bjp Archives - Dainik Yashwant, Latur https://dailyyashwant.com/tag/bjp/ Online Portal Tue, 13 Feb 2024 08:56:28 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.4 काहीही केलं तरी भाजप यशस्वी होणार नाही – प्रकाश आंबेडकर https://dailyyashwant.com/bjp-will-not-succeed-no-matter-what-prakash-ambedkar/4033/ https://dailyyashwant.com/bjp-will-not-succeed-no-matter-what-prakash-ambedkar/4033/#respond Tue, 13 Feb 2024 08:38:18 +0000 https://dailyyashwant.com/?p=4033 भाजपने या नेत्याला घ्या, त्या नेत्याला घ्या…, हा पक्ष फोडा, तो पक्ष फोडा… असे कितीही प्रयत्न केले तरी भाजप राज्यात यशस्वी होणार नाही,’ असा दावा वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला. त्याचवेळी भाजपच्या पायाखालील वाळू सरकल्याने भाजप राजकीय व्यक्तींसह अराजकीय व्यक्तींवरही कारवाई करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कोरेगाव भीमा चौकशी आयोगापुढे […]

The post काहीही केलं तरी भाजप यशस्वी होणार नाही – प्रकाश आंबेडकर appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
भाजपने या नेत्याला घ्या, त्या नेत्याला घ्या…, हा पक्ष फोडा, तो पक्ष फोडा… असे कितीही प्रयत्न केले तरी भाजप राज्यात यशस्वी होणार नाही,’ असा दावा वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला. त्याचवेळी भाजपच्या पायाखालील वाळू सरकल्याने भाजप राजकीय व्यक्तींसह अराजकीय व्यक्तींवरही कारवाई करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कोरेगाव भीमा चौकशी आयोगापुढे सुनावणीसाठी प्रकाश आंबेडकर पुण्यात आले होते. सुनावणीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या वेळी त्यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केले. ‘कोणताही नेता कोणत्याही पक्षातून दुसऱ्या पक्षात गेल्यावर फार फरक पडत नाही. पक्ष हा कायम राहतो, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे काँग्रेसवर फार परिणाम होईल असे वाटत नाही,’ असे आंबेडकर यांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यावर बोलताना स्पष्ट केले.

‘चारशेच्या पुढे जाऊ असा दावा भाजप करीत असला, तरी त्यामागे भीती आहे. अशीच भीती निर्माण करण्यासाठी राजकीय; तसेच अराजकीय व्यापारी, मत नोंदवू शकणाऱ्या व्यक्तींवरही ते धाडी घालत आहेत,’ अशा शब्दांत आंबेडकर यांनी भाजपला लक्ष्य केले. ‘भाजप ही भयग्रस्त झाली आहे,’ अशीही टीका त्यांनी केली.

‘ओबीसी संघटनांनी राजकीय पक्ष काढण्याचे आवाहन केले आहे. ओबीसी संघटनांचे छगन भुजबळ यांनी नेतृत्व करावे. त्यांनी सरकारमधून बाहेर पडून स्वतंत्र पक्ष स्थापन करून नेतृत्व केल्यास आम्ही त्यांना मदत करू. ओबीसींचे आरक्षण राखण्यासाठी भुजबळ काय पावले उचलतात हे पाहू. आम्ही त्यांना पाठिंबा दिला आहे,’ असे आंबेडकर म्हणाले.

The post काहीही केलं तरी भाजप यशस्वी होणार नाही – प्रकाश आंबेडकर appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
https://dailyyashwant.com/bjp-will-not-succeed-no-matter-what-prakash-ambedkar/4033/feed/ 0
देवेंद्र फडणवीस सांगतील त्याप्रमाणं काम करणार: अशोक चव्हाण https://dailyyashwant.com/i-will-work-as-devendra-fadanvis-says-to-me-ashok-chavan/4031/ https://dailyyashwant.com/i-will-work-as-devendra-fadanvis-says-to-me-ashok-chavan/4031/#respond Tue, 13 Feb 2024 08:26:42 +0000 https://dailyyashwant.com/?p=4031 नरेंद्र मोदींकडून प्रेरणा घेऊन देशाच्या आणि राज्याच्या विकासात योगदान देता यावं यासाठी हा निर्णय घेतला आहे, असं चव्हाण म्हणाले.  अशोक चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, पक्षाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचे आभार मानतो, असं म्हटलं. मी जिथं होतो तिथं प्रामाणिकपणे काम केलेलं आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर प्रामाणिकपणे काम करण्याची ग्वाही देणार आहे. आगामी […]

The post देवेंद्र फडणवीस सांगतील त्याप्रमाणं काम करणार: अशोक चव्हाण appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
नरेंद्र मोदींकडून प्रेरणा घेऊन देशाच्या आणि राज्याच्या विकासात योगदान देता यावं यासाठी हा निर्णय घेतला आहे, असं चव्हाण म्हणाले.  अशोक चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, पक्षाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचे आभार मानतो, असं म्हटलं. मी जिथं होतो तिथं प्रामाणिकपणे काम केलेलं आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर प्रामाणिकपणे काम करण्याची ग्वाही देणार आहे. आगामी निवडणुकीत भाजपला जास्तीत जास्त जागा मिळतील यासाठी प्रयत्न करणार आहे. राजकारण हे सेवेचं माध्यम आहे. मी कुणावरही टीका करणार नाही, असं अशोक चव्हाण म्हणाले.

मी पक्ष सोडल्यानंतर कोणावरही टीका करणार नाही. नरेंद्र मोदी यांनी सबका साथ सबका विकास हा मंत्र घेऊन देशात विकासाचं काम केलं आहे. त्यांच्या कामानं प्रभावित झालेलो आहे. विरोधी पक्षात असताना सरकारनं जे चांगलं काम केलेलं असेल तर त्याचं कौतुक केलं पाहिजे. महाराष्ट्राची एक वेगळी राजकीय संस्कृती राहिलेली, असं अशोक चव्हाण म्हणाले.

The post देवेंद्र फडणवीस सांगतील त्याप्रमाणं काम करणार: अशोक चव्हाण appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
https://dailyyashwant.com/i-will-work-as-devendra-fadanvis-says-to-me-ashok-chavan/4031/feed/ 0
आजपासून नव्या राजकीय प्रवासाला सुरुवात करतोय, भाजपमध्ये जातोय: अशोक चव्हाण https://dailyyashwant.com/starting-a-new-political-journey-from-today-joining-bjp-ashok-chavan/4017/ https://dailyyashwant.com/starting-a-new-political-journey-from-today-joining-bjp-ashok-chavan/4017/#respond Tue, 13 Feb 2024 06:34:42 +0000 https://dailyyashwant.com/?p=4017 आजपासून मी माझ्या राजकीय आयुष्याची पुनश्च: नव्याने सुरुवात करत आहे. आज मी रितसर भाजपमध्ये प्रवेश करणार आहे, असे वक्तव्य राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केले. ते  मंगळवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. भाजपमध्ये पक्षप्रवेश करण्यापूर्वी घरातून निघताना अशोक चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, […]

The post आजपासून नव्या राजकीय प्रवासाला सुरुवात करतोय, भाजपमध्ये जातोय: अशोक चव्हाण appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
आजपासून मी माझ्या राजकीय आयुष्याची पुनश्च: नव्याने सुरुवात करत आहे. आज मी रितसर भाजपमध्ये प्रवेश करणार आहे, असे वक्तव्य राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केले. ते  मंगळवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. भाजपमध्ये पक्षप्रवेश करण्यापूर्वी घरातून निघताना अशोक चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट केले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांच्या उपस्थितीत मी आज भाजपमध्ये प्रवेश करेन. भाजपच्या प्रदेश कार्यालयात अन्य काही  जिल्ह्यातील संभाव्य लोकांचे पक्षप्रवेश होतील. मात्र, मी आज काँग्रेसच्या कोणत्याही आमदाराला माझ्यासोबत येण्यासाठी निमंत्रण दिलेले नाही, असे चव्हाण यांनी सांगितले. यावेळी चव्हाण यांना आज तुम्ही सत्यसाईबाबांची पूजा करताना काय मागितले, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अशोक चव्हाणांनी सांगितले की, मी घरातून बाहेर पडताना नेहमीच पूजा करतो. ही माझी रोजची सवय आहे. चांगल्या कामासाठी बाहेर पडताना ईश्वराचा आशीर्वाद घ्यायचा ही माझी नेहमीची पद्धत आहे, असे अशोक चव्हाण यांनी सांगितले.

अशोक चव्हाणांना भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी?

अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना राज्यसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. चव्हाणांच्या पक्षप्रवेशानंतर भाजपकडून लगेचच राज्यसभा उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल. अशोक चव्हाण यांच्यासोबत आज राजूरकर वगळता अन्य कोणताही विद्यमान आमदार भाजपमध्ये जाणार नाही. मात्र, राज्यसभा निवडणुकीत भाजपने चौथा उमेदवार उभा केल्यास अशोक चव्हाण गटातील काँग्रेस आमदारांकडून क्रॉस व्होटिंग होण्याची दाट शक्यता आहे. अनेक काँग्रेस आमदारांनी अशोक चव्हाण यांना फोन करुन आम्ही तुमच्यासोबत असल्याचे सांगितले. परंतु, तुर्तास आम्हाला पक्षांतरबंदी कायद्यामुळे तुमच्यासोबत भाजपमध्ये येता येणार नाही. आम्ही योग्यवेळी तुमच्यासोबत येऊ, असे या काँग्रेस आमदारांनी अशोक चव्हाण यांना सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

The post आजपासून नव्या राजकीय प्रवासाला सुरुवात करतोय, भाजपमध्ये जातोय: अशोक चव्हाण appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
https://dailyyashwant.com/starting-a-new-political-journey-from-today-joining-bjp-ashok-chavan/4017/feed/ 0
15 फेब्रुवारीच्या मुहूर्तावर अमित शाहांच्या उपस्थितीत अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार, केंद्रात मोठं पद मिळण्याची शक्यता https://dailyyashwant.com/ashok-chavan-will-join-the-bjp-in-the-presence-of-amit-shah-on-february-15/3969/ https://dailyyashwant.com/ashok-chavan-will-join-the-bjp-in-the-presence-of-amit-shah-on-february-15/3969/#respond Mon, 12 Feb 2024 09:00:04 +0000 https://dailyyashwant.com/?p=3969 मुंबई: राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे बडे नेते अशोक चव्हाणांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्याने राज्यात राजकीय भूकंप झाल्याचं चित्र आहे. अशोक चव्हाण आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह  यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. अमित शाह हे 15 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून त्यावेळी अशोक चव्हाण हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. अशोक चव्हाणांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा […]

The post 15 फेब्रुवारीच्या मुहूर्तावर अमित शाहांच्या उपस्थितीत अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार, केंद्रात मोठं पद मिळण्याची शक्यता appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
मुंबई: राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे बडे नेते अशोक चव्हाणांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्याने राज्यात राजकीय भूकंप झाल्याचं चित्र आहे. अशोक चव्हाण आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह  यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. अमित शाह हे 15 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून त्यावेळी अशोक चव्हाण हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

अशोक चव्हाणांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून ट्विटरच्या माध्यामातून ही माहिती दिली. तसेच भोकर विधानसभेच्या आमदारकीचाही त्यांनी राजीनामा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडे सोपवल्याचं सांगितलं.

गेल्या आठवड्यात अमित शाहांची भेट घेतली

गेल्या आठवड्यात अशोक चव्हाण यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे. त्याचवेळी राजीनामा देण्याविषयी चर्चा झाली. त्यानंतर आता अशोक चव्हाणांनी आपला राजीनामा दिला आहे. केंद्रीय नेतृत्वाच्या उपस्थितीत आपला पक्षप्रवेश व्हावा अशी इच्छा अशोक चव्हाण यांनी व्यक्त केल्याची माहिती आहे. त्यामुळे येत्या 15 फेब्रुवारी रोजी अमित शाह हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असताना अशोक चव्हाण यांचा भाजप प्रवेश होणार असल्याची माहिती आहे.

केंद्रात मोठं पद मिळण्याची शक्यता 

राज्यात मुख्यमंत्री राहिलेल्या अशोक चव्हाण यांना भाजप प्रवेश केल्यानंतर त्यांना केंद्रात मोठं पद मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यासाठी त्यांना राज्यसभेवर घेतलं जाणार असल्याची चर्चाही आहे. त्याचमुळे त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला.

महाराष्ट्र काँग्रेसमध्ये भूकंप

अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठा भूकंप झाल्याचं दिसतंय. त्यांच्यासोबत काही आमदार भाजपमध्ये जाणार आहेत. विधानपरिषदेचे माजी आमदार अमर राजूरकर यांनीही काँग्रेसच्या पदाचा राजीनामा दिला आहे. अमर राजूरकर हे अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय आहेत. त्याचवेळी मुंबई काँग्रेसमध्येही अस्वस्थता असल्याचं काँग्रेस नेते भाई जगताप यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्याची चर्चाही होतेय.

The post 15 फेब्रुवारीच्या मुहूर्तावर अमित शाहांच्या उपस्थितीत अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार, केंद्रात मोठं पद मिळण्याची शक्यता appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
https://dailyyashwant.com/ashok-chavan-will-join-the-bjp-in-the-presence-of-amit-shah-on-february-15/3969/feed/ 0
आगे आगे देखिए, होता है क्या, देवेंद्र फडणवीसांचं सूचक वक्तव्य https://dailyyashwant.com/suggestive-statement-by-devendra-fadnavis/3960/ https://dailyyashwant.com/suggestive-statement-by-devendra-fadnavis/3960/#respond Mon, 12 Feb 2024 07:43:31 +0000 https://dailyyashwant.com/?p=3960 अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं वक्तव्य केले आहे. काँग्रेसमधील अनेक नेते आमच्या संपर्कात आहेत, असं सूचक वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. देवेंद्र फडणवीस काँग्रेसमधील अनेक दिग्गज नेते संपर्कात असल्याचं समोर आले आहे. अशोक चव्हाण भाजपमध्ये येत आहेत, हे तुमच्याकडूनच ऐकतोय. पण काँग्रेसचे अनेक नेते संपर्कात […]

The post आगे आगे देखिए, होता है क्या, देवेंद्र फडणवीसांचं सूचक वक्तव्य appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं वक्तव्य केले आहे. काँग्रेसमधील अनेक नेते आमच्या संपर्कात आहेत, असं सूचक वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. देवेंद्र फडणवीस काँग्रेसमधील अनेक दिग्गज नेते संपर्कात असल्याचं समोर आले आहे.

अशोक चव्हाण भाजपमध्ये येत आहेत, हे तुमच्याकडूनच ऐकतोय. पण काँग्रेसचे अनेक नेते संपर्कात आहेत. गेली काही वर्ष काँग्रेस जी वाटचाल करतोय, त्यामुळे अनेकांची घुसमट होतेय, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
भाजपसोबत अनेक पक्षातील बडे नेते येण्यासाठी इच्छुक आहेत. विशेषत: काँग्रेसमधील अनेक नेते आमच्या संपर्कात आहेत. काँग्रेसमधील गटबाजी आणि अंतर्गत राजकारणाला नेते कंटाळले आहेत. काँग्रेसमधील मुस्कटदाबी आणि मोदींच्या नेतृत्त्वातील भारताची प्रगती पाहता, अनेक नेत्यांना वाटतं की मुख्य प्रवाहात यायला हवं. त्यामुळे आमच्या कोण कोण संपर्कात आहेत, भाजपमध्ये कोण कोण येणार याबाबत मी इतकंच सांगेन, आगे आगे देखीए, होता है क्या!

महाविकास आघाडीतील सगळ्याच पक्षातील नेते आमच्या संपर्कात आहेत. काही लोकांना यायचं आहे, ते येत आहेत. मोदींजीसोबत, भाजपसोबत यायला हवं, ही त्यांची भावना झालेली आहे. काँग्रेसचे अनेक नेते संपर्कात आहेत. गेली काही वर्ष काँग्रेस जी वाटचाल करतोय, त्यामुळे अनेकांची घुसमट होतेय. ‘आगे आगे देखिए होता है क्या’ असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

पंकजा नेत्या राष्ट्रीय नेत्या आहेत, त्यांचं अंडरस्टँडिंग पक्कं आहे. त्यांच्या भाषणातील एक-दोन वाक्ये काढून मीडिया दाखवतो. पक्षामध्ये त्यांचा सन्मान होता, आहे आणि पुढेही राहील, असं फडणवीसांनी सांगितलं. बिहारमध्ये नेमकं काय चाललंय याची मला माहिती नाही. मी आधी भाजपचा प्रभारी होतो, आता नाही. अलिकडच्या काळात उद्धवजी जे बोलतायत, ते फार गांभीर्याने घेऊ शकत नाही. कालच मी त्यांना शुभेच्छा दिल्यात, गेट वेल सून.

The post आगे आगे देखिए, होता है क्या, देवेंद्र फडणवीसांचं सूचक वक्तव्य appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
https://dailyyashwant.com/suggestive-statement-by-devendra-fadnavis/3960/feed/ 0
अशोक चव्हाण नॉट रिचेबल, भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा https://dailyyashwant.com/ashok-chavan-is-not-reachable-will-join-bjp/3957/ https://dailyyashwant.com/ashok-chavan-is-not-reachable-will-join-bjp/3957/#respond Mon, 12 Feb 2024 07:30:10 +0000 https://dailyyashwant.com/?p=3957 राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याची चर्चा आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं समजतेय. नांदेडमधील राजकारणात तशी चर्चाही सुरु आहे. अशोक चव्हाण यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे आमदारकीचा राजीनामा दिल्याचं सुत्रांनी सांगितलेय. मागील काही वेळापासून अशोक चव्हाण यांचा फोनही नॉट रिचेबल आहेत, त्यामुळे […]

The post अशोक चव्हाण नॉट रिचेबल, भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याची चर्चा आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं समजतेय. नांदेडमधील राजकारणात तशी चर्चाही सुरु आहे. अशोक चव्हाण यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे आमदारकीचा राजीनामा दिल्याचं सुत्रांनी सांगितलेय. मागील काही वेळापासून अशोक चव्हाण यांचा फोनही नॉट रिचेबल आहेत, त्यामुळे या चर्चेला आणखी उधाण आले आहे.

मुंबई भाजपमध्ये काँग्रेसच्या नेत्याची पक्षप्रवेशाची मोठी तयारी सुरु आहे. अशोक चव्हाण यांच्यासोबत काँग्रेसमधील आणखी काही नेत्यांचाही पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे. नांदेडमधील काँग्रेसमध्ये अस्वस्थता पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पक्षप्रवेशाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, मागील काही दिवसांपासून भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसचे मोठे मासे गळाला लागतील, असे वक्तव्य केले होते.

मोठा पोलीस बंदोबस्त

भाजपा कार्यालयात हा पक्षप्रवेश पार पडणार आहे. यासाठी भाजपा प्रदेश कार्यालयाच्या बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान, हा पक्षप्रवेश आज झाला नाही, तर उद्या होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. अनिल देशमुख यांनी अशोक चव्हाण महाविकास आघाडीला सोडणार नाहीत याची मला खात्री आहे. ही अफ़वा आहे असा विश्वास व्यक्त केला आहे.

काँग्रेसचे दिग्गज भाजपच्या वाटेवर ?

अशोक चव्हाण यांच्यासह त्यांच्या स्वीय सहायाकांचाही फोन नॉट रिचेबल आहे.  14 फेब्रुवारी रोजी काँग्रेसमधील मराठवाड्यातील नेते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे समजले होते. नांदेड, धाराशिव, पश्चीम महाराष्ट्रातील मोठे काँग्रेस नेते भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याचं समोर आलेय.

काँग्रेसला मोठा धक्का –

अशोक चव्हाण यांच्यासारखा मातब्बर नेता आणि माजी मुख्यमंत्री भाजपच्या गोटात जाणे काँग्रेस पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे. गेल्याच आठवड्यात काँग्रेसच्या बाबा सिद्दीकी यांनी अजित पवार गटात प्रवेश केला होता. तर मिलिंद देवरा यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर आता अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्यास काँग्रेस पक्ष आणखी खिळखिळा होईल.

अशोक चव्हाण भाजपमध्ये जाणार, चर्चेला उधाण – 

गेल्या बऱ्याच काळापासून अशोक चव्हाण हे भाजपमध्ये जातील, अशी चर्चा होती. राज्यात झालेल्या सत्ताबदलानंतरही अशोक चव्हाण यांच्या मतदारसंघात सरकारने निधी दिला होता. याशिवाय, बऱ्याच काळापासून अशोक चव्हाण भाजपमध्ये जाण्याचा विचार करत होते, अशी चर्चा होती. राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर बहुमत चाचणीवेळी काँग्रेसचे सात आमदार सभागृहात उपस्थित नव्हते. भाजपला मदत करण्याासाठीच या आमदारांनी बहुमत चाचणीला येणे टाळल्याची चर्चा होती. यामध्ये अशोक चव्हाण यांचा समावेश होता. काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी याचा अहवाल मागवून या प्रकाराची गंभीर दखल घेतली होती. या सगळ्या घडामोडींमुळे अशोक चव्हाण भाजपमध्ये जातील, अशी अटकळ बांधली जात होती.

The post अशोक चव्हाण नॉट रिचेबल, भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
https://dailyyashwant.com/ashok-chavan-is-not-reachable-will-join-bjp/3957/feed/ 0
भाजपच्या माजी नगरसेवकावर टोळक्याचा गोळीबार; माजी नगरसेवक बाळू मोरे यांचे निधन https://dailyyashwant.com/mob-firing-on-ex-bjp-corporator-former-corporator-balu-more-passed-away/3923/ https://dailyyashwant.com/mob-firing-on-ex-bjp-corporator-former-corporator-balu-more-passed-away/3923/#respond Sat, 10 Feb 2024 06:43:47 +0000 https://dailyyashwant.com/?p=3923 जळगांव:   जळगावात तीन दिवसांपूर्वी टोळक्याने भाजपच्या माजी नगरसेवकावर गोळीबार केला होता.या गोळीबारात जखमी झालेले माजी नगरसेवक बाळू मोरे यांचे उपचार सुरू असतांना निधन झाले आहे चाळीसगाव शहरातील सिंधी कॉलनी येथील माजी नगरसेवक बाळू मोरे यांच्यावर कारमधून आलेल्या ५ जणांनी कट्ट्यातून फायरिंग करत जखमी केल्याची खळबळजनक घटना बुधवारी ७ फेब्रुवारी रोजी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास घडली […]

The post भाजपच्या माजी नगरसेवकावर टोळक्याचा गोळीबार; माजी नगरसेवक बाळू मोरे यांचे निधन appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
जळगांव:   जळगावात तीन दिवसांपूर्वी टोळक्याने भाजपच्या माजी नगरसेवकावर गोळीबार केला होता.या गोळीबारात जखमी झालेले माजी नगरसेवक बाळू मोरे यांचे उपचार सुरू असतांना निधन झाले आहे

चाळीसगाव शहरातील सिंधी कॉलनी येथील माजी नगरसेवक बाळू मोरे यांच्यावर कारमधून आलेल्या ५ जणांनी कट्ट्यातून फायरिंग करत जखमी केल्याची खळबळजनक घटना बुधवारी ७ फेब्रुवारी रोजी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास घडली होती. यात बाळू मोरे हे गंभीर जखमी झाले. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात ५ हल्लेखोर आणि कट रचनारे २ असे एकुण ७ हल्लेखोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना प्राप्त झाले असून पुढील चौकशीला सुरुवात करण्यात आली आहे.

The post भाजपच्या माजी नगरसेवकावर टोळक्याचा गोळीबार; माजी नगरसेवक बाळू मोरे यांचे निधन appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
https://dailyyashwant.com/mob-firing-on-ex-bjp-corporator-former-corporator-balu-more-passed-away/3923/feed/ 0
अख्खा देव एका व्यक्तीनं ताब्यात घेतला; मल्लिकार्जुन खरगेंचा पीएम मोदींवर कडाडून हल्लाबोल https://dailyyashwant.com/the-whole-god-was-taken-over-by-one-person-mallikarjun-kharges-pm-will-strongly-attack-modi/3687/ https://dailyyashwant.com/the-whole-god-was-taken-over-by-one-person-mallikarjun-kharges-pm-will-strongly-attack-modi/3687/#respond Sun, 21 Jan 2024 16:29:25 +0000 https://dailyyashwant.com/?p=3687 अयोध्येत उद्या सोमवारी (22 जानेवारी) होणाऱ्या रामलला प्राण प्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. आसाममधील नागाव येथे एका सभेला संबोधित करताना ते म्हणाले की, एका व्यक्तीने संपूर्ण देव ताब्यात घेतला आहे. ते म्हणाले की, “पंतप्रधान मोदी राम मंदिरात आहेत आणि रामदेव बाहेर आहेत. सर्व महत्त्वाचे लोक बाहेर आहेत. त्यांना […]

The post अख्खा देव एका व्यक्तीनं ताब्यात घेतला; मल्लिकार्जुन खरगेंचा पीएम मोदींवर कडाडून हल्लाबोल appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
अयोध्येत उद्या सोमवारी (22 जानेवारी) होणाऱ्या रामलला प्राण प्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. आसाममधील नागाव येथे एका सभेला संबोधित करताना ते म्हणाले की, एका व्यक्तीने संपूर्ण देव ताब्यात घेतला आहे. ते म्हणाले की, “पंतप्रधान मोदी राम मंदिरात आहेत आणि रामदेव बाहेर आहेत. सर्व महत्त्वाचे लोक बाहेर आहेत. त्यांना (पीएम मोदी) सर्व काही एकट्याने करायचे आहे. तुम्ही एकटेच सर्वकाही करत असाल तर इतरांकडे मते का मागता? अशी विचारणा त्यांनी केली.

हिमंता बिस्वा सरमा धर्मांतरित मुख्यमंत्री

यावेळी त्यांनी मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर राजकीय निशाणा साधला आणि त्यांना धर्मांतरित मुख्यमंत्री म्हटले. ते म्हणाले की, “आसाममध्ये जो आम्हाला सोडून भाजपमध्ये आला तो ‘नवा धर्मांतरित मुख्यमंत्री’ आहे. तो आम्हाला धमक्या देत आहे. भाजपच्या लोकांनी यात्रेवरही हल्ला केला, वाहनांच्या काचा फोडल्या आणि पोस्टर्स आणि बॅनर फाडले.”

देशातील सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री

काँग्रेस अध्यक्ष म्हणाले की, “येथील (आसाम) मुख्यमंत्री हे विसरतात की त्यांच्यावरच असंख्य घोटाळ्यांचे आरोप आहेत, त्यांच्यावर अनेक कलमांतर्गत गुन्हे दाखल आहेत. आसामचे मुख्यमंत्री हे देशातील सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री आहेत, असे राहुल गांधी बरोबर म्हणाले. ते सत्य आहे आणि जर ते स्वच्छ होत असतील तर त्यामागे फक्त मोदी आणि अमित शहा यांच्या वॉशिंग मशीनचे आश्चर्य आहे.

आम्ही इंग्रजांना घाबरलो नाही

भारत जोडो न्याय यात्रेवर झालेल्या हल्ल्याबाबत खरगे म्हणाले की, भाजपचे लोक राहुल गांधींच्या दौऱ्याला घाबरले आहेत. हे लोक जयराम रमेश यांच्या वाहनावर हल्ला करत आहेत, पण ते काँग्रेसचे सैनिक आहेत. ते घाबरत नाहीत. आमचे लोक तुरुंगात गेले. आम्ही इंग्रजांना घाबरत नाही तर भाजपला का घाबरणार?

त्यांनी सांगितले की, राहुल गांधी कन्याकुमारी ते काश्मीरला जात असताना दगडफेक झाली नाही. त्यावेळी लाखोंच्या संख्येने लोक मिरवणुकीत सहभागी झाले होते, पण आसाममध्ये हल्ला का झाला?, पंतप्रधान मोदींचे शिष्य असल्यामुळे येथे हल्ला होत आहे. तो अल्पसंख्याकांना धमकावतो. आज या देशात भाजपला प्रत्येक राज्यात दिल्लीतून सरकार चालवायचे आहे आणि एक देश, एक निवडणूक, एक विचारधारा लादायची आहे.

The post अख्खा देव एका व्यक्तीनं ताब्यात घेतला; मल्लिकार्जुन खरगेंचा पीएम मोदींवर कडाडून हल्लाबोल appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
https://dailyyashwant.com/the-whole-god-was-taken-over-by-one-person-mallikarjun-kharges-pm-will-strongly-attack-modi/3687/feed/ 0
देवेंद्र फडणवीसांच्या लेटरबॉम्बमुळे अजित पवार गट नाराज https://dailyyashwant.com/ajit-pawar-faction-upset-over-devendra-fadnavis-letter-bomb/3030/ https://dailyyashwant.com/ajit-pawar-faction-upset-over-devendra-fadnavis-letter-bomb/3030/#respond Fri, 08 Dec 2023 06:21:42 +0000 https://dailyyashwant.com/?p=3030 नागपूर: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांची विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशानातील एंट्री चांगलीच गाजली आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी ते थेट सत्तापक्षाच्या बाकांवर विराजमान झालेत. त्यावर विरोधकांनी केलेल्या टीकेनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महायुतीत तुर्तास घेऊ नये, असे पत्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लिहीले. या संपूर्ण घटनाक्रमावर मलिक यांनी मौन बाळगले असले तरी युतीतील नेते सध्या बॅकफूटवर आल्याचे […]

The post देवेंद्र फडणवीसांच्या लेटरबॉम्बमुळे अजित पवार गट नाराज appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
नागपूर: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांची विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशानातील एंट्री चांगलीच गाजली आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी ते थेट सत्तापक्षाच्या बाकांवर विराजमान झालेत. त्यावर विरोधकांनी केलेल्या टीकेनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महायुतीत तुर्तास घेऊ नये, असे पत्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लिहीले. या संपूर्ण घटनाक्रमावर मलिक यांनी मौन बाळगले असले तरी युतीतील नेते सध्या बॅकफूटवर आल्याचे चित्र आहे.

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मलिक यांची अधिवेशनातील एंट्रीने राष्ट्रवादीच्या अजित पवार गटामध्ये चैतन्य संचारले होते. विधानसभेत ते सत्तापक्षाच्या बाकांवर बसलेत. त्यामुळे अजितदादांनी ही लढाई जिंकल्याचा विजयीभाव त्यांच्या गटात दिसून आला. नवाब मलिक तेव्हादेखील मौन होते. पहिल्या दिवशी त्यांनी कुठल्याही गटात नाही तर राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असल्याचे सांगितले. पण, सत्तापक्षाच्या बाकावर बसून त्यांनी स्वत:च्या कृतीतून त्यांची बाजू स्पष्ट केल्याचे चित्र होते. त्यावर विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत ‘देशद्रोहाचे आरोप असलेल्यांच्या मांडीला मांडी लावून बसणार का,’ असा सवाल केला होता. या संपूर्ण घटनाक्रमानंतर सायंकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्राने राजकीय भूंकप झाला. त्या पत्राचे पडसाद राष्ट्रवादीच्या अजित पवार गटावर पडल्याचे शुक्रवारी दिसून आले. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील म्हणाले,‘उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पत्र जाहीर झाले नसते तर बरे झाले असते. मित्रपक्ष म्हणून यासंदर्भात चर्चा करायला पाहिजे होती. आमचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी याबाबत भूमिका स्पष्ट केल्यामुळे युतीत मिठाचा खडा पडला, असे म्हणण्याचे काहीही कारण नाही.’

आमदार नवाब मलिक यांना कुठे बसू द्यावे, हा विधानसभा अध्यक्षांचा अधिकार आहे. त्यावर मी बोलणे योग्य नाही. काल नवाब मलिक वैद्यकीय जामीनावर सुटल्यानंतर पहिल्यांदाच यंदाच्या हिवाळी अधिवेशनात आलेत. त्यानंतर ते सहकाऱ्यांशी भेटलेत. मात्र, ते कुठल्या गटात आहेत, याबाबत त्यांनी भूमिका स्पष्ट केल्यानंतर मी यावर भाष्य करेल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणालेत.

फडणवीसांच्या लेटरबॉम्बवर बोचरी टीका करताना काँग्रसेचे नेते बाळासाहेब थोरात म्हणाले,‘भाजप सत्तेसाठी कुठल्याही थराला जाण्यास तयार आहे; हे या पत्रावरून स्पष्ट होते.’ त्यांनी खासगीत पत्र लिहीणे शक्य होते, ते जाहीर करण्याची गरज नव्हती, असेदेखील ते म्हणाले.

The post देवेंद्र फडणवीसांच्या लेटरबॉम्बमुळे अजित पवार गट नाराज appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
https://dailyyashwant.com/ajit-pawar-faction-upset-over-devendra-fadnavis-letter-bomb/3030/feed/ 0
नवाब मलिक कोणत्या गटात मला माहिती नाही; अजित पवारांचं स्पष्टीकरण https://dailyyashwant.com/nawab-malik-in-which-group-i-do-not-know-explanation-of-ajit-pawar/3027/ https://dailyyashwant.com/nawab-malik-in-which-group-i-do-not-know-explanation-of-ajit-pawar/3027/#respond Fri, 08 Dec 2023 06:15:48 +0000 https://dailyyashwant.com/?p=3027 नागपूर: राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमच्या गटाने महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला, त्याबाबत नवाब मलिक यांना कोणतीही माहिती नव्हती. हिवाळी अधिवेशनाच्यानिमित्ताने ते पहिल्यांदाच सभागृहात आले होते. मात्र, ते कोणत्या गटासोबत आहेत, याबाबत त्यांनी भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केल्यानंतर मी या सगळ्यावर प्रतिक्रिया देईन, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी […]

The post नवाब मलिक कोणत्या गटात मला माहिती नाही; अजित पवारांचं स्पष्टीकरण appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
नागपूर: राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमच्या गटाने महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला, त्याबाबत नवाब मलिक यांना कोणतीही माहिती नव्हती. हिवाळी अधिवेशनाच्यानिमित्ताने ते पहिल्यांदाच सभागृहात आले होते. मात्र, ते कोणत्या गटासोबत आहेत, याबाबत त्यांनी भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केल्यानंतर मी या सगळ्यावर प्रतिक्रिया देईन, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना गुरुवारी रोखठोक भाषेत पत्र धाडून नवाब मलिक यांच्या सत्ताधारी गटातील समावेशाला विरोध दर्शविला होता. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांची आजची प्रतिक्रिया सूचक आणि अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. अजितदादांच्या एकूण बोलण्याचा रोख पाहता आगामी काळात अजित पवार गटाकडून नवाब मलिक यांना अंतर दिले जाण्याची शक्यता आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्यासंदर्भात लिहेलेल पत्र मला मिळाले, ते मी वाचलं. नवाब मलिक हे काल पहिल्यांदाच सभागृहात आले होते. ते सभागृहात कुठे बसले, याबाबत मीडियाने माहिती दिली. पण आम्ही महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला त्यानंतर नवाब मलिक हे पहिल्यांदाच सभागृहात आले होते. त्यांची भूमिका काय आहे, हे ऐकल्यानंतरच मी त्यांच्याबद्दल माझं मत देईन. नबाव मलिक यांना न्यायालयाने वैद्यकीय कारणामुळे बाहेर येण्याची संधी दिली आहे. त्यांच्यावरील केस अजून सुरु आहे. सभागृहात कोणी कुठे बसायचे, हा माझा अधिकार नाही. तो निर्णय विधानसभा अध्यक्ष घेतात. नवाब मलिक कोणासोबत आहेत, हे अद्याप त्यांनी स्पष्ट केलेले नाही. त्यांची भूमिका स्पष्ट झाल्यानंतरच मी बोलेन. देवेंद्र फडणवीस यांच्या पत्राबाबत काय करायचं ते मी करेन. त्याबाबत मीडियाला सांगण्याचं काही कारण नाही, असे अजित पवार यांनी म्हटले. यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी अजित पवार यांच्यावर एकापाठोपाठ एक प्रश्नांची सरबत्ती केली. त्यामुळे अजित पवार चांगलेच वैतागल्याचे दिसत होते.

जमीन गैरव्यवहारप्रकरणात ईडी कोठडीत तुरुंगवास भोगलेल्या आणि भाजपकडून देशद्रोहाचे आरोप झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची चांगलीच कोंडी झाली आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी गुरुवारी नवाब मलिक हे सभागृहात बसले होते. यावेळी ते सत्ताधाऱ्यांच्या रांगेत शेवटच्या बाकावर बसले होते. इतके दिवस भाजपने देशद्रोहाचे आरोप केलेले नवाब मलिक सत्ताधाऱ्यांच्या रांगेत बसल्याने अनेकांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले होते. या सगळ्या घटनाक्रमानंतर देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी संध्याकाळी अजित पवार यांना एक पत्र लिहले. योगायोगाने हे पत्र प्रसारमाध्यमांच्या हाती लागले. त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांना सोबत घेण्यास स्पष्ट विरोध केला होता. यानंतर अजित पवार काय भूमिका घेतात, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या होत्या.

The post नवाब मलिक कोणत्या गटात मला माहिती नाही; अजित पवारांचं स्पष्टीकरण appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
https://dailyyashwant.com/nawab-malik-in-which-group-i-do-not-know-explanation-of-ajit-pawar/3027/feed/ 0