान शनिवार 30 डिसेंबर रोजी मुलगी तनुजा हिचा तर मुलगा किशोर याचा 1 जानेवारी रोजी मृत्यू झाला. दोघांचाही अंत्यविधी पांढरवाडी येथे झाला. याप्रकरणात सुरूवातीला तलवाडा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र, पुढे हा खुनाचा प्रकार असल्याचे समोर आले.

शेजारी महिलेच्या सांगण्यावरून केली हत्या…

एक ते दिड महिन्यापुर्वी शेजारी राहणाऱ्या सखुबाई ज्योतीराम भावले हिने आरोपी स्वाती हिचा सासरा सुखदेव भावले याने माझी लेक वैशाली हिला नांदु दिले नाही. मला त्याचा बदला घ्यायचा आहे असे म्हणून मयत मुलांची चुलती म्हणजेच मुलांना औषध देणारी आरोपी स्वाती हिला मुलांना औषध खावू घालण्यास सांगितले. मात्र, स्वातीने त्या महिलेला नकार दिला. त्यानंतर पुन्हा 15 दिवसांनी शेजारी राहणाऱ्या सखुबाई भावले हिने स्वातीला ‘मी तुला चार लाख रूपये देईल, तेवढं काम कर, तुझा कोणाला संशय येणार नाही, तु असे केल्यास तुझी जाऊ येथे राहणार नाही, मग तु एकटीच इथे राहशील’ असे सांगितले. त्यानुसार सखुबाई भावले आणि स्वाती भावले या दोघींनी संगनमताने कट रचला आणि 29 डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास सखुबाई हिने आणून दिलेले उंदिर मारण्याच्या ट्युबमधील औषध स्वाती हिने बोटावर काढून तनुजा आणि किशोर या दोघांना चाटविले. त्यानंतर त्यांना उलट्या झाल्या आणि उपचार सुरू असतांना दोघांचा मृत्यू झाला.

अन् मृत्यूचे खरे कारण समोर आले….

या प्रकरणात पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र, 19 जानेवारी रोजी मयत मुलांची चुलती स्वाती उमाजी भावले ही शेतात काम करत असतांना तिला कुणीतरी मारहाण केली. याविषयी नातेवाईकांनी तिच्याकडे विचारणा केली असता तिने किशोर आणि तनुजा यांच्या मृत्युच्या कारणावरुन मी कुणाला काही सांगू नये म्हणून शेजारी राहणाऱ्या सखुबाई ज्योतीराम भावले हीने दोन अनोळखी मुलांना मला मारहाण करण्यासाठी पाठवले होते असे कुटुंबियांना सांगितले. त्याचवेळी किशोर आणि तनुजा यांच्या मृत्यूचे खरे कारण समोर आले.

The post सूडाच्या भावनेतून भावकीतील महिलेने चिमुकल्या बहीण-भावाला संपवलं appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
https://dailyyashwant.com/out-of-a-sense-of-revenge-the-emotional-woman-killed-the-little-brother-and-siste/3698/feed/ 0
पैशांच्या वादातून मित्राची हत्या; खून करणारा आरोपी परभणी पोलिसांच्या ताब्यात https://dailyyashwant.com/killing-a-friend-over-a-money-dispute-the-accused-murderer-is-in-the-custody-of-parbhani-police/3682/ https://dailyyashwant.com/killing-a-friend-over-a-money-dispute-the-accused-murderer-is-in-the-custody-of-parbhani-police/3682/#respond Sun, 21 Jan 2024 10:50:38 +0000 https://dailyyashwant.com/?p=3682 परभणी : दोन मित्रांनी पार्टनरशिप मध्ये ट्रॅक्टरही घेतले होते. ते दोघे मिळून चांगला व्यवसाय करत असत. मयताच्या वडिलांना दोन लाख पाच हजार रुपये उसने दिले होते. अचानक एकेदिवशी वडिलांना दिलेल्या उसण्या पैशावरून दोघांमध्ये वाद झाला. वादाचे रूपांतर खुनात झाले आहे. मयताचे नाव हुसेन उर्फ अल्ताफ अकबर शेख (वय २३, रा. पेडगाव ता. जि. परभणी) असं आहे. […]

The post पैशांच्या वादातून मित्राची हत्या; खून करणारा आरोपी परभणी पोलिसांच्या ताब्यात appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
परभणी : दोन मित्रांनी पार्टनरशिप मध्ये ट्रॅक्टरही घेतले होते. ते दोघे मिळून चांगला व्यवसाय करत असत. मयताच्या वडिलांना दोन लाख पाच हजार रुपये उसने दिले होते. अचानक एकेदिवशी वडिलांना दिलेल्या उसण्या पैशावरून दोघांमध्ये वाद झाला. वादाचे रूपांतर खुनात झाले आहे. मयताचे नाव हुसेन उर्फ अल्ताफ अकबर शेख (वय २३, रा. पेडगाव ता. जि. परभणी) असं आहे. तर आरोपीचे नाव शेख उमर शेख रसूल (वय ३८, रा. पेडगाव ता. जि. परभणी) असं आहे.

१६ जानेवारी रोजी परभणीच्या पारवा शिवारामध्ये एक मानवी सांगाडा असल्याची बातमी पोलिसांच्या हाती लागली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली सदरील सांगाडा व परिस्थितीची पाहणी केली. यादरम्यान खून, घातपात दिसून येत असल्याने पोलीस अधीक्षक रगसुधा आर. यांनी तात्काळ आरोपीचा शोध आणि मानवी सांगाड्याची ओळख पटविण्यासाठी पोलिसांची तीन पथके तैनात केली.

त्यानुसार सदर गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना सदरील गुन्हा आरोपी शेख उमर शेख रसूल याने केला असल्याची खात्रीलायक बातमी पोलिसांना कळाली. तसेच हा मानवी सांगाडा परभणीच्या पेडगाव येथील रहिवासी हुसेन उर्फ अल्ताफ अकबर शेख याचा असल्याचे देखील निष्पन्न झाले. आरोपी शेख उमर शेख रसूल यास पोलिसांनी ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने हा गुन्हा केल्याचे सांगितले.

गुन्ह्याचे कारण विचारले असता आरोपी शेख उमर शेख रसूलने सांगितले की, “मी आणि अल्ताफ शेख दोघेजण मिळून पार्टनरशिपमध्ये ट्रॅक्टर घेतले होते. त्याचबरोबर त्याच्या वडिलांना मी दोन लाख पाच हजार रुपये उसने दिले होते. उसने दिलेले पैसे परत मिळत नव्हते आणि त्यामुळेच दोघांमध्ये भांडण झाले आणि त्याचा खून केला” असल्याची कबुली आरोपीने दिली आहे.

The post पैशांच्या वादातून मित्राची हत्या; खून करणारा आरोपी परभणी पोलिसांच्या ताब्यात appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
https://dailyyashwant.com/killing-a-friend-over-a-money-dispute-the-accused-murderer-is-in-the-custody-of-parbhani-police/3682/feed/ 0
५० वर्षीय भोंदू महाराज २२ वर्षीय तरुणीला घेऊन पसार https://dailyyashwant.com/50-year-old-bhondu-maharaj-took-a-22-year-old-girl-and-passed-away/3676/ https://dailyyashwant.com/50-year-old-bhondu-maharaj-took-a-22-year-old-girl-and-passed-away/3676/#respond Sun, 21 Jan 2024 05:56:53 +0000 https://dailyyashwant.com/?p=3676 यवतमाळ: उपचाराच्या बहाण्याने मुलीशी जवळीक साधून तिला जत्रेला घेऊन जातो, असे तिच्या घरच्यांना सांगून महाराज गेले ते परत आलेच नाही. शेवटी वाट पाहून मुलीच्या पालकांनी नेर पोलिस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी या भोंदू महाराजावर गुन्हा दाखल केला असून मुलीचा व महाराजाचा शोध सुरू केला आहे. प्रकाश नाईक महाराज (वय ५०) असे गुन्हा दाखल झालेल्या […]

The post ५० वर्षीय भोंदू महाराज २२ वर्षीय तरुणीला घेऊन पसार appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
यवतमाळ: उपचाराच्या बहाण्याने मुलीशी जवळीक साधून तिला जत्रेला घेऊन जातो, असे तिच्या घरच्यांना सांगून महाराज गेले ते परत आलेच नाही. शेवटी वाट पाहून मुलीच्या पालकांनी नेर पोलिस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी या भोंदू महाराजावर गुन्हा दाखल केला असून मुलीचा व महाराजाचा शोध सुरू केला आहे. प्रकाश नाईक महाराज (वय ५०) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.

नेर तालुक्यातील एका गावातील २२ वर्षीय तरुणीला डोकेदुखीमुळे वेदना होत असे. तिच्या घरच्यांनी अनेक उपचार केले पण आराम पडत नव्हता. काही दिवसानंतर तिच्या लहान बहिणीलाही त्रास होऊ लागला. दरम्यान, गावातील एकाने मुलींच्या वडिलांना तुम्ही सावरगाव काळे येथील प्रकाश जनार्दन नाईक महाराज यांच्याकडे घेऊन जाण्यास सांगितले. वडिलांनी दोन्ही मुलींना उपचारासाठी महाराजाकडे नेले. महाराजांनी उपचारदरम्यान मोठ्या मुलीला आपल्या प्रेमजाळ्यात ओढले.

मुली व तिच्या वडिलांना अमरावती जिल्ह्यातील लाखनवाडी येथे जत्रेला घेऊन गेला. त्यामुळे महाराज व मुलीच्या कुटुंबात जवळीक निर्माण झाली. १० जानेवारीला रात्री १२च्या दरम्यान प्रकाश महाराज मुलीच्या घरी कार घेऊन आले. लाखनवाडीच्या जत्रेला घेऊन जातो म्हणून २२ वर्षीय तरुणीला आपल्यासोबत नेले. मात्र त्यानंतर महाराज परत आलेच नाही. मुलीच्या वडिलांनी मोबाइलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण मोबाइल बंद आढळला. लाखनवाडी येथे जाऊन महाराज व मुलीचा शोध घेतला. पण ते दिसले नाही. शेवटी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर मुलीच्या वडिलांनी नेर पोलिस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी प्रकाश नाईक महाराज याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार बाळासाहेब नाईक करीत आहे.

The post ५० वर्षीय भोंदू महाराज २२ वर्षीय तरुणीला घेऊन पसार appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
https://dailyyashwant.com/50-year-old-bhondu-maharaj-took-a-22-year-old-girl-and-passed-away/3676/feed/ 0
पिल्लू फक्त दोन मिनिटं त्रास होईल… गळा घोटत त्याने गर्लफ्रेंडला संपवलं https://dailyyashwant.com/the-puppy-will-only-be-bothered-for-a-couple-of-minutes-he-finished-off-his-girlfriend-choking/3669/ https://dailyyashwant.com/the-puppy-will-only-be-bothered-for-a-couple-of-minutes-he-finished-off-his-girlfriend-choking/3669/#respond Sat, 20 Jan 2024 07:55:07 +0000 https://dailyyashwant.com/?p=3669 मुंबई  : नवी मुंबईतून गायब झालेल्या एका 19 वर्षांच्या तरूणीच्या मृत्यूसंदर्भात धक्कादायाक माहिती समोर आली आहे. गेल्या महिन्याभरापासून बेपत्ता असलेल्या त्या तरूणीच्या हत्येचं गूढ उलगडण्यास पोलिसांना यश आलं. वैष्णवी बाबर हिची तिच्या प्रियकराने हत्या केली आणि नंतर स्वत:चंही जीवनही संपवलं. त्याने लिहीलेल्या एका चिठ्ठीतील कोडमधून पोलिसांनी वैष्णवीच्या हत्येचा आणि मृतदेहाचा तपास लावला. त्याच वेळी पोलिसांना तिची […]

The post पिल्लू फक्त दोन मिनिटं त्रास होईल… गळा घोटत त्याने गर्लफ्रेंडला संपवलं appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
मुंबई  : नवी मुंबईतून गायब झालेल्या एका 19 वर्षांच्या तरूणीच्या मृत्यूसंदर्भात धक्कादायाक माहिती समोर आली आहे. गेल्या महिन्याभरापासून बेपत्ता असलेल्या त्या तरूणीच्या हत्येचं गूढ उलगडण्यास पोलिसांना यश आलं. वैष्णवी बाबर हिची तिच्या प्रियकराने हत्या केली आणि नंतर स्वत:चंही जीवनही संपवलं. त्याने लिहीलेल्या एका चिठ्ठीतील कोडमधून पोलिसांनी वैष्णवीच्या हत्येचा आणि मृतदेहाचा तपास लावला. त्याच वेळी पोलिसांना तिची हत्या करणाऱ्या तरूणाच्या मोबाईलमध्ये एक व्हॉइस नोटही सापडली. त्यामध्ये ‘ पिल्लू, २ मिनिटं, जास्त त्रास होणार नाही, मग आपण दुसऱ्या जन्मात प्रवेश करू’ अशी समजूत काढणारा आवाज ऐकू आला.

24 वर्षीय आरोपी वैभव बुरुंगळेने खारघर येथे वैष्णवीची हत्या करून तिचा मृतदेह तिथेच सोडला. नंतर त्याने रेल्वेखाली झकून देत स्वत:लाही संपवलं. मात्र प्रेमकहाणीचा हा अंत का झाला, हे समजून घेऊ.

वैष्णवी बाबर (19) आणि वैभव बुरंगले (24) हे कळंबोली परिसरात जवळजवळ रहायचे. दोघांचे एकमेकांवर प्रेम होतं, लग्नही करायचं होतं, पण कुटुंबियांचा त्यांच्या नात्याला विरोध होता. 12 डिसेंबरला कॉलेजला जाण्यासाठी वैष्णवी घराबाहेर पडली, पण ती परत आलीच नाही. मुलगी बेपत्ता झाल्याने कुटुंबियांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. मात्र या तक्रारीला महिना उलटून देखील पोलिसांना तिचा काहीच सुगावा लागत नव्हता.

अखेर या घटनेचा तपास गुन्हे शाखेच्या मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडे सोपवण्यात आला आणि तपासासाठी पथक नेमण्यात आलं. वैष्णवीच्या शोधासाठी या पथकाने तिच्या कॉलेजपासून तपासाला सुरुवात केली होती. ती एका तरूणासोबत रेल्वेने प्रवास करताना सीसीटीव्हीत कैद झाली होती. त्यानंतर खारघर स्थानकात उतरून ती टेकडीच्या दिशेने गेली. मात्र टेकडीवरून तो तरूण एकटाच खाली आला. त्यामुळे टेकडीवरच तिच्यासोबत घातपात झाल्याचा संशय पोलिसांना आला.

त्यामुळे पोलिसांनी हत्येपुर्वी वैष्णवी ज्या तरूणासोबत दिसली त्या तरूणाचा शोध घ्यायला सुरुवात केली. वैष्णवी बेपत्ता झाली त्याच दिवशी, 12 डिसेंबरला एका तरूणाने जुईनगर स्थानकात आत्महत्या केल्याचे समोर आले होते. हा तरूण वैष्णवीचा प्रियकर वैभव बुरूंगलेच होता. वैष्णवीच्या मृत्यूपूर्वी तिच्यासोबत असलेल्या एकमेव साक्षीदाराच्या मृत्यूमुळे या प्रकरणाचा उलगडा करायचा कसा असा मोठा प्रश्न पोलिसांसमोर होता.

मोबाईलमधून उलगडले गूढ

अखेर हा गुंता सोडवण्यासाठी पोलिसांनी वैभवचा मोबाईल ताब्यात घेतला आणि त्यात त्यांना मोठा पुरावा मिळाला. त्या मोबाईलमध्ये पोलिसांना एक व्हॉईस नोटही सापडली होती. ज्यामध्ये ‘पिल्लू फक्त दोन मिनिट त्रास होईल, त्यानंतर आपण दुसऱ्या जन्मात प्रवेश करू’, अशी तिची समजूत काढताना दिसला आहे. दोघांचे लग्न होणार नसल्याने ती माझी नाही झाली तर कोणाचीही होणार नाही. या भावनेतून वैभवने हत्येचा कट रचल्याचे समोर आले होते.

मृतदेह कसा शोधला ?

वैभवनेच वैष्णवीची हत्या केल्याचे उघड झाले तरी तिचा मृतदेह मिळाला नव्हता. तो कसा शोधायचा हा प्रश्नही लोकांसमोर होता. तो पुरावा पोलिसांना वैभवच्या मोबाईलमध्ए मिळाला. त्याच्या मोबाईलमध्ये एक नोट होती, ज्यामध्ये ‘L01-501’ हा कोड होता. पोलीस बरेच दिवस या कोडचं रहस्य उलगडण्याचा प्रयत्न करत होते, मात्र हा कोड कुठला आहे याचा सुगावा लागत नव्हता. पोलिसांनी घटनास्थळी म्हणजेच त्या टेकडीवर जाऊन तब्बल 4 दिवस शोधही घेतला, पण त्यांच्या हाती काही लागले नाही.

अखेर त्यांची नजर त्या टेकडीवरील झाडांवर पडली, त्यावर जनगनेसाठी क्रमामक लिहीलेले होते. पोलिसांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने ‘L01-501’ हा क्रमांक लिहीलेल झाड शोधून काढले आणि ते तेथे पोहोचले. त्या झाडाजवळच कुजलेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळला. त्या तरूणीचा ड्रेस, घड्याळ यावरून तिची ओळख पटवण्यात आली आणि ती मृत तरूणी वैष्णवीच असल्याचे समोर आले.

The post पिल्लू फक्त दोन मिनिटं त्रास होईल… गळा घोटत त्याने गर्लफ्रेंडला संपवलं appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
https://dailyyashwant.com/the-puppy-will-only-be-bothered-for-a-couple-of-minutes-he-finished-off-his-girlfriend-choking/3669/feed/ 0
कपडे उतरवले, उलटं लटकवून लोखंडी चिमट्याने… अनाथाश्रमात क्रूरतेचा कळस https://dailyyashwant.com/undressed-hung-upside-down-with-iron-tongs-the-height-of-cruelty-in-the-orphanage/3657/ https://dailyyashwant.com/undressed-hung-upside-down-with-iron-tongs-the-height-of-cruelty-in-the-orphanage/3657/#respond Sat, 20 Jan 2024 06:37:21 +0000 https://dailyyashwant.com/?p=3657 इंदूर : मध्य प्रदेशातील इंदूर येथे असलेल्या अनाथाश्रमातील मुलींनी तेथील कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. येथे 4 ते 16 वयोगटातील मुलींनी जेव्हा आपबिती सांगितली, ते ऐकून पोलिसही हैराण झाले. हृदय पिळवटून टाकणाऱ्या या घटनेत एक-दोन नव्हे तर तब्बल 21 मुलींना क्रूरपण वागणूक देऊन त्यांचा अनन्वित छळ करण्यात आला. या मुलींचे कपडे उतरवून, उलटं लटकवून त्यांना लोखंडी […]

The post कपडे उतरवले, उलटं लटकवून लोखंडी चिमट्याने… अनाथाश्रमात क्रूरतेचा कळस appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
इंदूर : मध्य प्रदेशातील इंदूर येथे असलेल्या अनाथाश्रमातील मुलींनी तेथील कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. येथे 4 ते 16 वयोगटातील मुलींनी जेव्हा आपबिती सांगितली, ते ऐकून पोलिसही हैराण झाले. हृदय पिळवटून टाकणाऱ्या या घटनेत एक-दोन नव्हे तर तब्बल 21 मुलींना क्रूरपण वागणूक देऊन त्यांचा अनन्वित छळ करण्यात आला. या मुलींचे कपडे उतरवून, उलटं लटकवून त्यांना लोखंडी चिमट्याने भाजण्यात आलं. क्रूरतेचा हा कळस गाठतानाच त्या मुलींना लाल मिरचीची धुरीही देण्यात आली. अनाथ बालिकांना मायेचं छत्र मिळावं म्हणून सुरू केलेलं हे वात्स्यपुरम् होतं पण तेथील छळ पाहता त्याचं नान वात्सल्यपुरम् नव्हे तर वासनापुरम् असायला हवं होतं.

त्या मुलीच्या तोंडून अत्याचाराची कहाणी ऐकून पोलिसही हेलावले. याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या तक्रारीच्या आधारे इंदूर पोलिसांनी अनाथाश्रमातील चार कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या संपूर्ण प्रकरणाचा पोलीस गांभीर्याने तपास करत आहेत.

21 मुलींनी लावले आरोप

मिळालेल्या माहितीनुसार, इंदूरच्या अनाथाश्रमातील कर्मचाऱ्यांनी अत्याचार केल्याचा आरोप 21 मुलींनी केला आहे. त्या मुलींचे कपडे काढून त्यांना लोखंडी चिमट्याने भाजण्यात आलं. त्यांना उलटं टांगून लाल मिरचीची धुरही देण्यात आली. हैवान शब्दही लाजेल, कमी पडेल अशा प्रकारचं कृत्य त्या कर्मचाऱ्यांनी मुलींसोबत केलं. 13 जानेवारी रोजी बाल कल्याण समिती (CWC) च्या टीमने इंदूरमधील वात्सल्यपुरम जैन ट्रस्टच्या अनाथाश्रमात अचानक तपासणी केली होती. यानंतर धक्कादायक खुलासा झाला.

अनाथाश्रमातील मुलींनी जेव्हा अधिकाऱ्यांना आपला त्रास सांगितला तेव्हा ते अवाक् झाले, हैराण झाले. 21 मुलींच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी वात्सल्यपुरम जैन ट्रस्टच्या चार कर्मचार्‍यांवर बाल न्याय कायदा आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला.

गुन्हा दाखल करून कारवाई सुरू

मुलींनी त्यांच्या जबानीत छेडछाडीची माहिती दिली आहे, असे इंदूरचे अतिरिक्त पोलिस उपायुक्त अमरेंद्र सिंह यांनी सांगितले. या आधारे पोलिसांनी वात्सल्यपुरम जैन ट्रस्टच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आयुषी, सुजाता, सुमन, आरती आणि बबली अशी आरोपींची नावे आहेत.

अनाथाश्रमात राहणाऱ्या मुली वेगवेगळ्या जिल्ह्यातील आहेत. तपासणीत या मुलींवर अत्याचार झाल्याचे आढळून आले. आम्ही या प्रकरणाचा व्यापक तपास सुरू केला आहे. CWC अहवालानंतर योग्य कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे, असे इंदूरचे जिल्हाधिकारी आशिष सिंह यांनी सांगितले.

The post कपडे उतरवले, उलटं लटकवून लोखंडी चिमट्याने… अनाथाश्रमात क्रूरतेचा कळस appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
https://dailyyashwant.com/undressed-hung-upside-down-with-iron-tongs-the-height-of-cruelty-in-the-orphanage/3657/feed/ 0
कर्णबधीर मुलीवर आईच्या प्रियकरासह तीन नराधमांचा लैंगिक अत्याचार https://dailyyashwant.com/a-deaf-girl-was-sexually-assaulted-by-three-murderers-along-with-her-mothers-boyfriend/3347/ https://dailyyashwant.com/a-deaf-girl-was-sexually-assaulted-by-three-murderers-along-with-her-mothers-boyfriend/3347/#respond Fri, 22 Dec 2023 05:04:19 +0000 https://dailyyashwant.com/?p=3347 पुणे: आईच्या प्रियकरासह तिघांनी १७ वर्षीय कर्णबधीर मुलीवर बलात्कार केल्याचा प्रकार मुंढवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला. आरोपींमध्ये मुलीचा जवळचा नातेवाईक आणि मित्र यांचा समावेश आहे. या प्रकरणी नरवीर तानाजी मालुसरे रस्त्यावरील एका विशेष मुलांच्या शाळेतील शिक्षिकेने मुंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार २०१९ ते २०२३ या […]

The post कर्णबधीर मुलीवर आईच्या प्रियकरासह तीन नराधमांचा लैंगिक अत्याचार appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
पुणे: आईच्या प्रियकरासह तिघांनी १७ वर्षीय कर्णबधीर मुलीवर बलात्कार केल्याचा प्रकार मुंढवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला. आरोपींमध्ये मुलीचा जवळचा नातेवाईक आणि मित्र यांचा समावेश आहे. या प्रकरणी नरवीर तानाजी मालुसरे रस्त्यावरील एका विशेष मुलांच्या शाळेतील शिक्षिकेने मुंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार २०१९ ते २०२३ या कालावधीत घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींपैकी एक जण पीडितेच्या कुटुंबातील आहे, तर एक जण आईचा प्रियकर व एक जण पीडितेचा मित्र आहे. पीडित मुलीची आई दिवसभर धुण्याभांड्यांची कामे करते. तिच्या वडिलांचे पूर्वीच निधन झाले आहे. पीडित मुलगी घरी असताना, आईच्या प्रियकराने घरी येऊन जबरदस्तीने तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली. पीडितेच्या मित्राने तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला. पीडिता घरी एकटीच असताना तिच्या कुटुंबातीलच एका अल्पवयीन मुलाने जबरदस्तीने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

पीडित मुलगी शाळेत असताना तिच्या मोबाइलमध्ये वर्गातील मैत्रिणींनी पीडितेचे आणि तिच्या मित्राचे काही फोटो पाहिले. त्यानंतर मैत्रिणींनी शिक्षिकेला त्याची माहिती दिली. शिक्षिकेने अधिक चौकशी केल्यावर संपूर्ण प्रकार उघडकीस आला, अशी माहिती मुंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांनी दिली.

The post कर्णबधीर मुलीवर आईच्या प्रियकरासह तीन नराधमांचा लैंगिक अत्याचार appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
https://dailyyashwant.com/a-deaf-girl-was-sexually-assaulted-by-three-murderers-along-with-her-mothers-boyfriend/3347/feed/ 0
पतीच्या छळाला कंटाळून पत्नीनेच दिली आपल्या पतीच्या हत्येची सुपारी https://dailyyashwant.com/tired-of-her-husbands-torture-the-wife-gave-the-betel-nut-to-her-husbands-murder/3107/ https://dailyyashwant.com/tired-of-her-husbands-torture-the-wife-gave-the-betel-nut-to-her-husbands-murder/3107/#respond Tue, 12 Dec 2023 06:09:45 +0000 https://dailyyashwant.com/?p=3107 पिंपरी: सलग आठ मुली झाल्याने पती पत्नीचा वारंवार छळ करत होता. त्यामुळे पत्नीने पतीला मारण्यासाठी अनेक प्रयत्न केले. मात्र, ते सारे फसत होते. शेवटी संतापलेल्या पत्नीने पतीला मारण्यासाठी सराईत गुन्हेगारांना दोन लाखांची सुपारी दिली. त्यानुसार, त्या सराईत गुन्हेगारांनी पतीवर हल्ला केला. मात्र, तोही प्लान फसला. हल्ला केल्यानंतर आरोपी पती मृत झाल्याचे समजून तिथून निघून गेले होते. […]

The post पतीच्या छळाला कंटाळून पत्नीनेच दिली आपल्या पतीच्या हत्येची सुपारी appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
पिंपरी: सलग आठ मुली झाल्याने पती पत्नीचा वारंवार छळ करत होता. त्यामुळे पत्नीने पतीला मारण्यासाठी अनेक प्रयत्न केले. मात्र, ते सारे फसत होते. शेवटी संतापलेल्या पत्नीने पतीला मारण्यासाठी सराईत गुन्हेगारांना दोन लाखांची सुपारी दिली. त्यानुसार, त्या सराईत गुन्हेगारांनी पतीवर हल्ला केला. मात्र, तोही प्लान फसला. हल्ला केल्यानंतर आरोपी पती मृत झाल्याचे समजून तिथून निघून गेले होते.

शिवम दुबे उर्फ दुब्या आणि अमन पुजारी अशी हल्लेखोरांची नावं आहेत. तसेच, सुपारी देणाऱ्या पत्नीला पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत जखमी व्यक्तीच्या मुलीने निगडी पोलिसात फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, लग्नानंतर आरोपी असलेल्या महिलेला आठही मुली झाल्या होत्या. त्यावरून पती तिचा वारंवार छळ करत होता. तसेच, त्याने दुसरे लग्न करण्याची देखील तयारी केली होती. त्यामुळे संतापलेल्या पत्नीने त्याचा राग मनात धरून काटा काढण्याचं ठरवलं. तिने रागाच्या भरात पतीवर विष प्रयोग केला होता. मात्र तो फसला. त्यामुळे तिने शेजारी राहणारा सराईत गुन्हेगार अमन पुजारी याला पतीला मारण्याची दोन लाखांची सुपारी दिली.

त्यासाठी पुजारी याने मित्र शिवम दुबे याला सोबत घेतले. त्याने सुपारी मिळालेल्या पैशातून तलवारी देखील विकत घेतल्या. ७ डिसेंबरच्या रात्री पती दारू पिऊन झोपला असल्याचे पत्नीने हल्लेखोरांना सांगितले. संपूर्ण खबरदारी घेत आरोपींनी घरात घुसून पतीवर तलावरीने सपासप वार केले. पती मेल्याचे समजून हल्लेखोरांनी तिथून पळ काढला. मात्र, पती बचावला होता.

The post पतीच्या छळाला कंटाळून पत्नीनेच दिली आपल्या पतीच्या हत्येची सुपारी appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
https://dailyyashwant.com/tired-of-her-husbands-torture-the-wife-gave-the-betel-nut-to-her-husbands-murder/3107/feed/ 0