ashok chavan Archives - Dainik Yashwant, Latur https://dailyyashwant.com/tag/ashok-chavan/ Online Portal Tue, 13 Feb 2024 09:44:26 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.4 एकतर भाजपाची स्मरणशक्ती कमजोर आहे किंवा ते जनतेला मुर्ख समजतात – नाना पटोले https://dailyyashwant.com/either-bjps-memory-is-weak-or-they-think-people-are-fools-nana-patole/4035/ https://dailyyashwant.com/either-bjps-memory-is-weak-or-they-think-people-are-fools-nana-patole/4035/#respond Tue, 13 Feb 2024 09:43:08 +0000 https://dailyyashwant.com/?p=4035 जो नेता तुमच्यासाठी कालपर्यंत भ्रष्टाचारी होता, तो नेता आता भाजपमध्ये कसा काय चालतो, असे सवाल समाज माध्यमांतून विचारले जात होते. अगदी तोच सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपला विचारला आहे.  एकतर भाजपाची स्मरणशक्ती कमजोर आहे किंवा ते जनतेला मुर्ख समजतात. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे तथाकथित आदर्श घोटाळ्यातील आरोपी आहेत, असा आरोप भाजपने वारंवार […]

The post एकतर भाजपाची स्मरणशक्ती कमजोर आहे किंवा ते जनतेला मुर्ख समजतात – नाना पटोले appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
जो नेता तुमच्यासाठी कालपर्यंत भ्रष्टाचारी होता, तो नेता आता भाजपमध्ये कसा काय चालतो, असे सवाल समाज माध्यमांतून विचारले जात होते. अगदी तोच सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपला विचारला आहे.  एकतर भाजपाची स्मरणशक्ती कमजोर आहे किंवा ते जनतेला मुर्ख समजतात. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे तथाकथित आदर्श घोटाळ्यातील आरोपी आहेत, असा आरोप भाजपने वारंवार केला. त्यानंतर भाजपने अशोक चव्हाण यांच्यामागे ईडी, सीबीआय यांचा ससेमिरा लावला. अखेर या जाचाला कंटाळून अशोक चव्हाण भाजपात दाखल झाले, हा कृतीचा परिणाम आहे.

आता प्रश्न असा आहे की, कालपर्यंत जे तुम्हाला भ्रष्ट वाटत होते त्यांनी नेमकं असं काय पुण्य केलं ते अचानक तुम्हाला पुजनीय वाटू लागले? निर्लज्जपणाची देखील काहीतरी एक सीमा असते, अशआ शब्दात नाना पटोले यांनी भाजपवर बोचरा वार केला आहे.

The post एकतर भाजपाची स्मरणशक्ती कमजोर आहे किंवा ते जनतेला मुर्ख समजतात – नाना पटोले appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
https://dailyyashwant.com/either-bjps-memory-is-weak-or-they-think-people-are-fools-nana-patole/4035/feed/ 0
काहीही केलं तरी भाजप यशस्वी होणार नाही – प्रकाश आंबेडकर https://dailyyashwant.com/bjp-will-not-succeed-no-matter-what-prakash-ambedkar/4033/ https://dailyyashwant.com/bjp-will-not-succeed-no-matter-what-prakash-ambedkar/4033/#respond Tue, 13 Feb 2024 08:38:18 +0000 https://dailyyashwant.com/?p=4033 भाजपने या नेत्याला घ्या, त्या नेत्याला घ्या…, हा पक्ष फोडा, तो पक्ष फोडा… असे कितीही प्रयत्न केले तरी भाजप राज्यात यशस्वी होणार नाही,’ असा दावा वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला. त्याचवेळी भाजपच्या पायाखालील वाळू सरकल्याने भाजप राजकीय व्यक्तींसह अराजकीय व्यक्तींवरही कारवाई करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कोरेगाव भीमा चौकशी आयोगापुढे […]

The post काहीही केलं तरी भाजप यशस्वी होणार नाही – प्रकाश आंबेडकर appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
भाजपने या नेत्याला घ्या, त्या नेत्याला घ्या…, हा पक्ष फोडा, तो पक्ष फोडा… असे कितीही प्रयत्न केले तरी भाजप राज्यात यशस्वी होणार नाही,’ असा दावा वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला. त्याचवेळी भाजपच्या पायाखालील वाळू सरकल्याने भाजप राजकीय व्यक्तींसह अराजकीय व्यक्तींवरही कारवाई करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कोरेगाव भीमा चौकशी आयोगापुढे सुनावणीसाठी प्रकाश आंबेडकर पुण्यात आले होते. सुनावणीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या वेळी त्यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केले. ‘कोणताही नेता कोणत्याही पक्षातून दुसऱ्या पक्षात गेल्यावर फार फरक पडत नाही. पक्ष हा कायम राहतो, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे काँग्रेसवर फार परिणाम होईल असे वाटत नाही,’ असे आंबेडकर यांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यावर बोलताना स्पष्ट केले.

‘चारशेच्या पुढे जाऊ असा दावा भाजप करीत असला, तरी त्यामागे भीती आहे. अशीच भीती निर्माण करण्यासाठी राजकीय; तसेच अराजकीय व्यापारी, मत नोंदवू शकणाऱ्या व्यक्तींवरही ते धाडी घालत आहेत,’ अशा शब्दांत आंबेडकर यांनी भाजपला लक्ष्य केले. ‘भाजप ही भयग्रस्त झाली आहे,’ अशीही टीका त्यांनी केली.

‘ओबीसी संघटनांनी राजकीय पक्ष काढण्याचे आवाहन केले आहे. ओबीसी संघटनांचे छगन भुजबळ यांनी नेतृत्व करावे. त्यांनी सरकारमधून बाहेर पडून स्वतंत्र पक्ष स्थापन करून नेतृत्व केल्यास आम्ही त्यांना मदत करू. ओबीसींचे आरक्षण राखण्यासाठी भुजबळ काय पावले उचलतात हे पाहू. आम्ही त्यांना पाठिंबा दिला आहे,’ असे आंबेडकर म्हणाले.

The post काहीही केलं तरी भाजप यशस्वी होणार नाही – प्रकाश आंबेडकर appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
https://dailyyashwant.com/bjp-will-not-succeed-no-matter-what-prakash-ambedkar/4033/feed/ 0
देवेंद्र फडणवीस सांगतील त्याप्रमाणं काम करणार: अशोक चव्हाण https://dailyyashwant.com/i-will-work-as-devendra-fadanvis-says-to-me-ashok-chavan/4031/ https://dailyyashwant.com/i-will-work-as-devendra-fadanvis-says-to-me-ashok-chavan/4031/#respond Tue, 13 Feb 2024 08:26:42 +0000 https://dailyyashwant.com/?p=4031 नरेंद्र मोदींकडून प्रेरणा घेऊन देशाच्या आणि राज्याच्या विकासात योगदान देता यावं यासाठी हा निर्णय घेतला आहे, असं चव्हाण म्हणाले.  अशोक चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, पक्षाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचे आभार मानतो, असं म्हटलं. मी जिथं होतो तिथं प्रामाणिकपणे काम केलेलं आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर प्रामाणिकपणे काम करण्याची ग्वाही देणार आहे. आगामी […]

The post देवेंद्र फडणवीस सांगतील त्याप्रमाणं काम करणार: अशोक चव्हाण appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
नरेंद्र मोदींकडून प्रेरणा घेऊन देशाच्या आणि राज्याच्या विकासात योगदान देता यावं यासाठी हा निर्णय घेतला आहे, असं चव्हाण म्हणाले.  अशोक चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, पक्षाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचे आभार मानतो, असं म्हटलं. मी जिथं होतो तिथं प्रामाणिकपणे काम केलेलं आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर प्रामाणिकपणे काम करण्याची ग्वाही देणार आहे. आगामी निवडणुकीत भाजपला जास्तीत जास्त जागा मिळतील यासाठी प्रयत्न करणार आहे. राजकारण हे सेवेचं माध्यम आहे. मी कुणावरही टीका करणार नाही, असं अशोक चव्हाण म्हणाले.

मी पक्ष सोडल्यानंतर कोणावरही टीका करणार नाही. नरेंद्र मोदी यांनी सबका साथ सबका विकास हा मंत्र घेऊन देशात विकासाचं काम केलं आहे. त्यांच्या कामानं प्रभावित झालेलो आहे. विरोधी पक्षात असताना सरकारनं जे चांगलं काम केलेलं असेल तर त्याचं कौतुक केलं पाहिजे. महाराष्ट्राची एक वेगळी राजकीय संस्कृती राहिलेली, असं अशोक चव्हाण म्हणाले.

The post देवेंद्र फडणवीस सांगतील त्याप्रमाणं काम करणार: अशोक चव्हाण appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
https://dailyyashwant.com/i-will-work-as-devendra-fadanvis-says-to-me-ashok-chavan/4031/feed/ 0
अशोक चव्हाण भाजपवासी https://dailyyashwant.com/ashok-chavan-joins-bjp-in-presence-of-fadnavis/4022/ https://dailyyashwant.com/ashok-chavan-joins-bjp-in-presence-of-fadnavis/4022/#respond Tue, 13 Feb 2024 07:55:22 +0000 https://dailyyashwant.com/?p=4022 माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला. चंद्रशेखर बावनकुळे, देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार यांच्या उपस्थितीत अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. अशोक चव्हाण यांनी सोमवारी काँग्रेस सदस्यत्व आणि आमदारकीचा राजीनामा दिला. आज त्यांनी  भाजपमध्ये  अधिकृत प्रवेश केला. 38 वर्ष काँग्रेसमध्ये राहून मी आज माझ्या नवीन राजकीय कारकिर्दीला सुरुवात करत आहे. […]

The post अशोक चव्हाण भाजपवासी appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला. चंद्रशेखर बावनकुळे, देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार यांच्या उपस्थितीत अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. अशोक चव्हाण यांनी सोमवारी काँग्रेस सदस्यत्व आणि आमदारकीचा राजीनामा दिला. आज त्यांनी  भाजपमध्ये  अधिकृत प्रवेश केला.

38 वर्ष काँग्रेसमध्ये राहून मी आज माझ्या नवीन राजकीय कारकिर्दीला सुरुवात करत आहे. राज्यासाठी काम करताना आम्ही नेहमीच एकमेकांना साथ दिलीय. गेल्या 38 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीनंतर आज मी नवी सुरूवात करतोय.  विकासाला सोबत घेऊन आम्ही एकत्र काम करत आहोत.  देवेंद्र फडणवीस यांनी  नेहमी आम्हाला सकारात्मक साथ दिली. मी प्रामाणिकपणे भाजपमध्ये काम करेन. राज्यात भाजपला कशा अधिक जागा मिळतील यासाठी काम करू. मी व्यक्तिगत टीका कुणावर करणार नाही. मी कुणावर दोषारोप केलेले नाही आणि करणार नाही. पक्ष प्रवेशाची फी देखील मी बावनकुळे यांना दिलेली आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्याकडून स्वागत

आज भारतीय जनता पक्षासाठी आनंदाचा दिवस आहे. महाराष्ट्रातील अत्यंत ज्येष्ठ नेतृत्व, विधानसभा-लोकसभा ज्यांनी गाजवली, विविध मंत्रिपदं ज्यांनी भूषवलं, दोन वेळा महाराष्ट्राचं मुख्यमंत्रिपद सांभाळलं, असे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

अशोक चव्हाण यांच्या प्रवेशाने महायुतीची शक्ती भक्कम झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात विकासाचं काम करायचं आहे. त्यांनी प्रवेश करताना आपल्याला पदाची कुठलीही अपेक्षा नाही, विकासाच्या मुख्यधारेत काम करण्याची संधी द्या, असं सांगितल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

अशोक चव्हाण यांना भाजप महाराष्ट्रातून राज्यसभेवर पाठवणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय केंद्रीय नेतृत्व घेतं, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी चेंडू टोलावून दिला. अशोक चव्हाण यांची मदत कुठे घ्यायची, याची आम्हाला बरोबर माहिती आहे. त्यांच्या प्रदीर्घ राजकीय आणि प्रशासकीय अनुभवाचा फायदा करुन घेऊ, असंही फडणवीस म्हणाले.

अशोक चव्हाण काय म्हणाले?

मी राजकीय आयुष्याची पुन्हा नव्याने सुरुवात करत आहे. मी भाजप प्रवेशावेळी कुठलीही मागणी केलेली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात विकासाचं काम करण्याची माझी इच्छा आहे. आजपासूनच सकारात्मक पद्धतीने काम करायला सुरुवात करत आहे, असं अशोक चव्हाण म्हणाले.

दरम्यान, आशिष शेलार यांचा उल्लेख करताना अशोक चव्हाण यांनी अनवधानाने मुंबई भाजप ऐवजी मुंबई काँग्रेस असा केला. त्यांची चूक लगेच देवेंद्र फडणवीस यांनी सुधारली, त्यासरशी व्यासपीठावर उपस्थित भाजप नेत्यांसह खुद्द अशोक चव्हाण आणि कार्यकर्ते-पत्रकारांमध्ये एकच हशा पिकला. पहिलाच दिवस आहे. स्वीच व्हायला वेळ द्या, असं मिश्कील भाष्य करत अशोक चव्हाणांनी वेळ मारुन नेली.

 

The post अशोक चव्हाण भाजपवासी appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
https://dailyyashwant.com/ashok-chavan-joins-bjp-in-presence-of-fadnavis/4022/feed/ 0
आमचा पाठिंबा तुम्हाला; काँग्रेस आमदारांचा अशोक चव्हाणांना फोन https://dailyyashwant.com/our-support-to-you-congress-mlas-call-to-ashok-chavan/4020/ https://dailyyashwant.com/our-support-to-you-congress-mlas-call-to-ashok-chavan/4020/#respond Tue, 13 Feb 2024 06:49:16 +0000 https://dailyyashwant.com/?p=4020 मुंबई: काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये पक्षप्रवेशाच्या तयारीत असलेल्या अशोक चव्हाण यांच्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवा भूकंप येण्याची शक्यता आहे. अशोक चव्हाण  यांच्यासोबत  काँग्रेसचे अनेक आमदार फुटून भाजपमध्ये जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अशोक चव्हाण यांनी सोमवारी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर काँग्रेसच्या अनेक आमदारांनी अशोक चव्हाण यांना फोन केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अशोक चव्हाण […]

The post आमचा पाठिंबा तुम्हाला; काँग्रेस आमदारांचा अशोक चव्हाणांना फोन appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
मुंबई: काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये पक्षप्रवेशाच्या तयारीत असलेल्या अशोक चव्हाण यांच्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवा भूकंप येण्याची शक्यता आहे. अशोक चव्हाण  यांच्यासोबत  काँग्रेसचे अनेक आमदार फुटून भाजपमध्ये जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अशोक चव्हाण यांनी सोमवारी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर काँग्रेसच्या अनेक आमदारांनी अशोक चव्हाण यांना फोन केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

अशोक चव्हाण यांना मोठ्या प्रमाणावर काँग्रेस आमदारांचा गुप्तपणे पाठिंबा आहे.  या आमदारांनी अशोक चव्हाण यांना फोन केला तेव्हा सांगितले की, तुमची भूमिका योग्य आहे. आमचं तुम्हाला समर्थन आहे. पण आम्हाला आता लगेच काँग्रेस पक्ष सोडता येणार नाही. आमच्यावर पक्षांतरबंदी कायद्यातंर्गत कारवाई होऊ शकते. त्यामुळे आम्ही योग्यवेळी आम्ही तुमच्यासोबत येऊ, असा संदेश या आमदारांनी अशोक चव्हाण यांना दिल्याचे समजते. अशोक चव्हाण आज दुपारी १२ वाजता देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करतील. यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेसचे माजी आमदार अमर राजूरकरही भाजपमध्ये जातील. काँग्रेसमधील आमदारांचा एक मोठा गट भाजपमध्ये जाण्यास उत्सुक असला तरी तुर्तास ते योग्य वेळ येण्याची वाट पाहतील, असे सांगितले जात आहे. अशोक चव्हाण यांना भाजपकडून आजच राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली जाऊ शकते. त्यामुळे राज्यसभा निवडणुकीत अशोक चव्हाण गटातील आमदार महायुतीच्या उमेदवाराला क्रॉस व्होटिंग  करण्याची शक्यता आहे.

अशोक चव्हाणांमुळे तो दरवाजा उघडला

अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये जाण्याचे निश्चित केल्यामुळे काँग्रेसमधील अनेक नाराज आमदार आणि नेत्यांसाठी भाजपमध्ये जाण्याचे दरवाजे उघडे झाले आहेत. अशोक चव्हाण यांनी काँग्रेसवासियांना ही वाट मोकळी करुन दिली आहे.

काँग्रेसच्या गोटात अस्वस्थता

अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसमध्ये मोठी फूट पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेसचे दिल्लीतील वरिष्ठ नेते कामाला लागले आहेत. काँग्रेसचे अध्यक्षही सक्रिय झाले आहेत. राज्यातील  काँग्रेसच्या प्रत्येक आमदाराला फोन करुन तुम्ही भाजपमध्ये जाणार की काँग्रेसमध्ये थांबणार, याविषयी विचारले जात आहे. तुर्तास काँग्रेसच्या उर्वरित आमदारांनी वेट अँड वॉचची भूमिका घेतल्याचे सांगितले जाते

The post आमचा पाठिंबा तुम्हाला; काँग्रेस आमदारांचा अशोक चव्हाणांना फोन appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
https://dailyyashwant.com/our-support-to-you-congress-mlas-call-to-ashok-chavan/4020/feed/ 0
आजपासून नव्या राजकीय प्रवासाला सुरुवात करतोय, भाजपमध्ये जातोय: अशोक चव्हाण https://dailyyashwant.com/starting-a-new-political-journey-from-today-joining-bjp-ashok-chavan/4017/ https://dailyyashwant.com/starting-a-new-political-journey-from-today-joining-bjp-ashok-chavan/4017/#respond Tue, 13 Feb 2024 06:34:42 +0000 https://dailyyashwant.com/?p=4017 आजपासून मी माझ्या राजकीय आयुष्याची पुनश्च: नव्याने सुरुवात करत आहे. आज मी रितसर भाजपमध्ये प्रवेश करणार आहे, असे वक्तव्य राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केले. ते  मंगळवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. भाजपमध्ये पक्षप्रवेश करण्यापूर्वी घरातून निघताना अशोक चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, […]

The post आजपासून नव्या राजकीय प्रवासाला सुरुवात करतोय, भाजपमध्ये जातोय: अशोक चव्हाण appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
आजपासून मी माझ्या राजकीय आयुष्याची पुनश्च: नव्याने सुरुवात करत आहे. आज मी रितसर भाजपमध्ये प्रवेश करणार आहे, असे वक्तव्य राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केले. ते  मंगळवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. भाजपमध्ये पक्षप्रवेश करण्यापूर्वी घरातून निघताना अशोक चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट केले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांच्या उपस्थितीत मी आज भाजपमध्ये प्रवेश करेन. भाजपच्या प्रदेश कार्यालयात अन्य काही  जिल्ह्यातील संभाव्य लोकांचे पक्षप्रवेश होतील. मात्र, मी आज काँग्रेसच्या कोणत्याही आमदाराला माझ्यासोबत येण्यासाठी निमंत्रण दिलेले नाही, असे चव्हाण यांनी सांगितले. यावेळी चव्हाण यांना आज तुम्ही सत्यसाईबाबांची पूजा करताना काय मागितले, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अशोक चव्हाणांनी सांगितले की, मी घरातून बाहेर पडताना नेहमीच पूजा करतो. ही माझी रोजची सवय आहे. चांगल्या कामासाठी बाहेर पडताना ईश्वराचा आशीर्वाद घ्यायचा ही माझी नेहमीची पद्धत आहे, असे अशोक चव्हाण यांनी सांगितले.

अशोक चव्हाणांना भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी?

अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना राज्यसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. चव्हाणांच्या पक्षप्रवेशानंतर भाजपकडून लगेचच राज्यसभा उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल. अशोक चव्हाण यांच्यासोबत आज राजूरकर वगळता अन्य कोणताही विद्यमान आमदार भाजपमध्ये जाणार नाही. मात्र, राज्यसभा निवडणुकीत भाजपने चौथा उमेदवार उभा केल्यास अशोक चव्हाण गटातील काँग्रेस आमदारांकडून क्रॉस व्होटिंग होण्याची दाट शक्यता आहे. अनेक काँग्रेस आमदारांनी अशोक चव्हाण यांना फोन करुन आम्ही तुमच्यासोबत असल्याचे सांगितले. परंतु, तुर्तास आम्हाला पक्षांतरबंदी कायद्यामुळे तुमच्यासोबत भाजपमध्ये येता येणार नाही. आम्ही योग्यवेळी तुमच्यासोबत येऊ, असे या काँग्रेस आमदारांनी अशोक चव्हाण यांना सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

The post आजपासून नव्या राजकीय प्रवासाला सुरुवात करतोय, भाजपमध्ये जातोय: अशोक चव्हाण appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
https://dailyyashwant.com/starting-a-new-political-journey-from-today-joining-bjp-ashok-chavan/4017/feed/ 0
विकास ठाकरे आऊट ऑफ कव्हरेज, काँग्रेसला आणखी एक धक्का बसणार? https://dailyyashwant.com/vikas-thackeray-out-of-coverage-another-blow-to-congress/4009/ https://dailyyashwant.com/vikas-thackeray-out-of-coverage-another-blow-to-congress/4009/#respond Tue, 13 Feb 2024 02:05:43 +0000 https://dailyyashwant.com/?p=4009 नागपूर : काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह आमदारकीचा राजीनामा सोमवारी दिला. चव्हाण यांच्यासह त्यांना पाठिंबा देणारे १३ आमदारही पक्षाला अलविदा करू शकतात. या चर्चांमध्येच कॉंग्रेसचे नागपूर शहर व जिल्हाध्यक्ष विकास ठाकरे हेही आउट ऑफ कव्हरेज झाले असून, काँग्रेसचे नेते सतत त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र तसे […]

The post विकास ठाकरे आऊट ऑफ कव्हरेज, काँग्रेसला आणखी एक धक्का बसणार? appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
नागपूर : काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह आमदारकीचा राजीनामा सोमवारी दिला. चव्हाण यांच्यासह त्यांना पाठिंबा देणारे १३ आमदारही पक्षाला अलविदा करू शकतात. या चर्चांमध्येच कॉंग्रेसचे नागपूर शहर व जिल्हाध्यक्ष विकास ठाकरे हेही आउट ऑफ कव्हरेज झाले असून, काँग्रेसचे नेते सतत त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र तसे होत नाही. त्यानंतर विकास ठाकरे यांनीही काँग्रेस सोडल्याची चर्चा सुरू झाली आहे.

अशोक चव्हाण यांच्यासह सुमारे १३ नेते काँग्रेस सोडण्याच्या विचारात असल्याचा चर्चा सुरू आहे. यामध्ये आमदार विश्वजित कदम, विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, अमित देशमुख आणि धीरज देशमुख, प्रणिती शिंदे, अस्लम शेख, जितेश अंतापूरकर, सुरेश वरपुडकर, विकास ठाकरे, कैलास गौरंट्याल, संजय जगताप आदी बड्या नेत्यांचा समावेश असल्याची चर्चा आहे.

अशोक चव्हाण यांच्यासोबत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारही काँग्रेसला अलविदा करणार असल्याचा दावा केला जात होता. मात्र, याबाबतच्या चर्चेत तथ्य नसल्याचे वडेट्टीवार यांनीच स्पष्ट केलं आहे. ”अशोक चव्हाण यांचा राजीनामा धक्कादायक आहे. त्यांनी अचानक घेतलेल्या निर्णयामागील कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. त्याने माझ्याशी काहीही चर्चा केली नाही. माझे त्याच्याशी चांगले संबंध आहे. त्यामुळे मीही काँग्रेस सोडणार असल्याची चर्चा आहे. मात्र या चर्चेत तथ्य नाही”, असं विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.

The post विकास ठाकरे आऊट ऑफ कव्हरेज, काँग्रेसला आणखी एक धक्का बसणार? appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
https://dailyyashwant.com/vikas-thackeray-out-of-coverage-another-blow-to-congress/4009/feed/ 0
अजितदादा आणि अशोक चव्हाण यांची गुप्त बैठक, तिथेच सगळं ठरलं? लवांडे यांचा दावा https://dailyyashwant.com/ajitdada-and-ashok-chavans-secret-meeting-everything-was-decided-there/4006/ https://dailyyashwant.com/ajitdada-and-ashok-chavans-secret-meeting-everything-was-decided-there/4006/#respond Mon, 12 Feb 2024 16:31:46 +0000 https://dailyyashwant.com/?p=4006 राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर अशोक चव्हाण यांनी आज काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि आपल्या आमदारकीचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात भूकंप झालाय. भाजपमध्ये प्रवेश करणार नाही, असे त्यांनी थेटपणे सांगितले नसले तरी त्यांनी तसे उघड उघड संकेत दिले आहेत. राजीनाम्याची गोष्ट कधीपासून तुमच्या डोक्यात सुरू होती, असा प्रश्न ज्यावेळी पत्रकारांनी विचारला त्यावेळी सगळ्याच गोष्टी सांगायच्या नसतात, असं म्हणून […]

The post अजितदादा आणि अशोक चव्हाण यांची गुप्त बैठक, तिथेच सगळं ठरलं? लवांडे यांचा दावा appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर अशोक चव्हाण यांनी आज काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि आपल्या आमदारकीचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात भूकंप झालाय. भाजपमध्ये प्रवेश करणार नाही, असे त्यांनी थेटपणे सांगितले नसले तरी त्यांनी तसे उघड उघड संकेत दिले आहेत. राजीनाम्याची गोष्ट कधीपासून तुमच्या डोक्यात सुरू होती, असा प्रश्न ज्यावेळी पत्रकारांनी विचारला त्यावेळी सगळ्याच गोष्टी सांगायच्या नसतात, असं म्हणून त्यांनी यावर अधिकचं बोलणं टाळलं. परंतु शरद पवार गटाचे नेते विकास लवांडे यांनी अशोक चव्हाण यांच्याविषयी धक्कादायक गौप्यस्फोट केले आहेत. राजीनाम्याची बिजं कधीपासून पेरली गेली, हेच सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला.

आज माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी पक्षाचा व विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. याबाबत त्यांची अजित पवार यांच्या सोबत दि. २७ की २८ जून २०२३ रोजी मुंबईत देवगिरी या शासकीय बंगल्यावर गुप्त बैठक झाली होती. देवगिरीवर त्याच दिवशी अजितदादांनी मला बोलावून घेतले होते. दादांची माझी राजकीय सद्यस्थिती बाबत चर्चा चालू असताना अशोक चव्हाण तिथे आल्यावर मग दादांनी मला आपण नंतर चर्चा करू असे सांगितले व मी तिथून बाहेर पडलो.

त्यानंतर त्यांची दोघांची बराच वेळ बंद दाराआड चर्चा झाली होती. अजितदादा आणि अशोक चव्हाण यांचा निर्णय तेव्हाच झालेला होता. त्यानंतर लगेच दि. २ जुलै २०२३ रोजी अजितदादा मित्र मंडळ राज्य सरकार मध्ये सामील झाले. आता अशोक चव्हाण काँग्रेस मधून बाहेर पडले हे पूर्वनियोजित होते. मला त्यात धक्कादायक काहीच वाटत नाही.

ते भाजपा किंवा कदाचित अजितदादा गटात सुध्दा जातील कारण अजितदादा मित्र मंडळ आणि अशोक चव्हाण हे ईडी ग्रस्त असल्याने समदुःखी आहेत. जेल मध्ये जाण्यापेक्षा भाजपा सोबत गेलेले बरे .असे सद्या देशभर वातावरण आहे. साम दाम दंड भेद या भाजपच्या राजनीतीचे देशाला दररोज दर्शन होत आहे. सत्तेचा दुरुपयोग कसा करायचा हे भाजपाने जगाला दाखवून दिले आहे. आपली संसदीय लोकशाही आणि भारतीय संविधान धोक्यात आहे हे नक्की !

The post अजितदादा आणि अशोक चव्हाण यांची गुप्त बैठक, तिथेच सगळं ठरलं? लवांडे यांचा दावा appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
https://dailyyashwant.com/ajitdada-and-ashok-chavans-secret-meeting-everything-was-decided-there/4006/feed/ 0
भ्रष्टाचाराचा एकच नारा तुरुंगापेक्षा भाजप बरा, हा नारा अशोक चव्हाणांनी दिला; संजय राऊतांचा बोचरा वार https://dailyyashwant.com/ashok-chavan-gave-this-slogan-that-bjp-is-better-than-jail-for-the-single-slogan-of-corruption/4003/ https://dailyyashwant.com/ashok-chavan-gave-this-slogan-that-bjp-is-better-than-jail-for-the-single-slogan-of-corruption/4003/#respond Mon, 12 Feb 2024 16:22:21 +0000 https://dailyyashwant.com/?p=4003 आता नवा नारा आला आहे,  भ्रष्टाचाराचा एकच नारा तुरुंगापेक्षा भाजप बरा.  हा नारा अशोक चव्हाण यांनी दिला, अशी सडकडून टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली. शिवसेना ठाकरे गटाची जनसंवाद यात्रा छत्रपती संभाजीनगरमध्ये पोहोचली. यावेळी बोलताना संजय राऊत यांनी अशोक चव्हाणांचा चांगलाच समाचार घेतला. त्यांनी अब्दुल सत्तार यांचाही खोचक शब्दात समाचार घेतला. राऊत पुढे  म्हणाले […]

The post भ्रष्टाचाराचा एकच नारा तुरुंगापेक्षा भाजप बरा, हा नारा अशोक चव्हाणांनी दिला; संजय राऊतांचा बोचरा वार appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
आता नवा नारा आला आहे,  भ्रष्टाचाराचा एकच नारा तुरुंगापेक्षा भाजप बरा.  हा नारा अशोक चव्हाण यांनी दिला, अशी सडकडून टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली. शिवसेना ठाकरे गटाची जनसंवाद यात्रा छत्रपती संभाजीनगरमध्ये पोहोचली. यावेळी बोलताना संजय राऊत यांनी अशोक चव्हाणांचा चांगलाच समाचार घेतला. त्यांनी अब्दुल सत्तार यांचाही खोचक शब्दात समाचार घेतला.

राऊत पुढे  म्हणाले की, भारतीय जनता पार्टीला विस्मरणाचा रोग झाला आधी काय बोललो होतो ते त्यांना आठवत नाही. दोन-तीन वर्षांपूर्वी मोदींनी नांदेडमध्ये जाऊन अशोक चव्हाणांविरोधात भाषण केलं होतं. अशोक चव्हाण किती भ्रष्टाचारी आहे ते सांगितलं होतं. संजय राऊत यांनी त्याच भाषणाची क्लीप व्यासपीठावर ऐकवली. देवेंद्र फडणवीस यांनी देखील जे बोलले होते त्याची क्लिपही ऐकवली.

अब्दुल सत्तार नावाचा चोर जेलमध्ये असेल

संजय राऊत यांनी अब्दुल सत्तार यांच्यावरही तोफ डागली. अब्दुल सत्तार नावाचा चोर पुढील चार महिन्यात जेलमध्ये असेल. आपलं सरकार येईल आणि किमान 12 महिने जेलमध्ये असेल, असा इशारा राऊत यांनी दिला.

तत्पूर्वी, बोलताना माजी मंत्री चंद्रकांत खैरे यांनी सुद्धा चंद्रकांत खैरे यांच्यावर तोफ डागली. खैरे यांनी सत्तार यांच्या विरोधात ईडीकडे 17 हजार पानांचा पुरावा दिला होता तो गठ्ठा दाखवला. ईडीवर यावर कोणती कारवाई करणार आहे का? असा सवाल त्यांनी केला. भुमरे मला म्हणतात की मी काम केलं नाही. मी मंदिर उभा केलं, पण दारूची दुकाने उघडली नाही, अशी टीका करताना खैरे यांनी भूमऱ्या असा उल्लेख केला. पोलिस पालकमंत्री यांचं ऐकत असेल, तर आम्हाला कोर्टात जावं लागेल असा इशाराही त्यांनी दिला.

The post भ्रष्टाचाराचा एकच नारा तुरुंगापेक्षा भाजप बरा, हा नारा अशोक चव्हाणांनी दिला; संजय राऊतांचा बोचरा वार appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
https://dailyyashwant.com/ashok-chavan-gave-this-slogan-that-bjp-is-better-than-jail-for-the-single-slogan-of-corruption/4003/feed/ 0
सप्टेंबरमध्ये ठरलं, फेब्रुवारीत घडलं, आणखी होणार भूकंप, कुणी केला खळबळजनक दावा? https://dailyyashwant.com/it-was-decided-in-september-it-happened-in-february/4000/ https://dailyyashwant.com/it-was-decided-in-september-it-happened-in-february/4000/#respond Mon, 12 Feb 2024 14:35:58 +0000 https://dailyyashwant.com/?p=4000 हिंगोली  : शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन पक्षानंतर आता देशातील सर्वात जुना पक्ष कॉंग्रेस हा फुटीरतेच्या उंबरठ्यावर आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी अचानक पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. आपल्या आमदारकीचाही राजीनामा त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे दिला. गेले काही महिने अशोक चव्हाण पक्षात नाराज असल्याच्या चर्चा होत्या. त्यांच्यासह आणखी काही आमदार भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा होती. […]

The post सप्टेंबरमध्ये ठरलं, फेब्रुवारीत घडलं, आणखी होणार भूकंप, कुणी केला खळबळजनक दावा? appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
हिंगोली  : शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन पक्षानंतर आता देशातील सर्वात जुना पक्ष कॉंग्रेस हा फुटीरतेच्या उंबरठ्यावर आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी अचानक पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. आपल्या आमदारकीचाही राजीनामा त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे दिला. गेले काही महिने अशोक चव्हाण पक्षात नाराज असल्याच्या चर्चा होत्या. त्यांच्यासह आणखी काही आमदार भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा होती. अखेर, अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यामुळे त्या चर्चांवर शिक्कामोर्तब झाले आहे.

अशोक चव्हाण हे कॉंग्रेसमध्ये नाराज होते. पक्षात योग्य स्थान मिळत नसल्याची त्यांची खदखद होती. यातच भाजपने विरोधाकांमागे ईडी चौकशी लावल्याने अनेक विरोधक भाजपमध्ये गेले. एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आणि अजित पवार यांच्यासह 35 आमदार गेले. त्यामुळे पुढील गडांतर कॉंग्रेसवर येणार हे जवळपास निश्चित होते. यात अशोक चव्हाण यांचे नाव आघाडीवर होते.

अशोक चव्हाण यांच्या भाऊराव चव्हाण साखर कारखान्याने बुलढाणा अर्बन बँकेकडून 200 कोटींचे कर्ज घेतले होते. याच प्रकरणी कारखान्याचे कुटुंबियांची ED चौकशी होणार अशी कुजबुज होती. त्यामुळे अशोक चव्हाण यांची धास्ती वाढली होती. नागपूरचे कॉंग्रेसचे माजी आमदार आणि भाजपात प्रवेश केलेले आशिष देशमुख यांच्या घरी गणपतीनिमित्त अशोक चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली होती. सुमारे वीस मिनिटे त्यांच्यात चर्चा झाली. मात्र, या भेटीनंतर ही अचानक झालेली भेट होती अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिली होती.

माजी आमदार आशिष देशमुख यांनी दिल्लीतील हाय कमांडवर टीका केली. पक्षांचे नेते राहुल गांधी यांच्यावरही टीका केली होती. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनाही त्यांनी सोडले नाही. अशावेळी कॉंग्रेसचे कट्टर कार्यकर्ते, ज्येष्ठ नेते, आमदार अशोक चव्हाण यांनी आशिष देशमुख यांच्या घरी सप्टेंबर महिन्यात गणपतीला गेले त्याचवेळी त्यांच्याभोवती संशयाची सुई निर्माण झाली होती, अशी माहिती कॉंग्रेसच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली.

अशोक चव्हाण यांच्यासोबत किमान 11 आमदार भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर कॉंग्रेस नेते सर्व आमदारांच्या संपर्कात आहेत. 14 फेब्रुवारीला कॉंग्रेसच्या सर्व आमदारांची बैठक बोलावण्यात आली आहे. मात्र, ही बैठक होण्यापूर्वीच शिंदे गटाच्या आमदाराने आणखी एक बॉम्ब फोडला आहे. पुढील आठ दिवसामध्ये एवढा मोठा स्फोट होईल की काँग्रेस संपुष्टात येईल. काँग्रेस राहणारच नाही, असा दावा हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांनी केलाय.

The post सप्टेंबरमध्ये ठरलं, फेब्रुवारीत घडलं, आणखी होणार भूकंप, कुणी केला खळबळजनक दावा? appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
https://dailyyashwant.com/it-was-decided-in-september-it-happened-in-february/4000/feed/ 0