Congress Archives - Dainik Yashwant, Latur https://dailyyashwant.com/tag/congress/ Online Portal Tue, 13 Feb 2024 02:07:32 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.4 विकास ठाकरे आऊट ऑफ कव्हरेज, काँग्रेसला आणखी एक धक्का बसणार? https://dailyyashwant.com/vikas-thackeray-out-of-coverage-another-blow-to-congress/4009/ https://dailyyashwant.com/vikas-thackeray-out-of-coverage-another-blow-to-congress/4009/#respond Tue, 13 Feb 2024 02:05:43 +0000 https://dailyyashwant.com/?p=4009 नागपूर : काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह आमदारकीचा राजीनामा सोमवारी दिला. चव्हाण यांच्यासह त्यांना पाठिंबा देणारे १३ आमदारही पक्षाला अलविदा करू शकतात. या चर्चांमध्येच कॉंग्रेसचे नागपूर शहर व जिल्हाध्यक्ष विकास ठाकरे हेही आउट ऑफ कव्हरेज झाले असून, काँग्रेसचे नेते सतत त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र तसे […]

The post विकास ठाकरे आऊट ऑफ कव्हरेज, काँग्रेसला आणखी एक धक्का बसणार? appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
नागपूर : काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह आमदारकीचा राजीनामा सोमवारी दिला. चव्हाण यांच्यासह त्यांना पाठिंबा देणारे १३ आमदारही पक्षाला अलविदा करू शकतात. या चर्चांमध्येच कॉंग्रेसचे नागपूर शहर व जिल्हाध्यक्ष विकास ठाकरे हेही आउट ऑफ कव्हरेज झाले असून, काँग्रेसचे नेते सतत त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र तसे होत नाही. त्यानंतर विकास ठाकरे यांनीही काँग्रेस सोडल्याची चर्चा सुरू झाली आहे.

अशोक चव्हाण यांच्यासह सुमारे १३ नेते काँग्रेस सोडण्याच्या विचारात असल्याचा चर्चा सुरू आहे. यामध्ये आमदार विश्वजित कदम, विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, अमित देशमुख आणि धीरज देशमुख, प्रणिती शिंदे, अस्लम शेख, जितेश अंतापूरकर, सुरेश वरपुडकर, विकास ठाकरे, कैलास गौरंट्याल, संजय जगताप आदी बड्या नेत्यांचा समावेश असल्याची चर्चा आहे.

अशोक चव्हाण यांच्यासोबत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारही काँग्रेसला अलविदा करणार असल्याचा दावा केला जात होता. मात्र, याबाबतच्या चर्चेत तथ्य नसल्याचे वडेट्टीवार यांनीच स्पष्ट केलं आहे. ”अशोक चव्हाण यांचा राजीनामा धक्कादायक आहे. त्यांनी अचानक घेतलेल्या निर्णयामागील कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. त्याने माझ्याशी काहीही चर्चा केली नाही. माझे त्याच्याशी चांगले संबंध आहे. त्यामुळे मीही काँग्रेस सोडणार असल्याची चर्चा आहे. मात्र या चर्चेत तथ्य नाही”, असं विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.

The post विकास ठाकरे आऊट ऑफ कव्हरेज, काँग्रेसला आणखी एक धक्का बसणार? appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
https://dailyyashwant.com/vikas-thackeray-out-of-coverage-another-blow-to-congress/4009/feed/ 0
अशोक चव्हाणांसोबत भाजपने माईंड गेम खेळला -प्रणिती शिंदे https://dailyyashwant.com/bjp-played-mind-game-with-ashok-chavan-praniti-shinde/3997/ https://dailyyashwant.com/bjp-played-mind-game-with-ashok-chavan-praniti-shinde/3997/#respond Mon, 12 Feb 2024 14:05:51 +0000 https://dailyyashwant.com/?p=3997 सोलापूर: काँग्रेसचे अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्यात राजकीय भूकंप आला आहे. काँग्रेसच्या राज्य कार्याध्यक्ष आणि काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी प्रतिक्रिया देताना भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. राजकीय नेत्यांना फोडणे, ईडी सारख्या चौकशा लावणे, हताश होऊन अशोक चव्हाण काँग्रेस सोडून गेले. भाजपची ही युक्तीच आहे, असेही प्रणिती शिंदेंनी सांगितलं. मी तर स्पष्टपणे सांगितले आहे. माझ्याबाबत […]

The post अशोक चव्हाणांसोबत भाजपने माईंड गेम खेळला -प्रणिती शिंदे appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
सोलापूर: काँग्रेसचे अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्यात राजकीय भूकंप आला आहे. काँग्रेसच्या राज्य कार्याध्यक्ष आणि काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी प्रतिक्रिया देताना भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. राजकीय नेत्यांना फोडणे, ईडी सारख्या चौकशा लावणे, हताश होऊन अशोक चव्हाण काँग्रेस सोडून गेले. भाजपची ही युक्तीच आहे, असेही प्रणिती शिंदेंनी सांगितलं.

मी तर स्पष्टपणे सांगितले आहे. माझ्याबाबत फक्त अफवा आहेत. आम्ही काँग्रेस सोडून जाणार नाही. आमच्याकडे ईडीची चौकशी होण्यासारखं काहीही नाही, असे प्रणिती शिंदें स्पष्ट सांगितले. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे आमदार अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्याने राज्यातील काँग्रेसमध्ये मोठा भूकंप आला आहे. अशोक चव्हाणांसोबत भाजपने माईंड गेम खेळला. ईडीच्या चौकशा आणि दबाव यामुळे अशोक चव्हाणांनी हा निर्णय घेतला. हे केवळ आणि केवळ ईडीच्या प्रेशरमुळे आहे. जे अशोक चव्हाण साहेबांसोबत झालं. वारंवार प्रेशर, ब्लॅकमेल, एकप्रकारचं ब्लॅकमेल पण त्यांना करण्यात आलेलं म्हणून कदाचित त्यांनी तो निर्णय हा निर्णय घेतला असेल. ही काँग्रेससाठी अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे, असं त्या म्हणाल्या.

प्रणिती शिंदे म्हणाल्या की, ब्लॅकमेल करून अटक असेल, ईडी असेल त्या पद्धतीचा ब्लॅकमेल करून प्रत्येक पक्षाच्या नेत्यांना त्यांच्यामध्ये घेण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपने त्यांच्याबरोबर माईंड गेम खेळले गेले. अतिशय हताश होऊन त्यांनी हा निर्णय घेतला आहे. मी भाजपमध्ये जाणार ह्या सगळ्या अफवा आहेत. साहेबांनी आणि मी याअगोदर स्पष्टीकरण दिलेला आहे. त्याबद्दल मला काही बोलायचं नाही. पण जे शक्य नाही. अर्थात चव्हाण साहेबांनी जो काही निर्णय भीतीपोटी असेल तो घेतला तो काँग्रेससाठी अतिशय दुर्दैवी आहे. ह्या पद्धतीचे राजकारण आपल्या देशात किंवा महाराष्ट्रात पहिल्यांदाच होत आहे. माझ्याबद्दल अफवा पसरवत आहेत. ईडी चौकशी करण्यासारख आमच्याकडे नाहीच आहेत संस्था वैगरे. पण भारताची नागरिक म्हणून ज्याच्यासाठी माझी जे तत्व आहेत, ज्याच्यासाठी मी राजकारणात आली.

बीजेपी आम्हाला आणि अनस्टेबल दाखवायचा प्रयत्न करत आहे. तसं काही नाही काँग्रेस पक्ष भक्कम आहे. कितीही आम्हाला अनस्टेबल करायचा प्रयत्न केला तर ते यशस्वी होणार नाहीत. काँग्रेस हा एक विचार आहे आणि महाविकास आघाडी भक्कम आहे. महाराष्ट्राला एक विचार देणारा महाविकास आघाडी एक राजकीय पक्ष आहे. महाविकास आघाडीच्या बाजूने कौल वाढत चालला आहे. हे त्यांना माहित आहे. म्हणून ते महानगरपालिका निवडणुका घेत नाहीत. लोकसभा किंवा विधानसभेमध्ये महाविकास आघाडीचा कल हे भाजपपेक्षा जास्त असेल, असं प्रणिती शिंदे म्हणाल्या आहेत.

The post अशोक चव्हाणांसोबत भाजपने माईंड गेम खेळला -प्रणिती शिंदे appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
https://dailyyashwant.com/bjp-played-mind-game-with-ashok-chavan-praniti-shinde/3997/feed/ 0
अशोक चव्हाणांबद्दल २०१४ मध्ये मोदी काय म्हणाले होते? https://dailyyashwant.com/what-did-modi-say-about-ashok-chavan-in-2014/3991/ https://dailyyashwant.com/what-did-modi-say-about-ashok-chavan-in-2014/3991/#respond Mon, 12 Feb 2024 13:40:28 +0000 https://dailyyashwant.com/?p=3991 देशातील विरोधकांमागे ईडी आणि सीबीआयचा ससेमीरा सुरू असतानाच देशातील विरोधी पक्षातील नेते सुद्धा एका मागोमाग एक या पद्धतीने भाजपमध्ये सामील होत आहेत. काहींची संस्थात्मक राजकारणासाठी राजकीय अगतिकता, तर काहींची राजकीय सोय यामागे पाहिली जात आहे. मात्र, यामुळे विचारधारा मात्र बासनात गुंडाळून ठेवावी लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यासह देशामध्ये ईडी आणि सीबीआयचे धाडसत्र सुरूच आहे. […]

The post अशोक चव्हाणांबद्दल २०१४ मध्ये मोदी काय म्हणाले होते? appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
देशातील विरोधकांमागे ईडी आणि सीबीआयचा ससेमीरा सुरू असतानाच देशातील विरोधी पक्षातील नेते सुद्धा एका मागोमाग एक या पद्धतीने भाजपमध्ये सामील होत आहेत. काहींची संस्थात्मक राजकारणासाठी राजकीय अगतिकता, तर काहींची राजकीय सोय यामागे पाहिली जात आहे. मात्र, यामुळे विचारधारा मात्र बासनात गुंडाळून ठेवावी लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यासह देशामध्ये ईडी आणि सीबीआयचे धाडसत्र सुरूच आहे.

मोदी सरकारच्या श्वेतपत्रिकेत आदर्श घोटाळा

केंद्रातील सत्ताधारी मोदी सरकारकडून सातत्याने विरोधकांवर भ्रष्टाचाराचा आणि घराणेशाहीचा आरोप केला जातो. मात्र, त्याच आरोपातील नेते मागच्या दाराने भाजपमध्ये सामील होतात, हे गेल्या काही दिवसांपासून ठळकपणे दिसून येत आहे. काँग्रेस प्रणित युपीएच्या कार्यकाळातील कामकाजावर मोदी सरकारकडून श्वेतपत्रिका सादर करण्यात आली. या श्वेत पत्रिकेमध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक गाजलेल्या आदर्श घोटाळ्याचा सुद्धा समावेश होता. मात्र, आता त्याच आदर्श घोटाळ्यातील मुख्य आरोपी म्हणून पाहिले गेले तेच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण राजीनामा देताच भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे.

मोदींकडून अशोक चव्हाणांवर टीका

मात्र, तेच अशोक चव्हाण यांचं नाव आदर्श घोटाळ्यात आले त्यावेळी त्यांच्यावर आरोपांची राळ उडवून देण्यात पंतप्रधान मोदींपासून ते राज्यातील भाजप नेतृत्वाने कोणतीही कसर बाकी ठेवली नव्हती. इतकंच नव्हे तर आता 2014 मध्ये पीएम मोदी यांनी केलेले ट्विट सुद्धा आता सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.

9 एप्रिल 2014 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशोक चव्हाण यांच्या अनुषंगाने ट्विट करत जोरदार टीका केली होती. अशोक चव्हाण सारख्या घर चोरणाऱ्यांना आपण चौकीदार करणार का? अशी विचारणा त्यांनी सार्वजनिकरित्या केली होती. आता हे ट्विट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झालं आहे. आता अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर आता ते भाजपवासी होऊन त्यांना केंद्रामध्ये मोठं मंत्रिपद दिलं जाईल, अशी चर्चा रंगली आहे. त्यामुळे आता एका बाजूने आरोप करायचे आणि दुसऱ्या बाजूने मागचं दार उघड ठेवून त्यांनाच भाजपमध्ये सामील करून घ्यायचं असा आरोप विरोधकांकडून होत आहे. याची चर्चा आता सोशल मीडियामध्ये रंगली आहे.

 

 

The post अशोक चव्हाणांबद्दल २०१४ मध्ये मोदी काय म्हणाले होते? appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
https://dailyyashwant.com/what-did-modi-say-about-ashok-chavan-in-2014/3991/feed/ 0
प्रत्येक गोष्टीचं कारण सांगता येणार नाही, मला वेगळा पर्याय शोधायचा होता; अशोक चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया https://dailyyashwant.com/not-everything-can-be-explained-i-wanted-to-find-an-alternative-ashok-chavans-first-reaction/3979/ https://dailyyashwant.com/not-everything-can-be-explained-i-wanted-to-find-an-alternative-ashok-chavans-first-reaction/3979/#respond Mon, 12 Feb 2024 10:04:04 +0000 https://dailyyashwant.com/?p=3979 अशोक चव्हाण  यांनी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि आमदाराकीचा राजीनामा दिला असून आपली राजकीय भूमिका येत्या एक दोन दिवसात जाहीर करेन असं ते म्हणाले. पक्ष सोडताना तसं कोणतंही कारण नाही, प्रत्येक गोष्टीचं कारण सांगता येणार नाही असं सांगत त्यांनी मला वेगळा पर्याय शोधायचा आहे, म्हणून राजीनामा दिल्याचं स्पष्ट केलं. राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी […]

The post प्रत्येक गोष्टीचं कारण सांगता येणार नाही, मला वेगळा पर्याय शोधायचा होता; अशोक चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
अशोक चव्हाण  यांनी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि आमदाराकीचा राजीनामा दिला असून आपली राजकीय भूमिका येत्या एक दोन दिवसात जाहीर करेन असं ते म्हणाले. पक्ष सोडताना तसं कोणतंही कारण नाही, प्रत्येक गोष्टीचं कारण सांगता येणार नाही असं सांगत त्यांनी मला वेगळा पर्याय शोधायचा आहे, म्हणून राजीनामा दिल्याचं स्पष्ट केलं.

राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर राज्यात एकच चर्चा सुरू झाली. अशोक चव्हाणांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडे सोपवला असल्याची माहिती दिली. त्यानंतर आपण आतापर्यंत अनेक वर्षे काँग्रेसमध्ये प्रामाणिकपणे काम केलं आहे, आता नवा पर्याय शोधावा असं वाटतं अशं ते म्हणाले.

मी काँग्रेस पक्षाच्या विधानसभा सदस्यत्त्वाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेस वर्किंग कमिटी, प्राथमिक सदस्यत्त्व विधिमंडळ काँग्रेस पक्ष राजीनामा दिला आहे. मी काँग्रेसमध्ये प्रामाणिकपणे पक्षाचे काम केले आहे. माझी कोणाबद्दल वेगळी भावना नाही. जोपर्यंत काँग्रेसमध्ये होतो तोपर्यंत प्रामाणिकपणे काम केलं. आता मी निर्णय घेईन, दिशा ठरवेन. एक दोन दिवसात राजकीय भूमिका ठरवेन.

भाजपची कार्यप्रणाली मला माहिती नाही. मी अद्याप भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतलेला नाही. दोन दिवसांमध्ये मी माझी राजकीय भूमिका स्पष्ट करेन.

काँग्रेस पक्ष सोडण्याचं कारण काय असं विचारणा करण्यात आल्यानंतर अशोक चव्हाण म्हणाले की, प्रत्येक गोष्टीला कारण असलंच पाहिजे असे काही नाही. मी जन्मपासून आतापर्यंत काँग्रेसचे काम केले. आता मला वाटतं मला आता अन्य पर्याय पाहिले पाहिजेत. म्हणून मी पक्षाचा राजीनामा दिला.

मी आज काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याशी किंवा आमदाराशी बोललेलो नाही. कोण काय करेल, ते मला माहिती नाही. हा प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय असतो. पण मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की, काँग्रेसच्या एकाही आमदाराशी माझे बोलणे झालेले नाही, असे चव्हाण यांनी म्हटले.

यावेळी अशोक चव्हाण यांनी पक्ष सोडण्यामागील आपली भूमिकाही स्पष्ट केली. प्रत्येक गोष्टीला कारण असलंच पाहिजे, असे काही नाही. मी जन्मापासून आतापर्यंत काँग्रेस पक्षाचे काम केले आहे. आता मला वाटते की, मी अन्य पर्यायांचा विचार केला पाहिजे. त्यामुळे मी पक्षाचा राजीनामा दिला आहे. आता मी विचार करुन पुढची दिशा ठरवेन. मी दुसऱ्या पक्षात जाण्याविषयी अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. येत्या दोन दिवसांमध्ये मी माझी पुढील राजकीय दिशा स्पष्ट करेल, असे अशोक चव्हाण यांनी सांगितले. तसेच मला कुठल्याही पक्षांतर्गत गोष्टीची वाच्यता  करायची नाही. मला कोणाचीही उणीदुणी काढायची नाहीत. तो माझा स्वभाव नाही, असेही चव्हाण यांनी म्हटले.

काँग्रेस पक्षाने तुम्हाला खूप काही दिले आहे, तरीही तुम्ही पक्ष का सोडताय, असा प्रश्न अशोक चव्हाण यांना विचारण्यात आला. त्यावर चव्हाण यांनी म्हटले की, अशोक चव्हाणांना पक्षाने खूप दिलं हे खरं आहे, पण चव्हाणांनीही पक्षासाठी खूप केलंय. मी पक्षात असेपर्यंत प्रामाणिकपणे काम केले आहे. पक्षाने मला मोठं केलं असेल तर मीपण पक्षासाठी काही कमी केले नाही, असे अशोक चव्हाण यांनी आवर्जून सांगितले. विरोधी पक्षात असूनही राज्य सरकारने तुमच्या मतदारसंघातील कामांसाठी निधी दिला, यावर अशोक चव्हाण यांना विचारणा करण्यात आली. त्यावर स्पष्टीकरण देताना चव्हाण यांनी म्हटले की, मी राज्याचा मंत्री असताना भाजपसहित सर्वपक्षीयांना विकासाच्या कामात मदत केली. मंत्री शेवटी सर्व राज्याचा असतो, एका पक्षाचा नसतो. त्यामुळे माझ्या कार्यकाळात मी सर्वांना निधी दिला आहे, असे चव्हाण यांनी सांगितले.

The post प्रत्येक गोष्टीचं कारण सांगता येणार नाही, मला वेगळा पर्याय शोधायचा होता; अशोक चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
https://dailyyashwant.com/not-everything-can-be-explained-i-wanted-to-find-an-alternative-ashok-chavans-first-reaction/3979/feed/ 0
15 फेब्रुवारीच्या मुहूर्तावर अमित शाहांच्या उपस्थितीत अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार, केंद्रात मोठं पद मिळण्याची शक्यता https://dailyyashwant.com/ashok-chavan-will-join-the-bjp-in-the-presence-of-amit-shah-on-february-15/3969/ https://dailyyashwant.com/ashok-chavan-will-join-the-bjp-in-the-presence-of-amit-shah-on-february-15/3969/#respond Mon, 12 Feb 2024 09:00:04 +0000 https://dailyyashwant.com/?p=3969 मुंबई: राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे बडे नेते अशोक चव्हाणांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्याने राज्यात राजकीय भूकंप झाल्याचं चित्र आहे. अशोक चव्हाण आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह  यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. अमित शाह हे 15 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून त्यावेळी अशोक चव्हाण हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. अशोक चव्हाणांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा […]

The post 15 फेब्रुवारीच्या मुहूर्तावर अमित शाहांच्या उपस्थितीत अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार, केंद्रात मोठं पद मिळण्याची शक्यता appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
मुंबई: राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे बडे नेते अशोक चव्हाणांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्याने राज्यात राजकीय भूकंप झाल्याचं चित्र आहे. अशोक चव्हाण आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह  यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. अमित शाह हे 15 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून त्यावेळी अशोक चव्हाण हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

अशोक चव्हाणांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून ट्विटरच्या माध्यामातून ही माहिती दिली. तसेच भोकर विधानसभेच्या आमदारकीचाही त्यांनी राजीनामा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडे सोपवल्याचं सांगितलं.

गेल्या आठवड्यात अमित शाहांची भेट घेतली

गेल्या आठवड्यात अशोक चव्हाण यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे. त्याचवेळी राजीनामा देण्याविषयी चर्चा झाली. त्यानंतर आता अशोक चव्हाणांनी आपला राजीनामा दिला आहे. केंद्रीय नेतृत्वाच्या उपस्थितीत आपला पक्षप्रवेश व्हावा अशी इच्छा अशोक चव्हाण यांनी व्यक्त केल्याची माहिती आहे. त्यामुळे येत्या 15 फेब्रुवारी रोजी अमित शाह हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असताना अशोक चव्हाण यांचा भाजप प्रवेश होणार असल्याची माहिती आहे.

केंद्रात मोठं पद मिळण्याची शक्यता 

राज्यात मुख्यमंत्री राहिलेल्या अशोक चव्हाण यांना भाजप प्रवेश केल्यानंतर त्यांना केंद्रात मोठं पद मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यासाठी त्यांना राज्यसभेवर घेतलं जाणार असल्याची चर्चाही आहे. त्याचमुळे त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला.

महाराष्ट्र काँग्रेसमध्ये भूकंप

अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठा भूकंप झाल्याचं दिसतंय. त्यांच्यासोबत काही आमदार भाजपमध्ये जाणार आहेत. विधानपरिषदेचे माजी आमदार अमर राजूरकर यांनीही काँग्रेसच्या पदाचा राजीनामा दिला आहे. अमर राजूरकर हे अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय आहेत. त्याचवेळी मुंबई काँग्रेसमध्येही अस्वस्थता असल्याचं काँग्रेस नेते भाई जगताप यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्याची चर्चाही होतेय.

The post 15 फेब्रुवारीच्या मुहूर्तावर अमित शाहांच्या उपस्थितीत अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार, केंद्रात मोठं पद मिळण्याची शक्यता appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
https://dailyyashwant.com/ashok-chavan-will-join-the-bjp-in-the-presence-of-amit-shah-on-february-15/3969/feed/ 0
अशोक चव्हाणांनी कॉंग्रेस सोडली https://dailyyashwant.com/ashok-chavan-left-congress/3962/ https://dailyyashwant.com/ashok-chavan-left-congress/3962/#respond Mon, 12 Feb 2024 07:55:09 +0000 https://dailyyashwant.com/?p=3962 माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा  राजीनामा दिला आहे.  पक्ष सदस्यत्वाच्या राजीनाम्याच्या कॉपीमध्ये विधानसभा सदस्याचा पुढे माजी हा शब्द लिहण्यात आलेला आहे. या वरून त्यांनी पक्ष सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. हा  राजीनामा त्यांना काँग्रसे अध्यक्ष नाना पटोले  यांच्याकडे दिला आहे. आता अशोक चव्हणांची पुढील राजकीय दिशा काय असणार यकडे सर्वांचे लक्ष […]

The post अशोक चव्हाणांनी कॉंग्रेस सोडली appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा  राजीनामा दिला आहे.  पक्ष सदस्यत्वाच्या राजीनाम्याच्या कॉपीमध्ये विधानसभा सदस्याचा पुढे माजी हा शब्द लिहण्यात आलेला आहे. या वरून त्यांनी पक्ष सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. हा  राजीनामा त्यांना काँग्रसे अध्यक्ष नाना पटोले  यांच्याकडे दिला आहे. आता अशोक चव्हणांची पुढील राजकीय दिशा काय असणार यकडे सर्वांचे लक्ष लगले आहे.

अशोक चव्हाण यांनी माजी विधानसभा सदस्य असा उल्लेख केला आहे. त्यामुळे त्यांनी आमदरकीचा ही राजीनामा दिला आहे. अशोक चव्हाण यांनी नार्वेकरांची भेट घेतल्याचीही माहिती आहे.  14  फेब्रुवारी रोजी अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. अशोच चव्हाण यांच्यासोबत काही आमदार देखील जाण्याची शक्यता आहे.

राजीनाम्यात नेमकं काय म्हटलय?

मी 12 फेब्रुवारी 2024 मध्यान्हनंतर पासून माझ्या इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा सादर करत आहे.

आपला विश्वासू,

अशोकराव शंकरराव चव्हाण

The post अशोक चव्हाणांनी कॉंग्रेस सोडली appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
https://dailyyashwant.com/ashok-chavan-left-congress/3962/feed/ 0
आगे आगे देखिए, होता है क्या, देवेंद्र फडणवीसांचं सूचक वक्तव्य https://dailyyashwant.com/suggestive-statement-by-devendra-fadnavis/3960/ https://dailyyashwant.com/suggestive-statement-by-devendra-fadnavis/3960/#respond Mon, 12 Feb 2024 07:43:31 +0000 https://dailyyashwant.com/?p=3960 अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं वक्तव्य केले आहे. काँग्रेसमधील अनेक नेते आमच्या संपर्कात आहेत, असं सूचक वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. देवेंद्र फडणवीस काँग्रेसमधील अनेक दिग्गज नेते संपर्कात असल्याचं समोर आले आहे. अशोक चव्हाण भाजपमध्ये येत आहेत, हे तुमच्याकडूनच ऐकतोय. पण काँग्रेसचे अनेक नेते संपर्कात […]

The post आगे आगे देखिए, होता है क्या, देवेंद्र फडणवीसांचं सूचक वक्तव्य appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं वक्तव्य केले आहे. काँग्रेसमधील अनेक नेते आमच्या संपर्कात आहेत, असं सूचक वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. देवेंद्र फडणवीस काँग्रेसमधील अनेक दिग्गज नेते संपर्कात असल्याचं समोर आले आहे.

अशोक चव्हाण भाजपमध्ये येत आहेत, हे तुमच्याकडूनच ऐकतोय. पण काँग्रेसचे अनेक नेते संपर्कात आहेत. गेली काही वर्ष काँग्रेस जी वाटचाल करतोय, त्यामुळे अनेकांची घुसमट होतेय, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
भाजपसोबत अनेक पक्षातील बडे नेते येण्यासाठी इच्छुक आहेत. विशेषत: काँग्रेसमधील अनेक नेते आमच्या संपर्कात आहेत. काँग्रेसमधील गटबाजी आणि अंतर्गत राजकारणाला नेते कंटाळले आहेत. काँग्रेसमधील मुस्कटदाबी आणि मोदींच्या नेतृत्त्वातील भारताची प्रगती पाहता, अनेक नेत्यांना वाटतं की मुख्य प्रवाहात यायला हवं. त्यामुळे आमच्या कोण कोण संपर्कात आहेत, भाजपमध्ये कोण कोण येणार याबाबत मी इतकंच सांगेन, आगे आगे देखीए, होता है क्या!

महाविकास आघाडीतील सगळ्याच पक्षातील नेते आमच्या संपर्कात आहेत. काही लोकांना यायचं आहे, ते येत आहेत. मोदींजीसोबत, भाजपसोबत यायला हवं, ही त्यांची भावना झालेली आहे. काँग्रेसचे अनेक नेते संपर्कात आहेत. गेली काही वर्ष काँग्रेस जी वाटचाल करतोय, त्यामुळे अनेकांची घुसमट होतेय. ‘आगे आगे देखिए होता है क्या’ असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

पंकजा नेत्या राष्ट्रीय नेत्या आहेत, त्यांचं अंडरस्टँडिंग पक्कं आहे. त्यांच्या भाषणातील एक-दोन वाक्ये काढून मीडिया दाखवतो. पक्षामध्ये त्यांचा सन्मान होता, आहे आणि पुढेही राहील, असं फडणवीसांनी सांगितलं. बिहारमध्ये नेमकं काय चाललंय याची मला माहिती नाही. मी आधी भाजपचा प्रभारी होतो, आता नाही. अलिकडच्या काळात उद्धवजी जे बोलतायत, ते फार गांभीर्याने घेऊ शकत नाही. कालच मी त्यांना शुभेच्छा दिल्यात, गेट वेल सून.

The post आगे आगे देखिए, होता है क्या, देवेंद्र फडणवीसांचं सूचक वक्तव्य appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
https://dailyyashwant.com/suggestive-statement-by-devendra-fadnavis/3960/feed/ 0
अशोक चव्हाण नॉट रिचेबल, भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा https://dailyyashwant.com/ashok-chavan-is-not-reachable-will-join-bjp/3957/ https://dailyyashwant.com/ashok-chavan-is-not-reachable-will-join-bjp/3957/#respond Mon, 12 Feb 2024 07:30:10 +0000 https://dailyyashwant.com/?p=3957 राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याची चर्चा आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं समजतेय. नांदेडमधील राजकारणात तशी चर्चाही सुरु आहे. अशोक चव्हाण यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे आमदारकीचा राजीनामा दिल्याचं सुत्रांनी सांगितलेय. मागील काही वेळापासून अशोक चव्हाण यांचा फोनही नॉट रिचेबल आहेत, त्यामुळे […]

The post अशोक चव्हाण नॉट रिचेबल, भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याची चर्चा आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं समजतेय. नांदेडमधील राजकारणात तशी चर्चाही सुरु आहे. अशोक चव्हाण यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे आमदारकीचा राजीनामा दिल्याचं सुत्रांनी सांगितलेय. मागील काही वेळापासून अशोक चव्हाण यांचा फोनही नॉट रिचेबल आहेत, त्यामुळे या चर्चेला आणखी उधाण आले आहे.

मुंबई भाजपमध्ये काँग्रेसच्या नेत्याची पक्षप्रवेशाची मोठी तयारी सुरु आहे. अशोक चव्हाण यांच्यासोबत काँग्रेसमधील आणखी काही नेत्यांचाही पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे. नांदेडमधील काँग्रेसमध्ये अस्वस्थता पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पक्षप्रवेशाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, मागील काही दिवसांपासून भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसचे मोठे मासे गळाला लागतील, असे वक्तव्य केले होते.

मोठा पोलीस बंदोबस्त

भाजपा कार्यालयात हा पक्षप्रवेश पार पडणार आहे. यासाठी भाजपा प्रदेश कार्यालयाच्या बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान, हा पक्षप्रवेश आज झाला नाही, तर उद्या होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. अनिल देशमुख यांनी अशोक चव्हाण महाविकास आघाडीला सोडणार नाहीत याची मला खात्री आहे. ही अफ़वा आहे असा विश्वास व्यक्त केला आहे.

काँग्रेसचे दिग्गज भाजपच्या वाटेवर ?

अशोक चव्हाण यांच्यासह त्यांच्या स्वीय सहायाकांचाही फोन नॉट रिचेबल आहे.  14 फेब्रुवारी रोजी काँग्रेसमधील मराठवाड्यातील नेते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे समजले होते. नांदेड, धाराशिव, पश्चीम महाराष्ट्रातील मोठे काँग्रेस नेते भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याचं समोर आलेय.

काँग्रेसला मोठा धक्का –

अशोक चव्हाण यांच्यासारखा मातब्बर नेता आणि माजी मुख्यमंत्री भाजपच्या गोटात जाणे काँग्रेस पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे. गेल्याच आठवड्यात काँग्रेसच्या बाबा सिद्दीकी यांनी अजित पवार गटात प्रवेश केला होता. तर मिलिंद देवरा यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर आता अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्यास काँग्रेस पक्ष आणखी खिळखिळा होईल.

अशोक चव्हाण भाजपमध्ये जाणार, चर्चेला उधाण – 

गेल्या बऱ्याच काळापासून अशोक चव्हाण हे भाजपमध्ये जातील, अशी चर्चा होती. राज्यात झालेल्या सत्ताबदलानंतरही अशोक चव्हाण यांच्या मतदारसंघात सरकारने निधी दिला होता. याशिवाय, बऱ्याच काळापासून अशोक चव्हाण भाजपमध्ये जाण्याचा विचार करत होते, अशी चर्चा होती. राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर बहुमत चाचणीवेळी काँग्रेसचे सात आमदार सभागृहात उपस्थित नव्हते. भाजपला मदत करण्याासाठीच या आमदारांनी बहुमत चाचणीला येणे टाळल्याची चर्चा होती. यामध्ये अशोक चव्हाण यांचा समावेश होता. काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी याचा अहवाल मागवून या प्रकाराची गंभीर दखल घेतली होती. या सगळ्या घडामोडींमुळे अशोक चव्हाण भाजपमध्ये जातील, अशी अटकळ बांधली जात होती.

The post अशोक चव्हाण नॉट रिचेबल, भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
https://dailyyashwant.com/ashok-chavan-is-not-reachable-will-join-bjp/3957/feed/ 0
अख्खा देव एका व्यक्तीनं ताब्यात घेतला; मल्लिकार्जुन खरगेंचा पीएम मोदींवर कडाडून हल्लाबोल https://dailyyashwant.com/the-whole-god-was-taken-over-by-one-person-mallikarjun-kharges-pm-will-strongly-attack-modi/3687/ https://dailyyashwant.com/the-whole-god-was-taken-over-by-one-person-mallikarjun-kharges-pm-will-strongly-attack-modi/3687/#respond Sun, 21 Jan 2024 16:29:25 +0000 https://dailyyashwant.com/?p=3687 अयोध्येत उद्या सोमवारी (22 जानेवारी) होणाऱ्या रामलला प्राण प्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. आसाममधील नागाव येथे एका सभेला संबोधित करताना ते म्हणाले की, एका व्यक्तीने संपूर्ण देव ताब्यात घेतला आहे. ते म्हणाले की, “पंतप्रधान मोदी राम मंदिरात आहेत आणि रामदेव बाहेर आहेत. सर्व महत्त्वाचे लोक बाहेर आहेत. त्यांना […]

The post अख्खा देव एका व्यक्तीनं ताब्यात घेतला; मल्लिकार्जुन खरगेंचा पीएम मोदींवर कडाडून हल्लाबोल appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
अयोध्येत उद्या सोमवारी (22 जानेवारी) होणाऱ्या रामलला प्राण प्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. आसाममधील नागाव येथे एका सभेला संबोधित करताना ते म्हणाले की, एका व्यक्तीने संपूर्ण देव ताब्यात घेतला आहे. ते म्हणाले की, “पंतप्रधान मोदी राम मंदिरात आहेत आणि रामदेव बाहेर आहेत. सर्व महत्त्वाचे लोक बाहेर आहेत. त्यांना (पीएम मोदी) सर्व काही एकट्याने करायचे आहे. तुम्ही एकटेच सर्वकाही करत असाल तर इतरांकडे मते का मागता? अशी विचारणा त्यांनी केली.

हिमंता बिस्वा सरमा धर्मांतरित मुख्यमंत्री

यावेळी त्यांनी मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर राजकीय निशाणा साधला आणि त्यांना धर्मांतरित मुख्यमंत्री म्हटले. ते म्हणाले की, “आसाममध्ये जो आम्हाला सोडून भाजपमध्ये आला तो ‘नवा धर्मांतरित मुख्यमंत्री’ आहे. तो आम्हाला धमक्या देत आहे. भाजपच्या लोकांनी यात्रेवरही हल्ला केला, वाहनांच्या काचा फोडल्या आणि पोस्टर्स आणि बॅनर फाडले.”

देशातील सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री

काँग्रेस अध्यक्ष म्हणाले की, “येथील (आसाम) मुख्यमंत्री हे विसरतात की त्यांच्यावरच असंख्य घोटाळ्यांचे आरोप आहेत, त्यांच्यावर अनेक कलमांतर्गत गुन्हे दाखल आहेत. आसामचे मुख्यमंत्री हे देशातील सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री आहेत, असे राहुल गांधी बरोबर म्हणाले. ते सत्य आहे आणि जर ते स्वच्छ होत असतील तर त्यामागे फक्त मोदी आणि अमित शहा यांच्या वॉशिंग मशीनचे आश्चर्य आहे.

आम्ही इंग्रजांना घाबरलो नाही

भारत जोडो न्याय यात्रेवर झालेल्या हल्ल्याबाबत खरगे म्हणाले की, भाजपचे लोक राहुल गांधींच्या दौऱ्याला घाबरले आहेत. हे लोक जयराम रमेश यांच्या वाहनावर हल्ला करत आहेत, पण ते काँग्रेसचे सैनिक आहेत. ते घाबरत नाहीत. आमचे लोक तुरुंगात गेले. आम्ही इंग्रजांना घाबरत नाही तर भाजपला का घाबरणार?

त्यांनी सांगितले की, राहुल गांधी कन्याकुमारी ते काश्मीरला जात असताना दगडफेक झाली नाही. त्यावेळी लाखोंच्या संख्येने लोक मिरवणुकीत सहभागी झाले होते, पण आसाममध्ये हल्ला का झाला?, पंतप्रधान मोदींचे शिष्य असल्यामुळे येथे हल्ला होत आहे. तो अल्पसंख्याकांना धमकावतो. आज या देशात भाजपला प्रत्येक राज्यात दिल्लीतून सरकार चालवायचे आहे आणि एक देश, एक निवडणूक, एक विचारधारा लादायची आहे.

The post अख्खा देव एका व्यक्तीनं ताब्यात घेतला; मल्लिकार्जुन खरगेंचा पीएम मोदींवर कडाडून हल्लाबोल appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
https://dailyyashwant.com/the-whole-god-was-taken-over-by-one-person-mallikarjun-kharges-pm-will-strongly-attack-modi/3687/feed/ 0
Bad Credit Shouldn’t Affect Health Insurance, Experts Say https://dailyyashwant.com/bad-credit-shouldnt-affect-health-insurance-experts-say/1508/ https://dailyyashwant.com/bad-credit-shouldnt-affect-health-insurance-experts-say/1508/#respond Sun, 19 Sep 2021 09:53:46 +0000 https://foxiz.themeruby.com/default/?p=52 Good web design has visual weight, is optimized for various devices, and has content that is prioritized for the medium. The most important elements of a web page should have more visual weight to “naturally attract” a visitor’s attention. Good design is making something intelligible and memorable. Great design is making something memorable and meaningful. […]

The post Bad Credit Shouldn’t Affect Health Insurance, Experts Say appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
Good web design has visual weight, is optimized for various devices, and has content that is prioritized for the medium. The most important elements of a web page should have more visual weight to “naturally attract” a visitor’s attention.

Good design is making something intelligible and memorable. Great design is making something memorable and meaningful.

Dieter Rams

Most users search for something interesting (or useful) and clickable; as soon as some promising candidates are found, users click. If the new page doesn’t meet users’ expectations, the back button is clicked and the search process is continued.

A good website should be easy to navigate

Not all websites are made equal. Some websites are simple, logical, and easy to use. Others are a messy hodgepodge of pages and links.

How are innovations in robotics changing the way we perceive the world?

Without website navigation, your visitors can’t figure out how to find your blog, your email signup page, your product listings, pricing, contact information, or help docs.

Quick and easy access to the content they’re after is more important for your website users than a… visually-stunning design.

Creating visual rhythms in your layouts

In design, rhythm is created by simply repeating elements in predictable patterns. This repetition is a natural thing that occurs everywhere in our world. As people, we are driven everyday by predictable, timed events.

Why does Bluetooth use lossy rather than lossless compression

One of the best ways to use repetition and rhythm in web design is in the site’s navigation menu. A consistent, easy-to-follow pattern—in color, layout, etc. Gives users an intuitive roadmap to everything you want to share on your site.

Elements that can help website visual composition

Nobody enjoys looking at an ugly web page. Garish colors, cluttered images and distracting animation can all turn customers “off” and send them shopping “somewhere else”. Basic composition rules to create more effective:

  • Direct the Eye With Leading Lines
  • Balance Out Your Elements
  • Use Elements That Complement Each Other
  • Be clear about your “focal points” and where you place them

Diving into UX and UI design

UX and UI: Two terms that are often used interchangeably, but actually mean very different things. So what exactly is the difference?

Styles come and go. Good design is a language, not a style.

Massimo Vignelli

UX design refers to the term “user experience design”, while UI stands for “user interface design. Both elements are crucial to a product and work closely together. But despite their relationship, the roles themselves are quite different.

Breaking down the barriers

Design is not the end-all solution to all of the worlds problems — but with the right thinking and application, it can definitely be a good beginning to start tackling them.

The post Bad Credit Shouldn’t Affect Health Insurance, Experts Say appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
https://dailyyashwant.com/bad-credit-shouldnt-affect-health-insurance-experts-say/1508/feed/ 0