Amit Shah Archives - Dainik Yashwant, Latur https://dailyyashwant.com/tag/amit-shah/ Online Portal Mon, 12 Feb 2024 09:00:04 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.4 15 फेब्रुवारीच्या मुहूर्तावर अमित शाहांच्या उपस्थितीत अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार, केंद्रात मोठं पद मिळण्याची शक्यता https://dailyyashwant.com/ashok-chavan-will-join-the-bjp-in-the-presence-of-amit-shah-on-february-15/3969/ https://dailyyashwant.com/ashok-chavan-will-join-the-bjp-in-the-presence-of-amit-shah-on-february-15/3969/#respond Mon, 12 Feb 2024 09:00:04 +0000 https://dailyyashwant.com/?p=3969 मुंबई: राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे बडे नेते अशोक चव्हाणांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्याने राज्यात राजकीय भूकंप झाल्याचं चित्र आहे. अशोक चव्हाण आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह  यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. अमित शाह हे 15 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून त्यावेळी अशोक चव्हाण हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. अशोक चव्हाणांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा […]

The post 15 फेब्रुवारीच्या मुहूर्तावर अमित शाहांच्या उपस्थितीत अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार, केंद्रात मोठं पद मिळण्याची शक्यता appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
मुंबई: राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे बडे नेते अशोक चव्हाणांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्याने राज्यात राजकीय भूकंप झाल्याचं चित्र आहे. अशोक चव्हाण आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह  यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. अमित शाह हे 15 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून त्यावेळी अशोक चव्हाण हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

अशोक चव्हाणांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून ट्विटरच्या माध्यामातून ही माहिती दिली. तसेच भोकर विधानसभेच्या आमदारकीचाही त्यांनी राजीनामा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडे सोपवल्याचं सांगितलं.

गेल्या आठवड्यात अमित शाहांची भेट घेतली

गेल्या आठवड्यात अशोक चव्हाण यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे. त्याचवेळी राजीनामा देण्याविषयी चर्चा झाली. त्यानंतर आता अशोक चव्हाणांनी आपला राजीनामा दिला आहे. केंद्रीय नेतृत्वाच्या उपस्थितीत आपला पक्षप्रवेश व्हावा अशी इच्छा अशोक चव्हाण यांनी व्यक्त केल्याची माहिती आहे. त्यामुळे येत्या 15 फेब्रुवारी रोजी अमित शाह हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असताना अशोक चव्हाण यांचा भाजप प्रवेश होणार असल्याची माहिती आहे.

केंद्रात मोठं पद मिळण्याची शक्यता 

राज्यात मुख्यमंत्री राहिलेल्या अशोक चव्हाण यांना भाजप प्रवेश केल्यानंतर त्यांना केंद्रात मोठं पद मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यासाठी त्यांना राज्यसभेवर घेतलं जाणार असल्याची चर्चाही आहे. त्याचमुळे त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला.

महाराष्ट्र काँग्रेसमध्ये भूकंप

अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठा भूकंप झाल्याचं दिसतंय. त्यांच्यासोबत काही आमदार भाजपमध्ये जाणार आहेत. विधानपरिषदेचे माजी आमदार अमर राजूरकर यांनीही काँग्रेसच्या पदाचा राजीनामा दिला आहे. अमर राजूरकर हे अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय आहेत. त्याचवेळी मुंबई काँग्रेसमध्येही अस्वस्थता असल्याचं काँग्रेस नेते भाई जगताप यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्याची चर्चाही होतेय.

The post 15 फेब्रुवारीच्या मुहूर्तावर अमित शाहांच्या उपस्थितीत अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार, केंद्रात मोठं पद मिळण्याची शक्यता appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
https://dailyyashwant.com/ashok-chavan-will-join-the-bjp-in-the-presence-of-amit-shah-on-february-15/3969/feed/ 0
रथात स्वार असलेले अमित शहा बालंबाल बचावले; चौकशीचे आदेश https://dailyyashwant.com/amit-shah-riding-in-the-chariot-escaped-unhurt-order-of-inquiry/2658/ https://dailyyashwant.com/amit-shah-riding-in-the-chariot-escaped-unhurt-order-of-inquiry/2658/#respond Wed, 08 Nov 2023 09:50:09 +0000 https://dailyyashwant.com/?p=2658 जयपूर: राजस्थानात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सत्ताधारी काँग्रेस विरुद्ध भारतीय जनता पक्ष अशी थेट राजस्थानात आहे. स्टार प्रचारकांच्या सभा, रॅलींना सुरुवात झाली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मंगळवारी प्रचारासाठी राजस्थानच्या नागौर जिल्ह्यात पोहोचले. त्यावेळी भाजपच्या प्रचार रथाची वरील भाग विजेच्या तारेच्या संपर्कात आला. सुदैवानं अमित शहा थोडक्यात बचावले. केंद्रीय मंत्री अमित शहांचा ताफा बिदियाद […]

The post रथात स्वार असलेले अमित शहा बालंबाल बचावले; चौकशीचे आदेश appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
जयपूर: राजस्थानात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सत्ताधारी काँग्रेस विरुद्ध भारतीय जनता पक्ष अशी थेट राजस्थानात आहे. स्टार प्रचारकांच्या सभा, रॅलींना सुरुवात झाली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मंगळवारी प्रचारासाठी राजस्थानच्या नागौर जिल्ह्यात पोहोचले. त्यावेळी भाजपच्या प्रचार रथाची वरील भाग विजेच्या तारेच्या संपर्कात आला. सुदैवानं अमित शहा थोडक्यात बचावले.

केंद्रीय मंत्री अमित शहांचा ताफा बिदियाद गावातून परबतसरच्या दिशेनं जात होता. एका गल्लीतून ताफा जात होता. गल्लीच्या दुतर्फा दुकानं आणि घरं होती. त्यावेळी रथाचा वरचा भाग तारेच्या संपर्कात आला. त्यामुळे स्पार्किंग झालं. विजेची तार रस्त्यावर पडली. त्यानंतर रथामागील अन्य वाहनं लगेचच थांबली. वीज पुरवठा तातडीनं खंडित करण्यात आला. त्यामुळे जीवितहानी टळली. घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.

यानंतर अमित शहांना दुसऱ्या वाहनातून परबतसरला नेण्यात आलं. तिथे त्यांनी रॅलीला संबोधित केलं. या घटनेच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी जयपूरमध्ये पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी बोलताना त्यांनी चौकशीचे आदेश दिल्याची माहिती दिली.

राजस्थानात २५ नोव्हेंबरला विधानसभेच्या २०० जागांसाठी एका टप्प्यात मतदान होणार आहे. निवडणुकीचा निकाल ३ डिसेंबरला जाहीर होईल. याच दिवशी मध्य प्रदेश, छत्तीसगढ, तेलंगणा आणि मिझोरम विधानसभा निवडणुकांचा निकालही जाहीर करण्यात येतील. राजस्थानमध्ये काँग्रेस अशोक गेहलोत यांच्या नेतृत्त्वाखाली निवडणुकीत उतरली आहे. तर भाजपनं अद्याप तरी मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर केलेला नाही.

The post रथात स्वार असलेले अमित शहा बालंबाल बचावले; चौकशीचे आदेश appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
https://dailyyashwant.com/amit-shah-riding-in-the-chariot-escaped-unhurt-order-of-inquiry/2658/feed/ 0