CM Eknath Shinde Archives - Dainik Yashwant, Latur https://dailyyashwant.com/tag/cm-eknath-shinde/ Online Portal Thu, 25 Jan 2024 02:05:40 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.4 मनोज जरांगेंचं काळजात धडकी भरवणारे भगवं वादळ लोणावळ्यात https://dailyyashwant.com/manoj-jarages-morcha-reaches-lonavala/3757/ https://dailyyashwant.com/manoj-jarages-morcha-reaches-lonavala/3757/#respond Thu, 25 Jan 2024 02:05:40 +0000 https://dailyyashwant.com/?p=3757 मुंबई: मराठा आरक्षणासाठी   मराठा आंदोलक मनोज जरांगे मुंबईच्या दिशेने निघाले  आहेत. लवकरच मराठ्यांचं वादळ मुंबईत धडकणार आहे. जरांगेंच्या  आंदोलनात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक जोडले जात आहेत. त्यामुळे सरकारची डोकेदुखी वाढलीये. त्यामुळे मराठ्यांचं वादळ थोपवण्यासाठी सरकारचेही प्रयत्न सुरु आहेत. मराठा बांधवाची गर्दी पाहता आज पावणे सात वाजता मराठा मोर्चा  लोणावळ्यात पोहचणार आहे. आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक […]

The post मनोज जरांगेंचं काळजात धडकी भरवणारे भगवं वादळ लोणावळ्यात appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
मुंबई: मराठा आरक्षणासाठी   मराठा आंदोलक मनोज जरांगे मुंबईच्या दिशेने निघाले  आहेत. लवकरच मराठ्यांचं वादळ मुंबईत धडकणार आहे. जरांगेंच्या  आंदोलनात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक जोडले जात आहेत. त्यामुळे सरकारची डोकेदुखी वाढलीये. त्यामुळे मराठ्यांचं वादळ थोपवण्यासाठी सरकारचेही प्रयत्न सुरु आहेत. मराठा बांधवाची गर्दी पाहता आज पावणे सात वाजता मराठा मोर्चा  लोणावळ्यात पोहचणार आहे. आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक असल्याने जरांगेंनी आंदोलन थांबवावं असं आवाहन मुख्यमंत्री शिंदेंनी  केलंय.

मराठा बांधव माझ्यासाठी गेले अनेक तास रस्त्यावर थांबले आहेत यांना भेटल्याशिवाय मी जाऊ शकत नाही. हे लोकच माझी ताकत आहे. आतापर्यंत माझ्यासोबत या मोर्चामध्ये जवळपास 70 ते 80 लाख लोक आहेत. मोजता येणार नाहीत अशा पद्धतीने मराठा बांधव या मोर्चात सहभागी होत आहेत.26 तारखेला आम्ही मुंबईला पोहोचणार आहे. आता जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही. न्यायालयात जाण्याचा अधिकार आम्हालाही आहे.  आमचे वकील आमची बाजू मांडतील. कोणत्याही नियमांचे उल्लंघन केलेला नाही. आम्हाला न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे, असे मनोज जरांगे एबीपी माझाशी बोलताना म्हणाले.  मनोज जरांगेंच्या मोर्चाविरोधात सदावर्तेंनी केलेल्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पार पडली .हायकोर्टाने जरांगेंना नोटीसही बजावली आहे.

मुंबईत धडकणार, वादळ घोंगावणार 

मुंबईत पोहोचेपर्यंत तीन कोटी लोक सहभागी होण्याचा दावा करण्यात येत आहे. ट्रॅक्टर, इतर वाहनं आल्यास अडचणीची धास्ती आहे.26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क आहे. मुंबईत लोकल, वाहतुकीवर परिणामांची शक्यता आहे. कायदा-सुव्यवस्था, सामाजिक शांतता भंगण्याची भीती आहे. महत्त्वाचं म्हणजे, हेच मुद्दे उपस्थित करत गुणरत्न सदावर्तेंनी कोर्टाचं दार ठोठावलं.. यावेळी कोर्टाने कायदा आणि सुव्यस्था राखणं ही राज्य  सरकारची जबाबदारी आहे, अशी टिप्पणी करत  जरांगेंना नोटीस बजावली आहे.

मुंबापुरीची धावपळ जरांगेंच्या आंदोलनामुळे थबकणार 

एकीकडे सरकारकडून जरांगेंशी चर्चा सुरू असताना दुसरीकडे सरकारचे महाधिवक्ता बीरेंद्र सराफ यांनी मात्र जरांगेवर कारवाई करण्याचे संकेत दिलेत. जरांगेंच्या वाटेवर सरकार वाटाघाटी करतंय आणि सोबतच कोर्टात जरांगेंवर कारवाईचे संकेतही देतंय. त्यामुळे, ज्या वेगाने मनोज जरांगे लाखो लोकांना घेऊन मुंबईकडे झेपावतायत, तितक्याच वेगाने सरकारचीही धावपळ सुरू झालीय.म्हणूनच, घड्याळाच्या काट्यांना आणि कॅलेंडरच्या आकड्यांना टांगलेल्या मुंबापुरीची धावपळ जरांगेंच्या आंदोलनामुळे थबकते की त्याआधीच सरकार तोडग्याची वेळ साधतंय, हेच पाहणं महत्त्वाचं आहे.

The post मनोज जरांगेंचं काळजात धडकी भरवणारे भगवं वादळ लोणावळ्यात appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
https://dailyyashwant.com/manoj-jarages-morcha-reaches-lonavala/3757/feed/ 0
‘मराठे एवढे खालच्या पातळीचे नाहीत’ – मनोज जरांगे पाटील https://dailyyashwant.com/marathas-are-not-that-low-level-manoj-jarange-patil/2589/ https://dailyyashwant.com/marathas-are-not-that-low-level-manoj-jarange-patil/2589/#respond Tue, 31 Oct 2023 06:46:39 +0000 https://dailyyashwant.com/?p=2589 जालना :    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे   यांनी आज सकाळी मनोज जरांगे यांच्याशी फोनवरून संवाद साधला.  त्यावेळी जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. अर्धा तास झालेल्या चर्चात कुणबी प्रमाणपत्र, विशेष अधिवेशन अशा विविध मुद्द्यांवर चर्चा झाली.  मराठे एवढे खालच्या पातळीचे नाहीत  नोंदीनुसार अहवाल स्वीकारणार नाही. आपण अर्धवट आरक्षण घेणार नाही, असे मनोज जरांगेनी मुख्यमंत्र्यांना सांगितले आहे. जालन्यातील […]

The post ‘मराठे एवढे खालच्या पातळीचे नाहीत’ – मनोज जरांगे पाटील appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
जालना :    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे   यांनी आज सकाळी मनोज जरांगे यांच्याशी फोनवरून संवाद साधला.  त्यावेळी जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. अर्धा तास झालेल्या चर्चात कुणबी प्रमाणपत्र, विशेष अधिवेशन अशा विविध मुद्द्यांवर चर्चा झाली.  मराठे एवढे खालच्या पातळीचे नाहीत  नोंदीनुसार अहवाल स्वीकारणार नाही. आपण अर्धवट आरक्षण घेणार नाही, असे मनोज जरांगेनी मुख्यमंत्र्यांना सांगितले आहे. जालन्यातील आंदोलनस्थळावर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आरक्षणाबाबत चर्चा झाली. मनोज जरांगे म्हणाले,  आपण त्यांना स्पष्टपणे सांगितले, नोंदीनुसार अहवाल स्वीकारणार नाही.आपण अर्धवट आरक्षण घेणार नाही, हे त्यांना स्पष्ट सांगितले. आम्ही अभ्यासकांची बैठक बोलावली आहे. मराठा आणि कुणबी एकच असल्याचा 2004 चा GR दुरुस्त करा. शेतीच्या आधारावरच आरक्षण दिलेले आहे. कितीही बहाणे सांगितले तरी आम्ही ऐकणार नाहीत. समितीकडे भरपूर पुरावे आहेत. सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे. 60 -65 टक्के मराठा समाज अगोदरच obc मध्ये आहे,  आम्ही थोडे राहिलेलो आहोत. विशेष अधिवेशन घ्या. ज्याचा कुणबी प्रमाणपत्राला विरोध आहे त्यांनी घेऊ नका. शेतीची लाज वाटण्याएवढे मराठे खालच्या पातळीवर नाहीत. मराठवड्यात कागदपत्रे जमा करा आणि सर्व महराष्ट्राला आरक्षण द्या. विशेष अधिवेशन घ्या,समितीचा प्रथम अहवाल स्वीकारून तिला राज्याचा दर्जा द्या.

मराठा समाजाला जरांगेंचे आवाहन 

कालपासून मी पाणी पितोय, मी पाणी पिल्यानंतर समाज शांत होणार असेल तर मी पाणी पिणार. मी पुन्हा सांगतो उद्रेक करू नका, आत्महत्या करू नका. खांद्याला खांदा लावून लढा. पाण्यामुळे तब्येत चांगली झालीय, उठून बसलोय. सगळीकडे शांततेत उपोषण सुरू आहे.आमरण उपोषण जसे सहन होईल तसे करा, मात्र साखळी उपोषण सुरू ठेवा, असे आवाहन त्यांनी समाजाला केले आहे.

आमदार, खासदारांनी मुंबईतच राहा, राजीनामे थांबवा 

राज्यात सुरू असलेल्या राजीनामा सत्रार मनोज जरांगेंनी भाष्य केले आहे. जरांगे म्हणाले,  सर्वांनी मुंबईत जाऊन आवाज उठवा असे म्हटले होते.  बहुतेक आमदार मुंबईकडे गेलेत,  राजीनामा देण्याचं कळत नाही. सर्व आमदार खासदार मुंबईतच राहा. राजीनामा दिल्याने काय फायदा होतो कळत नाही पण सर्वांनी मुंबई सोडायची नाही.

राज्यात मराठा आंदोलनाला काही ठिकाणी हिंसक वळण लागले आहे. त्याविषयी देखील मनोज जरांगेनी वक्तव्य केले आहे. मराठा समाजाने संयम राखावा, थोडं टप्प्या टप्प्यात होऊ द्या, बंदचा विचार तूर्तास करू नये, असे देखील जरांगे यावेळी म्हणाले.

बस बंद करायला कोणी सांगितले 

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना येथे सुरू असलेल्या आंदोलनाची झळ राज्यभर जाणवू लागली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे.अनेक ठिकाणी बसच्या जाळपोळ झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने बस  बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. याविषयी बोलताना जरांगे म्हणाले,  बस बंद करायला कोणी सांगितले. ST महामंडळवाले  खूप घाबरतात. एसटीवाले खूप कलाकार आहेत. डोके आमचे फुटले आणि बस बंद होते

The post ‘मराठे एवढे खालच्या पातळीचे नाहीत’ – मनोज जरांगे पाटील appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
https://dailyyashwant.com/marathas-are-not-that-low-level-manoj-jarange-patil/2589/feed/ 0