congres party Archives - Dainik Yashwant, Latur https://dailyyashwant.com/tag/congres-party/ Online Portal Mon, 12 Feb 2024 13:53:59 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.4 काल काँग्रेसच्या बैठकीला हजर, उद्याही येतो म्हणून सांगितलं आणि… https://dailyyashwant.com/attended-congress-meeting-yesterday-said-to-come-tomorrow-too-and/3994/ https://dailyyashwant.com/attended-congress-meeting-yesterday-said-to-come-tomorrow-too-and/3994/#respond Mon, 12 Feb 2024 13:53:59 +0000 https://dailyyashwant.com/?p=3994 कालपर्यंत लोकसभेच्या जागावाटपाला उपस्थित राहणारे अशोक चव्हाण आज अचानक पक्ष कसा काय सोडतात? याचं आम्हाला आश्चर्य वाटत असल्याचं सांगत अशोक चव्हाण यांच्या कालच्या संपूर्ण दिवसभराचा दिनक्रम काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितला. आज सकाळी राजीनामा दिल्यानंतर अशोक चव्हाण यांनी दुपारच्या सुमारास प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. भाजपप्रवेशाचा निर्णय आणखी मी घेतलेला नाही. माझ्या पुढील राजकीय निर्णयासाठी […]

The post काल काँग्रेसच्या बैठकीला हजर, उद्याही येतो म्हणून सांगितलं आणि… appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
कालपर्यंत लोकसभेच्या जागावाटपाला उपस्थित राहणारे अशोक चव्हाण आज अचानक पक्ष कसा काय सोडतात? याचं आम्हाला आश्चर्य वाटत असल्याचं सांगत अशोक चव्हाण यांच्या कालच्या संपूर्ण दिवसभराचा दिनक्रम काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितला.

आज सकाळी राजीनामा दिल्यानंतर अशोक चव्हाण यांनी दुपारच्या सुमारास प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. भाजपप्रवेशाचा निर्णय आणखी मी घेतलेला नाही. माझ्या पुढील राजकीय निर्णयासाठी २ ते ३ दिवसांचा अवधी लागेल, असं त्यांनी सांगितलं. विशेष म्हणजे गृहमंत्री अमित शाह १५ तारखेला महाराष्ट्र दौऱ्यावर येतायेत. त्याचवेळी अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी अटकळ बांधली जातीये. अशोक चव्हाण यांच्या पत्रकार परिषदेनंतर पृथ्वीराजबाबांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांचा निर्णय निश्चित वेदनादायी असल्याच्या भावना व्यक्त केल्या.

अशोक चव्हाण यांनी अजून तरी त्यांची पुढची भूमिका स्पष्ट केलेली नाही. जन्मापासून काँग्रेस पक्षात काम केल्याचं सांगत होते. पक्षासाठी काम केल्याचा उल्लेख त्यांनी केला. परंतु पक्षानेही त्यांच्यासाठी खूप काही केलं. त्यांच्या राजीनाम्याचं वृत्त खरोखर वेदनादायी आहे.

कालच आमचे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला आले होते. त्या बैठकीत राज्यसभेच्या दृष्टीने रणनीती आणि लोकसभेच्या जागा वाटपावर चर्चा झाली. ते ही उपस्थित होते. संध्याकाळी ४ पर्यंत ते आमच्यासोबत होते. त्यावेळी त्यांच्या डोक्यात असं काही सुरू असेल याची आम्हाला कल्पना नव्हती. जाताना ते बाळासाहेब थोरात यांना सांगून गेले की उद्या सकाळी ११ वाजता पुन्हा बसून आपण चर्चा करू. काँग्रेस वाटपाच्या जागावाटपात त्यांची महत्त्वाची भूमिका होती. काँग्रेस पक्षाने त्यांच्यावर प्रचंड मोठी जबाबदारी टाकली होती. मविआमध्ये ज्येष्ठ मंत्री म्हणून काम करत होते. त्यांनी हा निर्णय का घेतला? इतरांनी निर्णय का घेतला, हे आपल्याला माहिती आहे, त्यांनी भूमिका स्पष्ट केली नाही, पण दिशा स्पष्ट आहे. भाजपकडूनही त्यांच्याबद्दलचे संकेत मिळत होते.

The post काल काँग्रेसच्या बैठकीला हजर, उद्याही येतो म्हणून सांगितलं आणि… appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
https://dailyyashwant.com/attended-congress-meeting-yesterday-said-to-come-tomorrow-too-and/3994/feed/ 0