beed Archives - Dainik Yashwant, Latur https://dailyyashwant.com/tag/beed/ Online Portal Sat, 16 Dec 2023 04:45:50 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.4 परळीतील कॉलेजमध्ये खुलेआम कॉपी; ढीगभर मोबाईल, खंडीभर चिठ्ठ्या https://dailyyashwant.com/copied-openly-in-college-in-parli-heaps-of-mobiles-lots-of-lots/3164/ https://dailyyashwant.com/copied-openly-in-college-in-parli-heaps-of-mobiles-lots-of-lots/3164/#respond Sat, 16 Dec 2023 04:45:50 +0000 https://dailyyashwant.com/?p=3164 बीड:  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न परळी येथील नागनाथप्पा हालगे अभियांत्रिकी महाविद्यालयात थेट मोबाइल समोर ठेवूनच कॉपी करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने शिक्षण क्षेत्रात  एकच खळबळ उडाली आहे. याशिवाय डमी विद्यार्थी बसवल्याचाही आरोप करण्यात येत आहे. हा सर्व प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, विद्यार्थी करत असलेल्या कॉपीच्या घटनेचं व्हिडीओसह चित्रण करीत परीक्षार्थीचे […]

The post परळीतील कॉलेजमध्ये खुलेआम कॉपी; ढीगभर मोबाईल, खंडीभर चिठ्ठ्या appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
बीड:  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न परळी येथील नागनाथप्पा हालगे अभियांत्रिकी महाविद्यालयात थेट मोबाइल समोर ठेवूनच कॉपी करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने शिक्षण क्षेत्रात  एकच खळबळ उडाली आहे. याशिवाय डमी विद्यार्थी बसवल्याचाही आरोप करण्यात येत आहे. हा सर्व प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, विद्यार्थी करत असलेल्या कॉपीच्या घटनेचं व्हिडीओसह चित्रण करीत परीक्षार्थीचे मोबाइल जप्त करणाऱ्या सहकेंद्रप्रमुखालाच विद्यापीठाच्या परीक्षा संचालकांनी तडकाफडकी बदलून टाकल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

काय आहे प्रकरण? 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या सध्या वेगवेगळ्या विभागाच्या परीक्षा सुरु आहेत. दरम्यान, बीड जिल्ह्यात देखील विद्यापीठाशी संलग्न असलेल्या अनेक महाविद्यालयात परीक्षा घेण्यात येत आहे. असे असतांना परळी येथील नागनाथप्पा हालगे अभियांत्रिकी महाविद्यालयात चक्क विध्यार्थी मोबाइल समोर ठेवून कॉपी करत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेचा भांडाफोड करण्यासाठी एका सहकेंद्रप्रमुखाने सर्व कॉपीच्या घटनेचं व्हिडीओसह चित्रण देखील केले. मात्र, संबंधित विध्यार्थी आणि त्यांना कॉपी करण्यासाठी मदत करणाऱ्यांवर कारवाई न करता हा प्रकार समोर आणणाऱ्या सहकेंद्रप्रमुखाचीच विद्यापीठाच्या परीक्षा संचालकांनी तडकाफडकी बदली केली आहे. हा सर्व प्रकार कुलगुरूंना समजताच त्यांनी परीक्षा संचालकांची कानउघाडणी करीत परीक्षेसाठी बैठे पथक नेमण्याचे आदेश दिले आहे. दुसरीकडे, या घटनेची चौकशी करण्याची मागणी करत सहकेंद्रप्रमुखासह अधिसभा सदस्यांनी कुलगुरूंना निवेदन दिले आहे.

परीक्षार्थीकडून धमकावण्यात देखील आले

12 डिसेंबरपपासून विद्यापीठाच्या अभियांत्रिकीच्या परीक्षांना सुरुवात झाली आहे. अभियांत्रिकीच्या परीक्षेसाठी परळी येथील नागनाथप्पा हालगे अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रा. दशरथ रोडे यांची सहकेंद्रप्रमुख म्हणून परीक्षा विभागाने नियुक्ती केली होती. त्यानुसार, रोडे परीक्षा केंद्रावर गेले.  दरम्यान, प्रा. रोडे यांनी परीक्षा हॉलमध्य जाऊन पाहणी केली असता पर्यवेक्षकांसमोर विद्यार्थी थेट मोबाइल समोर ठेवून उत्तरपत्रिका लिहीत असल्याचा धक्कादायक प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यांनी या सर्व घटनेचे व्हिडीओ काढले, त्यानंतर विद्यार्थ्यांचे मोबाइल जप्त केले. रोडे यांना काही परीक्षार्थीकडून धमकावण्यात देखील आले. त्यामुळे, त्यांनी या सर्व प्रकरणाची लेखी तक्रार कुलगुरू यांच्याकडे केली आहे.

The post परळीतील कॉलेजमध्ये खुलेआम कॉपी; ढीगभर मोबाईल, खंडीभर चिठ्ठ्या appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
https://dailyyashwant.com/copied-openly-in-college-in-parli-heaps-of-mobiles-lots-of-lots/3164/feed/ 0
करुणा शर्मांच्या गाडीवर अज्ञात व्यक्तींचा हल्ला https://dailyyashwant.com/karuna-sharmas-car-attacked-by-unknown-persons/2500/ https://dailyyashwant.com/karuna-sharmas-car-attacked-by-unknown-persons/2500/#respond Sat, 26 Aug 2023 09:23:56 +0000 https://dailyyashwant.com/?p=2500 कृषिमंत्री धनंजय मुंडे  यांच्यावर टीका केल्यानंतर चर्चेत आलेल्या करुणा शर्मा यांच्या गाडीवर बीडमध्ये अज्ञात व्यक्तींकडून हल्ला करण्यात आला आहे. करुणा शर्मा यांच्या गाडीवर मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने हल्ला केला केल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये त्यांच्या कारवर दगडफेक करून कारचं मोठं नुकसान करण्यात आला आहे. तर, दुसरीकडे हल्लेखोरांनी त्यांची कार देखील उघडण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप […]

The post करुणा शर्मांच्या गाडीवर अज्ञात व्यक्तींचा हल्ला appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
कृषिमंत्री धनंजय मुंडे  यांच्यावर टीका केल्यानंतर चर्चेत आलेल्या करुणा शर्मा यांच्या गाडीवर बीडमध्ये अज्ञात व्यक्तींकडून हल्ला करण्यात आला आहे. करुणा शर्मा यांच्या गाडीवर मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने हल्ला केला केल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये त्यांच्या कारवर दगडफेक करून कारचं मोठं नुकसान करण्यात आला आहे. तर, दुसरीकडे हल्लेखोरांनी त्यांची कार देखील उघडण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप करुणा शर्मा यांनी केला आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये हल्ला करणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पोलिसांकडून आता हल्लेखोरांचा शोध घेण्यात येत आहे.

मागील काही दिवसांपूर्वी करुणा शर्मा या बीड शहरात स्थायिक झाल्या आहेत. त्यांनी यासाठी बीडमध्ये नवीन घर देखील घेतले आहे. दरम्यान,  करुणा शर्मा यांच्या बीडमधील घरासमोर लावलेल्या त्यांच्या गाडीवर तअज्ञात हल्लेखोराने मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास हल्ला केला आहे. यामध्ये गाडीच्या काचा फुटल्या असून, हल्लेखोरांनी गाडीत प्रवेश करण्याचा देखील प्रयत्न केला. सर्व प्रकार लक्षात आल्यावर करुणा शर्मा यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करत आता आरोपींचा शोध सुरु केला आहे.

धनंजय मुंडे यांच्यावर वेगवेगळ्या आरोपांनंतर करुणा शर्मा चर्चेत आल्या होत्या. दरम्यान, गेल्यावर्षी त्यांनी बीड शहरात घर घेऊन, बीडमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. तर, धनंजय मुंडे यांच्या विरोधात लढण्यासाठी मी कंबर कसली असून, आता बीडमध्ये घर घेतलं असल्याचं त्या म्हणाल्या होत्या. बीडचे लोकं माझ्यासोबत असल्याचं करुणा शर्मा म्हणाल्या होत्या. तेव्हापासून त्या बीडमध्येच राहत आहे. मात्र, त्यांच्या गाडीवर हल्ला झाल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहेत. तसेच हा हल्ला कोणी केला याचा शोध पोलिसांकडून घेण्यात येत आहे.

The post करुणा शर्मांच्या गाडीवर अज्ञात व्यक्तींचा हल्ला appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
https://dailyyashwant.com/karuna-sharmas-car-attacked-by-unknown-persons/2500/feed/ 0