Cold Wave in India Archives - Dainik Yashwant, Latur https://dailyyashwant.com/tag/cold-wave-in-india/ Online Portal Sat, 20 Jan 2024 05:25:22 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.4 थंडीचा जोर वाढला! मुंबई, पुण्यासह उत्तर भारतात तापमानात घट https://dailyyashwant.com/the-force-of-the-cold-increased-temperature-drop-in-north-india-including-mumbai-pune/3642/ https://dailyyashwant.com/the-force-of-the-cold-increased-temperature-drop-in-north-india-including-mumbai-pune/3642/#respond Sat, 20 Jan 2024 02:20:51 +0000 https://dailyyashwant.com/?p=3642 सध्या देशातील तापमानात घट झाली असून मुंबई, ठाणे, कोकणात गारठा वाढला आहे. उत्तर भारतात थंडीची लाट कायम आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) असाही अंदाज वर्तवला आहे की पुढील चार दिवसांत उत्तर भारतात दाट ते दाट धुके आणि थंड दिवस ते तीव्र थंड दिवसाची स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. पुढील चार दिवसांत तीव्र थंडीची लाट उत्तर-पश्चिम भारतातील […]

The post थंडीचा जोर वाढला! मुंबई, पुण्यासह उत्तर भारतात तापमानात घट appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
सध्या देशातील तापमानात घट झाली असून मुंबई, ठाणे, कोकणात गारठा वाढला आहे. उत्तर भारतात थंडीची लाट कायम आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) असाही अंदाज वर्तवला आहे की पुढील चार दिवसांत उत्तर भारतात दाट ते दाट धुके आणि थंड दिवस ते तीव्र थंड दिवसाची स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.

पुढील चार दिवसांत तीव्र थंडीची लाट

उत्तर-पश्चिम भारतातील मैदानी भागात पुढील चार दिवसांत तीव्र थंडीची लाट कायम राहण्याची शक्यता आहे, असे हवामान खात्याने म्हटले आहे. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) हवामान अंदाजानुसार, उत्तर भारतातील लोकांना पुढील 2 दिवसांमध्ये धुके आणि थंड दिवसाची स्थिती कायम राहील.

थंडीची लाट कायम राहण्याची शक्यता

दरम्यान, पंजाब आणि हरियाणा-चंदीगडमध्ये तीव्र थंडीची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. पंजाब, हरियाणा आणि चंदीगडमध्ये 20 आणि 21 जानेवारी रोजी थंडीची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. हिमाचल प्रदेश, पश्चिम उत्तर प्रदेशात 20 आणि 21 जानेवारीला आणि उत्तर राजस्थानवर 20 ते 21 जानेवारी 2024 दरम्यान थंडीची लाट येण्याची शक्यता आहे, असा अंदाज आययएमडीने वर्तवला आहे.

22 जानेवारीपर्यंत थंडी राहण्याची शक्यता

बांगलादेशावर चक्रीवादळाचे क्षेत्र 3.1 किमीपर्यंत पसरलं आहे. त्याचप्रमाणे दक्षिणेकडील भागात कर्नाटक ते पूर्व विदर्भापर्यंत कमी दाबाचे क्षेत्र पसरले आहे. येत्या पाच दिवसांत पुन्हा ढग दाटून येण्याची शक्यता आहे. डोंगराळ भागात झालेल्या बर्फवृष्टीचा परिणाम मैदानी भागात कडाक्याच्या थंडीच्या रूपाने दिसून येत आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, 18 जानेवारीला गेल्या दोन वर्षांतील या वेळेपेक्षा जास्त थंडीची नोंद झाली. 22 जानेवारीपर्यंत अशीच थंडी राहण्याची शक्यता आहे.

व्हायरल रोगांचा वाढता धोका

वातावरणातील वाढत्या प्रदूषणामुळे व्हायरल इन्फेक्शन आणि तापाचे रुग्ण वाढत आहेत. व्हायरल इन्फेक्शनमुळे रुग्णांना त्यांच्या श्‍वसनसंस्थेत समस्या येत आहेत. तसेच हृदयविकाराच्या झटका येणाच्या रुग्णांचे प्रमाण वाढताना दिसत आहे.

The post थंडीचा जोर वाढला! मुंबई, पुण्यासह उत्तर भारतात तापमानात घट appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
https://dailyyashwant.com/the-force-of-the-cold-increased-temperature-drop-in-north-india-including-mumbai-pune/3642/feed/ 0